मार्था आणि टोनी आरामात जेवले.... जेवताना मात्र दोघेही एक अवाक्षरही बोलले नाही....
कारण मार्थाचं अजून काही पूर्णपणे समाधान झालं नव्हतं आणि टोनीला आशिष बद्दल बोलायचे असल्याने त्याने जेवताना बोलणं टाळलं....
जेवण झाल्यावर मार्थाने टोनीला पून्हा प्रश्न केला? .... हं सांग आता, त्या नलिनीबद्दल तू पुराव्यासोबत काहीतरी सांगणार होतास...
टोनी : मॉम !!आता जे मी सांगणार आता त्यानी तू लागलीच पॅनिक व्हायचं नाही...
मार्था : म्हणजे?? मी का पॅनिक होऊ🤔
टोनी : तूझं म्हणणं आहे की नलीनीने अँप डेव्हलोप करण्यासाठी दहा लाख रुपये दिले, बरोबर??
मार्था : हो, तीने सही केलेलं व्हावचर मी पाहिलं आहे ...
टोनी : मॉम !! हे बघ अकाऊंट डिटेल्स... दहा लाख रुपये तर आशिषदादा च्या अकाऊंटला तूझ्या अकाऊंट मधून ट्रान्सफर झाले आहेत....
मार्था :त्यात काय विशेष, हा सगळा व्यवहार तर आशीषच सांभाळतो....
टोनी : ठीक आहे... आता तू हे आशिषदादा आणि नलिनीच्या अकाऊंट चे transaction बघ....
मार्था :😳 फक्त दोन लाख रुपये, ट्रान्सफर झाले आहेत.... मग बाकीचे आठ लाख रुपये गेले कुठे 🤔
टोनी : आशिषदादाच्या अकाऊंट मध्ये जमा आहेत.... कारण या व्यतिरिक्त कॅश 💵पेमेंट तर आपण करतच नाही....
मार्था : पण त्याला हे करायची गरज नाही ना.... हे सगळं तुमच्या दोघांचं तर आहे....
टोनी :अगदी बरोबर , आशिषदादाच्या फायद्यासाठी नाही दिवाकर अंकलच्या फायद्यासाठी हे सगळं घडलं आहे...
मार्था : काय 😳 दिवाकरचा फायदा?? तो कसा काय??🤔
टोनी : खरा सूत्रधार दिवाकरच.... आशिष मात्र बळीचा बकरा....
मार्था : बरं ठीक आहे तू म्हणतोस तसं.... पण मग व्हावचर??
टोनी :अगं मॉम !!आशिषदादा आणि दिवाकरने कॉन्ट्रॅक्ट दरम्यान व्हावचर वर नलिनीची नजर चुकवून तिच्या सह्या घेतल्या...
मार्था :माझा तर विश्वासच बसत नाहीये... हे म्हणजे असं झालं स्वतःचे पैसे स्वतः चोरी करणं 🤦♀️
टोनी : मॉम !!बोलता बोलता तुषार मला म्हणाला की आपलं टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचं जमा खर्चाचं नुसतं रजिस्टर बघितलं तरी कुणाच्याही लक्षात येईल की आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड होत आहे ते....
मार्था : हो का?? ठीक आहे उद्या तपासून पाहू...... चल आता आराम कर... उद्या ऑफिसमध्ये बघू....
टोनी : मॉम !! तूला आशिषदादाचं नाव ऐकून धक्का 😳नाही बसला.... मला तर तीच जास्त काळजी वाटत होती....
मार्था : धक्का??😳 थोडंसं आश्चर्य नक्कीच वाटलं.... टोनी तूझे डॅड गेल्यावर मी आयुष्यात ईतकी मोठी संकटे झेलली आहेत की हे त्याच्यासमोर काहीच नाही.... आणि गरज नसतानाही आपल्या कंपनीत फ्रॉड करणं हा महामूर्ख पणा आहे.... आणि त्याचा फायदा तिऱ्हाईत घेणारच.... जाऊदे तू आराम कर.... आपण बघुयात उद्या काय करायचे ते....
टोनी : हो मॉम मी आराम करतो.... पण तू उगाचच विचार🙄 करत बसू नकोस....
मार्था : विचार🤔 कसला विचार?? आशिषचा?? अरे मला जसा तू आहे तसाच तो.... चुकला तर कान पकडीन त्याचे... शेवटी हे सगळं तर तूम्हा दोघांचं आहे...त्यामुळे तू काळजी करू नकोस....
ठीक आहे मॉम !!गूड नाईट ... असं म्हणून टोनी त्याच्या बेडरूम मध्ये विचार करतच गेला....
किती स्ट्रॉंग आहे आपली मॉम... कुठे मला वाटलं होतं की आशिषदादाचं नाव ऐकल्यावर ती खूप डिस्टर्ब होईल.... मला तीला सांभाळावे लागेल... पण झाले उलटेच... तीने माझीच समजूत काढली.... hats off मॉम....
दुसऱ्या दिवशी सकाळीच मार्था आणि टोनी ऑफिसच्या वेळेवर ऑफिसला पोहोचले...
टोनीने ऑफिस मधून जूने जमाखर्चाचे रेकॉर्ड काढले.... एकच रजिस्टर त्यावर तीन वर्षांपासूनच्या नोंदी....बापरे 😳 हे तर उघड उघड फ्रॉड केले आहे.... मॉम !!तू कधी हे रजिस्टर चेक केले नाहीस का??
मार्था : टोनी !! तू जेव्हा अमेरिकेला गेला.... आपल्या ऑफिसच्या छोटया छोटया गोष्टी आशिष बघत असे.... त्याने सगळं छान सांभाळून घेतलं म्हणून मी कधीच त्याला हिशोब मागितला नाही आणि बघितला देखील नाही..... पण तिसरं कुणी त्याचा गैरफायदा घेईल असं मात्र मला चुकूनही वाटलं नव्हतं .....
टोनी : बघ पटलं ना तूला.... मग आता तुषार आणि समायरा??? त्यांचा जॉब..
मार्था :ठीक आहे त्यांना पून्हा जॉईन करून घेऊ.... पण नलिनी प्रकरण जरा जास्तच गंभीर आहे....
टोनी :म्हणजे??
मार्था : नलीनीने व्हावचर वर केलेली सही.... बाकी सगळ्या गोष्टी खोट्या ठरवते.... त्यात आशिषने तीला लीगल नोटीस पाठवली आहे....
टोनी : हं, अजून चौदा दिवस वेळ आहे.... काही ना काही मार्ग निघेल.....
मार्था : टोनी !!मला आशिष म्हणाला की तूला समायरा आवडते?? ..... हे खरं आहे का?
टोनी : मॉम !!ह्या आशिषने सांगण्यासाठी असं माझ्यासाठी काहीच ठेवले नाही का गं?? मी तूला सांगणारच होतो.... हो मॉम !!मला ती आवडते😍... मला ती भेटली तेव्हा ती आपल्याच ऑफिसची एम्प्लॉयी आहे हे सुद्धा माहिती नव्हतं... असं म्हणून टोनीने त्याच्या बद्दल आणि समायराबद्दल सगळं काही सांगितलं.....
ईकडे नलिनीच्या वडिलांनी खूप टेन्शन घेतलं.....
त्यांना पक्की खात्री होती की त्यांना सहा लाख रुपये भरावेच लागणार.....
जर एफ डी तोडली तर नलिनीचे लग्न?? पण हे संकट.... ह्यातून बाहेर पडल्याशिवाय नलीनीच्या लग्नाचा विचार तरी कसा करणार?? त्यांचं कशातच मन लागत नव्हतं....
आपल्या साध्याभोळ्या मुलीला तीची काहीही चूक नसताना या लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी अडकवलं याचा मनस्ताप देखील होत होता....
तुषारने देखील त्याच्या आईला नौकरी गेल्याचे सांगून दिले....
तुषारची आई : तुषार !!तूला माझ्यासाठी काय काय सहन करावं लागत आहे😒... नाही का??
तुषार : आई !! तुझ्यासाठी नाही माझ्याचसाठी मी खोटं बोललो म्हणून हे घडलं.... तू उगाचच स्वतःला दोष देत नको बसू....
तितक्यात तुषारचे काका त्याच्या घरी आले.... तुषार नलिनीला बघण्यासाठी गेला होता त्या वेळेस काय घडलं हे आता त्यांच्या कानावर पडले होते... म्हणून तुषारची मजा बघण्यासाठी ते घरी आले होते....
आता मात्र लग्नाची गोष्ट आणि आता तर नौकरी देखील... काकाला काय बोलणार???
त्याच्या काकांनी आल्या आल्या तोंड सुख घेतलं... कश्याला असली थेरं करायची?? 😠.... तुषार ईतका शिकलास तू असं खोटं वागणं तूला शोभलं का?? 🤔ईतकीच पैश्यांची अडचण होती तर मला मागायचे.... मी पाठवले असते.....
तुषारला त्याचे वडील गेल्यापासून त्याच्या काकाची वागणूक आठवली.... आताचं बोलणं त्याच्या जिव्हारी😡 लागत होतं पण आईचा विचार करून तो शांत बसला होता...
तुषारच्या आईला देखील त्याच्या काकांच्या बोलण्याचा खूप त्रास होत होता...पण शांतपणे ऐकून घेणेच त्यांना योग्य वाटले.....
तितक्यात तुषारचा फोन📳 वाजला.... 😳 मार्थाचा फोन??
मार्था : हॅलो तुषार !! मला तुझ्याशी आणि समायराशी जरा महत्वाचे बोलायचे आहे.... तूम्ही दोघेही ऑफिसला या.....मी समायराला देखील फोन करून सांगते.....
भाग 80 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लीक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
Waw nice. Next blog chi aaturata lagli ahe.... 😊
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा