तुषार : हो आई !!आता कुठले विघ्न नको यायला....
तुषारची आई : नाही येणार, तो आहे ना 🙏तो वरून सगळं बघत असतो....
तुषार :🙏
नलिनीच्या घरी आता नलिनीचे बाबा आता तुषारबद्दल विचार करत होते....
राहून राहून तुषारचं खोटं वागणं त्यांना आठवत होतं.... जर नलिनीचं लग्न तुषारशी लाऊन दिलं तर ती सुखी राहील ना....
तिला कुठल्याही प्रकारचा धोका तर नाही होणार 🤔 अश्या प्रकारची काळजी त्यांना सतवायला लागली....पण समायरा?? तीला तर आपण लहानपणा पासून ओळखतो.... ती तर तशी नाहीये.... तीने तुषारसोबत लग्नाचं नाटक केलं.... नाटक करता करता कश्यावरुन ती त्याच्या प्रेमात पडली नसेल🤔....
ते काही नाही जो पर्यंत आपल्या शंकेचे समाधान होत नाही तोपर्यंत आपण काहीच विचार करू शकत नाही....
तितक्यात नलिनीचा फोन 📳वाजला....
नलीनी :हं, बोल समु !! काय म्हणतेस??
समायरा : आताच मार्था आणि टोनी माझ्याघरी येऊन गेले...
नलिनी : हो का?? कसं काय??
समायरा : guess कर....
नलिनी : परत जॉईन करून घेण्यासाठी 🤔??
समायरा : नाही...
नलिनी : नाही बाबा.... मी guess नाही करू शकत....
समायरा : माझं टोनी सोबत लग्न फिक्स झालं 👩❤️👨....
नलिनी : काय?? 😳 खूप खूप अभिनंदन अगदी मनःपूर्वक अभिनंदन 💃💃....
समायरा : पंधरा दिवसांनी लग्न आहे....
नलिनी :पुन्हा एकदा अभिनंदन.....
नलिनीचे बाबा नलिनीकडे बघून तीचे हावभाव टिपत होते... एव्हाना समायराचे लग्न ठरले आहे हे नलीनीच्या फोनवर 📳बोलण्याने त्यांनी साधले होते.....
नलिनीचे फोन📳 वर बोलून झाल्यावर नलीनीने तिच्या आईला आवाज दिला....
नलिनी : आई !!बाबा !! समुचं लग्न ठरलं... राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकिणीच्या मुलाशी...
नलिनीचे बाबा : मालकीण... म्हणजे ती मार्था ना... 😳त्यांच्या मुलाशी?? कसं काय?? म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तर खूप तफावत आहे ना ......
नलिनी : अहो बाबा !!टोनी आणि समायराचं एकमेकांवर खूप प्रेम 👩❤️👨 आहे.... मार्था मॅमनी अगदीच दोन दिवसापूर्वीच समायरा आणि तुषारला नौकरीवरून काढून टाकलं होतं ना... आपल्याला आशिषसरांनी सगळं सांगितलं आहे ना.... त्याचवेळेस टोनी आणि समायराबद्दल👩❤️👨 देखील त्यांना कळालं.... आज चक्क त्याच समूच्या लग्नाची मागणी घालायला गेल्या... आणि तिचं लग्न ठरलं देखील....
नलीनीच्या बाबांना समायराबद्दल जो प्रश्न पडला होता.... त्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआपच मिळाले होते....
आता तुषार विषयीचा त्यांचा दृष्टीकोन बदलायला लागला होता....
त्यांच्या मनातील रागाची जागा आता कौतुकाने 😊घेतली होती.....
ईतकी लग्नाची गोष्ट सोडली तर तुषार आपल्याला आधीच आवडला होता....
आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत आणि नलिनी देखील तुषारवर प्रेम करते....इतकं तुषारला होकार देण्यासाठी पुरेसं आहे....
नलिनीचे बाबा : अहो नलिनीची आई !! ते काम आधी राहू द्या बघू.... नलिनी तू पण ऐक....
नलिनीची आई : काय हो इतक्या तातडीने तूम्ही आवाज दिलात....
नलिनीचे बाबा : जरा महत्वाचे बोलायचे होते....
नलिनीची आई : काय?? आपण तुषारच्या घरी जाऊन लग्नासाठी पुन्हा मागणी घालायची का?? हेच ना...
नलिनी :😳
नलिनीचे बाबा : हो,😳 अगदी बरोबर.... पण तू कसं काय ओळखलं??
नलिनीची आई : अहो !!तुमच्यासोबत पंचवीस वर्ष संसार केला आहे.... मला आता त वरून ताक समजतं ना 😉...
नलिनी : thank you बाबा !!
