आमच्यासारखे आम्हीच (भाग 3)

नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे... 
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................
      
                         Introduction 

पण हा या कॉलेजमध्ये काय करतोय🤔... माझ्या माहितीप्रमाणे याला तर मेडिकलला जायचे होते.... 

Excuse me!!ओ मॅडम कुठे हरवला आहात?? प्रज्वलच्या आवाजाने अनुयाची तंद्री तुटली.... 

अनुया : तू प्रज्वल ना?? 

ए!!तो तूझा सिनियर आहे... त्याला नावाने हाक नाही मारायची... सर म्हणायचे सर.... समजलं का?? 

अनुयाने 😒होकारार्थी मान हलवली.... 

प्रज्वल :प्राची!! अगं ती मला ओळखते 😳 तुला माझे नाव कसं काय माहिती?? हा मला देखील तूला कुठे तरी बघितल्या सारखे वाटत आहे... कुठे बरं बघितलं असेल मी... काय नाव म्हणालीस??? 

अनुया : मी अनुया मुळे !! 

प्रज्वल : हा, आता आठवलं... तू मुळे बिल्डरची मुलगी ना... नेहमीच कारमध्ये🚗 ओझरती पाहिलेली..... 

प्राची : असेल बिल्डरची मुलगी.... या कॉलेज मध्ये सगळेच सारखे आहेत😏.... चला आता बाकी मुलींनी आपापले introduction द्या...

सायली,गीतिका नेहा सगळ्यांनी introduction दिले.... तितक्यात त्यांच्या घोळक्याजवळ त्यांच्या कॉलेजचे व्हॉइस प्रिन्सिपॉल येताना दिसले...... 

व्हॉइस प्रिन्सिपॉल : काय रे मुलांनो कसला गोंधळ चालू आहे... तुमच्यासमोर नवीन ज्युनियर्स दिसत आहेत.... रॅगिंग वगैरे तर घेत नाही ना.... 

प्रज्वल : नाही सर.... जस्ट introduction घेत आहोत... हवं तर तूम्ही ज्यूनियर्सला विचारा.... 

आजही तोच आवाज, तोच क्युटनेस, तशीच केसांची ठेवण आणि तसाच निर्भीडपणा.... हाय मै मरजवा 😍😍...प्रज्वलच्या या सगळ्या गुणांवर तर मी फिदा झाले होते..... पण याचा तर मेडिकलला?? 

बरं बरं आता तुमचे introduction राहू द्या.... चला मुलींनो सभागृहात जाऊन बसा... प्रिन्सिपॉल सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत .... 

ठीक आहे सर !!असं म्हणून या सहाही मुली  सभागृहात गेल्या... सभागृह विद्यार्थ्यांनी खचाखच भरला होता... एका कोपऱ्यातील रीकामी  जागा बघून सहा ही जणी बसल्या..... 

लागलीच प्रिन्सिपॉल सर समोर स्टेज वर आले.... 

सुप्रभात... 

सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो... आता तुमच्या करियरची दिशा निश्चित झाली आहे.... 

कॉलेज हे रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत राहील... तुम्हाला तूमचा टाईम टेबल आणि वर्ग याची माहिती ई-मेल केली जाईल.... 
आपल्या या कॉलेजमध्ये वर्षभर काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू राहतील .... 
दर महिन्याला काही प्रोजेक्ट दिले जातील ....
 तसंच सांस्कृतिक, शारीरिक, आणि प्रायोगिक तत्वांवर काही कार्यक्रमही घेतले जातात... 
नुसतेच आपल्या महाविद्यालयात नाही तर अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत देखील सहभागी होने गरजेचे आहे... 
या कॉलेज मधून बाहेर पडताना तूम्ही नुसते अभ्यासू इंजिनिअर नाही तर सर्वगुणसंपन्न इंजिनीअर म्हणून बाहेर पडायला पाहीजे .....त्या मुळे प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झाले पाहीजे.... 

 सगळ्यात शेवटी प्रिन्सिपॉल ने दोन पुरुष शिक्षक दोन स्त्री शिक्षिका,विद्यार्थी देखील दोन मुले आणि दोन मुली अश्या स्टेजवर बोलावल्या...... 

सायली : अगं ही ती दिव्या आणि केतकी स्टेजवर 😳

गीतिका: अरे हो की.... 

प्रिन्सिपॉल : ही आमची अँटीरॅगिंग कमिटी आहे...... तुम्हाला काही त्रास झाला तर तूम्ही यांच्याकडे कंप्लेंट करू शकता.... आणि  जर कुणाला काही निनावी तक्रार करायची असेल तर त्याचा कंप्लेंट बॉक्स माझ्या ऑफिसच्या डाव्या बाजूला आहे.... तिथे टाकू शकता... तिथे मुद्दाम सीसीटीव्ही कॅमेरा ठेवला नाही..... 

नेहा : बघा आता.... रॅगिंग घेणारेच अँटीरॅगिंग कमिटी मध्ये आहेत 🤭🤭

अनुया : नेहा !!हळू.... त्यांनी आपलं फक्त introduction घेतलं आहे......

नेहा :हं

चला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.... कुणाला काही शंका असेल तर तूम्ही विचारू शकता.... 

अशी शांतता बघून सध्या तरी कुणाला शंका आहे असे वाटत नाहीये... 

चला मग ही सभा संपली असे मी जाहीर करतो...... मुलांनो तुम्ही उजव्या Exit दरवाज्यातून जा... आणि मुलींनो तूम्ही डाव्या Exit gate मधून बाहेर पडा... जेणेकरून गर्दा होणार नाही.... 

सगळेच जण सभागृहाच्या बाहेर पडले.....

नेहा : काय गं अनुया !! हा प्रज्वल कोण गं?? 

अनुया : प्रज्वल ना??  अगं माझ्या घराच्या बाजूच्या सोसायटी मध्ये राहायचा.....

नेहा : हा तोच तर नाही ना 🤔?? 

अनुया : तोच तो... 

सायली : कोण गं तोच तो... 

गीतिका : शु 🤫🤫समोरून सिनियर्स येत आहेत.. आले की wish करा गं... 

काही मुलांचा घोळका या मुलींसमोर आला... 

या सहाही मुलींनी एकसुरात गूड आफ्टरनून सर म्हणून wish केले... 

सगळी मुले एकदम बावचळली आणि जोर जोरात हसायला 😂😂लागली.. 

तितक्यात एक मुलगा त्यांच्या समोर आला.... त्या मुलाचे केस मानेवर पडत होते.... तेल तर ईतके चोपलेले होते जणू एक तेलाची बॉटल उंडली आहे आणि कपाळावर उभा गंध असा त्याचा अवतार होता... 

तो मुलगा : फ्रेशर्स का?? 

सगळ्या एकसुरात :हो.... 

आम्ही पण😂😂.... विकी म्हणत्यात मला.... असं म्हणत शेक हॅन्ड साठी त्याने हात पुढे केला... 

सायली : 🙏... अजूनही आम्ही पाश्चात्य संस्कृती दत्तक घेतलेली नाही 😏....

विकी : काय अटीट्युड आहे??  I like it😊...... 

सायली : काय?  औकातीत राहायचं.... समजलं ना😡... 
तितक्यात समोरून एक गोरा गोमटा, मध्यम उंचीचा...साधारण दिसणारा पण समोरच्या व्यक्तीवर छाप पाडेल असा मुलगा समोर आला.... 

ए विकी!! काय बडबडतो आहेस??  सॉरी गर्ल्स मी त्याच्या वतीने माफी मागतो..... ते काय आहे ना?? सध्या सगळेच जण खूप गोंधळलेले आहेत..... बाय द वे मी रोहन...

सायली मात्र रोहन कडे एकटक बघत राह्यली..... काय स्पार्क आहे या पोरामध्ये.... दिसायला ईतका साधारण असूनही मी इंप्रेस झाले.... असं काय असे ल बरं याच्यात🤔...  

जाऊद्या सायली मॅडम आपण ईथे असल्या फालतू गोष्टी करण्यासाठी आलो नाहीये.... आपल्याला आपले करियर चांगले करायचे आहे....आतापासून ईतका अभ्यास ठेवायचा आहे की आपण कॅम्पस interview मध्ये चांगल्या ठिकाणी सिलेक्ट झालो पाहीजे..... असं सायलीने मनातच स्वतःला मनातच सुनावलं...

गीतिका : चला आम्ही निघतो... सिनियर्सचे लेक्चर सुटायची वेळ झाली आहे.... ते कधीही क्लासच्या बाहेर येतील आणि आपण त्यांच्या तावडीत सापडू.... 

रोहन : हो, हो, आम्हालाही त्यांची भीती आहेच की.... चला आम्हीपण निघतो....

सगळ्या जणी मेस कडे वळल्या.... मेस मध्ये या मुलींव्यतिरिक्त मेसमध्ये फुलाबाईने सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढले......

काय हवं काय नको ते फुलाबाई आपुलकीने बघत होती...

नेहा : सायली !!कसली चिडलीस गं त्या झेंडूवर 

सायली : काय म्हणालीस 😂😂 झेंडू... 

अनुया : तू तर त्याचं बारसं केलंस 😂😂.... 

नेहा : नाहीतर काय?? ही असली कार्टून पोरं, स्वतःला काय समजतात कोण जाने😏... बरं हाईट म्हणजे ना ओळख ना पाळख डायरेक्ट शेकहॅन्ड काय करतो..... जसा काय अमेरिकेहून आला आहे..... 

आता वातावरण थोडे हलके फुलके  झाले  होते ....

तितक्यात समोरून येणारा सिनियर मुलींचा घोळका दिसला... तो दिसताच या सहा जणींमध्ये स्मशान शांतता झाली.... जेवण जवळ जवळ झालेच होते..... त्या मुळे सिनियर मुलींनी टेबलवर बसण्या आधी यांनी काढता पाय घेतला..... 

Introduction च्या बाबतीत मुलांचा अनुभव मात्र याहून वेगळा होता.... 

एक कित्येकवर्षांपासून एकाच वर्गात असलेला सिनियर "विश्वास " तो मात्र ज्युनियर मुलांना खूप त्रास देत असे.. 
त्याचा धाक ईतका होता की कुणी त्याच्यामुळे मुलांना हॉस्टेलला ठेवत नसत.... 

विश्वास  नुसता मवाली होता.... पण त्याची गुंडागर्दी ईतकी चालायची की कॉलेजच्या प्रशासनाने त्याच्यापुढे हात टेकले होते.....

 विश्वासच्या गुंडगिरीची त्या शहरातील राजकारणी लोकांना खूप मदत होत असे त्या मुळे त्याच्यावर कुणी ऍक्शन देखील घेऊ शकत नव्हते. 

हॉस्टेलला नवीन कुणी राहायला येत नसल्याने विश्वास आणि त्याचे सात ते आठ मित्र जणू काही त्या हॉस्टेल वर राज्य करत आहेत असे वागत असत....

याचा अर्थ फ्रेशर्स याच्या तावडीतून सुटले असा होत नाही बरं का?? 

हा पट्ठ्या मुद्दाम या सर्व मुलांना एका जवळच्या कॅन्टीनमध्ये बोलावत असे... ती कॅन्टीन म्हणजे तशी नावाला कॅन्टीन पण तिथे दारू जुगार असे सगळेच अवैध धंदे चालत तिथे सगळ्या ज्युनियर ला बोलावून टॉर्चर करत असे.... 

विश्वास कुणाला ड्रिंक्स घ्यायला लाव, कुणाला सिगारेट तर कुणाला एखाद्या मुलीला फोन लावून i love you म्हणायला लावत असे..... 

कॉलेजच्या पहिल्याच रात्री विश्वासने ज्युनियर मुलांना कॅन्टीनला बोलावून घेतले...... 

काय इनोसन्ट ज्युनियर हे पाहिलं होतं का कधी.... व्हिस्कीच्या बॉटल कडे हात दाखवून विश्वास म्हणाला 

विकी : हो हो.... माझ्या बाबाजवळ..... 

विश्वास : कोण रे तो?? अच्छा तू का? तूझ्या बाबांजवळ पाह्यलं..... कधी टेस्ट नाही केलं का?? खूप छान लागते.... 

विकी : नाही नाही.... कधी टेस्ट नाही केलं.... 

विश्वास : अरे विन्या !!आण रे ती बॉटल याच्या तोंडाला लाऊन जरा तीची चव चाखवतो..... 

विकी : नको नको.... 

 तू चूप.... नाहीतर मार खाशील.... अशी धमकी देऊन विश्वासने व्हिस्कीची बॉटल विकीच्या तोंडाला लावली..... 

 विकीच्या तोंडाचा तोबरा भरला तितक्यात विश्वासचा फोन वाजला.... बॉटल वरची पकड ढिली झाली आणि बॉटल दाणकन खाली पडली..... फुटली... 

सुटलो बूवा नाहीतर आज आपलं काहीच खरं नव्हतं असा विचार करून विकी शांत बसला.... 

विश्वास : नशीबवान आहेस.... 

ए तू इकडे ये...... विश्वास रोहनला म्हणाला.... 

रोहन जरा घाबरत घाबरत विश्वासच्या जवळ गेला....

विश्वासने रोहन समोर सिगरेट धरली..... 

रोहनला विश्वास आता काय करायला लावणार याचा अंदाजा आला.... 

रोहन : माझी फेव्हरेट..... 

विश्वास : असं आहे का?? तूझी फेव्हरेट आहे का.... मग थांब तूला दुसरी टास्क देतो..... 

तितक्यात पोलिसांच्या गस्त घालण्याच्या हॉर्नचा आवाज आला... विश्वासचे मित्र आणि विश्वास घाबरून हॉस्टेल कडे पळाले..... 

ज्युनियर मुले मात्र पार गोंधळून गेली होती.... एक इन्स्पेक्टर त्याच्या जीप मधून उतरला.... चला ईथे धिंगाणा कमी झालेला दिसत आहे... म्हणजे आपण वेळेवर पोहोचलेले दिसत आहोत.... 

इन्स्पेक्टर : मुलांनो !!तुम्हाला त्या विश्वासने काही केले नाही ना.... 

रोहन : नाही, बरं झालं सर तूम्ही वेळेवर आलात.... पण सर तूम्ही ईथे कसेकाय?? 

इन्स्पेक्टर : काय करणार?? तो" विश्वास "त्याच्या गुंडागर्दीला कंटाळून प्रिन्सिपॉल सरांनी मला हे काम लावलं आहे.... बरं मुलांनो माझा फोन📳 नंबर save करा..... कधीही हा विश्वास त्रास द्यायला लागला तर मला फोन 📳लावा...

रोहन : थँक्स अ लॉट सर, आम्ही आता टेन्शनफ्री झालो.... नाहीतर आमचा निभाव या कॉलेज मध्ये कसा लागणार त्याची भीती वाटत होती.... 

पोलीसची गाडी निघून गेल्यावर सगळी मुले आपापल्या रूम वर गेली.....
क्रमश :
भाग 4 वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या line वर क्लिक करा 👇आमच्यासारखे आम्हीच (भाग 4)
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या