किती सांगायचं मला (भाग 64)

टोनी आणि समायरा मॉल मध्ये गेले....

 टोनीने समायराला एक सुंदर, फिक्कट पिवळ्या रंगाचाअसा पार्टी वेअर गाऊन घेतला....😍😍🤩

समायरा :आता हे कशासाठी?? 

टोनी :समु !! मला मनापासून हे करावं वाटत आहे त्यासाठी... 🤩😍

समायरा :पण तूला हा थोडा एक्सपेंन्सिव्ह नाही वाटत का??  .. 

टोनी :तुझ्यासमोर नाही... 😍

समायरा : माझ्या घरी मी काय सांगू?? 🤔 ईतका महागाचा गाऊन... माझी आई ओरडेल ना... 

टोनी : आपण त्याच्यावरचा प्राईस टॅग बदलून टाकू... तू try तर करून ये..... 

समायराने गाऊन try केला... त्यात ती ईतकी सुंदर दिसत होती.... की तो गाऊन स्वतःकडे ठेवण्याचा मोह तिलाही आवरला नाही.... पण आताच टोनीकडून गिफ्ट घेणं कितपत योग्य आहे याच्या संभ्रमात ती पडली.... 

टोनीने देखील समायराला गाऊन वर बघितले... आणि म्हणाला बघ माझी चॉईस😍🤩.... कधीच खराब नसते...तू किती सुंदर दिसत आहॆस या गाऊनमध्ये😍... ते मला काही माहिती नाही तू संध्याकाळी पार्टीला हा गाऊन घालायचा म्हणजे घालायचा... टोनी थोडा हट्टाला पेटला.... 

समायरा : बरं बाबा !!ठीक आहे.... फक्त आठवणीने त्याच्यावरचा प्राईस टॅग बदलून घेऊ म्हणजे घरी उगाचच त्यावर चर्चा होणार नाही.... 

टोनी आणि समायरा खरेदी करून मॉलच्या बाहेर पडले... तितक्यात टोनीने समायराला स्कार्फ बांधायला सांगितला आणि तू गाडीजवळ🚗 जाऊन उभी रहा मी येतोच असं सांगितले.. 

समायरा टोनी च्या अश्या वागण्याने संभ्रमात पडली.... 

टोनी थोडा बाजूला जाऊन एका स्त्रीशी बोलायला लागला... त्याच्या वागण्यावरून ती त्याच्या चांगल्याच ओळखीची असावी असा अंदाज बांधता येत होता....टोनीने आपल्याला स्कार्फ बांधायला का सांगितलं असेल?? माझी आणि त्या स्त्रीची तर ओळखही नाही.... टोनीशी बोलल्यावरच कळेल... असा विचार समायराने केला... 

त्या स्त्री शी बोलून झाल्यावर टोनी गाडीजवळ🚗 आला.. 

टोनी :चल समायरा ईथुन आपल्याला पटकन जावं लागणार आहे असं म्हणून दोघेही टोनीच्या मर्सिडीज 🚗कार मध्ये बसले.... 

टोनीने जरा वेळ विचार केला आणि त्याची गाडी 🚗उलट्या दिशेने वळवली... 

समायरा मात्र आता पुरती गोंधळून गेली.... 

समायरा : टोनी !!काय चाललं आहे तुझं... मला काही कळेल का?? 

टोनी : समु !!थांब जरा मुख्य रस्त्याला एकदा लागू दे.... मग सांगतो... 

मुख्य रस्त्याला लागल्यावर टोनी बोलायला लागला... अगं समु !!मॉल मध्ये मला जी भेटली ती अस्मि वहिनी होती.... आशिषची बायको.... ती देखील शॉपिंगला आली होती आणि ऑफिस मधून आशिष दादा देखील मॉल मध्ये येणार आहे असं कळालं.... म्हणून मी जरा रस्ता बदलला... कारण मर्सिडीज 🚗गाडी आणि हा vip नंबर ओळखायला वेळ लागत नाही.... त्यात तू स्कार्फ बांधून असली तरी रीस्क कशाला.... त्यातल्यात्यात आशिषदादा माझ्या सगळ्या मैत्रिणींना ओळखतो..... 

समायरा :😳 बापरे... मग आता जरा सोबत फिरणे बंद करावे लागते.... 

टोनी :हं, हुशारीने राहू इतकंच... आणि हे फक्त माझी इंटर्नशिप पूर्ण होईपर्यंत.... नंतर मी ऑफिस जॉईन करेल तेव्हा मी मॉम शी बोलेलच 

समायरा : असं का? आणि काय सांगणार?? तुषारच्या बायकोवर माझे प्रेम आहे म्हणून??

टोनी : समु !!you dont worry... मी बरोबर बोलेन.... 

चला बाबा आमची सासरवाडी आली.... आणि आम्हाला बाहेरूनच जावं लागतंय😒.... 

समायरा : टोनी !! मी पण बाबांचा छान मूड बघून आपल्याविषयी त्यांना एकदाचं सांगून देईन.... तो पर्यंत सॉरी, तुला असच बाहेरून जावं लागणार....

टोनी :आताच नको.... मला एकदा ऑफिसला जॉईन होऊ दे मग बोल.... 

समायरा : बरं, चल निघते मी... नाहीतर शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळून जाईल मी मर्सिडीज🚗 मध्ये येते ते.... 

टोनी :ok, bye... see you🥰... भेटू संध्याकाळी 

समायरा : bye... 

समायराला अमोघ बाहेरच भेटला.... त्याने तीला नेमकं मर्सिडीज 🚗मधून उतरताना पाह्यलं.... 

अमोघ : ताई !!😳 तू आणि मर्सिडीज🚗?? 

समायरा : अमोघ 🤫 मी तूला नंतर सांगते पण आता तू शांत बस.... काहीच बोलू नकोस.... 

अमोघ : बरं ताई!!पण नक्की सांगशील..... 

समायरा : आई !! बघ मी आजच्या पार्टीसाठी गाऊन खरेदी केला... कसा आहे?? 

समायराची आई : खूप सुंदर आहे... किंमत पाहू...फक्त पंधराशे रुपये?? किमतीच्या मानाने खूप सुंदर 😊आहे....

समायरा : हो आई,मला खरंच खूप छान गाऊन मिळाला....

पार्टीची वेळ झाली.... रजनीच्या पार्टीच्या ठिकाणी(तिरुपती lawn ) सगळे जण एक एक करून जमायला लागले.... 

सगळ्यात पहिले आशिष, अस्मि, दिवाकर पोहोचले तर अगदीच दहा मिनिटांच्या अवधित तुषार समायरा टोनी मार्था गणेश, रिसेप्शनिस्ट आणि प्रदीप पोहोचले.... 

सगळेच जण ईतक्या शार्प वेळेवर पोहोचले त्याचं रजनीला खूप आश्चर्य वाटलं..... 

तुषार :रजनी !!या वेळेस मार्थाने हाल्फ डे दिला आहे म्हणून आम्ही वेळेवर पोहोचलो.... 

रजनी :हाल्फ डे?? 

तुषार : हो केवळ तूझ्या एंगेजमेंट पार्टी साठी.... 

रजनी : थँक्स मार्था.... 

रजनीने मग तिच्या आई वडिलांची होणाऱ्या नवऱ्याची आणि सासूसासऱ्यांची ओळख ऑफिसच्या सगळ्या लोकांना करून दिली... 

रजनी : वाह समायरा !!you are looking fabulous... गाऊन खूप सुंदर आहे....  हा फ्रेंच बन पण अगदीच तूला सूट झाला आहे.... तुषार !! घरी जाऊन नजर काढ बाबा.... 

तुषार : अं हो.... पण तुषारच्या नजरा दरवाजाकडे होत्या.... तो आतुरतेने नलिनीची वाट पहात होता... समायराने येता येताच नलिनीशी फोन📳 वर काय बोलणं झालं हे तुषारला सांगितलं होतं.... 

समायरा : थँक्स,  तू पण खूप सुंदर दिसत आहॆस....तुझी  सगळीच एक एक गोष्ट छान आहे... 

रजनी : मग, छानच आहे मी😏.... 

तितक्यात नलिनी देखील आत आली.... नलीनीने पुन्हा फिक्कट आकाशी कलरची साडी घातली होती.... त्यावर फिक्कट गुलाबी गुलाबांची डिझाईन होती....ती देखील खूप सुंदर दिसत होती... 

नलिनीला पाहून तुषारच्या हृदयाची धडधड वाढली.... एक तर ती त्याला टाळत होती आणि पार्टीला येताना मात्र त्याच्याच आवडत्या रंगाची साडी घातली होती...किती दुष्ट आहे ना नलिनी?? मला टाळत आहे पण माझ्याच आवडीच्या रंगाची साडी घालून आली आहे... असं तुषार मनोमन म्हणू लागला होता ... 

नलिनी मात्र समायरा खास मैत्रीण असून डायरेक्ट त्यांच्याजवळ जाऊ शकली नाही.... 

आशिषने नलिनीला आवाज दिला... 

आशिष : नलिनी !! ही माझी बायको अस्मि... 

नलिनी : हॅलो

आशिष : नलिनी तूला कुणी ईथे जास्त ओळखिचे नसेल ना.... 

नलिनी :अं, हो... 

आशिष :मग अस्मि सोबत थांब... तूम्हाला एकमेकांची मदत होईल.....

अस्मि आणि नलिनी सोबतच उभे राहीले.... 

तुषार बरोबर नलिनीची नजर त्याच्याकडे जाईल असा प्रयत्न करत होता तर नलिनी त्याच्याशी होणारी नजरानजर तितक्याच शिताफीने आणि हुशारीने टाळत होती.... 

त्यामुळे तुषारचा जीव मात्र कासावीस झाला होता.... त्याला प्रत्येक क्षणाला आपलं काही चुकलं आहे का असाच प्रश्न पडत होता.... 

तितक्यात रजनी आणि तीचा होणारा नवरा राघव यांचा एंगेजमेंट सोहळा सुरु झाला.... दोघांनीही एकमेकांना अंगठ्या घातल्या.... त्या नंतर त्या जोडीने बहारदार नृत्य सादर केले.... टाळ्यांचा कडकडाट झाला.... मग जेवणासाठी सगळ्यांना सांगण्यात आलं..... 

सगळ्या ऑफिसच्या लोकांनी मिळून मग त्या जोडप्याला बुके दिला... फोटोसेशन झाले.... 

जेवणाची व्यवस्था अगदीच उत्तम केली होती... मोठा lawn असल्यामुळे lawn मध्ये एका कोपऱ्यात बफे मध्ये सर्व प्रकारचे veg, नॉनव्हेज, चाट, चायनीज अश्या प्रकारचे जिन्नस ठेवण्यात आले होते.... 

आणि मध्ये बसण्यासाठी जागोजागी गोलाकार टेबल ठेवण्यात आलेले होते.... 

सर्व जण जेवणासाठी जेवणाच्या व्यवस्थे कडे गेले....
क्रमश :
भाग 65 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या