गीताला बघण्यासाठी रोहीत येणार होता... त्या मुळे वाड्यामध्ये सगळी रेलचेल चालू होती.... रोहीतच्या स्वागताची तयारी चालू होती...
गीताचे नुकतेच इंजिनिअरिंग पूर्ण झाले होते... ती छोटयाश्या खेड्यात वाढली होती आणि तीचे महाविद्यालयातील शिक्षण हे बाजूच्या शहरातच झालेले होते...
या उलट रोहीतचे होते....
रोहीत इंजिनियर तर होताच पण त्याची संपूर्ण वाढ ही एका महानगरात झाली होती आणि तो अमेरिकेत नौकरी करत होता....
रोहीतच्या मामाने गीताचे स्थळ आणले होते... रोहितला शहरात वाढलेली मुलगी पाह्यजे होती...
पण मामाला दुखवायचे नाही म्हणून गीताला पाहण्यासाठी आणि काहीतरी कारण काढून नकार द्यायचा असे ठरवून रोहीत तयार झाला होता ....
गीताने छान फिक्कट निळ्या रंगाची साडी नेसली...मॅचिंग निळ्या बांगडया, तिच्या लांब केसांची वेणी घातली.... त्यावर मोगऱ्याचा गजरा.... चेहऱ्यावर हलकासा नकळत असा मेक अप... गीता खूप सुंदर🤩🤩दिसत होती....
रोहीत आणि त्याचा मामा गीताला बघण्यासाठी आले.... खेड्यातील तो भव्य दिव्य वाडा बघून रोहीत मात्र चक्रावून गेला....
असा वाडा तो पहिल्यांदाच बघत होता..
वाड्यात बैठकीत रोहीतला बसवण्यात आले....
त्या नंतर त्यांना वाड्यातील चौकात एका बाजूला हातपाय धुण्यासाठी गरम पाणी देण्यात आले.... हे सगळं घरात असणारे नौकर लोकं करत होते......
त्या नंतर माजघराजवळच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली...तिथे पाट आणि ताट मांडले होते... ताटाभोवती सुंदर रांगोळी काढली होती.....
रोहीत आणि त्याचा मामा यांना जेवायला बसवण्यात आलं सोबतीला गीताचे वडील जेवायला बसले.... अश्या प्रकारचा पाहुणचार देखील रोहीत पहिल्यांदा अनुभवत होता....
बसल्या बसल्या गीताच्या वडिलांनी गीताला आवाज दिला...
गीता समोर आली आणि रोहीतने मान वर केली.... दोघांचीही नजरानजर झाली... रोहित तर गीताकडे एकदम भान हरवून 🤩🤩बघायला लागला.... खाली ताटात काय पडतं आणि आपण काय खातो याचे देखील भान नव्हते....
अगदीच पहिल्या नजरेत प्रेम 😍काय असते याची जाणीव आज त्याला झाली होती. घरून येताना त्याने गीताला नकार द्यायचा ठरवला होता पण गीताला पाहताच त्याचा नकार हवेत विरून गेला होता...
गीताला देखील रोहीत मनोमन आवडला होता.....
जेवण झाल्यावर गीताच्या वडिलांनी रोहितला वाडा दाखवण्यासाठी सांगितला....
तितकंच गीता आणि रोहीत ला व्यवस्थित बोलता येईल असा त्यांचा प्रयत्न होता....
गीताने रोहीतला फिरून त्यांचा वाडा दाखवला....
त्या वेळेस रोहीतला समजले की गीता ला इंग्रजी तितकेसे येत नव्हते.गीताने कधीच एकटीने प्रवास केलेला नव्हता. गीताला बँकेची कामे देखील करता येत नव्हती.
गीताने इलेक्ट्रिकल मध्ये इंजिनिअरींग केल्यामुळे तीला कॉम्प्युटरचे तितकेसे ज्ञान नव्हते.....
थोडावेळ विचार करून रोहीत गीताला म्हणाला....गीता!! जर मी लग्नाला होकार दिला तर तू माझ्यासाठी एक काम करू शकशील....
गीता :काय?? 🤔
रोहीत : तू इंग्लिश स्पिकिंग चे आणि कॉम्पुटर चे बेसिक क्लासेस करशील... हे बघ लग्नानंतर तुलाही माझ्यासोबत अमेरिकेत राहावे लागेल.... तर तूला या गोष्टी आल्या पाहीजे....
गीता : हो करेन ना.... एव्हाना रोहीतचा होकार 😊आहे हे त्याच्या बोलण्यातून गीताला समजले होते....
वाडा बघून झाल्यावर पुन्हा औपचारिक चहापाणी ☕️घेऊन रोहीत आणि त्याचे मामा घरी जाण्यासाठी निघाले...
रोहितचे मामा : रोहीतच्या आईवडिलांशी बोलून तुम्हाला लवकरच काय निर्णय आहे ते मी कळवतो....
रोहितला गीता जाम आवडली होती... पण एका मुलीमध्ये त्याला हवा असणारा धीटपणा तिच्यात नव्हता.... पण गीता खूप आवडल्याने त्याने तिच्यात हवा तसा बदल घडवून आणण्याचे जणू आव्हान स्वीकारले....
लवकरच रोहीतच्या आई वडिलांनी त्याचा होकार कळवला... आणि रोहित आणि गीताचे शुभमंगल👩❤️👨 झाले....
रोहीत महिनाभर भारतात राहिला नंतर तो अमेरिकेत परत गेला.... ..
गीताचा विजा आणि पासपोर्ट काढण्यासाठी जवळ जवळ सहा महिन्यांचा अवधी लागणार होता... लग्न ठरले की पासपोर्ट साठी अर्ज करून झाला होता....
ठरल्याप्रमाणे गीताने कॉम्प्युटर आणि इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस लावले....
पासपोर्ट आणि विजा चे काम पूर्ण झाले आणि तो दिवस उजाडला...
शेजारच्या शहरात कधीच एकटी न जाणारी गीता आता सातासमुद्रा पलीकडे एकटीच प्रवास करणार होती..... तिला खूप भीती वाटत होती.... पण प्रवासा दरम्यान वेळोवेळी रोहीत तिला मार्गदर्शन करत होता..
एअरपोर्टवर ती नुसतीच घाबरली होती... पण आयुष्यात ईतके मोठे विमान ✈️ती प्रथमच पहात होती.... आपण एखाद्या सिनेमासारखं प्रवास करत आहोत असा तिला आभास होत होता....
विमानात ✈️बसल्यावर बाजूला लेडीज सीट असल्याने आता गीताच्या जीवात जीव आला... ती देखील न्यूयॉर्क ला उतरणार होती.... त्या मुळे आता ब्रेक जर्नी नंतर विमान✈️ बदलताना काही घोळ होणार नाही याची खात्री वाटायला लागली...
तब्बल अठरा तासांच्या प्रवासानंतर गीता न्यूयॉर्कला पोहोचली.... किती वेळ झाला रोहीत गीताला दिसलाच नाही.... गीता मात्र पार गोंधळून गेली... एकदम रडकुंडीला आली तितक्यात समोर तिच्या नावाचा एक बोर्ड घेऊन रोहीत दिसला.... गीता पळत पळत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गळ्यात पडून रडायला😭 लागली...
रोहित : गीता !!काय झालं?? 🤔.
गीता : मी खूप घाबरले होते...
रोहीत : गीता!!धीट हो... मला धीट मुली आवडतात बरं का?? भित्र्या नाही आणि आज तू आली आहेस म्हणून ठीक आहे उद्यापासून तू माझ्याशी फक्त न फक्त इंग्लिश मध्ये बोलणार आहेस बरं का??
गीता : हूं....
आता अमेरिकेत गीता आणि रोहित चा संसार सुरु झाला...
रोहीतचं वागणं एकदम शिस्तीचं होतं... तो गीताला अगदीच काटेकोर पणे इंग्लिश बोलायला लावे.... त्याने तिला कार🚗 चालवायला शिकवली ..... बँकेचे कामे, ईतर कामे तो गीताला करायला लावत असे.. ...
गीताला असं एकटं काम करण्याची बिलकुल सवय नव्हती... पण रोहीतच्या शिस्तीत गीता आता रडकुंडीला😭 येत असे ... कधी कधी तर तिला तिथून पळून जावेसे वाटे... पण अमेरिकेतून पळणार तरी कसं?? 🤔
काही महिन्यातच गीता आता अमेरिकेत रुळली... व्यवस्थित इंग्रजी बोलणं... बँकेचे सगळे व्यवहार बघणं... सगळंच जमायला लागलं.... तश्यातच गीताला मातृत्वाची चाहूल लागली.... आणि काही दिवसात गीताला पुत्र रत्न प्राप्त झाले.... आता मात्र रोहीतने घरी मराठी भाषा बोलायला सुरुवात केली.... कारण त्यांचं बाळ बाहेर इंग्रजी शिकणार होतं... पण त्याने मातृभाषा देखील शिकावी असा त्याचा अट्टाहास होता.....
रोहीतने अगदीच त्याच्या शिस्तीत नुसतं बायको मध्येच बदल घडवून आणले नव्हते तर.... मुलांना देखील संस्कारी बनवले होते....
धन्य 🙏🙏ते आईवडील ज्यांनी रोहीतवर देखील अश्या प्रकारचे संस्कार केले होते....
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या