नलिनीदेखील कामात व्यस्त झाली पण आजचा दिवस नलिनीसाठी जरा विचित्रच होता.... कारण तिच्या प्रत्येक गोष्टीला आशिष क्रॉस करत होता...
नलीनीने दोन दिवसांचा बॅकलॉग कसा भरून काढता येईल आणि आपलं काम कसं सुरळीत करता येईल त्यासाठी सकाळी साडे नऊ पासूनचा एक टाईम टेबल तयार केला होता....
पण आशिषच्या प्रत्येक गोष्टीला क्रॉस करण्यामुळे दुपारचे साडे बारा वाजले तरी देखील तीचे काम आहे त्या जागेवरच होते.....
नलिनीचा जीव रडकुंडीला आला होता... नेहमी कौतुक करणारा आशिष आज असा विचित्र का वागत होता तेच नलिनीला समजत नव्हते....
बरं कधी आशिषने काही खडूस पणा केला तर दिवाकर आशिषची समजूत काढत असे .... आणि नलिनीची साथ देत असे... पण आज मात्र दिवाकर देखील मूग गिळून गप्प बसला होता....
तर नलिनीकडे पाहून रजनी प्रदीपला म्हणाली.... माझ्या एंगेजमेंट पार्टीचा काही जणांना खूप फायदा झाला... डायरेक्ट सुहास सरांशीच सूत जमून आलं....
प्रदीप : म्हणजे... 🤔
रजनी :ती बघ की 🙄 काल सुहास नाही का तीला वेगळं घेऊन बोलले...
प्रदीप : हो का?? असं काही असेल मला तर लक्षातच आले नाही.... पण तू ईतक्या एंगेजमेंट मध्ये busy असताना....तूला बरं दिसलं...
रजनी : मी काय?? सर्वांनीच बघितलं की😏.. सुहासनी काय पाह्यलं त्या नलिनीमध्ये.... त्याला एक से बढकर एक मुली मिळतील ना....
प्रदीप : पण नलिनी?? खरंच तसं काही असेल का मला नाही वाटत..... पण ती दिसायला सुंदर आहे हे सत्य नाकारता येत नाही.....
प्रदीप आणि नलिनीची चर्चा गणेश आणि रिसेप्शनिस्ट ने ऐकली...
गणेश : रजनी मॅम मी बघितलं ते दोघे चक्क एका ताटात जेवत होते....
सगळ्यांची आता गॉसिप गँग तयार झाली होती....
तुषार आणि समायराचे काम सुरु असल्याने त्यांचं या गँग कडे लक्ष नव्हतं तर आशिष आणि दिवाकर, नलिनीच्या नकळत बाकी लोकांची गॉसिप ऐकून मनोमन खूष होत होते....तसंच ऑफिस मधल्या लोकांनी जो अंदाज केला होता त्याची त्यांना कीव पण येत होती....
आशिष तर मनात म्हणत होता.. तूम्ही लोकं खूप साधेभोळे आहात यांची तर चांडाळ चौकडी आहे.... तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा धक्के बसल्याशिवाय राहणार नाही....
गणेश तुषार आणि समायराजवळ घुटमळायला लागला...
तुषार : गणेश !! आज तू कोणती खबर आणली आहॆस?? जी सांगण्यासाठी ईथे घुटमळत आहे....
गणेश : तुमच्या पर्यंत आली नाही का? आपल्या सुहास बाबाची गोष्ट....
सुहास बाबाची?? 🤔.. 😳 तुषारला एकदम धस्स झालं....आता हा कोणतं गुपित सांगणार आहे... तुषारच्या मनात एकदम विचार चमकून गेला....
गणेश : ती नवीन मुलगी नाही का? डेव्हलपर का फिव्हलपर आहे ती??
तुषार : नलिनी??
गणेश : हा, तीच ती.... आपल्या ऑफिसच्या सगळ्यांना वाटतंय सुहास बाबाचं अन तिचं.. हूं हूं अन हूं
तुषार :😳 काय?? गणेश काहीही बडबड करू नकोस 😠
गणेश : तुम्हाला इतकं चिडायला काय झालं??
तुषार : गणेश !!तूझ्या या बोलण्यामागे काहीतरी लॉजिक आहे का??
गणेश : लॉजिक?? 🤔 ते लॉजिक बिजिक आपल्याला समजत नाय.... पण या गोष्टीची आपल्या ऑफिसमध्ये चर्चा आहे....
समायरा :😳 काय?? पूर्ण ऑफिस मध्ये चर्चा चालू आहे....
गणेश : हो, म्हणूनच मी तुम्हाला सांगायला आलो... मला तर वाटलं होतं तुम्हाला आधीच कळालं असेल.... पण तुषार सर तर माझ्यावरच चिडले....
तुषार : तसं नाही रे गणेश!!.... कुठल्याही गोष्टीची खात्री नसताना तूम्ही असं काही बोलू नये... ईतकंच मला वाटतं....आपलं काही नसतं जात पण कळत नकळत आपण कुणाची बदनामी करत असतो.....
गणेश : मला तुमचं काहीच समजत नाही बाबा.... मी जी चर्चा ऑफिस मध्ये ऐकली ती तुम्हाला सांगितली🤷♂️....
गणेश तिथून निघून गेला....
तुषार :🤦♂️
समायरा :🤦, खरंच काल असं काय घडलं की टोनी आणि नलिनीचं काही चालू😠 आहे असं यांना वाटायला लागलं...
तुषार : सुहासला माहिती नसेलच.... कदाचीत नलिनीलाही.... म्हणूनच ती काम करताना दिसत आहे....
समायरा : काय माहिती?? थांब मी त्याला मेसेज करते...
तुषार : नको!!... मेसेजेस ने कधी कधी गैरसमज होतात... ऑफिस सुटल्यावर तूम्ही भेटता ना तेव्हा सांग...
बोलता बोलता तुषारचं लक्ष नलिनीकडे गेलं.... त्याला असं दिसत होतं की आशिष नलिनीशी काहीतरी बोलत आहे... आणि नलिनीचा चेहरा मात्र एकदम रडवेला दिसत होता...
तुषार : समायरा !! नलिनीचा चेहरा बघ ना... आज काहीतरी गोंधळ दिसत आहे.... मी त्यांच्याकडे जाऊन बघू का?
समायराने देखील नलिनीकडे नजर टाकली...तीला नलिनी सगळ्यांच्या नकळत डोळे पुसत असताना दिसली... तुषार !!काहीतरी नक्कीच चुकतंय... नलिनी रडत आहे...
हो ना?? ... मी जाऊनच येतो... बघतो नेमकं काय चालू आहे....
असं म्हणून तुषार नलिनी आणि आशिष कडे गेला....
तुषारला पाहून नलिनीला एकदम रडू आलं पण तरी भानावर येऊन तीने सावरलं....
तुषार : excuse me, नलिनी !! ते हनिमून कपल्स बद्दल तूझ्या अँप मध्ये काय ऍड केलं आहे.... एकदा मला दाखवशील का??
नलिनी लागलीच लॅपटॉप मधील फोल्डर ओपन करायला लागली....
.
आशिष : तुषार !!काय घाई आहे... अँप पूर्ण झाल्यावर तू बघशीलच ना?? तूला काय या आशिष वर विश्वास नाही का?
तुषार : तसं नाही... अजून काही पॉईंट कव्हर करायचे राहिले ते मी बघत होतो...
आशिष : ते मी कव्हर करून घेईलच.... हो ना तुषार??
तुषार : हो...
आशिष : मग तू येऊ शकतोस😏.... बघ समोर कस्टमरची किती लाईन लागली आहे...
तुषारला आशिष आज जरा जास्तच विचित्र पद्धतीने बोलत आहे याचा अंदाजा आला..... त्या मुळे तुषारने तिथून काढता पाय घेतला....
तुषार लागलीच केबिन मध्ये आला आणि समायराला म्हणाला... समायरा !! आजचं आशिषचं वागणं हे नेहमीसारखं नाही....
समायरा : म्हणजे 🤔??
तुषारने आशिष कश्या पद्धतीने बोलला हे समायराला सांगितलं....
समायरा : बापरे 😳, पण नलिनी ती का रडत आहे??
तुषार :तेच तर कळाले नाही ना....
कस्टमर सुरु झाल्याने दोघांनाही कामाला लागावे लागले....
टोनीला समायराला बघण्याची हुक्की आली.... आईला भेटण्याच्या बहाण्याने टोनी ऑफिस मध्ये आला....
टोनी ईथे आता... हा आणि ईथे कश्याला आला आहे?? आधीच टोनी सोबत नलिनीचं नाव जोडलं जात आहे आता तर खात्री होईल....
आशिषने टोनीला पाहिलं आणि मुद्दाम हळूच खुणावत त्याने त्याला स्वतः जवळ बोलावून घेतलं...
टोनी नलिनी कडे जात आहे हे पाहून समायराने डोक्यावर हात मारला 🤦♀️
आता हा टोनी अजून कॉम्प्लिकेशन्स वाढवणार.... पण आता पर्याय नाही तो नलिनीजवळ जाऊन उभा राहिला...
आशिष : काय टोनी !! कसं काय येणं केलंत....
टोनी : काही नाही रे... मी इथून जात होतो म्हटलं जरा मॉम ची भेट घ्यावी....
आशिष :नक्की तेच कारण होतं ना?? की अजून दुसरे काही??
टोनी : नाही नाही तितकंच... चल मी मॉम ला जरा भेटतो
क्रमश :
भाग 69 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा