नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
" फ्रेशर्स पार्टी "
दुबे सरांनी फॅशन शो साठी जोडया तयार केल्या...बारा जोडयांना सर्व धर्म समभाव ही थीम घेऊन सर्व राज्यांचा पेहराव घालायला सांगितला...
तर बाकीच्या बारा जोडयांना स्टेजवर फिल्ड नुसार स्टेजवरच्या कोपऱ्यांमध्ये आपापल्या फिल्ड नुसार देखावे तयार करतील... ह्या साठी शक्यतो ज्या त्या फिल्डचे आहेत त्यांचाच सहभाग असावा....
कारण हा तुमचा कॉलेजचा पहिला प्रोजेक्ट राहील....बघुयात तूम्ही घेतलेल्या फिल्ड बद्दल तुम्हाला किती ज्ञान आहे किंवा त्या फिल्डकडून तूमची काय अपेक्षा आहे??
आता ही एक जोडी उरली आहे तर ती महाराष्ट्रीयन पोशाख करेल...तुम्हाला अँकरिंग करायचे आहे...
आता कुणाला काही शंका??
अनुया : नाही सर... तूम्ही सगळं व्यवस्थित प्लॅन केलं आहे....
विकी : सर मला कुणी female पार्टनर नाही, आजही मेल 🙄
दुबे सर : अरे आजही तूच का?? 😊 बरं बरं आता तुमच्या क्लास मध्ये मुले 26आणि मुली 24 मी तरी काय करू?? 🤔
नेहा :पण सर हे पेहराव?? आम्हाला रेंट ने मिळतील का??
दुबे सर : आपल्या कॉलेज मध्ये वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम चालतात त्या मुळे एक कॉस्ट्यूम डिझाईनर ठेवला आहे.... तो सगळे पोशाखाचे बघतो... फक्त कॉलेज सुटल्यावर तुम्हाला त्याच्याजवळ जाऊन आपापले माप द्यायचे आहे.....
यास्मिन :सर हमारे स्किट की स्क्रिप्ट??
दुबे सर : स्क्रिप्ट तुम खुद तयार करो.... बस ये याद रहे की उसमे तुम्हे तुम्हारे सिनियर्स को ग्रीट करना है |
यास्मिन :अच्छा सर समझा....
नेहा : यास्मिन !!तुम्हारी हॉबी तो डान्स है ना?? फिर तुम स्किट मे....
यास्मिन : नेहा!! 🤫 अभी कुछ मत बोलो.... मै तुम्हे बादमे बताती.....
दुबे सर :आणि डान्स ग्रुप तूम्ही देखील लक्षात ठेवा तुम्हाला देखील तुमच्या डान्स मध्ये देखील तुमच्या सिनियर्स ला ग्रीट करायचे आहे....
सगळेच जण आपापल्या तयारी ला लागले.....
पहिल्या क्लास नंतर देखील विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव दुसऱ्या क्लास मध्ये सराव झाला... शिकवणं असं काहीच झाले नाही....
सगळेच जण मनोरंजन करण्याच्या मूड मध्ये होते .....
________________________________________
सगळेच जण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते तो दिवस उजाडला.... तो दिवस म्हणजे फ्रेशर्स पार्टीचा दिवस... सगळीकडे नुसता आनंद....
फर्स्ट इयर च्या मुला मुलींना आजचा दिवस कसा असेल याची उत्सुकता होती... तर सिनियर्स आणि लेक्चरर बाकी तयारीला लागले होते....
खबरदारी म्हणून विश्वासला एका दिवसासाठी सक्तीने पोलीस कोठडीची भीती दाखवून त्याच्या गावी पाठवले होते....
कॉलेज मधला पहिला कार्यक्रम असल्यामुळे मुलींची तयारी एकदम जोरदार सुरु होती....
तयारी दोन दिवस आधीपासून चालली होती. हॉस्टेलच्या रूम मध्ये जणू ब्युटी पार्लर उघडले होते...
अगदीच वॅक्सिन्ग पासून फेशियल पर्यंत जो कुणी एक्स्पर्ट असेल ती मुलगी ते ते काम करत होती....
तर कुणी बाजारात जाऊन मॅचिंग खरेदी करत होते....
पार्टीची वेळ झाली... कॉलेज कॅम्पस मध्ये खास मोठा टेन्ट टाकलेला होता.... एका बाजूला ऑडिटोरियम होते....
ज्युनियर मुली आणि मुले टेन्ट मध्ये एन्ट्री करताच.. एक वेगळी धून वाजायला लागली.... वातावरण एकदम आल्हाददायक झाले....
Musical फिश पॉंड्स सुरु झाले... आठवडाभरात सगळ्या सिनियर मुलांनी जुनिअरच्या हालचालींकडे लक्ष ठेऊन अगदीच समर्पक असे गाणे वाजवले होते....
अनुया चे नाव अनाऊन्स झाले...
गाणे होते काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली...
नेहाला - हिची चाल तुरु तुरु... उडती केस भुरू भुरू..
रोहनला -मै शायर तो नही |मगर ