किती सांगायचं मला (भाग 63)

आज ऑफिसमध्ये कुणाचाच काम करायचा मूड होत नव्हता... 

सगळ्यांना रजनीच्या एंगेजमेंट प्रोग्रॅमला जाण्याची उत्सुकता होती.

.कारणच तसे होते... सगळ्यांचा पार्टीचा मूड होता... ऑफिस मध्ये नुसतीच रजनीच्या एंगेजमेंट प्लॅनिंगची चर्चा होत होती... गिफ्ट काय द्यायचे... सगळ्यांनी मिळून द्यायचे की आपापले द्यायचे?? 

प्रदीप : रजनीने गिफ्ट वगैरे काहीच आणायचे नाही असा सगळ्यांना पर्सनल मेसेज केला आहे... सगळे जण आपापल्या मेसेंजरवर चेक करा.... 

तुषार : ठीक आहे मग असं करू आपल्या ऑफिस टीम कडून एक बुके💐 घेऊन जाऊ... 

प्रदीप :ठरलं तर मग... 

तुषार :गणेश!! हे घे पैसे💵... संध्याकाळी तूच बुके💐 घेऊन ये... 

ठीक आहे तुषार सर.... असं म्हणून गणेशने पैसे 💵घेतले आणि स्वतःच्या वॉलेट मध्ये ठेवले 

मार्थाला ऑफिसची सगळी चहल पहल दिसत होती.... सगळ्यांचा पार्टीचा मूड आहे हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही....

 ते पाहून मार्थाला देखील वाटले... आपले एम्प्लॉयी बिचारे वर्षभर काम करतात... होता होई पर्यंत सुट्टी देखील घेत नाहीत.... आज सगळ्यांचा पार्टीचा मूड आहे तर सगळ्यांना एंजॉय करण्यासाठी सुट्टी  द्यावीशी वाटली 

तिने आतापर्यंत अशी कधी सुट्टी दिली नव्हती.... 

मार्थाने गणेश करवी सगळ्यांना आपल्या केबिन मध्ये बोलावले.... सगळे जण ऑफिस मध्ये जमा झाले....

 सगळेच जण आज अचानक मार्थाने सगळ्यांना केबिनमध्ये का बोलावले असेल या मुळे आश्चर्यचकित😳 झाले होते.... सगळेच जण विविध प्रकारचे तर्कवितर्क करत होते.... 

 तुम्हाला सगळ्यांना ईथे केबिन मध्ये बोलावण्याचं कारण म्हणजे... आज मला तूमचा कुणाचाच काम करण्याचा मूड दिसत नाहीये.... नुसतेच गप्पा मारत बसला आहात... मार्था थोडासा खोटा राग 😡आणून सगळ्यांच्या चेहऱ्याचे  हावभाव बघू लागली.... 

आशिष : हो, ते जरा आज सगळ्यांचा रजनीच्या एंगेजमेंट 👩‍❤️‍👨 पार्टीचा मूड आहे ना.... 

मार्था :पण पार्टी तर संध्याकाळी आहे ना सात वाजता... मग... काय तुम्हाला सुट्टी हवी आहे का?? 

प्रदीप : नाही मार्था !! तसं काही नाही... आम्ही आता जोमाने कामाला लागतो... 

मार्था : त्याची काहीच गरज नाहीये.... तूम्ही आता जोमाने काम करा.... तुम्हाला सगळ्यांना हाल्फ डे सुट्टी दिली... 

तुषार :काय 😳?? 

समायरा : मार्था you are simply great😊.... 

सगळ्यांनी मिळून जोऱ्यात आणि आनंदाने टाळ्या वाजवल्या... 👏👏👏👏👏👏👏👏

 तितक्यात नलिनी देखील ऑफिस मध्ये आली... 

तुषारने तिच्याकडे बघितले... पण नलीनीने जाणूनबुजून तुषारकडे बघणे टाळले.... त्यांची नजरानजर होऊच शकली नाही.... 

नलीनीच्या तश्या वागण्याने तुषार कासावीस झाला.... ती आपल्याला का टाळत आहे?? काय चुकलं माझं?? की माझा गैरसमज झाला आहे...." गैरसमज " नक्कीच नाही कारण नलीनीने मेसेंजर वर रिप्लाय देणे देखील बंद केले आहेत..... 

तुषार : समायरा !! मला नलिनीमध्ये बदल झाल्यासारखे वाटत आहे.. 

समायरा : बदल कसला बदल.... मला तर तसं काही वाटत नाहीये... 

तुषार : ती मला टाळत आहे गं...तिने आज माझ्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं आहे.... 

समायरा : मी दुपारी बोलते तिच्याशी.... तसंही.. त्या दिवसापासून माझे तिच्यासोबत बोलणेच झाले नाही.... खरं तर मी फोन करायला हवा होता... पण तीचे बाबा??  त्यांची भीती वाटत होती म्हणून मी फोन📳 पण केला नाही... 

तुषार : तू तीला नंतर बोल पण आता मेसेंजर वर मेसेज तरी  करून विचार ना... माझं काही चुकलं का?? 

समायराने तुषारच्या सांगण्याप्रमाणे नलिनीला मेसेज केला पण ती तिथे कामात व्यस्त असल्यामुळे मेसेज बघण्यात आलाच नाही... 

साहजिकच तुषार खूप अस्वस्थ झाला..... त्याचं मन कशातच लागत नव्हतं...

समायरा : तुषार !! तू काळजी करू नकोस मी नक्कीच बोलेन.... 

तुषार : हं, पण काय झालं असेल??ती का? अशी वागत आहे... 

समायरा :तुषार !!तू तर्क वितर्क नको करूस.... तू जरा कमी विचार कर....

तुषार : हो, तुझंही खरं आहे म्हणा... जास्त विचार करणे कधीही घातकच.... 

समायरा: चला, थोडं काम करू, मग घरी जायचं आहेच... 

ऑफिस एक वाजेपर्यंत चाललं, सर्वांची घरी जाण्याची लगबग सुरु झाली... 

तितक्यात समायराला टोनीचा फोन📳 आला... 

टोनी : समु !! तू तूझ्या नेहमीच्या बस स्टॉपच्या पुढे उजवीकडे वळल्यावर जी गल्लीबोळ येते तिथे थांब... मला थोडं तूला बाहेर घेऊन जायचं आहे.... 

समायरा :बाहेर 🙄 ठीक आहे?? आता हा मला कुठे नेणार आहे असा विचार समायरा करू लागली🤔....

 तुषार मात्र नलिनीच्या वागण्याचा विचार करत होता... 

समायरा : तुषार !!मी आता बाहेर पडले की लागलीच नलिनीला फोन लावते... तू असा उदास नको होऊस.... 

तुषार :तुझं बोलणं झालं की मला ताबडतोब सांग.... 

समायरा : ठीक आहे.... 

तुषार आणि समायरा टोनीने सांगितलेल्या जागेजवळ गेले.... टोनी तिथे आधीच पोहोचला होता.... 

टोनी :hi तुषार !!तूझा चेहेरा असा का लटकलेला आहे?? 

तुषार :नाही काही नाही.... 

समायरा : काही नाही?? कसं काय काही नाही?? अरे नलिनी कालपासून त्याच्याशी बोलत नाहीये.... तुषार !!थांब तुझ्यासमोर मी आताच नलिनीला फोन 📳लावते.... 

समायराने नलिनीला फोन 📳लावला... पण नलिनी तिच्या स्कुटीवर असल्यामुळे तो कॉल मिस झाला.... समायराने दोन तीन कॉल केले...पण नलीनीने ते उचलले नाही... त्यामुळे आता समायरादेखील असे वाटायला लागले की खरंच नलिनी तुषार आणि तीला टाळत आहे.... तरी समायरा तुषारला म्हणाली... हे बघ तुषार !!नलिनी आता कुठे busy असेल तिच्याशी बोलणं झालं की मी सांगते.... 

तुषारने होकारार्थी मान हलवली..... आणि येतो बाय टोनी म्हणून तिथून निघून गेला..... 

समायरा : टोनी !! आपल्याला कुठे जायचं आहे.... 

टोनी : सरप्राईज आहे ते😍😍... 


समायरा : सरप्राईज??  ठीक आहे मग आता न विचारणंच बरं.... 

तितक्यात समायराचा फोन 📳वाजला.... नलीनीने फोन केला होता... 

नलिनी : समायरा !! अगं किती फोन📳 केलेस तू??  मी स्कुटीवर होते... आता तुझे कॉल पाहिले.... 

समायरा : अगं हो नलिनी !!काही नाही तूला फक्त इतकंच विचारायचं होतं की तू तुषारला टाळत आहॆस का ?? 

नलिनी : खरं सांगू समायरा !! मी टाळते आहे, असं नाही म्हणता येणार पण सध्याची परिस्थिती पाहता मला कसं वागायचं तेच सुचत नाहीये..... माझे बाबा माझ्याशी व्यवस्थित बोलले मला त्यांची माझ्याविषयीची कळकळ जाणवली.... त्यांना मला दुखवायचं नाही... 

समायरा :अच्छा असं आहे तर.... बरं ऐक ना !!तू संध्याकाळी एंगेजमेंट प्रोग्रॅमला येणार आहॆस ना... 

नलिनी : हो... 

समायरा : मग तिथे भेटू...

नलिनी :हो चालेल.... 

समायरा : चल ठेवते फोन 📳 बाय... 

नलिनी : बाय..... 

तितक्यात टोनीने गाडी एका मॉल समोर थांबवली.... 

समायरा : मॉल आणि आता?? 🤔

टोनी :सरप्राईज 😍
क्रमश :
भाग 64 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या