आयुष्याच्या संध्याकाळी विनय आणि केतकी गॅलरीत चहा घेत बसले होते....
विनय : केतकी !!मला माफ कर मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे गं... त्याचा आज रोजी मला खूप पश्चाताप होत आहे...विनयने केतकीचा हात हातात घेतला आणि पश्चातापाचे अश्रुंचे ओघळ केतकीच्या हातावर पडले....
केतकी : विनय !!हे आता काय नवीन?? कसला पश्चाताप होतो आहे तूला....
विनय: तूला देवकी न बनू देण्याचा माझा तो अट्टाहास... किती चुकीचा होतो मी??
केतकी : आता मी तूझेच विश्व, माझे विश्व मानून जगले ना....एकरूप झाले... हा कधी कधी वाटायचं हे मातृत्व अनुभवावं... मग आपला अक्षय समोर दिसायचा.... त्यातच मी आनंद मानून घ्यायचे...
विनय : खरंच तू महान आहेस....
ह्या चर्चेनंतर केतकी आणि विनय भूतकाळात गेले
नुकतेच केतकीचे लग्न ठरले.पहिल्यांदाच तीला विवेक बघायला आला होता. आणि केतकी पसंत पडली होती. प्रत्येक नवरी जे सुखी संसाराचे स्वप्न पाहते त्या प्रमाणेच केतकी देखील तिच्या सुखी संसाराचे स्वप्न पहात होती.
तो दिवस उजाडला.... वऱ्हाड आलं....
नवऱ्या मुलाने, विवेकने तयार होण्यासाठी त्याच्या सोबतच्या मित्रांना रूम बाहेर काढले आणि गळफास लाऊन आत्महत्या केली.... ईतकी मोठी तयारी सगळं मुलाच्या पसंतीने आणि मुलाने अगदी लग्नाच्या वेळीच आत्महत्या केली....
केतकी व तिच्या आईवडिलांना हा खूप मोठा मानसिक धक्का होता...
केतकीच्या आईवडिलांनी मुलाची माहिती काढली होती.... जो तो त्याच्याबद्दल चांगलंच सांगत होता... मग त्याने असं का केलं???
नंतर कळालं की त्या मुलाने आधी दोन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता...
पण तेव्हा तो वाचला होता... म्हणजेच त्याला schizophrenia नावाची बिमारी होती.... आणि मुलाच्या आईवडिलांनी खूप हुशारीने ते लपवून ठेवलं होतं...
ईतकंच काय त्याच्या नातेवाईकांना देखील त्याच्याबद्दल चांगलं सांगावं असंच बजावलं होतं....
पण ठपका मात्र केतकीच्या पायगुणांवर आला.... जो तो केतकीला दोषी ठरवून मोकळं होत होता....
विवेक ने असे पाऊल उचलण्या आधी या दोघांचं काही बोलणं झालं होतं का याचा शहानिशा करून घेत होते.... काहीच सापडले नाही तरी देखील केतकीचा पायगुण असा खराब आहे म्हणूनच हे घडलं असं म्हणून विवेकच्या घरची सगळी वऱ्हाडी मंडळी निघून गेली...
हा सर्व प्रकार पाहून केतकीच्या वडिलांना खूप मोठा मानसिक धक्का बसला.... ते तिथेच कोसळले.... बेशुद्ध झाले.... त्यांना एका फॅमिली डॉक्टरने तिथेच झोपवून सलाईन लावले.....
शुद्धीवर आल्यावर केतकीचे वडील जोरजोरात रडायला😭 लागले... हे काय होऊन बसलं केतकी!!.... तूझ्या लग्नाचे,👩❤️👨 तूझ्या सुखी संसाराचे किती स्वप्न मी पाहिले होते....आणि आता??
झाल्या प्रकारचा केतकीला देखील खूप मोठा धक्का बसला होता.... ती तर घडणाऱ्या गोष्टी फक्त स्तब्ध होऊन बघत होती... तिला देखील काय घडत आहे काहीच कळत नव्हतं....
तितक्यात विनयच्या आई वडिलांनी केतकीसाठी मागणी घातली....
विनय विधुर होता... पहिल्या पत्नी पासून त्याला एक मुलगा होता...विनयला देखील हा एक धक्काच होता... आपल्या मुलाला सावत्र आई नको असा त्याचा अट्टहास होता.... पण त्याच्या आईवडिलांनी त्याच्याशी काहीच चर्चा न करता त्याच्या आईवडिलांनी हा प्रस्ताव मांडला होता....
प्रस्ताव ऐकून केतकीचे वडील बरेच सावरले होते...
विनय : एक मिनिट तूम्ही काही विचार करण्याआधी आणि ठरवण्याआधी तूमची परवानगी असेल मला केतकीशी थोडं बोलायचे आहे....
केतकीच्या वडिलांनी परवानगी दिली....
केतकी आणि विनय मंगल कार्यालयाच्या एका रूम मध्ये गेले...
विनय : केतकी !! मी जरा स्पष्टच बोलतो.... खरं तर मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नव्हता पण माझे आई बाबा?? त्यांनी आज एकदमच मागणी घातली....
मी दुसऱ्या लग्नाचा विचार या साठी नव्हतो करत कारण मला माझ्या अक्षयला सावत्र आईचा त्रास होऊ द्यायचा नाही... मी जरा जास्तच स्पष्ट बोलतो की तू जर स्वतः मुलाला जन्म देणार नसशील आणि माझ्या मुलाचा सांभाळ सख्ख्या मुलासारखा करशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे....
केतकीने थोडा वेळ विचार केला आणि तिच्या वडिलांकडे नजर फिरवली... तीचे वडील विनयच्या वडिलांसोबत हसून बोलताना दिसत होते....
थोडया वेळा पूर्वी झालेले सुतकी वातावरण आता थोडं बदललं होतं आणि आपल्या एका होकाराने ते पूर्णपणे आनंदी होणार होतं....
केतकीने विनयला होकार दिला आणि मग दोघांचं शुभमंगल पार पडलं....
लवकरच केतकी त्या घरात रुळली आणि सगळ्यांची लाडकी झाली होती.. अक्षयची तर लाडकी मम्मी झाली होती....
अश्यातच केतकीला दिवस गेले... पण भावना आणि प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये तिला प्रॅक्टिकल गोष्ट निवडावी लागली होती....
ऍबॉर्शन करावं लागलं.... तेव्हा खूप रक्तस्त्राव झाला... मरता मरता वाचली....
पण पून्हा नव्या उमेदीने उभी राहिली...
अचानक बाहेर जोराचा पाऊस सुरु झाला आणि केतकी व विनय भानावर आले....
केतकीच्या डोळ्यात अश्रू तरळत होते...
केतकी : विनय !! पण आज हा विषय का??
विनय : काही नाही गं.... काल मी एक सिरीयल बघितली त्या मध्ये असंच काहीसं होतं... त्यात त्या नायिकेची होणारी घालमेल बघितली....तेव्हा लक्षात आलं की यातून तर तू देखील गेली आहेस पण तू कधीच तक्रार केली नाहीस.....सगळ्यांच्या आनंदाचा विचार तू केलास पण मी तुझं हे सुख मात्र हिरावून घेतलं.... मला माफ कर केतकी...
सारखी सारखी माफी आता तू मला रडवणार आहेस का??
विनय च्या चेहऱ्यावरचे भाव बदलण्यासाठी केतकी बोलली.....
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या