नलिनी :खरं आहे... खोटं बोलल्याचा किंवा वागल्याचा परिणाम काय होऊ शकतो, आपण याचाअंदाज पण नाही करू शकत.....
समायरा : नलिनी !!बाबाला तर माहिती आहे... त्या मुळे कदाचीत ते मला समजून देखील घेतीलही पण माझी आई, तीची समजूत कोण काढणार?? आज नाही पण उद्या, मी घरी दिसल्यावर तीचे प्रश्न सुरु राहणार??
नलिनी : पण समायरा !! जसं बाबाला तू विश्वासात घेऊन सांगितलं आहॆस तसं आईला देखील सांगून टाक ना....
समायरा : दोघांच्या समजून घेण्यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे.... माझी आई तर खूप पॅनिक होईल....
नलिनी : खरंच खूप अवघड होऊन बसलं आहे सगळं....
तितक्यात दरवाजाची बेल वाजली.... नलिनीच्या बाबांनी दरवाजा उघडला...
नलीनीच्या नावाची नोटीस 📃एक माणूस देऊन गेला....नलीनीने नोटीस 📃मिळाल्याची (received )सही केली आणि तिच्या बाबांना तीने ती नोटीस📃 मागितली...
नलिनीचे बाबा : नलिनी !! ही वकिलामार्फत आलेली नोटीस 📃दिसत आहे... नेमकं काय आहे यात....
नलीनीने ती नोटीस📃 वाचली आणि जागेवरच मटकन खाली बसली....
नलिनीचे बाबा : काय आहे यात??
समायरा : नलिनी !! इतकं शॉक व्हायला काय झालं?? काय आहे यात....
नलीनीच्या बाबांनी ती नोटीस📃 घेतली आणि वाचायला लागले .... त्यात लिहिलं होतं की अँप डेव्हलोपमेंटच्या वेळेस दहा लाखांची अफरातफर....कंपनीच्या ऑडिट मध्ये असे निदर्शनास आले आहे की अँप चार लाखांची असताना दहा लाख रुपये कंपनीकडून लुबाडले.... उर्वरित सहा लाख रुपये पंधरा दिवसाच्या आत कंपनीला परत करा.... नाहीतर तुमच्यावर रीतसर कार्यवाही करण्यात येईल....
नलिनीचे बाबा : सहा लाख रुपये🤔... पंधरा दिवसात.... कुठून आणायचे?? नलिनी !!हा काय गोंधळ आहे.... हा मी लग्नासाठी दिलेल्या नकाराचा बदला तर नाही ना?? हे काम त्या तुषारचे😡 तर नाही ना??
नलिनी : नाही हो बाबा !!या प्रकाराशी त्याचा काडीमात्र संबंध नाही....
समायरा : हो काका !!नलिनी म्हणत आहे ते खरं आहे... तुषारचा काहीच संबंध नाही....
नलिनीचे बाबा : तूम्ही त्याची बाजू घेऊ नका.... त्याचे आधीच लग्न झाले आहे हे तो लपवून मुलगी बघायला येऊ शकतो तर तो काहीही करू शकतो....
नलिनीच्या बाबांचा तुषारवरचा राग पाहून दोघीही चूप बसल्या.... कारण त्यांच्यासमोर आता आलेलं हे सगळ्यात मोठं टेन्शन होतं.....
नलिनीचे बाबा : नलिनी !! मला सांग नेमकं काय घडलं आहे ते??
नलीनीने व्हावचर सही केल्यापासून सगळं तिच्या बाबांना आशिष बद्दल सांगितलं.....
नलिनीचे बाबा : नलिनी !!म्हणजे तूला जाणूनबुजून अडकवण्यात आलं......
नलिनी : हो बाबा, त्यांनी माझ्या न कळत अगदीच सुरुवातीला व्हावचर वर सह्या घेतल्या....
नलिनीचे बाबा : अवघड आहे.... यातून आता मार्ग काढायचा कसा?? ती नोटीस📃 दे ईकडे.... मी जरा वकिलाकडे जाऊन येतो.... बघतो यात काही मार्ग निघतो का??
असं म्हणून नलिनीचे बाबा ती नोटीस 📃घेऊन वकिलाकडे गेले....
नलिनीचे बाबा घराबाहेर पडले की लागलीच समायराने टोनीला फोन 📳लावला.....
समायरा : हॅलो टोनी !! आपल्या ऑफिसने नलिनीला दहा लाखांच्या अफरातफरीची वकिलामार्फत नोटीस📃 पाठवली आहे....
टोनी :😳 काय?? इतक्या लवकर.....
समायरा : हो.....
टोनी : समु !! नलिनीला सांग टेन्शन घेऊ नकोस मला हे सगळं कोणी केलं हे कळालं आहे....
समायरा : अच्छा, तूला सगळं खरं कळालं ना... ते फार महत्वाचे होते....ठीक आहे ठेवते मी... नलिनी खूप टेन्शन मध्ये आहे....
समायराने फोन📳 ठेवला
समायरा: नलिनी !!अगं टोनीला सगळं कळालं आहे.... तूला आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही....
नलिनी :पण नोटीस 📃तर ऑफिसने पाठवली आहे.... मार्था मॅम ने पण टोनीचं नाही ऐकलं तर.....
समायरा : टोनी विथ प्रूफ सगळं सांगेल ना...
नलिनी : पण मी तर सही करून मूर्खपणा केलाच ना...
समायरा : हे बघ नलिनी !!तू आता जास्त विचार करू नकोस बरं.... 🙄 मी तूझ्याकडे माझे टेन्शन दूर करण्यासाठी आले होते... पण हे माहिती नव्हतं की तूझ्या टेन्शनमुळे मी माझं टेन्शन विसरून जाईल ते 🤔
नलिनीची आई बाजारात भाज्या घ्यायला गेली होती म्हणून घरात काय घडलं आहे त्याची जाणीव तीला नव्हती....नलिनीची आई घरी आली..
नलिनीची आई :समायरा !!तू कधी आलीस??
समायरा : काकू !!बराच वेळ झाला मी येऊन....
नलिनीची आई : नलिनी !!जरा पाणी आण बघू...
नलिनी : हो आई !!पाणी आणते, चहा ☕️ठेवते तू ये फ्रेश होऊन....
समायरा : नलिनी !!मी निघते, आता घरी बाबांना सगळं सांगावं लागेल.... आईलाच कसं सांगावं तेच कळत नाहीये....
नलिनी : थांब ना.... एकदा बाबांना येऊ देत, मग जा ..
तितक्यात नलिनीचे बाबा घरी आले.... नलीनीने त्यांना खुणेनेच विचारले....नलीनीच्या बाबांनी नकारात्मक मान हलवली.... नलीनीने हळूच जाऊन बाबांना विचारलं...काय म्हणाले वकील?? बाबा म्हणाले.... तू सही केली याचा अर्थ तूला ते पैसे मिळाल्याची पोचपावती होती ती....
नलिनी :अच्छा, बाबा !!तूम्ही आता काहीच करायची गरज नाही... आमच्या बॉसचा मुलगा टोनी आहे ना त्याच्यासमोर हे कुणी केलं का केलं याचं सत्य आलं आहे....
नलिनीचे बाबा :पण ही नोटीस📃?? ह्याचं काही होत नाही तो पर्यंत या तोंडी गोष्टींना काहीच महत्व नाही....
नलिनीची आई :कसली नोटीस📃, कुठल्या तोंडी गोष्टी....
नलिनी : अगं आई !! मी बाबांना माझ्या कामाच्या बाबतीत असलेल्या नियमांबद्दल विचारत होते.....
नलिनीची आई : तसंही, मला मेलीला काय कळतं?? त्यातलं
असं म्हणून नलिनीची आई तिथून निघून गेली....
समायरा : काका !! पंधरा दिवसांचा अवधी आहे... काही ना काही उपाय निघेल, पण तूम्ही टेन्शन नका घेऊ...
नलिनीचे बाबा :आधी हिच्या लग्नाचं असं झालं आणि आता काय तर म्हणे अफरातफर... माझ्या लेकीने कमी पैसे 💵घेऊन काम केलं तरी त्या लोकांनी तिलाच अडकवलं..... या वयात आता असले टेन्शन सहन होत नाहीत..
नलीनी : बाबा !!मी काही गून्हा केलेला नाही.... मग माझ्यासोबत इतकं वाईट कसं होईल?? .... सगळं काही ठीक होईल.... तूम्ही जास्त विचार करू नका....
तरीही वेळ आलीच तर नलीनीच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी सहा लाख रुपये फिक्स डिपॉजिट मध्ये ठेवले होते... ती FD तोडायची ठरवले होते.....
चला निघते मी असं म्हणून समायरा तिच्या घरी गेली....
क्रमश :
भाग 78 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®सुजाता.स्वानुभव /सप्तरंग
2 टिप्पण्या
Nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा