लग्नाला पंधरा दिवसाचा अवधी असल्यामुळे मार्थाने समायराला आता ऑफिसला जॉईन होऊ नकोस फक्त स्वतःची काळजी घे.... स्वतःला पूर्णपणे वेळ दे असं बजावून सांगितलं..
समायराला बाजारात, पार्लर मध्ये जाण्यासाठी एक स्पेशल गाडी 🚗ठेवली....समायराच्या ब्युटीशिअनने तीला एक वेळापत्रक तयार करून दिले....
रोज संध्याकाळी पाच ते सहा च्या दरम्यान त्यांच्या संगीत नृत्याचा सराव ठेवला....
समायराच्या वडिलांनी देखील समायरासाठी दागीने बनवून घेतले.... त्यांनी तिच्या लग्नसाठी ठेवलेल्या सर्वच पैशांचे आता दागिने तयार करायचं ठरवलं
समायराची आई : अहो !! आपल्या समुचं किती छान 🤩झालं ना?? न भूतो न भविष्यती अशी लग्नाची तयारी चालू आहे.... आपले नातेवाईक तर समुचं लग्न अवाक होऊन बघतील....समु बेटा श्रीमंत मुलाचं तूझं स्वप्न मात्र खरं झालं हो...
समायरा : सपने ना😇 कभीभी बडे देखने चाहिए 😍😊🤩
अमोघ :ताई तूझी काय ऐश आहे👍👍.... आता तुझ्यासाठी गाडी🚗 बाहेर येऊन थांबते.... शेजारच्या काकू म्हणत होत्या समायराने श्रीमंत मुलगा गंडवला आहे....
समायरा : कोणत्या काकू म्हणत होत्या😡 रे... बघतेच मी त्यांची 😡आता.... म्हणे गंडवला?? 😏
समायराचे बाबा :समु बेटा !!तू जरा शांत हो.... निंदकाचे घर असावे शेजारी.... अश्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते..... तू आता तूझी ही वेळ एंजॉय कर....उगाचच काही लोकांमुळे तूझा मूड खराब करू नकोस.....
तुषारच्या घरी तुषारच्या आईने देखील साग्रसंगीत भोजन तयार केले....
नलिनी नलिनीचे आईवडील तुषारच्या घरी आले... जेवण झाल्यावर नलीनीच्या वडिलांनी लग्नाचा 👩❤️👨मुहूर्त काढण्यासाठी एका पुजाऱ्याला बोलावून घेतले....
लग्नाचा खर्च दोघांनीही अर्धा अर्धा करायचा ठरवला....
पण हे काय🤔 त्या पुजाऱ्याने लग्नाची तारीख आणि वेळ समायराच्या लग्नाची👩❤️👨 तारीख आणि वेळ दोन्हीही सारखेच निघाले....
अजून कुठली दुसरी तारीख निघते का ते बघा अशी विनंती तुषारने आणि नलीनीच्या बाबांनी पुजाऱ्याला केली....
पुजारी : पंधरा तारखेचा मुहूर्त हा सगळ्या दृष्टीने चांगला मुहूर्त आहे... आणि त्या नंतर दोन महीने कुठलाही मुहूर्त नाही....
तुषार :पुन्हा एकदा नीट बघा ना प्लीज....
नलिनीचे बाबा : हो...दुसरा कुठला मुहूर्त आहे का बघा ना...
माझ्या लाडक्या लेकीच्या खास मैत्रिणीचं लग्न 👩❤️👨आहे त्या दिवशी...
पुजाऱ्याने मोठा भिंग🔍 बघून मुहूर्त बघायला सुरुवात केली.... पण त्याला काही दुसरा मार्ग सापडला नाही....
तुषारची आई : आता दोन महीने तर थांबायचं नाही... आधीच खूप विघ्न येऊन गेले आहेत....
नलिनीचे बाबा :हो आता तर दोन महीने थांबता येणं खरंच शक्य नाही....आणि तोच मुहूर्त योग्य असेल तर ठीक आहे आपल्याला तोच दिवस लग्नाचा👩❤️👨 ठरवावा लागेल....
तुषार :😒 ठीक आहे..... मग आता दुसरे काही ऑप्शन नसेल तर
नलिनी : बाबा !!समु माझ्यावर किती नाराज होईल??
नलिनीचे बाबा : नलिनी बेटा !!आपण दुसरा मार्ग बघितला... पण नाही जमलं ना...
नलिनी : मला आणि तुषारला मिळून समायराची समजूत काढावी लागेल....
पुजारी निघून गेला.... पण आता दोन्हीही कुटुंबांनी लग्नाची 👩❤️👨खरेदी मिळून करायची ठरलं.... मंगल कार्यालय सोबतच ठरवू.... तुषार !!मंगल कार्यालय बघायला तू आणि मी जाऊ....
नलिनीचे बाबा : तुषारचे काका !! तूम्ही काहीच बोलत नाही आहात....
तुषारचे काका : दुसरा कुठला मुहूर्तच नाही म्हटल्यावर मी तरी काय म्हणणार... मला खात्री आहे माझ्या मानपानात तूम्ही काहीच कमी करणार नाही 😏....
नलिनीचे बाबा : हो हो... ते काय सांगणं झालं....
तुषारचे काका : मानपानात सोन्याची अंगठी....
सोन्याचं अंगठी वगैरे काहीच नको असं काका म्हणत आहेत.... हो ना काका?? काकाचं वाक्य खोडून तुषार म्हणाला...
तुषारचे काका :अं हो !!
काका तुषारकडे बघून 😏शांत झाले......
आता दोन्हीही घरी लग्नाचे👩❤️👨 वातावरण सुरु झाले....
नलिनीच्या बाबांनी सगळा कार्यक्रम आखून दिला आणि आता त्यानुसार त्यांच्या लग्नाच्या विधी होणार असं ठरलं आणि ते घरी निघून गेले....
तुषार : आई !! टोनी आणि समायरा लग्नाची 👩❤️👨तीच तारीख आणि वेळ आहे हे कळाल्यावर काय म्हणतील कोण जाणे... मला तर खूप टेन्शन येत आहे... छे... कुठलीच गोष्ट सरळ होत नाहीये😒....
तुषारची आई : टोनी आणि समायरा खूप समजूतदार आहेत ते तूला नक्कीच समजून घेतील...
तुषार :अगं आई पण त्यांच्या लग्नात 👩❤️👨जाता येणार नाही ना?? आणि त्यांनाही येता येणार नाही.... आणि आमच्या ऑफिसच्या लोकांना आमच्या लग्नाला 👩❤️👨येता येणार नाही...
तुषारची आई : हे बघ तुषार !!मला आता कुठलाही चान्स घ्यायचा नव्हता.... दोन महीने थांबलो असतो आपण तो काय जास्त मोठा कालावधी नाही.... पण ईथे दर दिवसाला काही ना काही विपरीत घडत आहे... म्हणून जे ठरले तेच बरोबर आहे....
तुषार : हो तूझंही खरं आहे म्हणा.... पण आता मला टोनी किंवा समायराला सांगायची हिम्मत होत नाहीये.....
तितक्यात टोनीचा तुषारला फोन📳 आला
तुषार : घे... आता टोनीला सांगावेच लागेल....
टोनी : हॅलो तुषार !! बोल काय म्हणतोस सगळं व्यवस्थित पार पडलं ना??
तुषार : टोनी !! सगळं व्यवस्थित पार पडलं, लग्नही👩❤️👨 ठरलं...
टोनी : गूड, अभिनंदन 😍पण मग तूझा आवाज असा खाली का गेला आहे??
तुषार : कारण तूझ्या लग्नाचा 👩❤️👨मुहूर्त आणि माझ्या लग्नाचा👩❤️👨 मुहूर्त दिवस आणि वेळ एकच आहे....
टोनी :😳 काय
तुषारने टोनीला सगळा घडलेला प्रकार सांगितला.....
टोनी :🤦♂️... आता काय करायचं... मॉमने तर आमच्या देखील लग्नाचं सगळं फिक्स केलं आहे.. आता date बदलता येणं अवघड आहे तरी मी मॉम शी एकदा बोलून बघतो....
तुषार : हे बघ टोनी !! सगळं काही ठरलं असेल तर आता त्यात काहीच बदल करू नकोस.... आधीच ईतकी सारी संकटे आपण पार केली आहेत.. आता अजून कुठले संकट नको.... बरं ऐक ना टोनी मला काही समायराला सांगण्याची हिम्मत होत नाहीये.... तू सांगशील का प्लिज...
टोनी : समायरा आता नलिनीशी बोलणारच होती... कदाचीत तीला आतापर्यंत कळालंच असेल...
तुषार : हो का... i hope ती समजून घेईल.....
क्रमश :
भाग 89 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
6 टिप्पण्या
Chan... 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाKhup chan story ahe
उत्तर द्याहटवाMala khup khup awdli
धन्यवाद
उत्तर द्याहटवाStory thodi Moti takat Java na pls
उत्तर द्याहटवाबरं, प्रयत्न करेन.. धन्यवाद
हटवा