किती सांगायचं मला (भाग 72)

नलिनीचे काम हे सात तारखेलाच पूर्ण झाले ....
 तीला मात्र तिच्या अँपचा डेमो सर्वप्रथम तुषारलाच द्यायचा होता.... डेमो द्यायचा म्हणजे कमीत कमी तीन तास तुषारला भेटणं जरुरी होतं...

 इतका वेळ बाहेर भेटणं म्हणजे एक मोठी रिस्क होती.... काय करावं हेच नलिनीला समजत नव्हतं... 

शेवटी नलीनीने तिच्या बाबांशी बोलायचं ठरवलं.... देऊन देऊन चारदोन शिव्याच देतील ना🤔... तितकं सहन करायचं असं तीने मनात ठरवलं 

नलिनी : बाबा !! मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे.... 

नलिनीचे बाबा : काय? 

नलिनी : बाबा !!आमच्या ऑफिस मध्ये तो तुषार आहे ना... 

नलिनीचे बाबा : त्याचं नाव देखील माझ्यासमोर घेऊ नकोस😡.... धोकेबाज कुठला.... आम्हाला फसवतो.... 

नलिनी : बाबा !!तूम्ही ऐका तर.... मला माझ्या ऑफिसच्या कामाविषयी तुमच्याशी बोलायचं आहे... 

नलिनीचे बाबा : काम असो का बीम.... जरा दुरूनच.... त्याची काहीच लायकी नाही... 

नलिनी : बाबा !! माझं प्रोजेक्ट पूर्ण झालं आहे पण मला आता तुषार आणि आपली समायरा आहे ना.... त्या दोघांनाही डेमो द्यायचा आहे.... त्यासाठी मला दोघांनाही बाहेर भेटावं लागणार आहे.... 

नलिनीचे बाबा : पण डेमो देण्यासाठी ऑफिस आहे... तूला बाहेर भेटायची काय गरज आहे.... 

नलिनी : बाबा !!तूमचा माझ्यावर विश्वास नाही का?? तसंही समायरा असणारच आहेना माझ्यासोबत..... पण तूम्ही नाही म्हणत असाल तर नाही देत त्यांना डेमो😒... 

नलिनीचे बाबा : तुझ्यावर विश्वास आहे गं... पण त्याच्यावर नाही ना.... पण तूझं डेमो देणं तितकंच आवश्यक आहे का? 

नलिनी : हो बाबा !!. 

नलिनीचे बाबा :ठीक आहे... समायरा सोबत आहे म्हणतेस म्हणून परवानगी देत आहे... 

नलिनी : थँक यू बाबा !!

नलिनीचे बाबा : पण जास्त वेळ लाऊ नकोस... लवकर डेमो देऊन ये.... 

नलिनी : हो बाबा !!

नलीनीने लागलीच समायराला फोन 📳लावला.... 

नलिनी?? आता इतक्या उशिरा?? समायराने विचार करत करत फोन उचलला.... 

नलिनी : हॅलो समायरा !!

समायरा :नलिनी !!बोल गं.... तिकडे सगळं काही ठीक आहे ना.... 

नलिनी :हूं,  समायरा !! हे बघ माझं अँप च काम पूर्ण झालं आहे... दहा तारखेला मला आशिषसरांना याचा डेमो द्यायचा आहे तत्पूर्वी त्या अँप ची इथंभूतः माहिती तूम्हा दोघांना मला द्यायची आहे..... 

समायरा : "तू अँप पूर्ण तयार केलीस त्या बद्दल "अभिनंदन "...  तूला डेमो द्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाहेर कुठेतरी भेटावं लागेल.... 

नलिनी : मी तशी  बाबांची परवानगी घेतली आहे तू फक्त तुषारला निरोप दे.... आपण उद्या संध्याकाळी सहा वाजता स्नॅक्स अँड कॉफी हॉटेल मध्ये भेटू..... 

समायरा : ओ हो😍🤩.... बाबांची परवानगी मिळाली👌👌.... असं आहे तर... 

नलिनी (हळूच ): मोठया मुश्किलीने मिळाली.... त्यातल्या त्यात तू सोबत आहेस म्हणून मिळाली... 

समायरा : ठीक आहे.. मी तुषारला सांगते.... तू पण मेसेज करून टाक.... 

नलिनी : हूं.... 

नलिनी आता ऑफिसमध्ये काम केल्याचे सोंग करत होती... आशिष आणि दिवाकरला अँप शेवटच्या टप्प्यात आहे असं सांगत होती.... 

ठरल्याप्रमाणे नलिनी तुषार आणि समायरा स्नॅक्स अँड कॉफी हॉटेल मध्ये भेटले... तिथे business meeting साठी काही स्पेशल रूम प्लायवुड ने तयार केलेल्या होत्या... नलीनीने फोनवर आधीच एक रूम बुक करून ठेवलेली होती... त्या रूम मध्ये ते आले.... 

तुषार : नलिनी !! आज तू चक्क ऑफिशीयल मिटिंग घेत आहॆस ती पण माझी😍😍...

नलिनी :हे बघ तुषार !! आपल्याला खरंच गप्पा मारायला वेळ नाही... गप्पा काय आपण मेसेंजर वर मारू शकतो...पण माहिती नाही का?? माझं सिक्स सेन्स सांगत आहे की आशिष आणि दिवाकर मध्ये नक्कीच या अँप विषयी काहीतरी शिजत आहे.... त्यांना मी दहा तारखेला अँपचा डेमो दिला की माझा तिथला रोल संपून जातो.... मला कुठलाही अधिकार रहात नाही.... तुषार !!अजून एक गोष्ट... आशिष मला चेक पेमेंट करणार आहे.... 

तुषार :😳 काय?? मग आता नवीन कुठला प्लॅन?? 

नलिनी :  तेच तर काही कळायला मार्ग नाही... म्हणून मी तुम्हाला पूर्ण अँप डेमो देणार आहे... 

असं म्हणून नलीनीने तीचा लॅपटॉप उघडला.... कॉफी ची ऑर्डर देऊन तिघेही आता अँप बघण्यात मग्न झाले होते.... 

नलिनी  एक एक पॉईंट सांगत होती तो तो तुषार 😊आणि समायरा☺️ नलिनीची वाहवा, वाहवा 👌👌करत होते..... 

पूर्ण डेमो देऊन झाल्यावर समायरा म्हणाली: नलिनी !!अगं दोन लाख रुपये, फार कमी पैसे💵 घेत आहॆस तू...... किती एक न एक पॉईंट कव्हर केला आहॆस.... अँपमुळे आता आशिष आणि दिवाकरला एक टक्काही फ्रॉड करता येणार नाही..... 

तुषार : खरंच, खूप छान, कस्टमरला वापरायला सोपी सुटसुटीत... नुसतं क्लीक जरी केलं तरी गाईड करणारी... मला तो पोर्शन फार आवडला ज्यात ऑडिओ देखील गाईड करणार.... 

नलिनी : थँक्स 🥰.... 

तुषार : नलिनी !!पण आम्हाला डेमो द्यावं असं तूला का सुचलं?? 

नलिनी : मला काल आशिष सर म्हणाले... अँप रेडी ठेव दहा तारखेला मला आणि दिवाकरला तू डेमो दे....त्या दिवशी दुसरं कुठलंही काम तू काढू नकोस....त्यांच्या त्या बोलण्यामागे काहीतरी शिजतंय असंच मला वाटून गेलं... 

तुषार : हो पण ते चेक प्रकरण काय आहे याचा अभ्यास करावा लागेल... आशिष काही साधा सुधा फ्रॉड करणाऱ्यातला दिसत नाही.... 

नलिनी : हो,आता हे वेगळं टेन्शन...की मला चेक देऊन ते काय पाऊल उचलणार आहे.... आपण असं केलं तर... आपण डायरेक्ट टोनीला सांगितलं तर?? 

समायरा : डायरेक्ट टोनीला?? .... चुकूनही नको🤫.... टोनीचा आंधळा विश्वास आहे आशिषवर..... मागे असंच त्या गणेशने आशिषच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर टोनी गणेशवर खूप चिडला होता.... नाहीतर मी आतापर्यंत सांगितलं नसतं का?? 

नलिनी : हो का.... मग जरा सगळ्या गोष्टी अवघड आहेत....

तुषार : चला, एकंदर बरं झालं.... ऑफिशिअल मिटिंगच्या निम्मिताने का होईना आपली भेट झाली 🤩😍🥰

तितक्यात नलिनीचा फोन 📳वाजला.... 

नलिनी : बाबांना कळालं वाटतं... आपली मिटिंग संपली ते..... चला मी निघते... नाहीतर उगाचच बाबांना मी त्यांच्या परवानगीचा गैरफायदा घेतला असे वाटून जाईल...

 असं म्हणून नलिनी तिथून निघून गेली.... 
क्रमश :
भाग  73 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या