किती सांगायचं मला (भाग 60)

घरी पोहोचल्या पोहोचल्या टोनी ने समायराला फोन 📳लावला... 

समायराने फोन बघितला.... टोनीचा फोन आणि आता?? 

समायरा : हॅलो, बोला सुहास सर.... 

टोनी :सुहास सर?? 🤔आजूबाजूला कुणी आहे का?? 

समायरा : हो, एक मिन,  नेटवर्क थोडं बरोबर येत नाही... मी जरा नेटवर्क एरिया मध्ये जाते.... 

असं म्हणून समायरा तिच्या परसबागेत आली.... 

टोनी : समु !! तुषारच्या आईची आता तुषारवरची नाराजी पूर्णपणे दूर झाली.... त्यांनी त्याला समजून घेतलं.... 

समायरा : वा👏👏.... ही छान बातमी आहे.... असच आता नलीनीच्या बाबांनी समजून घेतलं तर ते पुन्हा एकत्र  येतील.... 

टोनी : हो... खरं आहे तुझं.... 

समायरा : बरं टोनी !! मला काल पासून एक प्रश्न फार सतावत आहे? 

टोनी : कुठला?? 🤔

समायरा : आपण कॅफे मध्ये भेटण्या ऐवजी तू मला रोज🌹 गार्डनला बोलावलं.... मला थोडं विचित्र वाटलं.... 

टोनी : समु !!  हुशार आहॆस गं... इतकी बारीक गोष्ट तूझ्या लक्षात आली.... 

समायरा :म्हणजे?? 

टोनी : समु !! तू टेन्शन घेणार नसशील तर सांगतो.... 

समायरा : 😳 म्हणजे इतकं मोठं कारण आहे काय?? 

टोनी : मोठं  नाही... पण आशिष दादाने तूझ्या मागे आणि तुषारच्या मागे एक गुप्तहेर पाठवला होता?? 

समायरा :😳 गुप्तहेर?? पण का?? 

टोनी : आशिष दादाला कदाचीत तूम्ही married couple नाही याचा संशय आला असावा 

समायरा : omg... मग तर आता आमचं काहीच खरं नाही.सगळं आताच उघडकीस येतं की काय?? .. 

.टोनी : फिर ये टोनी किस लिये है.... अगं ते वेळीच माझ्या लक्षात आले नी मग मी त्याला तंबी दिली... आता तो नाही पाठलाग करणार पण त्या कॅफे विषयी त्याने आशिष दादाला माहिती दिली असावी म्हणून मी कॅफे ऐवजी रोज गार्डन ला बोलावलं.... 

समायरा :  😳 बापरे इतकं सगळं घडून पण गेलं आणि मला थांगपत्ता देखील नाही....अच्छा म्हणून तू काल कॅफे मध्ये उशिरा आला....  

टोनी :हो.... 

समायरा : टोनी !! तू पण आता काळजी घे... उठ सुठ स्टंट करायची गरज नाही... 

टोनी :  जशी आपली आज्ञा... महाराणी साहेबा..... 

समायरा : टोनी 🤩🥰

चला,  खूप वेळ झाला बोलून" बाबा "आत वाट पहात आहेत.... मी त्यांना तुषारची बातमी सांगते.... असं म्हणून समायरा फोन 📳ठेवणार तितक्यात टोनी बोलला... 

टोनी : समु !! आताच नको ना फोन📳 ठेवू... आपण आताच तर स्वतःविषयी बोलायला लागलो आहे..

समायरा : सॉरी टोनी !! या सगळ्या गोंधळात आपण आपल्यासाठी असा स्पेशल वेळच देऊ शकत नाहीये.... आत मध्ये बाबा देखील वाट पहात आहेत.... मी आता सध्या फोन📳 ठेवते... जमलं तर रात्री बोलू....नाहीतर मेसेंजर आहेच..... 

टोनी : ok बाय...love you😍🤩.... 

समायरा : बाय... love you too😍🤩.... 

टोनी : काय. म्हणालीस... मला नीट ऐकू नाही आलं.... 

समायरा : "बाबा "ईकडे येत आहेत मी चालले.... 

  बरं, ठीक आहे... बघून घेईन🤩😍... अशी गोड तंबी देऊन टोनीने फोन 📳ठेऊन दिला....

समायरा घरात गेली.... तीचे बाबा एकटेच हॉल मध्ये टीव्ही बघत बसले होते... 

समायरा : बाबा... आमच्या सुहास सरांनी तुषार आणि तुषारच्या आई मधला दुरावा दूर केला.... 

समायराचे बाबा : हो का?? छान झालं मग... 

समायरा : हो बाबा... पण तूम्ही देखील तुमच्या मनात किंतु ठेऊ नका.... 

समायराची आई : कसला किंतु ग... 

समायराचे बाबा : अगं कुसुम !!तूला नाही कळायचं ते... ऑफिस मधल्या हिशोब करण्याबद्दल आम्ही बोलत आहोत... 

समायरा एकदम हळूच : थँक्स बाबा😊....


ईकडे नलिनी मात्र खूप परेशान होती तसं मेसेंजर वर तिचं आणि तुषारच सगळ्यांच्या न कळत संभाषण चालू होतं... पण नलीनीच्या बाबांना संशय येऊ नये म्हणून तीच फोन📳 सतत हातात घेणं टाळत होती.... 

नलिनीची आई देखील या सगळ्या वातावरणाने दुखावली गेली होती.... कारण तिने नलिनीच्या डोळ्यात तुषारसाठी प्रेम 😍पाहिलं होतं....तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळावा असच नलिनीच्या आईला वाटत होतं... 

नलिनी दिवस भर झोपून होती तिने दिवसभरात काहीच खाल्ल नव्हतं.. फक्त सकाळी बाबांच्या धाकाने नाश्ता केला होता.... 

शेवटी न राहवून नलिनीची आई नलीनीच्या रूम मध्ये गेली... 

नलिनीची आई : नलिनी !!अगं रूम मध्ये किती अंधार केला आहेस...थांब हा खिडकीचा पडदा बाजूला करते... 
नलिनीची आई नलिनीच्या जवळ आली आणि म्हणाली .. नलिनी उठ बेटा... असं दिवस भर झोपून 🛌राहू नये... तू काही खाल्ल पण नाहीस... 

आई !!म्हणून नलिनी तिच्या आईच्या गळ्यात पडली आणि रडायला😭 लागली.... 

नलिनीची आई : नलिनी बेटा !! अगं तू इतकं का रडत😭

 आहेस... बरं झालं आपल्याला वेळेवर कळालं ते... तूला लग्न झाल्यावर कळालं असतं तर??? 

नलिनी : अगं आई !! बाबा तर ऐकत नाहीत पण तू तरी एकदा माझं ऐकून घे ना.... 

नलिनीची आई : बोल... तूला काय सांगायचं आहे??  ... 

नलिनी : तुषारचं खरंच लग्न झालेलं नाही....त्याला नौकरीची अत्यंत गरज होती म्हणून आणि तिथे लग्न झालेलं जोडपंच निवडणार होते... त्याची गरजआणि त्याच्यासोबत जी मुलगी आहे तीची गरज  इतकी होती की त्याने त्यावेळेस लग्न झाल्याचे सांगून त्यांनी ती नौकरी मिळवली... 

नलिनीची आई :बरं तू म्हणतेस तसं... मग ते हनिमूनला जाणं?? 

नलिनी :अगं आई !!तोच तर जरा गोंधळ झाला... त्यांनी सुरुवात अशी खोट्याने केली... पण मग ऑफिसनेच त्यांना उटीला पाठवलं... तेही त्यांचं काम चांगलं होतं त्याचं बक्षीस म्हणून..... 

नलिनीची आई : विचित्रच आहे सगळं.... 

नलिनी :आई !!तुषारवर माझं जीवापाड प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर तुषारशीच करणार.... काल जे घडलं ते सगळं गैरसमजातून घडलं आहे.... 

नलिनीची आई :😳 काय?? तू प्रेम करतेस त्याच्यावर.... अगं पण तुझे बाबा?? ते कसे मान्यता देतील.... त्यांच्या नजरेत फ्रॉड ते फ्रॉडच.... 

नलिनी : म्हणजे तुषारला आणि मला अश्या गुन्ह्याची शिक्षा भेटणार जो आम्ही कधी केलाच नाही... तो ही आयुष्यभरासाठी ....

नलिनीची आई : अगं नलिनी तू सांगते त्या गोष्टीवर मी एकवेळ विश्वास ठेवेनही पण ते दोघेही नवराबायको म्हणून मिरवत असतील ना.... 

नलिनी : आई !!ते फक्त ऑफिसमध्येच नवरा बायको म्हणून वावरतात....  बाहेर नाही.... त्यात आमच्या बॉसच्या मुलाला सगळं माहिती आहे.... त्यांना काहीच अडचण नाही.... 

नलिनीची आई :असं आहे का??  मग आता तू माझं ऐक... थोडे दिवस जाऊ दे.... बाबांचा थोडा राग कमी होउदे.. मग पुढे बघू ... आता उठ बरं.... तोंड धुवून घे... आणि जेवायला चल... तुझ्या आवडीचे पालक पराठे केले आहेत..

क्रमश :
भाग 61 वाचण्यासाठी निळ्या line ला क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या