समायराने रजनीला टाळण्यासाठी म्हटलं, पण खरोखरच तुषारचा फोन 📳आला...
समायराने फोन📳 लावताच तुषार फोनवरच हमसून हमसून रडायला😭 लागला....
तुषारचं रडणं पाहून समायरादेखील खूप घाबरली....
समायरा : तुषार !! तू आधी रडणं 😭थांबव पाहू...
तुषार : समायरा !!😰😰 संपलं सगळं....
समायरा : तुषार !! तू शांत हो आधी.... मला नीट सांग काय घडलं ते....
तुषारने घडलेला सर्व प्रकार समायराला सांगितला....
समायरा : 😳 असं सगळं घडलं तर.... खरंच आपण इतका पुढचा विचार केलाच नाही... तुषार !! तू नको काळजी करू.... हे बघ आपलं मन साफ आहे.... त्यामुळे आपल्यासोबत काहीच वाईट घडणार नाही....
तुषार : समायरा !! ते सगळं खरं आहे गं पण माझ्या आईला या प्रकरणाने खूप मोठा धक्का बसला आहे गं... मी सगळं काही सहन करू शकतो पण माझ्या आईचा माझ्यावरचा राग कसा दूर करू....
समायरा : तू समजावून सांग ना त्या नक्कीच ऐकतील....
तुषार : समजावून सांगायला तिने माझ्याशी बोलायला पाहीजे ना.... तिने तर माझ्याशी अबोला धरला आहे....
समायरा :अच्छा असं आहे तर....
समायरा मॅम ऑफिसला लॉक लावायचं आहे..दरवाजा जवळून गणेशचा आवाज आला....
समायरा लागलीच पर्स 👜घेऊन निघाली तीचे फोन वर तुषारशी बोलणे चालू होते....
आशिषने ठेवलेला गुप्तहेर समायराच्या मागे जात होता... आज समायरा एकटीच कशी काय म्हणून तो जरा संभ्रमात होता.....
समायरा जिथे जाईल तीचा पाठलाग तिचा पाठलाग करू आपोआपच तुषारचा पत्ता मिळेल असा विचार करून तो गुप्तहेर तीचा पाठलाग करू लागला.
कुणीतरी आपला पाठलाग करत आहे हे तिच्या ध्यानातच नाही आले.... तुषारशी बोलून झाल्यावर समायराला लागलीच टोनीचा फोन 📳आला....
समायरा : हॅलो टोनी !!मी कालच्या कॉफी शॉप जवळ पोहोचत आहे... तू पण येशील का प्लीज??
टोनीला समायराच्या बोलण्यात टेन्शन जाणवले....
टोनी :समु !!काय झाले आहे?? Is everything fine??
समायरा : आपण भेटून बोलू.....
ok ok.... मी पोहोचतोच पाच मिनिटात तितक्याच काळजीने टोनी म्हणाला....
समायरा : आरामशीर ये.... घाई करू नकोस....
थोडं पुढे गेल्यावर समायराला आपला कुणीतरी पाठलाग करत आहे याची जाणीव झाली.... समायराने फोन📳 वर बोलण्याचे नाटक करत मागे वळून बघितलं तर तीला कुणीच दिसलं नाही....
समायरा कॉफी शॉप जवळ पोहोचली...
टोनीने त्याची कार 🚗साईडला लावली होती... टोनी कार मध्येच बसून होता.... त्याने देखील सामायराच्या मागे पाठलाग करणाऱ्याला बघितले... त्याला आधल्या दिवशी देखील बघितल्या सारखे वाटत होते....
समायराने टोनीची गाडी शॉप च्या विरुद्ध दिशेने असल्यामुळे बघितली नाही... समायराच्या मागे कुणीतरी येत आहे अशी शंका आल्याने टोनी तिथेच बसून राहिला....
कॉफी शॉप च्या गेट च्या आत मध्ये समायरा गेली तर ईकडे तिकडे बघून गुप्तहेर देखील मध्ये घुसायचा प्रयत्न करू लागला.. ....
आता मात्र टोनी चा पारा 😡चढला....टोनी ने मागून जाऊन त्या गुप्तहेराला बाहेरच पकडलं....
टोनी : कालपासून बघत आहे तू समायराचा पाठलाग करत आहॆस....
गुप्तहेर🕵️♂️ : कोण समायरा?? आणि मी कशाला कुणाचा पाठलाग करू...
टोनी : हो!!... मग ईथे तू काय करायला आला आहॆस?? ...
गुप्तहेर🕵️♂️ त त प प करू लागला....
टोनी :बऱ्या बोलाने सांग, नाहीतर एक ठोसा 👊लगावतो....
गुप्तहेर🕵️♂️ : नाही नाही नको मारू मला.... म्हणून तो पळण्याचा🏃♂️ प्रयत्न करू लागला....
टोनीने पुन्हा त्याला पकडलं आणि एक ठोसा👊 लगावला....
तितक्यात ती मारामारी बघून हॉटेल चे दोन सिक्युरिटी 👮♂️👮♂️गार्ड पळत आले.... आणि टोनीला म्हणाले सर याला आमच्या ताब्यात द्या... आम्ही याची बघतो...
टोनी :बघ देऊ का ताब्यात.... सांग लवकर कुणी पाठवलं??
गुप्तहेर🕵️♂️ : सांगितलं तर मला सोडणार ना??
टोनी : खरं सांगितलं तर सोडेन... नाहीतर यांच्या ताब्यात देईन....
गुप्तहेर🕵️♂️ : आशिष सरांनी....
टोनी :काय?? 😳🤔
गुप्तहेर🕵️♂️ :आशिष सरांनी तुषार आणि समायराची माहीती काढायला सांगितली....
टोनी :अच्छा, असं आहे तर... ठीक आहे आता तू जा... आशिष दादा ला काहीच सांगू नकोस.... सांगितलं तर याद रख... मी आहे अन तू आहे... आशिषदादाला काय सांगायचे हे मी तूला नंतर सांगेनच.... चल निघ आता....
टोनीला असं वाटलं की आशिषला तुषार आणि समायराच्या लग्नाबद्दल काहीतरी संशय आला असावा म्हणून त्याने गुप्तहेर 🕵️♂️लावला असावा....
इतकं सगळं घडल्यावर टोनी कॉफी शॉप मध्ये गेला... समायरा खूप टेन्शन मध्ये दिसत होती.... टोनी समायराच्या जवळ येताच
समायरा :टोनी !! किती उशीर 😡
टोनी : अगं मी मघाशीच आलो.... पण मला वाटलं तू पोहोचली नसशील म्हणून मी बाहेरच वाट पहात होतो.... मग ते सिक्युरिटी👮♂️👮♂️ गार्ड बाहेर आल्यावर कळालं...
समायरा :काय कळालं?? ..
टोनी :ते मला म्हणाले त्या कालच्या मॅडम आतमध्ये आलेल्या आहेत... मग मी धावत पळत आलो... किती लक्ष असतं नाही त्यांचं....
बाहेर काय घडलंय याची समायराला काही चाहूल लागली आहे का याचा टोनीने अंदाज घेतला....
टोनी :समु !! बोल बरीच टेन्शन मध्ये दिसत आहॆस... काय झालं??..
समायरा :तुषारचा फोन 📳आला होता... असं सांगून नेमकं काय घडलं हे सगळं समायरा टोनीला सांगत होती...
टोनी :बापरे 😳 असं घडून गेलं तर.... खूप चुकीच्या पद्धतीने तुषारच्या आईसमोर हे आलं.... समु!!अगं आई आहे ती... ती तुषारला समजून घेईल....
समायरा : समजून घ्यायला त्या बोलायला पाहीजे ना.... त्यांनी अबोला धरला आहे... त्यांनी खूप मनाला लाऊन घेतलं आहे.... साहजिकच आहे ना... एकुलता एक तुषार त्याच्या साठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं... आणि त्यांच्या नजरेत तुषारने अपराध केला आहे.... मला तर काहीच समजत नाही😒...
ईकडे तुषार, तीकडे नलिनी आणि आता मलाही असं वाटायला लागलं की मी माझ्या आई वडिलांना तरी सांगून द्यावं.... नाहीतर असं पुन्हा काही घडलं तर मी देखील स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही.....
टोनी : हे बघ समु !!असं टेन्शन घेऊन चालणार नाही.... हे तर खरं आहे की ज्या गोष्टीची सुरवात खोट्याने होते त्यांना असा काहीसा त्रास होतो...पण माझं ऐक.... आपण एक एक गोष्ट आधी निस्तरू....
समायरा :म्हणजे??
टोनी : आधी तुषार आणि त्याच्या आई मध्ये सगळे ठीक करू.... एकदा ते झाले की मग नलिनी....आणि हे व्यवस्थित झाले की तू तुझ्या घरी सांग.... म्हणजे एकावेळी एक गुंता सुटेल...
समायरा : ठीक आहे तू म्हणशील तसं.... माझं तर डोकंच काम करत नाहीये😒😇....
टोनी : आता just chill... मी आज कोल्ड कॉफी मागवतो.... तुषारच्या बाबतीत आजच सगळं घडलं आहे.... त्या मुळे सगळं वातावरण तिकडे खूप गरम असेल.... त्याला थोडं थंड होऊ दे... मग आपण बोलू...
असंही आता कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल...
मी रात्री तुषारला फोन करतो त्याला बोलतो तो नक्कीच रिलॅक्स होईल....
समायरा टोनीशी बोलून रिलॅक्स झाली.... आता काहीतरी व्यवस्थित होईल असा विश्वास तीला वाटायला लागला...
भाग 57 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
8 टिप्पण्या
Mst ch
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा1no.😊😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाBhag 58 nai disat....pls sangana to post nai kela ka
उत्तर द्याहटवाBhag 58 nai disat....pls sangana to post nai kela ka
उत्तर द्याहटवाBhag 58 nai disat....pls sangana to post nai kela ka
उत्तर द्याहटवाकेला, अपलोड करायला उशीर झाला
हटवा