नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
.....................................................................
"फ्रेशर्स पार्टी"
बरं झालं बाबा ऐनवेळी पोलीस आले... नाहीतर आलं काहीच खरे नव्हते.... असा विचार करून रोहन त्याच्या रूमवर आला....
प्रज्वल : आलास का रे रोहन?? त्या विश्वासच्या गुंडगिरी मुळे आम्ही खूप हतबल झालो आहोत.... पण नशिबाने प्रिन्सिपॉल सर त्याला तितके खतपाणी घालत नाहीत.... म्हणून ईथे आपण सुरक्षित आहोत.....
रोहन : हो ना प्रज्वल सर !! तूम्ही आमचे किती छान introduction घेतले.... सुरुवातीला थोडा राग आला होता.... ...पण आता मला फरक समजतोय... पण या विश्वासमुळे मला आज उपाशीच झोपावे लागणार😡....
प्रज्वल : उपाशी कसा काय?? तो तिथे टेबल वर मी डब्बा ठेवला आहे .... खाऊन घे...
रोहन : प्रज्वल सर !!तूम्ही?? 🥺
प्रज्वल : वेडा आहेस का?? आम्ही सिनियर काही तुमचे दुश्मन नसतो.... पण आईवडिलांच्या छत्रछायेखाली तूम्ही जो अहंकार कमावलेला असतो त्याला तुडवण्यासाठी आम्हाला असं वागावं लागतं....
रोहन : थँक्स 😊...
प्रज्वल : तू पण ना... अरे उद्या मला उशीर झाला तर माझ्या नावाचा डब्बा मेस मधून घेऊन ये.... फिट्टंफाट 👍
रोहन :😊...
दुसरा दिवस उजाडला सगळ्यांना आता आपापले क्लास कुठले आहेत त्याचा ई-मेल आला होता.... त्या मुळे कुठलाही गोंधळ नव्हता.... एका क्लास मध्ये 50 विद्यार्थी होते....
अनुया, सायली, गीतिका, नेहा अंजली आणि यास्मिन सगळ्यांना एकच वर्ग मिळाला होता....त्या मुळे आता या मुलींमध्ये बिनधास्तपणा आला होता....
सिनियर मुलींनीही जवळ जवळ त्रास देने कमी केले होते....
सगळ्या जणी अगदीच वेळेच्या आधी तयार होऊन नाश्त्यासाठी मेस मध्ये गेल्या.... गरम गरम इडली सांबार चा नाश्ता करून कॉलेज मध्ये गेल्या.....
वर्गात बसल्यावर तिथे नुसता चिवचिवाट चालू होता.... अचानक सगळेच शांत झाले....
एक मध्यम वयीन सफारी घातलेला गृहस्थ क्लास च्या स्टेज वर येऊन उभे राहीले ....
Good morning studants मी के.जी. माने.... मी तूमचा कॉम्प्युटर लेक्चरर आहे.... तूम्हाला आता मी काही महत्वाच्या सूचना देणार आहे.... पॅन्ट वर करून त्यांनी बोलायला सुरुवात केली.....
नंबर 1 - तूम्ही जर वेळेवर आले तरच मी तूमची क्लास मध्ये एन्ट्री मान्य करणार....
नंबर दोन -क्लास सुरु व्हायच्या पाच मिनिट आधी येऊन दरवाजाच्या बाजूला असलेले बायोमेट्रिकवर तूमचा अंगठा लावायचा आहे.... तीच तूमची उपस्थिती गृहीत धरल्या जाईल.....
नंबर तीन -तूमची उपस्थिती 75% पाहीजे.... त्या पेक्षा जर कमी असेल तर परीक्षेत बसता येणार नाही....
बाकी काही नवीन प्रोजेक्ट बद्दल सूचना वेळोवेळी दिल्या जातील.....
असं म्हणून त्यांनी लेक्चर घ्यायला सुरुवात केली.....
हे मास्तर काय बोर करत आहेत गं🙄.... तूला काही कळत आहे का?? नेहा सायलीच्या कानाजवळ खुसफुसली..
सायली : मास्तर 🤭..... नाही ना... काय बोलत आहेत तेच कळत नाही....
अनुया : म्हणे कॉम्प्युटर basics शिकवता आहेत 🙄
नेहा : याला म्हणतात बेसिक मे राडा 🤭🤭
एकदम हळूच सगळ्या मिळून हसू लागल्या😂😂😂....
तितक्यात माने मास्तरांचे लक्ष या चौकडी कडे गेलं...
तूम्ही, हा हा, तुम्हीच एकटेच काय हसता🤔... आम्हालाही जोक सांगा की आम्ही पण तुमच्यासोबत हसू.... माने सरांनी गीतिकाला उभे करून विचारलं...
गीतिका : सर !! मी नाही काही केलं...
माने सर : असुदे असुदे.... मुलांनो मी आता हे basics शिकवायला घेतले आहे.... जरा अवघड आहे... तूम्ही जर आता लक्ष दिले नाही तर पुढे तुम्हाला काहीच समजणार नाही....
पुन्हा सरांनी शिकवायला सुरुवात केली ....
क्लास संपला तोच मुलामुलींचा गोंधळ सुरु झाला.... जवळ जवळ सगळेच एकमेकांना अनोळखी होते....त्या मुळे वर्गातील मुलांचा आवाज मुद्दाम वाढला होता.... सगळ्यांना आपसात ओळख करून घ्यावीशी वाटत होती... पण कुणी हिम्मत करत नव्हतं....
तितक्यात एक एकदम तरुण, पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेली व्यक्तीने वर्गात प्रवेश केला.... त्याने वर्गात प्रवेश करताच संपूर्ण वर्गात परफ्युमचा सुगंध आला... जणू काही परफ्युम ची बॉटल त्याने त्याच्या अंगावर ओतून घेतली होती.....
नेहा :😍😍किती हँडसम आहे यार?? आपला सिनियर असेल का??
गीतिका : हँडसम?? 🧐 मला तर उगाचच भपकेबाज वाटत आहे तो.....
Good morning girls and boys i am your mathmatics proffesor... my name is k.v. dube.... तूम्ही मला दुबे सर म्हणून बोलावू शकता.....
नेहा : प्रोफेसर ऐकलं मी?? ईतका यंग प्रोफेसर?? 🤔🤔
दुबे सर : अरे मुलांनो तूम्ही ईतके शांत का?? आज काय नाश्ता वगैरे केला नाही वाटते..... थांबा तुम्हाला आता मी जरा जागे करतो.....आपल्या क्लास मध्ये मुली किती आहेत....
मुले : 24 सर....
दुबे सर : अच्छा मग मुले 26...असतील....
मुले : हो सर.... टोटल स्ट्रेंथ ही 50 ची आहे.
दुबे सर : ठीक आहे.चला तर मग आपण एक game खेळू.....
दुबे सरांनी खिश्यातुन फोल्ड केलेल्या चिठ्ठया काढल्या आणि त्यातून प्रत्येकाला एक चिट्ठी पास केली...
सगळी मुले मात्र आता नेमका आपल्यावर काय प्रयोग होणार आहे असा विचार करून पुरती गोंधळलेली होती.....
सगळ्यांना चिठ्ठया वाटून झाल्यावर सर म्हणाले.... सगळ्यांना मिळाल्या आहेत ना... कुणी राह्यलं तर नाही ना...
मुले एकसुरात : नाही...
आता सगळ्यांनी आपापल्या चिठ्ठयाची घडी काढा.... त्यावर काही जोड शब्दातील एक शब्द आला आहे... जसे की वरण भात... एकाला वरण आला असेल तर एकाला भात.... तर ज्याला वरण हा शब्द आला आहे आणि भात हा शब्द आला आहे ते एका बेंच वर बसतील...
रोहन : मला शुभ शब्द आला आहे...
सायली : मला लाभ....
दुबे सर : हं आता शुभ वाला लाभ कडे जाईल...
असं करत करत सगळ्या वर्गातील एक मुलगी आणि एक मुलगा अश्या जोडया तयार झाल्या.... शेवटी फक्त विकी च राहिला... एक मुलगा गैरहजर होता....
दुबे सर : ठीक आहे. तूझ्या जोडीला मी राहतो....
पूर्ण वर्गात हशा पिकला 😂😂😂
दुबे सर :अरे हसताय काय?? 🤔 आता तूम्ही एक काम करायचं आहे.... मी तुम्हाला अर्धा तास वेळ देतो.... त्या अर्ध्या तासात आपापल्या बेंचपार्टनर चे नाव, गाव, मार्क आणि छंद विचारायचे... आणि ओळख करून देताना बेंच पार्टनर ची ओळख करून द्यायची... म्हणजे आपोआपच तूमची ओळख होईल.....
सगळ्यांना या नवीन खेळात मजा वाटत होती.... मुलांना मुलींची ओळख करून देण्यात खूप उत्सुकता होती😍😍... तर मुलींच्या मनात देखील एक वेगळ्या प्रकारची कालवा कालव होत होती... तरी चेहरे मात्र निर्भीड ठेवत होत्या....
सगळ्यांचे इंट्रो.. देऊन झाल्यावर आता पूर्ण वर्गात एक मोकळे पणा निर्माण झाला होता...
मुलगा आणि मुलगी असा भेदभाव राहिला नव्हता.... नंतर सरांनी दहाच मिनिट त्यांच्या विषयाबद्दल शिकवले.....
अगदी तासाभराच्या क्लासमध्ये दुबे सरांनी मुला मुलींची मने जिंकली होती....
दुबे सर : चला तूमच्या सर्वांची ओळख होणे महत्वाचे होते.. आता कुठलीही अडी राहणार नाही.... उद्यापासून निदान मात्र मी नियमित शिकवण्यासाठी सुरुवात करेन.....
दुबे सर वर्गातून निघून गेले... सगळेच विद्यार्थी आपापल्या पूर्वजागेवर आले....
नंतरचा विद्यार्थ्यांचा वेळ मात्र एकदम हसतखेळत गेला... आता कुठल्याही विद्यार्थ्यांला त्याचे दडपण नव्हते.....
सायली : बापरे 😳मला तर नुसतं धडधड करत होतं त्या रोहनच्या बाजूला.... पण तो ईतका व्यवस्थित बोलला की माझी भीतीच पळून गेली.....
अनुया : हो खरंच किती चांगले आहेत ना दुबे सर.... आपल्या कळत नकळत त्यांनी आपल्याला एका ऍक्टिव्हिटी मध्ये सामावून घेतलं.....
विकी : Excuse me !!girls....
नेहा : आता या झेंडू ला काय बोलायचे आहे?? 🙄
. विकी :आता इलेक्ट्रॉनिक्स चे लेक्चर आहे...
नेहा :आम्हाला ई-मेल द्वारे टाईमटेबल आला आहे 😏
विकी : त्या सरांचे नाव आहे गीतेश सर..... त्या सरांना जास्त बोलू नका बरं...
सायली : Excuse me!! आम्हाला आमचे बरेवाईट कळते 😏 उगाचच तुझं ज्ञान आमच्यासमोर पाजळू नकोस 😡
विकी : तुम्हाला सावधान करणं माझे काम होते.... पण जर तुम्हाला ऐकूनच घ्यायचे नसेल तर मी काहीच करू शकत नाही....
तितक्यात गीतेश सरांची क्लास मध्ये एंट्री झाली... गीतेश सर म्हणजे एकदम हिरो सारखा लुक... डोळ्यावर गॉगल... त्यांनी देखील परफ्युम ची बॉटल पूर्ण अंगावर ओतून घेतल्यासारखा सुवास पूर्ण वर्गात दरवळत होता....
अनुया : आपल्या लेक्चर लोकांमध्ये परफ्युम ओतून घेण्याची स्पर्धा चालू आहे का??
सायली : हो ना !!किती तो परफ्युम माझे तर या भपकेबाजी मुळे डोके दुखणार....
गीतिका : हे सगळे सर किती यंग आणि हँडसम आहेत ना....
नेहा : हं पण दुबे सरांसारखा त्यांच्यात स्पार्क वाटत नाहीये..
गीतेश सरांनी जास्त गप्पा न करता शिकवायला सुरुवात केली... त्यांचं शिकवणं म्हणजे रोजच्या व्यवहारातले उदाहरण देऊन होतं त्या मुळे समजण्यात कुणालाही काहीच अडचण आली नाही....
नेहा : त्या झेंडू चा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती 🤷 किती छान शिकवलं सरांनी......
सायली : जाऊदे, त्याला उगाचच मुलीसमोर शाईन मारायची असेल.... पण त्याला माहिती नाही... आम्ही..आमच्यासारखे आम्हीच आहे ते 😏.....
क्रमश :
भाग 5 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
दुबे सरांची एन्ट्री मस्त कथा चांगली वळण घेत आहे. सुदंर
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा