तुषारला एक भन्नाट कल्पना सुचली😇...
घरी गेल्यावर चॅटिंग दरम्यान नलिनीला काही instructions देऊन ठेवायचे असे त्याने मनोमन ठरवले....
नलिनी आणि टोनी बद्दल उडालेल्या अफवा अद्याप नलिनी पर्यंत पोहोचल्या नव्हत्या...
नलिनी सतत उदास रहात असल्यामुळे टोनी, समायरा आणि तुषार यांनी देखील ही अफवा तिच्यापर्यँत पोहोचणार नाही यांचं कटाक्षाने पालन करत होते......
तुषारने नलिनीला ठरलेल्या वेळेवर मेसेंजर वर मेसेज केला...
तुषार : hi नलिनी !! कशी आहॆस??
नलिनी : आज जरा बरं वाटत आहे😊... किती दिवसांनी काहीतरी माझ्या मनासारखं झालं आहे...
तुषार : हो ना.... बरं ऐक ना....
नलिनी : काय??
तुषार : तू तुझे काम पूर्ण झाल्यावर पेमेंट घेताना आशिष कडून चेक पेमेंट घेशील.... त्याला आपल्या ऑफिस कडून चेक द्यावा लागेल ना.... कदाचित त्याच्यामुळे त्याला कुठलं फ्रॉड करता येणार नाही...
नलिनी : hope so.... पण "चेक पेमेंट "आयडिया चांगली आहे... तूला काही संशय आला आहे का?? 🤔
तुषार : मला तर संशय येतच राहतो 😃... पण ते तूझ्या कामाचं नाही... जाऊदे.... पण आज जसा तूझा चेहरा😍🤩 खुलला आहे ना तसाच सतत हसमुख😊😊 राहू दे...
नलिनी :😊
तुषार : तूझ्या त्याच हसमुख 😊चेहऱ्याव तर मी फिदा झालो आहे... ती तूझ्या गालावरची खळी😍🤩....
नलिनी : हूं हूं हूं🥰... आज अचानक 😍😍🤩🤩
तुषार : 🌹🌹🌹
नलिनी : तुषार!! कधी संपेल हे सगळं?? मला तर वाटतं की बाबाना पण लवकर समजावं की तू चुकीचा नाहीयेस....परिस्थिती चुकीची आहे......
तुषार : येईल येईल, तो दिवस देखील येईल....
नलिनी : हं....
तुषार आणि नलिनी बऱ्याच दिवसांनी आज रिलॅक्स होऊन बराच वेळ चॅटिंग👩❤️👨 करत होते....खूप दिवसांनी त्यांना आजचा दिवस त्यांचा वाटत होता......
ईकडे आशिषच मन मात्र इतक्यावरच समाधानी नव्हतं.... गणेश ने मार्था आणि टोनीचं संभाषण ऐकलं होतं आणि इंटर्नशिप संपली की दुसऱ्याच दिवशी टोनी ऑफिस जॉईन करणार आहे आशिषला त्याने सांगितलं होतं.....
टोनीच्या इंटर्नशिप कंप्लिशनची तारीख आशिषने बोलता बोलता त्याच्याकडून काढून घेतली होती....
आशिष रात्रभर काही विचार करत होता....
आशिषने सकाळीच दिवाकरला फोन 📳लावला....
आशिष : बाबा !! आज ऑफिसला सोबतच जाऊ... मी तुम्हाला घ्यायला येतो आहे....
दिवाकर : ठीक आहे, मी तयार राहतो....
आशिषराव चक्क मला घ्यायला?? 🤔 आज कुठलाही जावईपणा न ठेवता... आश्चर्य 😳आहे.... नक्की काहीतरी मोठी गोष्ट सांगायची असणार.... दिवाकर विचार करत करतच तयार झाला....
तितक्यात आशिषच्या गाडीचा हॉर्न 📢वाजला.... दिवाकर घराबाहेर पडणार तोच आशिष घरात आला...
आशिष : बाबा !!मला तुमच्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे....
दिवाकर : आशिषराव!! तूम्ही आधी बसा तर... मी हिला चहा ☕️ठेवायला सांगतो.....
आशिष : चहा ☕️बिहा काही नको... आपण फक्त बोलू... आणि ऑफिसला जाऊ....
दिवाकर : अहो अस्मिची आई !!आशिषराव चहा ☕️नको म्हणत आहेत.... आम्ही थोडं महत्वाचे बोलणार आहे... आम्हाला ईथे प्लीज कुणाचाच डिस्टर्ब नको आहे....
बोला आशिषराव !!
आशिष : "नलिनी " तिचं प्रोजेक्ट दहा तारखेपर्यंत पूर्ण करणार आहे... आणि अंदाजे अकरा तारखेला टोनी आपल्या ऑफिसला जॉईन होणार आहे.... म्हणजे तयार झालेली अँप ही टोनी उर्फ सुहास लॉंच करेल....तर ही अँप मला लॉंच करायची आहे.... त्याचं सगळं क्रेडिट मला पाहिजे....
दिवाकर : तुम्हालाच मिळायला पाहिजे.... डेव्हलपर आपण शोधून काढला आहे....
आशिष : म्हणूनच मला एक चांगली कल्पना सुचली आहे...
दिवाकर :कुठली??
आशिष : दहा तारखेला अँप पूर्ण तयार झाली की आपणच एक डेमो घेऊन नलिनीचा पत्ता कट करायचा... तीला पेमेंट चेक द्वारे द्यायचे म्हणजे तीला वाटेल सगळं legaly चाललं आहे....
दिवाकर : पेमेंट चेक द्वारे दिल्यावर legaly च होणार ना??🤔
आशिष :😃😃😃 बघा तूम्हाला नाही लक्षात आलं तर नलीनीला तर कसच लक्षात नाही येणार....
दिवाकर : म्हणजे?? 🤔
आशिष : मी व्हावचर सबमिट करणार कुठे??
दिवाकर :आपल्या ऑफिसला.... 🙄
आशिष : मी मार्थाला फक्त व्हावचर दाखवून तिच्याकडून पैसे ट्रान्सफर माझ्या अकाउंटला करणार....आणि माझ्या अकाउंटचा चेक मी नलिनीला देऊन टाकेन... ....
दिवाकर : great... म्हणजे बाकीचे आठ लाख??
आशिष : आपले... एकदम करेक्ट.. आणि मी टोनीला मार्थाच्या खुर्चीवर बिलकुल बसू देणार नाही....
दिवाकर : आशिषराव !! मी तर अगदीच सुरुवातीपासून म्हणतो आहे.... या सगळ्यावर तुमचाच अधिकार आहे.... पण तूम्ही तेवढं सिरीयसली घेतच नाहीत...
आशिष : बाबा !!तुमचं म्हणणं खरं आहे.... म्हणूनच अकरा तारखेला टोनीला जॉईन होऊ द्यायचे नाही...
दिवाकर : पण ते कसं??
आशिषने दिवाकरच्या कानात काहीतरी सांगितलं... आणी
दोघेही मनसोक्त 😂😂😂हसले...
दिवाकर : आशिषराव !! मला अभिमान आहे तुमचा....
आशिषने कॉलर वर उचलली, आणि म्हणाला चला ऑफिसला निघूया
दोघेही ऑफिसला निघाले....
ऑफिसमध्ये नलिनी देखील नलिनीचे काम मन लाऊन करायला लागली आता तिच्यावर कुठलाच दबाव नसल्याने तिच्या कामाने गती घेतली होती....
अधून मधून रजनी नलिनीला टोनीबद्दल काही ना काही विचारण्याचा प्रयत्न करायची... पण कधी तुषार तर कधी समायरा, रजनी नेमकं काय बोलत आहे याचा अंदाज घेऊन शिताफीने विषय बदलत असत....
नलिनी मात्र कामात व्यस्त असल्यामुळे रजनी नेमकं काय बोलत आहे याचा विचारच करत नसे...
टोनीला समायराने शेजरच्या काकू विषयी सांगितल्यामुळे तो ऑफिसला जॉईन होईपर्यंत समायराचे बस ने घरी जाण्याचे ठरले....
टोनीची इंटर्नशिप शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे त्याला त्याचे सबमिशन करणे देखील जरुरी होते.... साहजिकच काम वाढल्यामुळे टोनीचे ऑफिसला येणे देखील बंद झाले...
तुषार, नलिनी, टोनी आणि समायरा या सगळ्यांचेच एक रुटीन सुरु झाले....
क्रमश :
भाग 72 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
0 टिप्पण्या