नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
" फ्रेशर्स पार्टी "
कॉलेजचा पहिला दिवस... नवीन वातावरण, नवीन ओळख विशेष म्हणजे सगळ्या ब्रँच मधील एकाच वर्गात असणारे विद्यार्थी..... कुठलाच भेदभाव नाही.... दुबे सरांमुळे मुलगा मुलगी भेदभाव देखील गळून पडला होता... थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीही चांगल्या पद्धतीने शिकवल्या गेल्याने सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरला होता......
कॉलेज सुटले सगळे जण आपापल्या रूम कडे जायला निघाले....
तितक्यात एक आवाज आला... अनुया !!
अनुयाने मागे वळून बघितलं आणि तिच्या हृदयात एकदम धस्स झालं...." प्रज्वल" याने आपल्याला कश्याला आवाज दिला असेल?? ..
प्रज्वल : अनुया !! कसा गेला आजचा पहिला दिवस??
अनुया : अं?? खूप छान...
प्रज्वल :बरं थोडं एक मिनिट बाजूला येतेस का?? मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे....
अनुया :😳 बापरे.... याला आता माझ्याशी काय बोलायचं आहे.... हा माझा क्रश😍 आहे ... याला माहिती तर झाले नसेल ना??
प्रज्वल : अगं अनुया !! ईतका काय विचार करत आहेस??
अनुया : ठीक आहे.... थोडे बाजूला होऊन बोल काय बोलायचे आहे.....
प्रज्वल : हे बघ मला घुमून फिरवून बोलायला आवडत नाही... मी सरळ सरळ सांगतो....
अनुया : क क काय??अनुया श्वास रोखून ऐकायला लागली....
प्रज्वल : तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स कुणी शिकवलं??
अनुया : 🤷 गीतेश सरांनी....
प्रज्वल : मी तूला सांगतो आणि तू देखील तूझ्या मैत्रिणींना सांग.. गीतेश सरांपासून जरा सावध रहा...
रोखून धरलेला श्वास सोडत अनुया म्हणाली... कमाल आहे.. आमच्या क्लास मधील विकी ने देखील आम्हाला हेच सांगितले... पण खरं सांगू का?? गीतेश सरांनी तर मुलींकडे बघितले देखील नाही.... आल्या आल्या त्यांनी शिकवायला सुरुवात केली....
प्रज्वल : ही गीतेश सरांची मुलींना इंप्रेस करण्याची पद्धत आहे... आणि भोळ्या भाबड्या मुली त्यात फसतात....
अनुया : बापरे 😳??
प्रज्वल : तूम्ही फक्त इतकंच करायचं की त्याने कधी एकटं भेटायला बोलावलं तर जायचं नाही.. कुणी ना कुणी सोबत ठेवायचं....
अनुया :पण तूम्ही लोकं गीतेश सरांबद्दल ईतकं का सांगत आहेत आधी कुणाला काही वाईट अनुभव??
प्रज्वल : हो... हा माणूस कॉलेज मधील मुलीला बरोबर पटवतो.... जसं की हिप्नोटाईज केलं आहे आणि मग पळून घेऊन जाऊन लग्न करतो.... वर्षभर संसार करतो की दुसऱ्या मुलीच्या मागे... मग काय पहिलीला घटस्फोट....
अनुया : म्हणजे सध्या तर ते सर married आहेत ना??
प्रज्वल : दरवर्षी नवीन डाव.... विशेष म्हणजे आता पर्यंत पाच मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत.....
अनुया : 😳किती तो मूर्खपणा आणि ऐकावे ते नवलच....
प्रज्वल : चल मला जे सांगायचे होते ते मी सांगितले.... तूम्ही काळजी घ्या... निघतो मी... बाय
अनुया : बाय....
नेहा : ओहो काय अनुया !!काय प्रपोज बीपोज केलं की काय??तूझ्या त्या....
अनुया : नेहा !!जरा हळू🤫 कुणी ऐकेल..... चला रूमवर जाऊन आधी फ्रेश होऊ.... मग सांगते....
नेहा : सन्स्पेन्स हं🙄...
सायली : चला गं पोरींनो !!ईथे उभे राहून माझे नुसते पाय दुखत आहे....
रूमवर जाऊन सगळ्या जणी फ्रेश झाल्या... आणि अनुयाच्या रूम मध्ये येऊन बसल्या...
नेहा : अनुया !!आता जास्त उत्सुकता ताणू नको बरं का??
अनुया : नेहा !! गीतेश सरांबद्दल जे विकी ने सांगितले तेच प्रज्वलने सांगितले...पण त्याने जे सांगितले... असं म्हणत अनुयाने गीतेश सरांची स्टोरी ऐकवली....
गीतिका :😳 बापरे आपला तर कॉलेजचा पहिला दिवस आणि काय काय कळत आहे....
नेहा :पण अनुया !!त्या प्रज्वलला बरी तूझी काळजी??
सायली : नेहा !!अनुया !! मी मगापासून बघते आहे की तुमचं काहीतरी खुसफूस खुसफूस चालले आहे.... जरा आम्हालाही कळू देत की...
नेहा : अगं सायली तू विसरलीस का?? आपण एलेव्हन्थ मध्ये होतो तेव्हा अनुयाच्या बिल्डिंग च्या बाजूला सोसायटी मध्ये राहणारा अनुयाचा 😍😉 क्रश
सायली : हं... आठवलं... हा तोच आहे की काय?? तसंही आम्हाला नाव कुठे सांगितलं होतं अनुया तू !! पण त्याला तर मेडिकलला जायचे होते ना.... त्याचा स्कोरपण आला होता.... मग?? 🤔
अनुया : हो ना म्हणून तर मी देखील त्याला ईथे पाहून खूप गोंधळले होते. .... जाऊ दे नंतर त्याचा विचार बदलला असेल
गीतिका : पण काहीही म्हणा,.. कॉलेजचा पहिला दिवस खूप छान गेला... त्या दुबे सरांनी तर सगळं वातावरणच बदलून टाकलं....
गर्ल्स गर्ल्स गर्ल्स ऐका मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे असं म्हणून अंजली अनुयाच्या रूम मध्ये आली...
नेहा : बोला "खबरी " काय बातमी आहे??
अंजली : खबरी आणि मी?? पण नेहा तूला कसं कळालं की मी काही बातमी आणली आहे??
नेहा : इट इज कॉल्ड एज किन ऑबसेर्व्हशन.... समजलं ना 😉
अंजली :हं..... बरं ऐका आपले सिनियर्स पैसे कलेक्ट करत आहेत.... कश्यासाठी माहिती आहे का??
अनुया : असेल काही कार्यक्रम??
अंजली : ते collection फ्रेशर्स पार्टी साठी आहे....
सगळ्याच एका आवाजात :काय?? 🤔 फ्रेशर्स पार्टी
अंजली : हो हो, या कॉलेजची प्रथा आहे.... ज्युनिअरचे introduction झाल्यावर त्या आठवड्याच्या शनिवारी सिनियर्स ज्युनियरला ( आपल्याला )फ्रेशर्स पार्टी देतात...
अनुया : पार्टी??😳 ती पण आपल्याला आपले सिनियर्स देणार?? ... अंजली तूला खात्री आहे का??
अंजली : अगं अनुया !! तूझे इस खबरी के बात पे भरोसा नही है क्या??
अनुया : बरं बरं असू दे.... अगं अंजली !!आज यास्मिन दिसत नाहीये?? कुठे आहे ती??
अंजली : माहिती नाही.. पण ती आज जरा अलिप्त रहात आहे....
नेहा : काय?? अलिप्त 😳 का गं... काही बिनसलं आहे का??
सायली : गर्ल्स !!चलो अपने मिशन पे.... बघुयात यास्मिनचे काय बिनसले??
सगळ्या मैत्रिणी यास्मिनच्या रूमवर गेल्या.... यास्मिन झोपून होती??
अनुया : यास्मिन !! का गं झोपलीस??
यास्मिनने तीची कूस बदलली... अरे तूम्ही?? काही नाही गं जरा बरं वाटत नव्हते 🥺.... पण तिच्या डोळ्यात अश्रू होते....
नेहा : यास्मिन !!खरं सांग?? तू कुणाला मीस करत आहेस का??
असं म्हणताच यास्मिनच्या डोळ्यातून धारा😭 वाहायला लागल्या....
नेहा : अरे यास्मिन !!काय झाले?? माझे काही चुकले का??
यास्मिन : नही रे नेहा !!मुझे अम्मी, अब्बूकी बहोत याद आरही है |
अंजली : यास्मिन !! तो उन्हे एक फोन करलो... व्हिडीओ कॉल कर लो...
यास्मिन :डर लगता है |🥺की, मै फोन पे रो दूंगी....
नेहा : यास्मिन !!तुम्हे पता है क्या?? सिनियर्स अपने को पार्टी देने वाले है |( यास्मिन होमसीक झाली हे एव्हाना नेहाच्या लक्षात आले होते)....
यास्मिन :क्या?? 😳
असं करत सगळ्यांनी यास्मिनचा मूड बदलला😊......
कॉलेजचा दुसरा दिवस आता सगळ्यांनाच तिथले वातावरण परीचयाचे झाले होते.... अधून मधून एखादा सिनियर मुलांचा ग्रुप समोर येत असे आणि मुला मुलींचे introduction घेत असे....
गीतिका : हे introduction किती दिवस चालणार?🤔 तेच तेच उत्तर द्यायचा जाम कंटाळा आला....
फ्रेशर्स पार्टी पर्यंत... मागून एका मुलाचा आवाज आला 😊
गीतिकाने मागे वळून बघितले....
Hi मी अजिंक्य !! तुझाच क्लासमेट....
गीतिका : अच्छा....
अजिंक्य : तूझे नाव गीतिका ना?? I like your name....
गीतिका : काय?? 😡
अजिंक्य :काही नाही.... अजिंक्य जरा घाबरून गेला आणि वर्गात जाऊन बसला....
सगळेच क्लास मध्ये जाऊन बसले.... आज पाहिलं लेक्चर दुबे सरांचे होते.... सगळ्यांना दुबे सर आवडल्याने मुलांची शंभर टक्के उपस्थिती होती.....
दुबे सर : मुलांनो !!मी तुमच्या सिनियर मुलांच्या वतीने फ्रेशर्स पार्टीची घोषणा करत आहे.... फ्रेशर्स पार्टी या शनिवारी दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत चालणार आहे....
नेहा : बापरे सर ईतका वेळ 😳??
दुबे सर : ही पार्टी जरी फ्रेशर्स पार्टी असली तरी यात सहभाग तुम्ही, तुमचे सिनियर्स आणि आम्ही टीचर्स, प्रोफेसर सगळेच घेतात.....
तर मुलांनो मी तुमच्याकडून आहे..... आपल्याला एक फॅशन शो, एक ग्रुप स्किट, आणि एक ग्रुप डान्स अशी तीन भागात विभागणी करायची आहे....
अनुया : किती मज्जा येईल ना??
दुबे सर : हो... मज्जा तर येणारच.... you will love it....
मी तर हळूच बोलले होते या सरांना कसेकाय ऐकू गेले?? .... 🙄 मनातच अनुया म्हणाली
दुबे सर : चला मग दोन ग्रुप करा एक स्किट साठी आणि एक डान्स साठी... फॅशनशो तर सर्वांनाच करायचा आहे.....
नेहा : आज सर काही शिकवणार नाही वाटते🙄....
दुबे सर : शिकवणार शिकवणार, आज जरा माने सरांची तब्येत ठीक नाही म्हणून मीच दोन तास क्लास घेणार आहे एका क्लास मध्ये फ्रेशर्स पार्टी तर दुसऱ्या क्लास मध्ये लेक्चर.....
नेहा मॅडम या सरांचे कान जरा जास्तच तीक्ष्ण दिसतात जरा सांभाळून बडबडत जा हो....
दुबे सरांनी दोन ग्रुप केले.....
फॅशन शो साठी त्यांच्या उंची प्रमाणे जोडया ठरवल्या....
या सगळ्या गोष्टींमुळे आता मुलांचा उत्साह अतिशय द्विगुणित होत होता.....
क्रमश :
भाग 6 वाचण्यासाठी निळ्या लाईन वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
.
2 टिप्पण्या
गितेश सरांची कर्म कहाणी तिरस्करणीय एक आदर्श शिक्षक पेशाला लागलेला काळिमा.पण प्रज्वल नक्की चांगला मुलगा असेल ना?
उत्तर द्याहटवाअसे काही लोक असतात. धन्यवाद 🙏
हटवा