टोनी आणि समायरा, काय करायचे?? असा विचार करू लागले....
टोनी :समु !!तू काळजी करू नकोस.... आपण यातून काही ना काही मार्ग काढू... फक्त आजचा दिवस जाऊ दे...
समायरा :ठीक आहे, मला घरी सोड ना... आज कशातच मन लागत नाहीये...
टोनी :😳 एकदम डायरेक्ट घरी??
समायरा : म्हणजे नेहमी सोडतो तिथे....
टोनी :हं...
रस्त्याने मात्र समायरा आणि टोनी एक शब्दही बोलले नाहीत...
टोनीला उटीमध्ये तुषारने सगळं आपल्याला सांगितलं... म्हणून आज समायरा👩❤️👨 माझ्यासोबत आहे... त्याने त्यावेळेस तोच दोषी असल्याचं भासवलं होतं.... त्याला लवकरात लवकर या दुःखातून बाहेर काढावे लागेल.....
तर समायरा, आज पप्पाला सांगूनच टाकते सर्व.... मग जे व्हायचे ते होईल पुढे बघता येईल.... पण हे खोट्याचे ओझे किती वेळ सहन करायचे आणि अश्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी घडायला लागल्यावर.... आपल्याला कुठे माहिती होतं की नौकरीसाठी बोललेलं एक खोटं कुणाचं तरी सगळं आयुष्य उध्वस्त करेल....
आता कुठे तरी जगावेसे वाटत आहे... पण या अश्या गोंधळाने भलतं सलतं काही घडलं तर 🤔... नाही नाही नको मी इतका मोठा trauma मी सहन करू शकणार नाही... पप्पा माझं ऐकतात एकदा बाबाना सांगून तर बघू...फार तर फार मला रागावतील, पण ते नक्कीच मला समजून घेतील....
टोनीने गाडी 🚗थांबवली.... समायरा गाडीतून उतरली....
दोघेही विचारात मग्न असल्याने दोघांनीही एकमेकांना बाय केले आणि समायरा घराकडे निघाली....
घरी पोहोचल्या पोहोचल्या समायरा तिच्या पप्पाना शोधू लागली....
समायरा :आई !!बाबा कुठे आहेत गं??
समायराची आई : अजून कुठे असणार... त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी... परसबागेत....झाडांना पाणी घालत आहेत...
समायराने हीच बाबाशी बोलण्याची योग्य वेळ आहे... असा विचार करून परसबागेत गेली....
समायराचे बाबा :अरे, आलीस का समु बेटा... बोल काय बोलायचे आहे तूला??
समायरा : बाबा !!😳तुम्हाला कसं कळालं की मला काही बोलायचं आहे...
समायराचे बाबा : बेटा !!तुझं असं ऑफिस मधून डायरेक्ट मला शोधत येणं.... तुझी सवय मला माहीती आहे...
समायरा :बाबा !!you are simply great.... बाबा मला एक गोष्ट सांगा...
समायराचे बाबा : काय??
समायरा : जर कुणी कुणाचं भलं होत असेल म्हणून खोटं बोललं असेल किंवा बोलत असेल तर ते चुकीचं आहे की बरोबर??
समायराचे बाबा : हे बघ बेटा !!खोटं ते खोटं... मला तू सांग एखाद्या माणसाने जर चोरी केली आणि त्याचं घर चालवलं तरी चोरी ती चोरीच झाली ना....
बाबा !!मग तर तुमच्या नजरेत मी गुन्हेगार ठरते.... असं म्हणून समायरा हुंदके देऊन रडायला 😭लागली....
समायराचे बाबा : समु बेटा !! इतकं काय झालं?? 🤔....
समायराने सांगायला सुरुवात केली.... बाबा आम्हाला अश्या प्रकारे नौकरी मिळाली....
समायराचे बाबा :😳 काय? अगं कळतं का तूला?? उद्या ऑफिसच्या बॉसला कळालं तर तूझ्यावर फसवणूक केल्याची केस करतील ना.... आणि तूला कुणी सांगितलं असा वेडेपणा करायला....
समायरा :बाबा !!मला अजून कुठले दुसरे ऑपशन समोर दिसले नाही.... आणि मार्थाच्या मुलाला सुहासला सगळं माहिती आहे....
समायराचे बाबा : तुझ्या आईला कळाल्यावर केवढा मोठा धक्का बसेल कळतंय का तूला....
समायरा : बाबा !! म्हणूनच मी मोठया आशेने तुमच्याकडे आले आहे.... तूम्ही मला समजून घ्याल...
समायराचे बाबा :बेटा !!पण खरंच मला हे आवडलं नाही.... तू हे करण्याआधी एकदा तरी मला सांगायला हवं होतं....
समायरा : बाबा!! अमोघची फीस पूर्ण भरणं हेच माझं लक्ष होतं.... मला माहीती होतं मी तुम्हाला विचारलं असतं तर तूम्ही मला कधीच होकार दिला नसता.... पण ईथे मी आणि तुषार सारख्यच अडचणीत सापडलो होतो...
समायराचे बाबा :हा तुषार म्हणजे तूझा तथाकथित नवरा का??
समायरा : हो...
समायराचे बाबा : पण आज तूला मला का सांगावेसे वाटले....
समायरा : बाबा आज त्याच गोष्टीचा एक खूप मोठा दुष्परिणाम दिसून आला आहे... तेही कश्यात काही नसताना...
समायराचे बाबा : म्हणजे?? 🤔
समायरा :तुषारचे लग्न मोडले....
समायराचे बाबा : 😳 ते कसेकाय??
समायराने तिच्या बाबांना उटीप्रकरण सांगितले....
ते ऐकल्यावर समायराच्या बाबांनी एकदम डोकयावर हात मारून घेतला 🤦♂️
समायराचे बाबा :अगं किती कॉम्प्लिकेशन्स करून घेतले आहेत हे.... आणि उटीला हनिमून पॅकेज म्हणून गेलात 🤦♂️
समायरा : बाबा !! खरंच आम्ही खूप साफ मनाने केलं हे...तुषारला त्याच्या आईच्या उपचारासाठी आणि मला अमोघ ची फीस भरण्यासाठी... पण तेव्हा वाटलं नाही की इतके सगळे प्रॉब्लेम्स येतील.....
समायराचे बाबा :पण बेटा तू विचार कर... आज जे तुषारच्या बाबतीत घडलं आहे... तेच जर तुझ्या बाबतीत घडलं असतं तर?? आम्हाला केवढा मोठा धक्का बसला असता....
समायरा :सॉरी ना बाबा !!आमचं खूप चुकलं... मला माफ करा...
समायराचे बाबा :अगं समु बेटा!! आम्हाला असं वाटतं की तू आणि अमोघ आमच्या छत्रछायेखाली असावं... कुठल्याही दुःखाची झळ तुमच्यापर्यंत पोहोचू नये....
समायरा : माझं चुकलं.. आता मी काय करू😢...
आज बापलेकीच्या गोष्टी संपत नाहीत वाटतं.... मागून समायराच्या आईचा आवाज आला
समयराने आईच्या न कळत डोळे पुसले.....
समायराचे बाबा : काही नाही गं कुसुम!!.. तिच्या ऑफिसच्या गोष्टींचा आढावा घेत होतो....समायराचे बाबा देखील आज तिच्या आईला खोटं बोलले....
समायरा आणि तीचे बाबा घरात गेले... मध्ये सगळे हलके फुलके वातावरण होते...
पण खरं पाहायला गेलं, तर समायराचा ताण थोडा कमी झाला होता पण तिच्या बाबांचा ताण वाढला होता.....
समायराच्या अश्या वागण्यामागे आपली आर्थिक परिस्थिती जबाबदार ही गोष्ट त्यांना असह्य झाली होती...त्यांना हरल्यासारखे झाले होते....
ईकडे नलिनी नुसतीच रडत😭 होती.... ऐनवेळी आलेल्या रवीला ती मनोमन शिव्या देत होती...
नलिनीचे बाबा : नलिनी !!असं कसं गं, तूम्ही आता एकाच ऑफिसमध्ये आहात ना... मग त्या तुषारचे लग्न झाले आहे हे तूला कसे नाही कळाले...
नलिनी : बाबा !!त्याचे लग्न झालेले नाही हो....
नलिनीचे बाबा :पुन्हा तेच.... इतकं भोळं असून चालत नाही...
नलिनी : आता तूम्हाला कसं सांगू बाबा??
नलिनीचे बाबा : मला तू काहीच नको सांगू.....तूम्ही पोरी कश्या वर पण आंधळा विश्वास ठेवता....
नलिनी ते ऐकून निरुत्तर झाली... आज आपलं बाबा काही एक ऐकणार नाही हे तिच्या लक्षात आलं.....
.
तुषारच्या घरी देखील एकदम सुतकी वातावरण असल्यासारखं होतं.. .
तुषारची आई रूम मध्ये जाऊन उपाशीच झोपी गेली.... तुषारने खिचडी केली आणि आई उठायची वाट बघून तो देखील तसाच डायनिंग टेबलवर बसल्याजागी झोपी गेला....
क्रमश :
भाग 58 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
Mast
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा