टोनी समायराला नेहमीच्या ठिकाणी सोडवायला आला....
समायरा : टोनी !! तू ऑफिस कधी जॉईन करणार आहॆस...
टोनी : खरं तर माझी इंटर्नशिप दहा तारखेला संपत आहे... अगदीच अकरा तारखेला मी जॉईन करू शकतो... अमेरिकेत लागलीच कम्प्लिशन देतात.... का गं??
समायरा : काही नाही मला आता बाबांपासून आपलं नातं लपवावं वाटत नाहीये... तू ऑफिसला जॉईन झालास की मी दुसऱ्याच दिवशी बाबांना सांगेन.... रजनीच्या एंगेजमेंटच्या दिवशी तर माझ्या आईने माझे आणि तुषारचे स्वप्नच रंगवले 👩❤️👨होते... तो मला सोडवायला घरी आला होता म्हणून....
टोनी : मग तू काय म्हणालीस?😃
समायरा : काय म्हणणार?? मी सांगितलं त्याला ऑफिस मधली एक मुलगी आवडते म्हणून.... पण खरं सांगू का?? आईने मला विचारलं तूला कुणी आवडतं का? मला तूझ्याबद्दल खूप सांगावंसं वाटलं....
टोनी : थोडे दिवस... मी ऑफिस जॉईन केल्यावर आपला जावई कर्तृत्ववान असल्याचा त्यांनाच आनंद होईल. नाही का?
समायरा : हूं... म्हणूनच मी सांगितलं नाही... पण घरी खूप अपराधी असल्यासारखं वाटतं.... कारण माझे आईबाबा मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी विरोध करत नाहीत.... चल, मी उतरते.... आज ईथे थांबून नेहमीपेक्षा जास्त वेळ झाला आहे....
समायरा कार मधून उतरली.... तेच नेमकं तिच्या शेजारच्या काकूंनी पाहिलं....
मर्सिडीज कार 🚗 ते ही हिला सोडवायला 😏 नक्कीच काही तरी शिजतंय👩❤️👨.....
समायरा जवळ येताच त्यांच्या शेजारची काकू तीला म्हणाली :काय समायरा !!आज एकदम मर्सिडीज🚗 गाडीमध्येच... काय लॉटरी बिटरी लागली की काय?? कोण होता तो हिरो🤩...
बापरे 😳हिरो बिरो, ह्या काकूंना ईतक्या दुरून "टोनी" दिसला की काय?? कसं शक्य आहे.... समायरा मुद्दाम थोडी खोकलली...
काही नाही काकू मला जरा बरं वाटत नव्हतं तर आमच्या बॉसने मला सोडवायला गाडी 🚗पाठवली...
असं होय.... मला वाटलं की 😍😍... शेजारीण वाक्य पूर्ण करणार तोच समायरा म्हणाली :काकू !! मला जरा बरं वाटत नाहीये मी जरा घरी जाऊन आराम करते...
समायराने एकदम व्यवस्थित शेजारणीला उत्तर दिले... पण या पुढे टोनी ऑफिसला जाईपर्यंत बसनेच प्रवास करावा लागेल असे मनात ठरवले....
आता आशिषचं पितळ टोनीसमोर लवकर उघडं करावं म्हणजे नलिनीची त्यातून सुटका होईल... पण टोनी तर आशिषवर एकदम आंधळा विश्वास ठेऊन आहे.... खूप हुशारीने हे करावं लागेल🤔... असा तुषार मनोमन विचार करू लागला...
आशिष मात्र नलिनीला अडकवण्याचा तयारीला लागला... आज त्याला ह्या चौघांवर आलेला राग आशिषने नलिनीवर काढला होता.... पण त्याने आता शांत डोक्याने त्याच्या मनात एक प्लॅन तयार केला...
दुसरा दिवस उजाडला... नलिनी आज देखील ऑफिसला साडेनऊलाच हजर झाली होती....
नलीनीने आधीच घरी देखील एक वेगळे फोल्डर तयार केले होते... जेणेकरून तीचे काम लवकर होईल....
आशिष : नलिनी !! अगं आज लवकरच आलीस... अकरा वाजता यायचं असतं ना....
कालचा आशिष आणि आज वागणारा आशिष दोघांमध्ये खूप फरक दिसत होता... आशिष कितीही बोलला तरी काहीच रिऍक्ट व्हायचं नाही अशी, नलिनी आज मनाची तयारी करून आली होती..पण त्याची गरजच पडली नाही....
आशिष : नलिनी !!" सॉरी "मी काल खुपच विचित्र वागलो.. कामाचा ताण आहे ना....
नलिनी :its ok सर... पण खरंच काल मी खूप कॉन्फयुज्ड होते....
आशिष :बरं नलिनी !! मी जर तूझ्या प्रोजेक्ट मध्ये लक्ष घातलं नाही तर हे प्रोजेक्ट तू कमीत कमी किती दिवसात पूर्ण करशील...
नलिनी :😳 काय?? तूम्ही लक्ष नाही घातलं तर....
आशिष : हो...
नलिनी : दहा तारखे पर्यंत ....
आशिष : ईतक्या लवकर....गूड...
नलिनी : हो...
आशिष : ठीक आहे.... नलिनी !!आजपासून मी तूला तूझ्या प्रोजेक्टची मोकळीक दिली समज.... पण दहा तारखेला मला आपल्या कंपनीची अँप पूर्ण तयार करून पाहीजे....
नलिनी : हो आशिष सर
दिवाकर मात्र आशिष आणि नलिनीचं संभाषण बघून पुरता गोंधळून गेला....
काय चाललं आहे आशिषच्या मनात?? काल कसा वागत होता आज एकदम सॉरी नलिनी.....
दिवाकर : आशिषराव !!जरा बाहेर येता का?? मला तुमच्याशी महत्वाचे बोलायचं आहे....
आशिष : हो, चला मला पण तुम्हाला खूप महत्वाचे बोलायचे आहे...
बाहेर दोघेही ऑफिस जवळ असलेल्या चहाच्या टपरीवर बसले...
दिवाकर :आशिषराव आज तुमचं नलिनीशी वागणं... मला समजेल का नेमकं तुमच्या मनात काय चाललं आहे ते?? 🤔
आशिष :मला सांगा बाबा !! नलिनीचा प्रोजेक्ट लवकर झाल्याने आपला फायदा आहे की उशिरा झाल्याने??
दिवाकर : हो आता लक्षात आलं, आशिषराव प्रोजेक्ट लवकर पूर्ण झाल्यावर आपला लवकर फायदा होईल...
आशिष :तेच ना... काल मी घरी गेल्यावर शांत डोक्याने विचार केला ... तेव्हा माझ्या लक्षात आलं की नलिनीवर चिडण्यात आपण उगाचच टाईमपास करत आहोत.... काल मी खूप चिडलो होतो कारण तिने या आशिषला फसवलं होतं.... या आशिषला....
पण आता मात्र त्याने नलीनीने सही केलेल्या व्हावचर वर मी दहा लाखांची रक्कम भरायचं ठरवलं आहे ....
मग बघू, 🤔 आली तर गोत्यात नलिनीच येईल... आशिष छद्मी पणाने हसला 😝
दिवाकर : असं आहे तर... तरी मला वाटलं आज सूर्य कुठून उगवला....
नलिनी मात्र आशिषच्या बदललेल्या वागण्यामुळे खूप खूष झाली... तीने काहीच विचार न करता एकदम मन लाऊन काम करायला सुरवात केली.... ती आज एकदम आनंदी दिसत होती....
तुषारचे नलिनीकडे लक्ष होतेच आज तीला आनंदी🥰 पाहून तोही खूप खूष झाला....
दिवाकर आणि आशिष तिच्याजवळ नव्हतेच....
समायरा !! मी नलिनीकडे एका मिनिटात जाऊन येतो... असं तुषारने नलिनीला सांगितलं आणि तुषार नलिनीजवळ कामाच्या बहाण्याने गेला....
तुषार : आज स्वारी एकदम खूष दिसत आहे....
नलिनी : आज आशिषने माझी माफी मागितली... आणि सगळा प्रोजेक्ट आता मीच पूर्ण करणार...
तुषार : म्हणजे?? आधी देखील तूच पूर्ण करणार होतीस ना?? 🤔
नलिनी : म्हणजे आता या पुढे आशिषची ढवळा ढवळ बंद... फक्त ते मी दहा तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहे..
तुषार :अरे वा😊... चल निघतो मी ते दोघे समोरून येताना दिसत आहेत.....
"yes got it " पण आता नलिनीला तीचे काम करू द्यायचे.... आज मनासारखे काम करायला मिळत आहे म्हणून किती खूष 😊दिसत आहे ती... मला वाटतं आपलं ऑफिस जॉईन केल्यापासून आज पहिल्यांदाच नलिनीच्या चेहऱ्यावर कसला ताण नाहीये.... हा आशिष माझ्या नलिनीला कसं अडकवतो तेच बघतो मी.
तुषार त्याच्या केबिनमध्ये विचार करत करतच गेला.....
समायरा : तुषार !!क्या बात है?? आज तर तूम्हा दोघांचाही चेहरा खूप खुलला 🥰🥰आहे....
तुषारने आशिषच्या वागण्याबद्दल समायराला सांगितले...
समायरा : गूड... देर आये दुरुस्त आये...
तुषार : कसलंकाय 🙄
समायरा : म्हणजे??
क्रमश :
भाग 71 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
6 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNew part 71
उत्तर द्याहटवाउद्या
हटवाKhupch chaan part...pudhe utsukta aahe vachaychi
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा