किती सांगायचं मला (भाग 67)

तुषार आणि नलिनीची मेसेंजरवर चॅटिंग चालू होती 

तुषार : काय हं..... 

नलिनी :तुषार!!तू कितीही म्हण??  पण टेन्शन तर येतेच ना... 

तुषार : हो, तेही आहे म्हणा....

नलिनी : तुषार !! मला खूप झोप येत आहे 😴 आणि उद्या पुन्हा जास्तीचे काम करायचे आहे... मागे दोन दिवस सुट्टी घेतली ना... त्यामुळे बरेच काम पेंडिंग आहे.... 

तुषार : चल बाय, GN

नलिनी : GN... 

तुषार ऑफलाईन गेला.... 

नलिनी :कसा आहे हा🤔... चारदोन प्रेमाच्या 😍🤩गोष्टी करायचं देखील याला समजत नाही....GN म्हटलं की लगेचच ऑफलाईन गेला ....  नलिनी!! काहीच खरं नाही तूझं...... 

समायराची आई मात्र रात्र भर तुषार आणि समायराच्या जोडीचा 👩‍❤️‍👨विचार करत होती...
समायराच्या आईला तुषार खूप आवडला 😊होता...आपल्या समायराला नक्कीच तो सुखात ठेवेल असा अंदाज तिने बांधला होता.... 

दुसऱ्या दिवशी सकाळी समायराच्या आईने समायराला आवाज दिला.... समु बेटा !!  आज मला थोडी स्वयंपाक घरात मदत करू लाग बरं..  

समायराशी जेव्हा केव्हा तिच्या आईला मनातलं बोलायचं तेव्हा ती तीला स्वयंपाक घरात मदतीसाठी बोलावत असे... 

तिच्या आईची ही सवय समायराला चांगलीच माहिती झाली होती.... 

आईला आता नेमकं काय बोलायचं असेल बरं 🤔
समायरा : आले आई !! बोल काय करू... कांदा कापून देऊ की लसुण सोलून  देऊ... 

समायराची आई : समु !! हा घे लसुण... सोलून दे बरं... 

समायराने लसूण सोलायला सुरुवात केली... 

समायराची आई : समु बेटा !! तुषारचे आईवडील काय करतात?? 

समायरा : आई !! त्याला वडील नाही... तो शहीद फौजीचा मुलगा आहे.... त्याची आई घरीच असते... तुषारच सगळं घर चालवतो  .... 

समायराची आई :  समु !! मला मुलगा खरंच खूप चांगला वाटला... 

आईचा कल कुठल्या दिशेने आहे, हे आता समायराला चांगलं समजलं..... 

समायरा : आई !!😇तू काही उलट सुलट विचार करण्याआधीच सांगते.... तुषार खूप चांगला मुलगा आहे  संस्कारी आहे. हे ईतकं सगळं असलं तरी,  तो माझा केवळ चांगला मित्र आहे...

समायराची आई : चांगला मित्र, चांगला जोडीदार 😍होऊच शकतो ना.... 

समायरा : आई !! नको गं ईतका विचार करू.... 

समायराची आई : तूला दुसरा कुणी आवडतो का? तसं असेल तर तसं सांग.... 

समायराला टोनीबद्दल सांगण्याची ही सुवर्णसंधी होती... पण टोनीने तो ऑफिस जॉईन करेपर्यंत कुणालाच सांगू नकोस असं सांगितल्यामुळे समायराला नेहमी सारखं खोटं बोलावं लागलं.... 

समायरा : नाही आई !! तूला तर माहिती ना मला श्रीमंत मुलगा पाहिजे आहे... 

समायराची आई : समु बेटा !! मी तूला पुन्हा एकदा सांगते की अंथरून पाहून पाय पसरावे....

समायरा : आई !! तुषार तूला ईतका जास्त आवडला आहे काय??  त्याला आमच्याच ऑफिस ची एक मुलगी आवडते.... म्हणून सांगते त्याचा विचार सोडून दे.... आणि चल हा घे सोललेला लसूण मला तयार व्हायचं आहे.... नाहीतर ऑफिसला मला जायला उशीर होईल...... 

आशिष आणि दिवाकर नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच ऑफिसला आले... सगळ्यांचे documents  रिसेप्शनिस्ट ने एका कपाटात ठेवले होते.... ती आली की तीला देखील काही संशय येऊ नये म्हणून नॉमिनल सगळ्यांचे documents तिच्या कडून काढून घेतले.....

आशिष आणि दिवाकर ने तुषार आणि समायराची फाईल काढली......

आशिष : बाबा !!दोघेही बीकॉम,एम बी ए... मग ईथे नौकरी?? 🤔 हे त्यांनी undartaking दिलेलं आहे... की एका महिन्याच्या आत marriage certificate सबमिट करतो.... पण सबमिट केलेलं नाही...... लग्नाचे फोटो बिटो तर भारी काढले आहेत... लग्नाची पत्रिका पण दिलेली आहे.... 

दिवाकर :हे सगळं तयार करून घेता येतं ना.... नशीब खोटं marriage certificate नाही जोडलं.... 

आशिष : बाबा !! आता यांची माहिती तर मिळाली.... पण आपल्याला खूप हुशारीने तीचा वापर करून घ्यावा लागणार.... कारण सगळ्यात महत्वाचे म्हणजे "टोनी" त्यांच्या सोबत आहे....

दिवाकर : हो, पण "मार्था "तीला खोटं सहन होत नाही.... तीला कळल्यावर ती नक्कीच त्यांच्यावर ऍक्शन घेईल.... 

आशिष : पण आता या सगळ्यांच्या न कळत आपल्याला  यांना एक्सपोज करावं लागेल....

दिवाकर : त्या दिवसाची मी तर आनंदाने वाट पाहत आहे... अगदीच सुरवातीपासून खूप हुशारी केली आहे या तुषार आणि समायराने.... ते ऑफिसला जॉईन झाल्यापासून वरची एक दमडी देखील आपल्याला मिळाली नाही..... 

आशिष : खरं आहे बाबा !! मी जरा हे documents ठेवून देतो... सगळ्यांची येण्याची वेळ झाली आहे.... घाई गरबडीत आशिषने तुषार आणि समायराच्या documents चे फोटो काढले... आणि सगळेच documents रीसेपशनिस्टला परत दिले..... 

तितक्यात ऑफिसचे सगळेच जण एक एक करून येऊ लागले... ... 

सगळ्यांच्या आधी दिवाकर आणि आशिष ऑफिसला हजर... ही सगळ्यांसाठी आश्चर्याची गोष्ट होती.... कारण ते दोघेही  कुठलाही नियम मग तो बायोमेट्रिक असो की मस्टर पाळत नसत....  

तुषार आणि समायरा देखील दिवाकर आणि आशिषला बघून आचंबित😳 झाले.... 

तितक्यात रजनी देखील ऑफिसला आली.... तिच्या चेहऱ्यावर एंगेजमेंट झाल्याने एक वेगळीच चमक आली होती..

.ऑफिस मध्ये जो तो रजनीला भेटत होता आणि कालच्या पार्टीची स्तुति करत होता.... त्यांनी केलेल्या नृत्याविषयी बोलत होता.... त्यामुळे रजनी देखील हरखून🥰 गेली होती...

नलिनी देखील कधी नाही ते साडे नऊलाच हजर झाली....

समायरा  : तुषार !! ऑफिसमध्ये आज किती बदलल्या सारखं वाटत आहे ना... पहिले दिवाकर आणि आशिष... आधीच हजर आणि आता ही" नलिनी " तीची अकरा वाजताची वेळ आहे ना ... 

तुषार :समायरा !! अगं नलीनीने मागे सुट्टी टाकली होतीना... तो बॅकलॉग भरून काढायचा आहे.... त्यासाठी आली आहे... 

समायरा : हो बाबा !!आता आम्हाला थोडीच सगळं माहिती असणार 😉.... तुम्हीच जास्त जवळचे... 

तुषार : हं घ्या फिरकी 😇, चान्स मिळाला की घेतली फिरकी.... हो ना.... 

समायरा : अरे तुषार !!उलट पुढे ह्याच तूझ्या गोड आठवणी राहतील....

तुषार : हं... चला लागा कामाला... कस्टमरची लाईन लागायला सुरवात झाली आहे...... 

क्रमश :
भाग 68 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या