किती सांगायचं मला (भाग 84)

आशिषने तुषारला फोन 📳करून बोलावून घेतलं.... 

तुषार : काय झालं आशिष !!मला इतक्या तातडीने बोलावून घेतलंस.... 

आशिष :तुषार !!मला नलिनीचं घर माहिती नाही... तू घेऊन चल... 

तुषार : मी?? 🤔पण मला नलिनीचं घर.... 

आशिष : हो, तूला माहिती आहे.... मला तूम्हा दोघांबद्दल सगळं माहिती आहे 👩‍❤️‍👨.... 

तुषार : आशिष !!पण तूला हे माहिती आहे का?? मी तिच्या घरी गेल्यावर तिच्या वडिलाने लग्नासाठी नकार दिला होता.... 

आशिष : काय?? 😳 असं कसं काय?? 

तुषारने आशिषला नेमकं काय घडलं ते सांगितलं..... 

आशिष :अच्छा, असं आहे तर.... तुषार !! आता तर तू चल च मग.... 

तुषार :नको आशिष !!नलिनीचे बाबा माझ्यावर अजून नाराज होतील.... 

आशिष :एक मिनिट... मी तूला सोबत ऑफिसचा एम्प्लॉयी म्हणून नेत आहे... 

तुषार : ठीक आहे बाबा !!तुझ्यासोबत एम्प्लॉयी म्हणून येतो मी.... 

दोघेही नलीनीच्या घरी गेले.... 

 आशिष सर तूम्ही दरवाजा उघडून नलिनी म्हणाली... 

आशिष : हो मी... का?? येऊ नये का?? 

नलिनी : तसं नाही सर.... 

आशिष : बरं तूझे बाबा कुठे आहेत?? मला त्यांच्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे.... 

नलिनी :हो सर... बोलावते म्, हणून तुषार कडे बघायला लागली... 

आशिष :"तुषार "आमच्या ऑफिसचा एम्प्लॉयी आहे आणि म्हणून तो आज माझ्यासोबत आहे.... जा आता बाबांना बोलव.... 

नलीनीने तिच्या बाबांना आवाज दिला.... तीचे बाबा बेडरूम मधून बाहेर आले... तुषारला पाहताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या ..... 

आशिष : मी जरा ऑफिसच्या कामासाठी आलो आहे.... 

नलिनीचे बाबा :आता कोणते काम?? 😡 नलीनीच्या विरुद्ध खोटी नोटीस 📃पाठवताना तूम्हाला काही वाटलं नाही आणि म्हणे ऑफिसकाम... 

आशिष : काका !! तुमचं चिडणं साहजिकच आहे ... तूम्ही थोडं बसून ऐकाल का प्लिज.... 

नलिनीचे बाबा : आता अजून काय ऐकवणार आहात.... तितकं सगळं करून पोट भरलं नाही वाटतं... भरीस भर म्हणून तूम्ही या धोकेबाज पोराला सोबत आणलं आहे.... 

आशिष : काका !! मी तुमच्याशी नलीनीला पाठवलेल्या  नोटीस 📃 बद्दल बोलायला आलो आहे... 

नोटीसचं नाव ऐकताच नलिनीचे बाबा जरा नरमले.... आपल्या अश्या वागण्याचा परिणाम नलीनीच्या नोटीसवर📃 होऊ शकतो असं लक्षात आल्याने जरा शांत झाले... 

आशिष : काका !! मी नलीनीला दिलेली नोटीस 📃मागे घेत आहे.... मला माफ करा मी चुकलो होतो.... मी नलीनीला अश्या गुन्ह्याची शिक्षा देत होतो जो तीने केला नव्हता... 

नलिनीचे बाबा :पण त्या गोष्टीचा आम्हाला किती मनस्ताप झाला आहे....तूम्हा श्रीमंताचं काही नाही... पण आम्ही किती तणावात होतो.... 

आशिष : त्या साठी खरंच, "सॉरी.".... पण काका मी जी चूक केली आहे तीच चूक तूम्ही पण करता आहात.... 

नलिनीचे बाबा : चूक आणि मी? 😡ते कसं काय?? 

आशिष : तूम्ही तुषारला अश्या गुन्ह्याची शिक्षा देत आहात जो त्याने केलाच नाही.... 

तुषार :😳

नलिनीचे बाबा :😡म्हणजे?? 

. आशिष : तुषारचं आधी लग्न झालेलं नाहीये... त्याला  परिस्थिती मुळे लग्नाचं नाटक करावं लागलं होतं... पण आता आम्हाला सगळ्यांना ते माहीत ही झालं आणि मान्य ही.... 

नलिनीचे बाबा : तूम्ही काय त्याची वकिली करायला आले आहात?? 😡

आशिष : वकिली, तसं समजा हवं तर... पण काही निर्णय घ्यायच्या आधी एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या... पटलं तर ठीक नाही पटलं तर मुकाट्याने आम्ही ईथुन निघून जाऊ.... 

नलिनीचे बाबा :लवकर बोला... काय बोलायचे आहे ते...
 
आशिष : आज जी मी नलीनीची नोटीस 📃मागे घेत आहे ती तुषारमुळेच मागे घेत आहे.... 

नलिनीचे बाबा : काय 😳... तुषारमुळे?? .... 

 तुषारने माझे आज डोळे उघडले.. असं सांगून अस्मिच्या अपघाताबद्दल आणि नंतर काय काय घडले ते सर्व आशिषने सांगितले.... पण सांगता सांगता त्याने समायराचे नाव घेतले..... जे आतापर्यंत नलीनीच्या बाबांना माहिती नव्हते.... 

नलिनीचे बाबा : नलिनी !! समायराने तुषारशी लग्न केल्याचं नाटक केलं होतं?? 

तुषार :🤦‍♂️

नलिनी : हो, बाबा !!

नलिनीचे बाबा : तू मला नाही सांगितलंस?? 

नलिनी : बाबा!! मला तूमची खूप भीती वाटत होती....

नलिनीचे बाबा : अगं पण हे किती धोक्याचं आहे.... तिच्या आई बाबांना?? 

नलिनी : सगळं माहिती आहे.... 

नलिनीचे बाबा : आणि मान्य?? 

नलिनी : असं मान्य कुणाला होणार बाबा?? पण तीने ज्या परिस्थिती मध्ये हे पाऊल उचलले आहे हे त्यांनी समजून घेतलं ..... 

नलिनीचे बाबा : समजून घेतलं 🤔?? 

नलिनी : बाबा !!समुचे बाबा रिटायर झाल्यावर त्यांना खूप आर्थिक चणचण भासू लागली होती.... त्यात अमोघ ची परीक्षा फीस वेळेवर भरणे महत्वाचे होते...... त्या साठी तीला हे लग्नाचे नाटक करणे योग्य वाटले..... 

नलिनीचे बाबा : पण,असे पाऊल उचलल्याने तिच्या भवितव्यावर काय परिणाम होईल याची भीती तीला वाटली नाही का?? 

नलिनी : बाबा !!त्या वेळेस तीला फक्त नी फक्त अमोघची फीस दिसत होती.... 

नलिनीचे बाबा :हं... 

म्हणून म्हणतो तूम्ही तुषारला ईतकी मोठी शिक्षा  देऊ नका.... नलिनीसाठी होकार द्या.... नलीनीच्या बाबांना नलिनीचे म्हणणे पटले असे वाटून आशिष म्हणाला..... 

नलिनीचे बाबा : काय 😳?? 

आशिष : मी खरंच तुम्हाला मनापासून विनंती करतो 🙏.... तूम्ही त्याला होकार द्या.... 

तुषार मात्र गोंधळून आशिष कडे बघत 😳राहिला.... हा तोच आशिष आहे ना?? चक्क माझ्यासाठी नलिनीच्या बाबांना हात जोडून विनंती करत आहे... 

नलिनीचे बाबा :मला विचार करायला वेळ द्या.... 

आशिष : ठीक आहे निघतो मी... 

नलिनीचे बाबा : आमच्या घराची पद्धत आहे... आलेल्या पाहुण्यांना चहा ☕️पाणी केल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही😡... 

आशिष : खरं तर माझ्या बायकोचे नुकतेच ऑपेरेशन झाले आहे... मी तिथे असायला हवं... पण मी मुद्दाम तुषार आणि नलिनीसाठी ईथे आलो आहे... त्यांच्या बाबतीत मी चुकलो होतो म्हणून..... 

नलिनीचे बाबा : अहो, जरा लवकर आणा ☕️

नलीनीच्या आईने दोघांनाही चहापाणी☕️ केलं.... 

नलिनीचे बाबा : तुषारराव !! तूम्ही काहीच बोलत नाहीयेत... तूम्हाला तूमची बाजू मांडायची नाही काय?? 

तुषार : हो, तूम्ही माझ्यावर रागावल्या मुळे मी नाही बोललॊ... मी जे लग्नाचं नाटक केलं माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून... माझ्या आईच्या औषधांचा खर्च मला झेपत नव्हता... 
त्यात माझी टेम्पररी नौकरी अचानक गेली... आणि मला राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची जाहिरात दिसली..... 
खरं सांगतो अश्या खोटं वागण्याचा परिणाम माझ्या आयुष्यावरच होऊ शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.....

आशिष : तूम्ही विचार करा... हवं तर समायराच्या आई बाबांशी बोला.... इतकं लग्नाचं नाटक सोडलं तर.... तूम्ही तुषारची बाकीची माहिती काढा... आणि मगच उत्तर द्या.... 
चला निघतो आम्ही.... 

नलिनीचे बाबा : ठीक आहे....
क्रमश :
भाग 85 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

14 टिप्पण्या

  1. नक्कीच आता तुषार नलिनी चे परत जुळेल ना? एक अपघात काय घडतो आणि सगळे चित्रच पालटते. नक्कीच कथा जोमाने पुढे सरकत आहे. मस्त !.. 👍👍

    उत्तर द्याहटवा
  2. आतापर्यंतची कथा खूप छान खरी वाटते.. पण पुढील भागाची खूप आतुरतेने वाट पाहतोय.. दर 5 मिनिटांनी उघडून पाहतोय.. कधी टाकणार आहात ते तरी सांगा डॉक्टर..

    उत्तर द्याहटवा