तुषारच्या आईला रात्रीच सुट्टी मिळाली... दोघेही घरी आले...
तुषारची आई : मग माझ्या सुनेला कधी भेटवणार??
तुषार :सून?? तू भेटलीस ना...
तुषारची आई : नलिनी नाही रे समायरा....
तुषार :आई !! नलिनी आणि समायरा काय कमी होते का?? आता तू पण माझी फिरकी घ्यायला लागली का 😇... जमलं तर उद्या भेटवतो..
तुषारची आई :आता सगळा गोंधळ माझ्या लक्षात आला... तुझ्या त्या बॉस, काय नाव त्यांचं...मार्था? त्या मुलगा आणि सून म्हणत होत्या.... ती सून म्हणजे समायरा ना...
तुषार :हो... आणि योगायोगाने नलिनी पण होती... मार्था सून समायराला म्हणत होत्या आणि तू नलिनी समजत होतीस...
तुषारची आई :🤦♀️... हं मार्था सुनबाई म्हणल्यावर मी गोंधळली होते खरी... पण मला वाटलं नलिनी पण त्याच ऑफिस मध्ये आहे.. सगळ्यांना माहिती झालं असेल...
तुषार :मला तर वाटलं आता तूला सगळं कळून जातं... पण तेव्हा माझी सुटका झाली... आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त वाईट पद्धतीने तूला कळालं.. .. सॉरी आई...
तुषारची आई :बस बेटा....नको इतकं वाईट वाटून घेऊ....
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये रजनी सगळ्यांना तिच्या एंगेजमेंटचे रीतसर आमंत्रण देत होती....
रजनी :तुषार आणि समायरा उद्या संध्याकाळी सात वाजता तिरुपती लॉन येथे माझी एंगेजमेंट आहे... तूम्ही सगळे हजर राहावे म्हणून मी मुद्दाम वेळ सात ची ठेवली आहे.. जेवणाचा कार्यक्रम आहे....तूम्ही दोघेही नक्की या..
इतक्या दिवसात आज पहिल्यांदा रजनी समायराशी व्यवस्थित बोलली होती... तीचे हावभाव देखील नेहमीसारखे वेडेवाकडे नव्हते....
तुषार : हो... येऊ आम्ही....
आमंत्रण देऊन रजनी तिथून निघून गेली...
समायरा : आता अजून हे एक नवीन संकट.. आपण नाही गेलं तर चालणार नाही का? काहीतरी कारण काढून टाळता येईल...
तुषार :त्याचाच मी देखील विचार करत आहे.. कारण आता कुठलेच कॉम्प्लिकेशन्स मला नको आहेत... कसं आहे ना समायरा?? आता पर्यंत जे झालं त्यात तुझं नाव समोर आलेलं नाही... उगाचच तुझं नाव समोर आलं तर नको ते प्रॉब्लेम??
समायरा : हो ना.... आपण काहीतरी मार्ग काढू.... पण जायचं टाळू...
तुषार :समायरा !!तूला आजकाल रोज घरी टोनी सोडत आहे ना??
समायरा : हो 😍
तुषार :आज त्याला माझ्या घरून तूला घ्यायला सांग ना...
समायरा : म्हणजे??
तुषार :अगं माझ्या आईला तूला भेटायचं आहे.. पाच मिनिट का होईना तेवढी धावती भेट....
समायरा : ठीक आहे मी टोनीला आताच मेसेज करून टाकते... असं म्हणून समायराने टोनीला मेसेज केला आणि तुषारला म्हणाली.. तुषार !! मी माझ्या बाबांना सगळं काही खरं सांगून टाकलं..
तुषार :काय 😳?? मग त्यांची प्रतिक्रिया..
समायरा :प्रतिक्रिया काय देणार... सुरवातीला खूप चिडले ते... पण आता शांत झाले...
तुषार :भलतीच डेरिंग केलीस तू??
समायरा : मला डेरिंग करावी लागली...
तुषार :हो, बरं केलंस ते... आधीच सांगून टाकलं..
रजनी सगळ्यांना आमंत्रण देण्याचं काम करत होती तर तीचे कस्टमर देखील तुषार आणि समायरा पहात होते.... त्यामुळे आज त्यांचे काम चांगलेच वाढले होते....
आपल्या कंपनीची अँप कधी लॉंच होते की?? बघ ना हे सगळेच काम ऑनलाईन झाले असते आपल्याला फक्त चेक करायचे काम बाकी होते....कामाचा व्याप बघून समायरा बोलली....
तुषार : मला तर वाटतं अँप तयार व्हायला जितका वेळ लागेल तितकं चांगलं😍😍....
समायरा :🤦♀️ माझ्या आधी हे लक्षातच आले नाही....बरं बाबा !!नलिनी आपल्याच ऑफिस मध्ये राहू दे...
रजनीने सगळ्यांना आमंत्रण देऊन झाल्यावर घरी जाण्याच्या तयारीत होती तितक्यात तीला समोर नलिनी दिसली..
रजनी : नलिनी !! तू देखील नक्की ये माझ्या एंगेजमेंट प्रोग्रॅम ला...
नलिनी खरं तर खूप उदास 😒मूड मध्ये होती.... पण मान वर करून तिने रजनीला होकार दिला....
नलिनी आली म्हणून तुषार एकदम केबिनच्या दरवाजाजवळ उभा राहिला....
नलिनीच्या डोळ्यात अश्रू होते 😢 साश्रूनयनांनी ती तुषार कडे पाहत होती... एकवेळ पळत जावं आणि तुषारच्या मिठीत जाऊन मनसोक्त रडावं असंच तीला वाटत होतं तर तुषारच्या मनात देखील नुसती कालवाकालव होत होती.... पण दोघांनाही ऑफिसच्या मर्यादा असल्यामुळे फक्त एकमेकांना बघता येत होते.....
तितक्यात आशिषने नलिनीला आवाज दिला....
आशिष : नलिनी !! आता तुझी तब्येत कशी आहे??
नलिनी : बरी आहे??
आशिष :पण तू नेहमीसारखी दिसत नाहीयेस....
नलिनी : थोडा वीकनेस आहे...
आशिष :मग इतक्या लवकर कश्याला आलीस.... तब्येत एकदम ठणठणीत होऊ द्यायची ना....
नलिनी : तसं काही नाही... मी काम करू शकते... तसंही घरी बसून कंटाळा आला....
असं म्हणून नलिनी तिच्या जागेवर येऊन बसली आणि तिने तीचा लॅपटॉप चालू केला....
नलिनीला पाह्यल्यानंतर तुषार देखील थोडा अस्वस्थ झाला....थोडावेळ त्याला काहीच सुचलं नाही पण वाढलेला कामाचा व्याप बघता शेवटी त्याला कामा कडे लक्ष द्यावे लागले....
आशिषला तुषारची काहीच माहिती मिळत नसल्याने तो हवालदिल झाला होता.... दिवाकर आणि आशिष तुषारची माहिती काढण्यासाठी अजून काय करता येईल त्याचा विचार करत होते......
आशिष : मला वाटतं, दिवाकर सर !!हा जो गुप्तहेर आपण लावला आहे ना तो काहीच कामाचा नाही.... आपल्याला साधा तुषारच्या घराचा पत्ता देखील दिला नाही....इतकं अवघड आहे का तुषारचं लोकेशन ट्रॅक करणं?? ....
दिवाकर :मलाही असाच काहीसा संशय येत आहे.... हा गुप्तहेर आपल्याला फितूर तर झाला नाही ना?? तूम्ही विचार करा आशिषराव !! आजकालच्या मोबाईलच्या युगात कुणाला शोधून काढणं असं कितीसं अवघड आहे..
आशिष :अरे हो, मला हे आधी का नाही सुचलं... सोशल नेटवर्किंग साईट मध्ये तुषार आणि समायरा असतीलच ना तिथे आपल्याला बरीच बेसिक माहीती मिळू शकेल.. हं पण त्यांनी खरी टाकली असेल तर???
दिवाकर : तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे?? ...
आशिषने लागलीच त्याचा लॅपटॉप उघडला... आणि सोशल नेटवर्किंग साईट वर दोघांचेही नाव टाकून शोधू लागला... तुषारने त्याचे अकॉउंट सहा महिन्यापूर्वी वापरलेले होते तर समायराने नौकरीच्या सुरवातीलाच तिचं अकाउंट डिलीट केलं होतं...
त्या मुळे म्हणावं तशी आणि हवी तशी माहिती त्यांना सोशल नेटवर्किंग वरून मिळाली नव्हती...
आशिष : इतका काय गूढ आहे हा... मला आता पर्यंत कुठलीही माहिती काढण्यासाठी कधीच इतकी मेहनत करावी लागली नाही...
दिवाकर : गूढ नाही हुशार आहे तो.... आपली माहिती त्याने स्वतःच इतकी गोपनीय ठेवली आहे...
आशिष :आज मी काय करतो?? मीच त्याच्या नकळत त्याच्या पाठीमागे जातो....निदान त्याचं घर तरी माहिती होईल...
क्रमश :
भाग 62 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
0 टिप्पण्या