किती सांगायचं मला(भाग 75)

मार्था : आशिष !!यांचं आजपर्यंतचं पेमेंट देऊन टाक... तुषार!! आणि समायरा !!तूम्ही आता या पुढे ईथे काम करण्याची गरज नाहीये.😠... तूम्ही येऊ शकता... 

तुषार आणि समायराला आशिषने पगाराचे चेक दिले.... 
दोघांचेही चेहरे खूप पडल😒😒 होते....

 समायराने तर टोनीच्या ऑफिस जॉइनिंगचे स्वप्न 😍पाहिले होते... 

अद्याप टोनी ऑफिसला आला नव्हता आणि समायरा आणि तुषारची मात्र नौकरी सोडून जाण्याची वेळ आली होती.. 

तुषार आणि समायराचं सत्य अश्या प्रकारे मार्था समोर येईल असं दोघांनाही बिलकुल वाटलं नव्हतं....पण आता तिथून शांतपणे निघून जाण्याशिवाय दोघांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता.... 

रजनी प्रदीपला म्हणाली....तरीच मला वाटत होतं.... ही दोघे इतक्या लवकर काशीकाय प्रगती करत होती ते🙄 ... 

प्रदीप :रजनी !! फ्रॉड करणारे लोकं असेच असतात....पण हे दोघे मला तर बिलकुलच संशय आला नाही.... 

तुषारला प्रदीप आणि रजनीच्या चर्चेचा खूप राग😡 येत होता.... पण त्याला समजलं होतं की ही वेळ आपली नाहीये.... त्या मुळे त्याला शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता.... 

समायराचे डोळे  अश्रुनी डबडबले होते 😭....

माझ्या कामाच्या आड येतो काय म्हणून आशिष कुत्सितपणे दोघांकडे 😏बघत होता....  

दोघेही ऑफिस बाहेर पडले आणि आता डायरेक्ट घरी जाण्यापेक्षा कुठेतरी थोडावेळ बसून घरी कश्याप्रकारे सगळं घडलं आहे हे सांगायचं ठरवून मगच घरी जाऊ असं तुषार म्हणाला...... 

समायरा : तुषार !!आपण आमच्या अड्डयावर जाऊ.... खूप दिवस झाले तिथे निवांत असं बसण्यात पण नाही आलं....मी दुःखी असले किंवा खूप आनंदात असले की बऱ्याचदा मी आणि नलिनी ईथे येतो...
समुद्राच्या लहरी पाहून थोडं टेन्शन विसरून जाईल .... 

दोघेही समुद्राच्या बीच वर आले.... 

तिथे समायरा आणि नलिनीचा नेहमीचा ठरलेला बेंच रिकामाच होता.... समायराने तुषारला तो बेंच दाखवला मग दोघेही त्या बेंचवर जाऊन बसले.... 

तुषार : समायरा !!तूला एक गोष्ट लक्षात आली का?? 

समायरा : काय?? 

तुषार :मार्थाने आपल्याला नौकरीवरून काढलं खरं.... पण तीने पोलीस केस केली नाही... 

समायरा : म्हणजे?? मग काय पोलीस केस करायला हवी होती का?? 

तुषार : हो.... समायरा !!तू स्वतःला मार्थाच्या जागी कन्सीडर करून बघ.... 

समायरा : हूं... बरोबर 

तुषार : याचा अर्थ टोनीचा आपल्याला सपोर्ट आहे हे मार्थाला माहिती झालं आहे... i am dam sure की मार्था आज टोनीला देखील ऑफिस जॉईन करून घेत नाही.... 

समायरा :असू शकतं.... बरं ऐक ना तू एकदा प्रमोदला फोन लाऊन बघ ना.... आशिषने त्याला कसं गाठलं ते त्याला विचार?? .... 

तुषारने प्रमोदला फोन लावला.... नऊ ते दहा वेळेस फोन लावला  फोन लागतंच नव्हता..... माझा फोन प्रमोदने ब्लॉक केला की काय?? 

सामायरा : माझा फोन 📳नंबर प्रमोद कडे save नाहीये हा लाऊन बघ.... उचलला तर उचलला 

तुषारने समायराच्या फोन 📳वरून फोन लावला.. प्रमोद ने उचलला.... 

तुषार : प्रमोद !! हे बघ फोन 📳ठेऊ नकोस, मी तूला काहीच बोलणार नाही... पण हे नेमकं कसं झालं मला सांगशील का?

प्रमोद : काल आशिष माझ्याकडे आला आणि त्याने मला त्याच्या फोनच्या गॅलरीत असणारे तुमचे फोटो दाखवून हे फोटो तू काढले आहॆस का हे विचारले.... मी म्हणालो हो मी त्यांच्या लग्नात काढले आहे.... तर आशिषने माझी गच्ची धरली आणि मला म्हणाला....मला सगळं माहिती आहे त्यांचं लग्नच झालेलं नाही.... मला काय मूर्ख समजलास का? तूला चांगला पोलीसि खाक्या दाखवावा लागेल..... खरं सांगतो तुषार जर माझी फॅमिली माझ्यावर अवलंबून नसती तर तुझ्यासाठी मी जेल मध्ये देखील गेलो असतो... पण काय करणार रे.. सॉरी ... 

तुषार : हे बघ प्रमोद !!तूला इतकं वाईट वाटून घेण्याचं कारण नाही.... तू जे केलं आहॆस आमच्यासाठी ते खूप आहे.... पण तूला अंदाजा नाही आला का? की आशिषला  कुठून कल्पना आली असेल याची..... 

प्रमोद : बोलता बोलता आशिष बोलून गेला.... बरं झालं मी त्या चौघांचं बोलणं झालेलं ऐकलं.... 

तुषार :चौघांचं बोलणं??? 

🤦‍♂️ तुषारने डोक्यावर हात मारला.... चोघे जण फक्त रजनीच्या एंगेजमेंटच्या दिवशी एकत्र आलो होतो... अरेरे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली..... खरंच मी नलिनीसाठी ईतका अस्वस्थ का झालो??? त्याचे हे दुष्परिणाम..... 

तुषार : ठीक आहे प्रमोद !!मी फोन 📳ठेवतो आणि मला अनब्लॉक कर... 

ठीक आहे.... पुन्हा एकदा सॉरी असं म्हणून प्रमोदने फोन📳 ठेऊन दिला....

तुषार :समायरा !! एंगेजमेंटच्या दिवशी आपलं जे बोलणं झालं तेच आपल्याला महागात पडलं आहे.... ते आशिषने ऐकलं आणि आपले documents चेक केले असणार..... फोटो वर फोटोग्राफरचे नाव असतेच न... म्हणून तो प्रमोद पर्यंत पोहोचला.... 

समायरा : तरी मी टोनीला म्हणाले होते... आपण ईथे बोलत बसणं चांगलं नाही म्हणून.... 

तुषार : हूं.... 

बरोबर अकरा वाजता टोनी ऑफिसला पोहोचला... आज ऑफिसचा पहिलाच दिवस होता.. अगदीच थोडया वेळापूर्वी त्याला त्याच्या इंटर्नशिप कंप्लिशनचा ई-मेल आला होता...... 

टोनीने मार्थाच्या केबिनमध्ये प्रवेश केला..... केबिन मध्ये जाता जाता त्याने तुषार आणि नलीनीच्या केबिन कडे पाहिले.... रीकामी केबिन बघून टोनी गोंधळात पडला..... 
मे आय कम ईन... 

मार्था :हूं... 

टोनी : मॉम आज ऑफिसला कमी एम्प्लॉयी आले आहेत का गं?? 
मार्था : समायराला शोधत होतास का?? 

टोनी(गोंधळून ) :तसं नाही मॉम येताना तुषार आणि समायराची केबिन रीकामी दिसली म्हणून विचारलं... बरं ते जाऊदे, माझ्या इंटर्नशिप कम्प्लिशनचा आज ई मेल आला आहे.... आजपासून मी ऑफिसला जॉईन होऊ शकतो ना... 

मार्था : मला आपल्या ऑफिसमध्ये फसवेगिरी करणारे लोकं चालत नाहीत.... 

टोनी : म्हणजे?? 
....
मार्था :तू माझा ईतका मोठा विश्वासघात 😠केला आहे...आणि आता म्हणत आहेस की ऑफिस जॉईन करतोस म्हणून.... 

टोनी :काय झालं मॉम??🤔

मार्था : तुषार आणि समायराचं लग्न झालेलं नाही हे तूला आधीच माहिती होते ना.... मग तू मला सांगितलं का नाही?? .. याउलट तू त्यांच्यासोबत सामील झाला.... 

टोनी :तूला कुणी सांगितलं 😳?? 

मार्था : त्याने काय फरक पडतो🙄.... 

टोनी : अगं मॉम !!मी तूला हे सांगणारच होतो फक्त योग्य वेळेची वाट पहात होतो.... 

मार्था : कधी सांगितलं असतंस.... आपल्या कंपनीचं दिवाळं निघाल्यावर?? 

टोनी :दिवाळं?? का निघेल मॉम?? उलट तूच म्हणाली होतीस ना की तुषार आणि समायरानी जॉईन केल्यापासून कंपनीची कमाई डबल झाली आहे म्हणून.... 

मार्था : हो, पण ती अँप डेव्हलपर.... ती यांची मैत्रीण आहे... तीने देखील अँप साठी दहा लाख रुपये घेतले आहेत.... 

टोनी : दहा लाख 😳, नलीनीने?? ... मला तर वाटतं नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे.... बरं तुषार आणि समायरा??? 

मार्था :त्यांना मी नौकरीवरून  काढून टाकलं....  गैरसमज?? कसला गैरसमज?? मी तरी काय बोलणार म्हणा जेव्हा  आपलाच सिक्का खोटा निघाला ..... 
क्रमश :
भाग 76 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लीक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या