अस्मि आणि पूर्वी घरी येण्याचा दिवस उजाडला.... सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं.. ठरल्या प्रमाणे अस्मि, पूर्वी आशिष, जेनी आणि जेनी चा नवरा सगळेच मार्थाच्या घरी आले.... फ्रेश होऊन सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर मार्थाने सगळ्यांना हॉल मध्ये बसवले....
मला काही महत्वाच्या घोषणा करायच्या आहेत....
पूर्वी : मम्मा !! घोषणा means??
जेनी : घोषणा means announcement
मार्थाने वकिलाला बोलावून घेतलं.....
टोनी : मॉम !!आता या अनाऊन्समेंट साठी वकील कश्याला??
मार्था : 😊 कळेल कळेल सगळं कळेल....
थोडया वेळात लागलीच वकील तिथे हजर झाला...
आता सगळ्यांचे लक्ष मार्थाच्या बोलण्याकडे लागले होते....
मार्था : तूम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती अशी की आपल्या टोनीचं लग्न 👩❤️👨ठरलं आहे.... पंधरा तारखेचा मुहूर्त आहे... आतापर्यंत मुलगी कोण आहे हे तर तुम्हाला समजलं असेलच....
"समायरा आँटी".... पूर्वी जोरात ओरडली
सगळीकडे हशा😄😄😂 पिकला.....
टोनी :बदमाश पूर्वी.... 😉
मार्था : वकीलसाहेब आता सुरु करा....
वकील : आता मी मार्था मॅम चे मृत्यूपत्र वाचत आहे....
टोनी : मॉम !!याची गरज होती का??
जेनी : मार्था आँटी हे काय आहे आता??
आशिष : आँटी मी चुकलो... पण आता हे नको....
मार्था : अरे तूम्ही ऐका तर.... तसंही हे सगळं तूम्हाला आताच नाही भेटणार.... माझ्या हातून सुटणार आहे का?? 😉 पण आता कुणामध्ये काही गैरसमज नको म्हणून मी आता सगळं क्लिअर करते..... वकील साहेब सुरु करा आता....
वकील :जी वडिलोपार्जित जमीन होती त्याचे तीन भाग करण्यात आले आहेत....
तूम्हा तिघांच्या नावाने अगदीच त्याचे समसमान भाग आहेत.....
तूम्ही त्या जमिनीच्या कागदपत्रावरून एक नजर फिरवू शकता....
वकिलाने ते कागदपत्रे त्यांच्या हातात दिले.....
हे घर टोनी चे तर आशिष जे राहतो ते आशिषचे घर राहील....
आणि जेनी तूझ्या मम्मी पप्पाचं घर हे तुझं घर राहील.....
आता ऑफिस.... ऑफिस मात्र हे आशिष आणि टोनीच्या एकत्र निर्णयाने चालेल..... म्हणजे कुठलाही निर्णय दोघांना मान्य असेल तरच तो आमलात आणला जाईल... एकाचाही विरोध असेल तर तो निर्णय मान्य होणार नाही... तसंच तूम्हा दोघांचं तुम्हाला एक जॉईंट अकाऊंट काढावं लागेल... आणि त्यातूनच तुमचे कंपनीचे व्यवहार समसमान रूपात होतील....तुमचे जे शेअर्स आहेत ते समसमान असतील....
वकिलाने मार्थाचं मृत्यूपत्र वाचल्या वाचल्या आशिष एकदम गहिवरला🥺.... खरंच आपण मार्था आँटीबद्दल किती चुकीचा विचार केला होता.... आँटीने फक्त आपलाच नाही तर जेनीचा देखील विचार केला आहे.... .
माझं सगळं वाचून झालं आहे... यात कुणाला काही आक्षेप आहे का?
टोनी आशिष आणि जेनी तिघांनीही नकारात्मक माना डोलावल्या....
ठीक आहे मग मी आता या तयार झालेल्या मृत्यूपत्रावर सही करते... असं म्हणून मार्थाने त्यावर सही केली....
वकील : ठीक आहे निघतो मी....
वकील गेल्यावर मार्था म्हणाली.... आशिष.. उद्या आपल्या कंपनीचं अँप तू लॉंच करायचं आहेस.... कारण त्या मागे तूझी अपार मेहनत आहे....
आता मात्र आशिष खूप अस्वस्थ झाला.... त्याला त्याचा स्वतःचाच खूप राग 😡आला....
मार्था: चला आता सगळं व्यवस्थित झालं....
टोनी : मॉम एक प्रॉब्लेम आहे....
मार्था : आता कसला प्रॉब्लेम??
टोनी : तुषारचं नलिनी सोबत लग्न ठरलं आहे... पण एकाच दिवशी आणि एकाच वेळी.......
मार्था : ओह... पण आता आपलं देखील सगळं नियोजन व्यवस्थित झालं आहे...आता कुठलीही गोष्ट डिस्टर्ब करता येत नाही.... आपण फक्त एक करू शकतो... आपल्या स्पॉन्सरला सांगून त्यांचं देखील लग्न तुमच्या सोबतच लाऊन देऊ शकतो....
टोनी : मॉम तू खरंच ग्रेट आहेस.... थँक्स मॉम... मी आजच तुषारशी बोलतो.....
ईकडे समायराच्या वडिलांनी समायरा जवळ तीचे दागिने तयार करण्याचा विषय काढला.....
समायरा : बाबा 😳, तूम्ही ह्या पैश्यांचे दागिने बनवणार आहेत?? ... जे की आपल्या घराचे कर्ज फेडण्यासाठी बाजूला ठेवले होते....
ईकडे फार कुणाला दागिन्यांची हौस कुठे आहे... मला काही वेळापुरतंच दागिने घालून मिरवायचं आहे.... तशीच वेळ आली तर मी मार्था मॉम च्या परवानगीने खोटे दागिने घालून मिरवेन.... पण माझ्या लग्ना साठी म्हणून मी तुम्हाला अडचणीत येऊ देणार नाही.....
तुषार आता ऑफिसमध्ये गेला... त्याने त्याचे जॉइनिंग दिले आणि त्याचे नेहमीचे काम करत बसला होता....
रजनी : वेलकम तुषार !!मला वाटलंच होतं की तू आणि समायरा निर्दोष असणार म्हणून..
तुषार :😊
रजनी : बाकी तूम्ही नवरा बायकोचे नाटक छान वठवले... बरं का?
तुषार :😂 धन्यवाद
तितक्यात टोनी तुषारला भेटायला आला....
सुहास : तुषार !!
तुषार : अरे सुहास !!तू??
सुहास : तुषार !!जॉइनिंग दिलं आहे ना...
तुषार : हो आताच जॉइनिंग देऊन बसलो....
सुहास : बरं मला तुझ्याशी थोडं महत्वाचे बोलायचे होते....
तुषार : बोल ना...
सुहास : थोडं बाहेर टपरीवर जाऊन बोलू...
तुषार : बरं चल....
सुहास :रजनी !! मी तुषारला घेऊन बाहेर चाललो आहे... जर कुणी कस्टमर आला तर बघून घेशील प्लीज... तुषार अर्ध्या तासात परत येईल....
रजनी :ठीक आहे 😏
टोनी आणि तुषार समोरच चहाच्या☕️टपरीवर गेले...
टोनीने चहा वाल्याला चहा ऑर्डर केला...
टोनी : तुषार !!आपलं दोघांचंही लग्न 👩❤️👨एकाच दिवशी एकाच वेळी होऊ एकाच ठिकाणी होऊ शकतं....
ते ऐकून चहावाला 😂😂😂हसायला लागला.... तुमच्या दोघांचं लग्न?? 👨❤️👨
🤦♂️... तू कामाशी काम ठेव ना आणि चहा☕️ दे बरं पटकन चहा टोनी थोडा रागाने 😠म्हणाला....
चहाचे ग्लास घेऊन आता टोनी आणि तुषार थोडं चहावाल्याला त्याचं बोलणं ऐकू येणार नाही अश्या ठिकाणी गेले....
तुषार : एकाच वेळी, एकाच ठिकाणी??🤔 ते कसं काय??
सुहास :आमचं लग्न म्हणजे ग्रँड इव्हेंट होणार आहे... बऱ्याच लोकांनी स्पॉन्सर केले आहे... मॉम म्हणाली की स्पॉन्सर्स ला सांगून आपण दोघांचेही लग्न एकत्र लावू....
तुषार : सुहास !!आपण ईतके दिवस एकमेकांना ओळखतो.. पण मला असं वाटतं तू अजून मला पूर्णपणे ओळखलं नाहीस...
सुहास : म्हणजे??
तुषार : मी असं कसं काय लग्न करायला तयार होणार.... माझा स्वाभिमान मला अशी गोष्ट बिलकुल करू देणार नाही.... त्या पेक्षा दोन महीने थांबणं मी पसंत करेन... आणि तू विचार कर सुहास !! नलिनीच्या बाबांना तरी हे आवडेल का??
सुहास : ओह तुषार !!सॉरी मी तूझा स्वाभिमान दुखावला....
तुषार : तसं नाही तुषार !!तू मला खूप सरळ मनाने विचारलं आहेस.... पण एकदा फक्त तू माझ्या जागेवर आहेस असा विचार करून बघ.. .. तूला माझ्या बोलण्यात काहीच चुकीचे वाटणार नाही.....
क्रमश :
भाग 90...अंतिम वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
👌👌👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा