समायरा घरी पोहोचली....
आज समायरा तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा आधीच घरी पोहोचली होती.... त्यामुळे घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं....
समायराची आई : समु !!आज इतक्या लवकर घरी?? ऑफिस लवकर सुटलं का??
आई !! बाबा कुठे दिसत नाहीत?? आईच्या प्रश्नाचे मुद्दाम उत्तर न देता समायराने प्रश्न विचारला....
समायराची आई : अजून कुठे असणार आहेत तुझे बाबा?? त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी.... परसबागेत.... पण समायराने काही उत्तर न देता ज्या प्रकारे प्रश्न विचारला होता... त्या मुळे तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
समायरा लागलीच बागेत गेली... समायराचे बाबा झाडाला पाणी देत होते.... समायरा पळतच तिच्या बाबांजवळ गेली... बाबा अशी हाक मारून त्यांना मिठी मारली....
समायराचे बाबा :अगं समु !!काय झालं....
समायरा हुंदके देऊन रडायला 😭लागली....
समायराचे बाबा :समु !!तू आधी रडणं 😭थांबव बघू.... मला सांग काय झालं ते...
समायरा : माझा जॉब गेला... मार्थाने मला नौकरीवरून काढून टाकलं??
काय 😳असं कसं काढून टाकलं... मागून समायराच्या आईचा आवाज आला....
समायराच्या आईचा आवाज ऐकून अमोघ देखील परस बागेत धावत आला...
समायराचे बाबा :हे बघ समु !!मार्थाने तूला नौकरीवरून काढून टाकलं याचं मला बिलकुलच आश्चर्य नाही वाटलं.... हे कधी ना कधी होणारच होतं...
समायराची आई : होणारच होतं, म्हणजे?? 🤔
अमोघ : जाऊदे ताई !!बरं झालं तूझा जॉब गेला... तूझा जॉब पाहून मला सारखं सारखं guilty फील व्हायचं... की माझ्या फीस साठी तूला खोटं बोलावं आणि खोटं वागावं लागत आहे....
समायराची आई :अरे तूम्ही सगळे असे कोड्यात काय बोलत आहेत मला कळेल का काय झालं ते?? ...
आईचे ते बोलणे ऐकून समायरा म्हणाली सॉरी आई !!मी चुकले.... मी तुझ्याशी खोटं बोलले.... असं बोलून समायराने नौकरी कशी मिळवली.... आणि आता नौकरी कशी गेली हे सर्व सांगितले.....
ते ऐकून समायराच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.... त्यांनी डोक्याला हात लावून घेतला.🤦♀️... आपली मुलगी काय करून बसली.... आता या गोष्टीचा परिणाम तिच्या पुढील आयुष्यात तर होणार नाही ना असं समायराच्या आईला वाटायला लागलं😢......
समायराची आई : अहो !!मी तुम्हाला म्हटले नव्हते का आपली मुलगी हाताबाहेर जाईल तीचा ईतका लाड करू नका ते.... सगळीकडे कळालं तर लोकं काय म्हणतील....
समायराचे बाबा : हे बघ कुसुम !!तू उगाचच काही तर्क वितर्क लावू नकोस.... आपली" समु "काही आपल्या हाताबाहेर नाही गेली आहे... मला तर गर्व आहे तिच्यावर... मान्य आहे ती खोटं बोलली.... पण त्या वेळी खरंच काही दुसरा पर्याय होता का? सांग ना आपल्याला किती आप्तेष्टांची मदत झाली???
समायराची आई :अहो !!हे तूम्ही काय बोलताय....
समायराचे बाबा : कुसुम !! याचा अर्थ असा नाही की मी तिच्या खोट्या बोलण्याचे आणि वागण्याचे समर्थन करतोय ... ते तिचं चुकलं आहेच... पण तीने अमोघची फीस वेळेवर भरली.., आपल्याला त्रास होऊ नये म्हणून...नाहीतर अमोघचं हे वर्ष वाया गेलं असतं.....
समायरा रडत रडत म्हणाली 😭थँक्स बाबा !!तूम्ही मला समजून घेतलंत.....
समायराची आई :आता काय?? मतदानच तुझ्याकडून आहे म्हटल्यावर मी तरी काय करणार.😇... ते काय म्हणतात ते मेजॉरिटी wins वगैरे😊....
समायराच्या आईचे ते वाक्य ऐकून तिघेही खदखदून😂😂😂 हसले... i love you 😍आई म्हणून समायराने तिच्या आईला मिठी मारली....
चला जास्त लाडात येऊ नका... मला स्वयंपाकात मदत करायला या आता.... एक टपली समायराच्या डोक्यात मारून समायराची आई समायराला म्हणाली....
पुन्हा स्वयंपाकघर 🙄आता माझ्या आईला मला काय विचारायचं असेल बरं?? ... तुषारबद्दल तर सगळं क्लिअर झालं आहे... जाऊदे आईने असा काही विषय छेडलाच तर आपण टोनीबद्दल सगळं काही सांगून द्यायचं असा विचार करतच समायरा स्वयंपाक घरात गेली....
दिवसभराचा ताण आणि आता घरी सगळं सांगितलं त्यानंतर वाटणारं मोकळं वातावरण.... खरंच आपले आई बाबा आपल्या सोबत असले की कितीही मोठे संकट आले तरी आपल्याला कसली भीतीच रहात नाही.... उगाचच चर्चा नको म्हणून मी नलिनीच्या बाबतीत काय घडलं आहे ते बाबांना सांगितलं नाही.... समायरा विचारात मग्न झाली....
ईकडे टोनी त्याच्या घरी गेला.... मार्थाने आज देखील तीचे जेवण तिच्या बेडरूममध्ये मागितले.... टोनीने संधी साधली टोनीने त्यांच्या स्वयंपाकीणीला त्याचे देखील जेवण मार्थाच्या रूम मध्ये आणायला सांगितले आणि मार्थाचे ताट तो स्वतः घेऊन मार्थाच्या बेडरूम मध्ये गेला....
मार्था : टोनी !!तू?? मी स्वयंपाकीणीला ताट आणायला सांगितलं होतं...
टोनी :मॉम!! तीच ताट आणत होती पण मला तूझ्या सोबत जेवायचं होतं म्हणून मी हे तूझं ताट घेऊन आलो आहे ती माझं ताट घेऊन येत आहे...
स्वयंपाकीणीने टोनीचे ताट ठेवले.... आणि येते मी म्हणून निघून गेली....
टोनी : मॉम !!मला नेमकं कळेल का?? काय झालं आहे तूला... तू म्हणालीस तर मी ऑफिस जॉईन पण नाही केलं ना.... मग तू अशी का रागावली 😠आहॆस......
मार्था : टोनी !! तू माझा विश्वासघात केला आहॆस आणि परत म्हणत आहॆस की काय झालं मला?? 😡
टोनी : मॉम !! अगं मी तूला सांगणारच होतो... त्याच्या आधी तूला कळाले....
मला अगदीच काही दिवसांपूर्वी हे कळाले.... मी उटी ला गेलो होतो ना त्या दिवशी.... तुषारने मला स्वतः सांगितले... खरं सांगायचं तर त्याने सांगितल्या सांगितल्या मला देखील त्यांचा खूप राग 😡आला होता.... वाटलं यांनी तूला फसवलं...पण मी तिथल्या हॉटेल मॅनेजरला भेटलो तो मात्र तुषार आणि समायराची वारेमाप स्तुती करत होता.... कारण तुषार आणि समायरामुळे तो चारपट फायद्यात होता....
मग मी फोनवर तुषार आणि समायरा आपल्या ऑफिसला जॉईन झाल्यापासूनचे सगळेच डिटेल्स मागितले... मला तिथे व्यवहारात किंवा आपल्या ऑफिसच्या कमाईत कुठेच घोळ दिसला नाही उलट त्यांची नोंद ईतकी व्यवस्थित होती की अश्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर मी का करावे हेच मला समजत नव्हतं...
मग मी विचार केला की हे नाटक त्या दोघांनीही त्याच्यावर आलेल्या जीवघेण्या परिस्थितीमुळे केलं..... समायराला भावाची फीस भरायची होती तर तुषारला त्याच्या आईच्या औषधोपचाराचा खर्च..
मार्था :पण कितीही केलं तरी खोटं ते खोटंच ना?? आणि त्या नलिनीचे काय?? नलिनी त्यांना मिळालेली आहे ना.....
टोनी : मॉम !! जेवण थंड होत आहे आधी आपण जेऊन घेऊ मग मी नलीनीच्या बाबतीत काय घडलं ते विथ प्रूफ सांगतो...
मार्था : तू विषय बदलू नकोस....
टोनी : नाही मॉम !! आधी जेवून घेऊ प्लीज... मला खूप भूक लागली आहे....
आशिष बद्दल कळाल्यावर मार्था काय प्रतिक्रिया देईल याची भीती टोनीला वाटल्याने त्याने जेवणाला प्राधान्य दिलं... ...
क्रमश :
भाग 79 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
4 टिप्पण्या
Khup chan... Ata jara positive feel hot ahe. 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाPudhil bhagachi aatutrta
धन्यवाद
हटवा