टोनी हॉस्पिटलला 🏥पोहोचला... तुषार स्पेशल वॉर्डच्या बाहेरच बसला होता.... त्याची आई काहीच खात पीत नव्हती...
टोनीला बघताच तुषारच्या डोळ्यात आपोआपच अश्रू😢 तरळले....
टोनी : तुषार !! Is everything ok?? काय झालं तू असा उदास 😒का आहॆस??
तुषार :आईची तब्येत छान आहे पण ती काहीच खात पीत नाही... ती dibetic आहे... अश्याने तीची तब्येत अजून बिघडेल....
टोनी : तुषार !!हे बघ तू असा हतबल होऊ नकोस?? मी काकुंशी बोलून बघतो....
तितक्यात तुषारचा फोन 📳खणखणला... तुषारच्या काकाचा फोन होता....
तुषार : काका?? आता मी यांना काय उत्तर देऊ??
टोनी : सध्या सरळ फोन ब्लॉक कर... काहीच बोलू नकोस... तुझ्या काकाबद्दल थोडी आयडिया समायराने मला दिली आहे.... आधी तुझ्या आईचा राग शांत करू मग या काकाला बघता येईल...
चल मी काकूंना भेटतो...
टोनी : नमस्कार काकू !! मी टोनी... तुषारच्या बॉस मार्थाचा मुलगा....
तुषारची आई : ये बेटा, बस....
टोनी : काकू आता कशी तब्येत आहे तूमची?? मला खास माझ्या आईने तुमच्या तब्येतीची विचारपूस करायला पाठवलं आहे....
तुषारची आई : काही नाही रे, थोडी साखर कमी झाली होती... ते डॉक्टर जरा जास्तच करतात.... सुट्टी द्यायचीना आता... उगाचच बिल वाढवायची कामे...
टोनी : काकू !! तुषार सांगत होता की तूम्ही काहीच खात पीत नाहीयेत अश्याने तूमची तब्येत बरी कशी होणार??
तुषारची आई : मग त्याने तूला हे नाही सांगितले का मी अशी का वागत आहे ते 😠
टोनी : काकू !! त्याचं जाऊद्या मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो...
मी अमेरिकेला जाण्याआधीची गोष्ट आहे... माझ्या डॅडचे निधन झाल्यावर सगळी जबाबदारी माझ्या मॉमने घेतली.... तिने दिवसरात्र एक करून खूप कमाई केली... आम्ही आधी ऑफिसची कमाई दरमहिन्याला बँकेत टाकत होतो... त्या प्रमाणे यावेळेस देखील नेहमी जसे डॅड जायचे तसे आई जाणार होती....
पण काय झालं माझ्या मॉमला काही दिवसापासून धमक्यांचे फोन येत होते.... मॉमने सुरवातीला ते उचलले... पण नंतर त्यांचे फोन तिने ब्लॉक करून टाकले... ती कुणालाच भीत नव्हती.....
मग ते धमकीचे फोन त्या गुंडानी लँडलाईन वर सुरु केले...
असाच एक फोन मी योगायोगाने इंटरकॉम वर उचलला... आणि मी त्यांची धमकी ऐकली... नेहमीप्रमाणेच माझ्या आईने त्यांना थोडं कडक बोलून फोन ठेवून दिला...
पण मी तो चालूच ठेवला होता आणि त्यांचाही receiver बरोबर ठेवला गेला नसल्याने मला त्यांच्यातल संभाषण आता क्लिअर ऐकू येत होतं... मॉम ऐकत नाही म्हणून ते पैसे घेऊन त्यांनी मॉमला मारायचा प्लॅन केला....
ईकडे मॉम देखील काही एक ऐकायला तयार नव्हती... मग ऐनवेळी मॉम त्या गुंड असलेल्या रस्त्याला लागणार की मी ड्रायव्हरला फोन📳 करून गाडी 🚗वळवायला सांगितली आणि मॉमला सांगितलं की बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे...
.गाडी घरी आल्यावर तिच पैश्यांची बॅग घेऊन मी मोटरसायकलवर बँकेत पैसे घेऊन गेलो....
पण मी खोटं बोलल्याने माझ्या मॉमने माझ्याशी काही दिवस बोलणं सोडलं....
तुषारची आई : पण, तू जे केलेस तुझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी केलं... मग तू त्यांना पटवून सांगितले नाहीस का??
टोनी :कसं पटवून सांगणार?? तिने माझ्याशी अबोला धरला होता ना.... आता तूम्ही जसा तुषारसोबत धरला आहे तसा...
तुषारची आई : तुझी आणि त्याची गोष्ट वेगळी आहे...
टोनी तुषारच्या आईसमोर बसला त्याने तुषारच्या आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला.. ... काकू !! तुषारने काय वेगळं केलं तूम्ही सांगाना, तो खोटं बोलला कारण त्याला नौकरीची अत्यंत आवश्यकता होती... ती कशासाठी होती... तर तुमच्या औषधंउपचाराच्या खर्चासाठी... त्याने स्वतःला पणाला लावलं कशासाठी?? तुमच्यावर त्याचे प्रचंड प्रेम आहे म्हणून.... मग तूम्ही त्याला माफ नाही करणार का?? तुम्हाला काय वाटतं?? 🤔 कालपासून फक्त तुम्हीच उपाशी आहेत का?? तुषार देखील....
ते ऐकून तुषारच्या आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू😭 वाहायला लागले....
टोनी : काकू !! समायरा माझी प्रेयसी आहे... माझा या दोघांवर खूप विश्वास आहे.... तुषारचं नलिनीवर खूप प्रेम आहे... फक्त वेळ चुकीची असल्याने आणि परिस्थितीमुळे हे सगळं घडलं आहे... आता तूम्ही तुषारवरचा राग सोडा.... म्हणजे सगळं काही लवकरच ठीक होईल....
टोनीने ज्या पद्धतीने तुषारच्या आईला समजावून सांगितले होते... तुषारच्या आईला ते आता पूर्णपणे पटले होते....
तुषारची आई : तुषार !! तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले..
तुषार :आई !!मला माफ कर गं... मला चुकूनही वाटले नाही की नौकरीसाठी बोललेलं खोटं अश्या पद्धतीने तुझ्या समोर येईल... मी तूला सांगितलं असतं... पण तू मला मग ती नौकरी करू दिली नसती... अचानक आधीची नौकरी गेल्यामुळे मला असं वागावं लागलं....
तुषारची आई : हो रे बाळा !!काय करू?? माझ्यासमोर ज्या पद्धतीने हे सत्य आले... मला तर राग येणारच...
तुषार : हो आई !!तुझं एकदम खरं आहे... सॉरी आई...
टोनी : चला म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पटलं तर..आता तूम्ही दोघेही जेवण करा मी छान जेवण ऑर्डर करतो... आणि काकू आता सगळे उपचार वेळेवर घ्या... म्हणजे डॉक्टर तूम्हाला संध्याकाळी घरी सोडतील...
तुषारची आई : हो बेटा... मार्था कश्या आहेत...
टोनी :मॉम छान आहे... चला निघतो मी... काळजी घ्या...
तुषारची आई : हो बेटा घेते मी काळजी....
तुषार :आई !!मी टोनीला बाहेर gate वर सोडून येतो... तसंही फूड पार्सल येईल ना आलं की घेऊनच येतो...
असं म्हणून दोघेही स्पेशल रूमच्या बाहेर पडले
तुषार : टोनी थँक्स यार, तू आला नसतास तर माझ्या आईचं काय झालं असतं काय माहीती....
टोनी : बस क्या?? अरे तू सुद्धा तूझ्या नौकरीची पर्वा न करता मला समायरा बद्दल सांगितलं होतं ना...
तुषार : ते तर माझं आद्यकर्तव्य होतं ... मी तिच्या आयुष्याचा खेळ कसा होऊ दिला असता...
टोनी : मग हे ही माझं आध्यकर्तव्य आहे असं समज...
तुषार : हं....
टोनी :चल निघतो मी....समायरा पण तुझी काळजी करत असेल... तिला आता फोन📳 करून सांगतो.... तेवढंच मला तिला फोन📳 करण्यासाठी कारण😉...
असं म्हणून टोनी तिथून निघून गेला...
ईकडे आशिषला गुप्तहेरा कडून आता फक्त टोनी सांगेल इतकीच तुषारची माहिती मिळत होती...
तुषारची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्यामुळेच तुषार आज ऑफिसला जाऊ शकला नाही... तो शहीद फौजीचा मुलगा आहे... इतकीच माहिती तो गुप्तहेर आशिषला देऊ शकला....
टोनीने गुप्तहेराला तुषार किंवा समायराचा पिच्छा करायचा नाही अशी वॉर्निंग दिली होती...
भाग 60 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
6 टिप्पण्या
Chan 👌👌. Khup ranjak hot ahe gost..
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNext part please 60
उत्तर द्याहटवाहो आज पोस्ट करेन
हटवाधन्यवाद
हटवाछान,, पुढचा भाग वाचायची उत्सूकता खूप वाढली
उत्तर द्याहटवा