नलिनीचे बाबा : नलिनी !!तुषारला फोन📳 लाऊन सांग...उद्या आपण तिघेही त्याच्या घरी जात आहोत म्हणून ....
नलिनी : हो बाबा!!
नलिनी लागलीच तिच्या बेडरूम मध्ये गेली..... तीने तुषारला फोन 📳लावला....
नलिनी : हॅलो तुषार !!
तुषार :नलिनी तू चक्क फोन📳 लावत आहेस....
तुषार !!उद्या आम्ही एका मुलाच्या घरी माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जाणार आहोत.... नलीनी मुद्दाम रडक्या🥺 सुरात बोलली... ...
तुषार : काय?? 😳 आशिषने इतकं बोलून काहीच फरक नाही पडला.... कोण आहे तो मुलगा?? काय करतो....
नलिनी : तो मुलगा बी कॉम,एम बी ए आहे... आणि राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत काम करतो😇....
तुषार : राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत आम्ही दोघेच बॅचलर आहोत... मी आणि प्रदीप... आणि प्रदीप बी कॉम एम बी ए नाहीये.... म्हणजे दुसरा मीच.... नलिनी !! 😠का ईतकी गंम्मत करतेस माझी....
नलिनी :😂😂😂 तुषार !!सॉरी रे मी कान पकडते.... पण तूझी फिरकी 😇घेतली की तू खूप cute 🤩दिसतोस आणि बोलतोस देखील..... yes आम्ही उद्या तूझ्या घरी येणार आहोत.........
तुषार : हो सांगतो... या वेळेस काका देखील आहेत....
नलिनी : 😳 बापरे काका?? आता त्यांनी काही घोळ घालून ठेऊ नये....
तुषार : नाही घालणार.... टोनीने त्यांच्यासमोर माझी ईतकी स्तूती केली की आता ते तोंडावर पडल्या सारखे झाले आहेत... तेव्हापासून जरा शांतच आहेत....
नलिनी : तुषार !!मला तर ना हे सगळं स्वप्नच वाटत आहे...
तुषार :खरं आहे.... इतकं साधं सरळ वाटणारं आयुष्य आपल्याला किती नागमोडी वळणातून जावं लागलं ना....
नलिनी : खरं आहे..आईना फोन📳 दे ना...
तुषार : हो देतो, एक मिनिट... आई !! नलिनीचा फोन 📳आहे....
तुषारची आई : नलिनीचा फोन 📳?? काय म्हणते आहेस नलिनी??
नलिनी : नमस्कार काकू !!
तुषारची आई : नमस्कार बेटा... बोल काय म्हणतेस??
नलिनी : काकू !!उद्या मी आणि माझे आई, बाबा आम्ही तिघेही तुमच्या घरी येत आहोत... आमच्या लग्नाची बोलणी करायला....
ठीक आहे ठीक आहे पण उद्या किती वाजता येणार?? नाही मला जरा बाहेर जायचं होतं म्हणून मी म्हणाले....तुषारची आई थोडं कोरडेपणाने म्हणाली....
नलिनी : साधारण अकरा वाजता....
ठीक आहे ठेऊ फोन 📳 असं म्हणून तुषारच्या आईने फोन ठेऊन दिला....
नलीनीला तुषारच्या आईचा कोरडेपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवला होता....
तुषार देखील त्याच्या आईच्या बोलण्यावरून थोडा गोंधळला होता.....
तुषार :आई !! तू नाराज आहेस का?? तू नलिनीशी फार कमी बोलली....
तुषारची आई : तुषार !! मी एका शहीद योद्धयाची पत्नी आहे.... मी मान अपमान असं कधी काहीच मनात ठेवत नाही..... कुणाकडून अपेक्षा देखील करत नाही.... पण नलिनीचे वडील आधी आपल्याशी जे वागले.... निदान ते आपल्या घरी येणार आहेत तर त्यांनी फोन📳 लावायला नको होता का.... की त्यातही त्यांचा अहंकार आड येत आहे का?? ....
तुषार : आई !!🤔 तू म्हणत आहेस ते खरं आहे गं.... तुषारला आता उद्या काय होणार याचं जाम टेन्शन आलं...
क्रमश :
भाग 87 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
6 टिप्पण्या
अगदी बरोबर नलिनीच्या वडीलांनी फोन लावायला हवा होता. पण कदाचित एवढ्या आनंदात ते विसरले कदाचित त्यांच्या लक्षात पण आले नसेल कदाचित उद्या या सगळ्या प्रकरणाची ते माफी देखील मागतील. हे निश्चित!! पुढच्या भागाची वाट बघतेय!
उत्तर द्याहटवाधन्यवाद mam
हटवाNice part 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा