नलिनी काम करत असताना तिच्या मनात बऱ्याचदा तुषार आणि समायराला भेटण्याचा विचार आला... पण तिच्या आजूबाजूला आशिष आणि दिवाकर असल्यामुळे तीला साधा मेसेज देखील करता आला नाही... काम झाल्यावर देखील आशिष नलीनीच्या कामाचा आढावा घेत तीला मुख्य दरवाजा पर्यंत सोडत असे .... त्या मुळे नलिनीला ईच्छा असतानाही तुषारला भेटता येत नसे...
ऑफिस सुटल्यावर तुषार आणि समायरा, तुषारच्या घरी जाण्यासाठी निघाले...
समायराने स्कार्फ बांधला. .... आज थोडं दूरवर तुषार सोबत जायचं असल्यामुळे तिच्या मनात धाकधुक चालू होती....
त्यांच्या मागे त्यांच्या नकळत एक विशिष्ट अंतर ठेवून आशिष त्यांचा पाठलाग करत होता....
समायरा व तुषार, तुषारच्या घरी पोहोचले....
तुषारने त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला...
तुषारच्या आईने उघडला.... तुषार आणि समायरा हॉल मध्ये आले....
तुषार :आई !! ही समायरा तुझी खोटी सून 😉
तुषारची आई :आलीस का समायरा?? तुषार !!ही सून पण पसंत आहे बरं का 😉 दिसायला छान आहे....
तुषार, :काय आई !!😇
सॉरी काकू😒 म्हणून समायरा तुषारच्या आईच्या पाया पडली
तुषारची आई : अरे बेटा हे नको करू...... उलट तू देखील स्वतःची पर्वा न करता हे सगळं केलंस.... अभिमान वाटतो मला... पण खरं सांगू का कुठल्याच आईवडिलांना आपल्या मुलाला असं स्वतःच्या आयुष्याशी खेळून घरी मदत केलेली आवडणार नाही... कारण कितीही केलं तर तूम्ही आमचे काळजाचे तुकडे असता ना!... अश्या गोष्टीची झळ लागू नये म्हणजे झालं.....
नाही लागणार.... मग हा टोनी कश्यासाठी आहे.... असं म्हणत टोनीने घरात प्रवेश केला.....
तुषारची आई : ये टोनी बेटा बस... तुषार !!तूम्ही बोलत बसा मी छान पोहे करते.....
तुषार :अगं आई !!गंगाबाई कुठे आहे तीला सांग ना करायला... तु आता तर बरी होऊन आली आहॆस...
समायरा : चला काकू !!मी येते किचन मध्ये मला सगळं दाखवा... पोहे मी करते....
तुषारची आई : अगं तू आताच ऑफिस मधून आली आहॆस... दमली असशील....
तितक्यात गंगाबाईने घरात प्रवेश केला.... मग तुषारनेच गंगामावशी !! आमच्यासाठी जरा खमंग पोहे करा पाहू....
गंगाबाई: हो दादा !!आता करून आणते... असं म्हणून किचनमध्ये गेली...
टोनी :ईथे आशिषदादा आला होता का?
तुषार :नाही, का रे??
टोनी :मला तो क्रॉस झाला... त्याचं लक्ष नव्हतं...
तुषार : म्हणजे?? तो आमच्या मागे तर नाही आला??, 🤔
समायरा : बापरे, म्हणजे तो आपला पाठलाग करत होता... नशीब आज मी पुन्हा बस स्टॉप वर उतरले नाही...
समायरा :कदाचीत गुप्तहेराकडून काही माहीती मिळाली नाही म्हणून स्वतःच पाठलाग सुरु केला असावा...
तुषार :गुप्तहेर?? हे आता काय नवीन....
टोनी :समायरा !!तू तुषारला नाही सांगितलंस...
समायरा : टोनी !!मला तितका वेळच नाही मिळाला... तुषार !!तूझा अंदाज खरा ठरला... उटीवरून आल्यापासून आशिष आपल्यावर पाळत ठेवत आहे....
टोनी : तुषार !! ते झालं असं... असं म्हणून टोनीने गुप्तहेर कसा बघितला व त्याला कसं स्वतःकडे ओढून घेतलं हे त्याला सांगितलं....
तुषार : बापरे 😳...कधी कधी नशीब किती साथ देतं नाही... कधी नाही ते समायरा माझ्या घरा पर्यंत सोबत आहे....
टोनी : हो ना, बरं...उद्याच्या प्रोग्रॅमचे काय ठरवले आहे तूम्ही....
समायरा : उद्याचा प्रोग्रॅम कुठला?? अच्छा रजनीच्या एंगेजमेंटचा....
तुषार : टोनी !!मला वाटतं जाऊ नये... कारण तिथे देखील आम्हाला नवराबायको म्हणून मिरवावं लागणार... पुन्हा नको ते गैरसमज आणि माझं जाऊदे पण नको ती समायराची बदनामी....
टोनी :मला काय वाटतं माहीती का? तूम्ही दोघेही कार्यक्रमाला यावं.... बाकी मी तिथे बघून घेईन... तुमच्या सोबत राहील.... तुषार !!नलिनीचं काय ठरलं नलिनी येणार की नाही??
तुषार : माहीती नाही... अजून काही तसा मेसेज आला नाही.....
हो नाही करत तिघांचेही रजनीच्या एंगेजमेंट प्रोग्रामला जायचे ठरले.....
चहा, पोहे झाल्यावर टोनी आणि समायराने तुषारच्या आईची परवानगी घेतली.... आणि दोघेही निघाले....
ईकडे नलिनी तिच्या घरी पोहोचली.... घरी पोहोचल्यावर तीचा चेहरा खूप पडलेला😒 होता.... तीचा असा पडलेला चेहरा बघून तीचे बाबा देखील परेशान झाले होते.... त्यांनी इतकं दुःखी नलिनीला पहिल्यांदाच पाहिलं होतं... घरात असून ती नसल्यासारखी झाली होती... तीची उपस्थिती घरात जाणवत नव्हती....
नलीनीच्या बाबांनी नलिनीला आवाज दिला.... नलिनी बेटा !!आलीस का ऑफिस मधून....
नलीनीला बाबांच्या अश्या प्रेमळ बोलण्याची कधीच सवय नव्हती.... त्याचं आश्चर्य वाटलं 🙄पण मूड खराब असल्यामुळे ती शांत होती...
नलिनीचे बाबा :नलिनी !!ये बस... मला तूला काहीतरी बोलायचे आहे..
नलिनी :हो बाबा!! आलेच मी, फ्रेश होऊन येते
असं म्हणून नलिनी फ्रेश होऊन बाबासमोर सोफ्यावर येऊन बसली
नलिनीचे बाबा : कालचा जो प्रकार घडला तू फार मनाला लाऊन घेतलेला दिसतोस...
नलिनी : नाही बाबा !!
नलिनीचे बाबा : काय नाही बाबा?? मला काय दिसत नाही?? पण बेटा तू सांग... तू माझ्या जागेवर असतीस तर काय केलं असतं??
नलिनी : बाबा !!तूम्ही बरोबर आहात पण तुषारचं लग्न नाही झालेलं....
नलिनीचे बाबा : समजा तू म्हणतेस त्यात तथ्यही असेल...पण हे फ्रॉड नाही का?? तू सांग नलिनी !!मी आतापर्यंत किती कडक राहिलो पण तूला कुठल्याही चांगल्या गोष्टीला विरोध केला आहे का?? किंवा तूझ्या मनाविरुद्ध तूला काही करायला सांगितलं आहे का?? मग ईथेच मी असा का वागत आहे... तूला लक्षात येत आहे का??
नलिनी : बाबा !!खरंच मी ईतका विचार नाही केला... पण तूम्ही चुकीचे आहात असं देखील मला चुकूनही वाटलं नाही....
नलिनीचे बाबा : मग सांग नलिनी !! तू का इतकी उदास रहात आहॆस....आम्हाला कसं करमेल?? बापाचं काळीज आहे पोरी तूला नाही समजायचं ते....
नलिनी : बाबा !!नाही राहणार मी उदास... बरं बाबा एक विचारायचं होतं...
नलिनीचे बाबा : काय?
नलिनी : उद्या आमच्या ऑफिस मधल्या एका मुलीची एंगेजमेंट आहे... मी जाऊ का??
नलिनीचे बाबा :नलिनी !!आजपर्यंत तूला मी कुठे रोखलं आहे... जा बेटा....
नलीनीच्या बाबांच्या बोलण्याचा परिणाम नलिनीवर ईतका झाला की तिने तुषारला मेसेंजरवर रिप्लाय देणे टाळायला लागली ....
तुषारने तीला रजनीच्या एंगेजमेंटला येणार का? असा मेसेज केलेला होता....
पण नलिनीने मेसेज बघूनही उत्तर दिले नाही...
पण तिच्या अश्या दुर्लक्ष करण्यामुळे तुषार खूप जास्त परेशान झाला...त्याला कळतंच नव्हतं की नलिनी आपल्याशी बोलायचं का टाळत आहे??
समायरा तिच्या घरी थोडं उशिरा पोहोचली....
समायराची आई : समु बेटा !!आज उशीर??
समायरा :हो आई... उद्या आमच्या एका कलीगची एंगेजमेंट आहे... ती आज आमंत्रण देण्यात व्यस्त होती आणि तीचे काम आम्ही करत होतो... बरं आई ऐक ना मी उद्या तिच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला जाणार आहे... तिने जेवण ही ठेवले आहे
अमोघ :अरे वा ताई !! एंगेजमेंटचा कार्यक्रम सगळ्यांना बोलावले असेल ना...
समायरा : नाही रे, छोटासाच कार्यक्रम ठेवला आहे...फक्त ऑफिसचे सगळे लोकं बोलावले आहेत....
भाग 63 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
4 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा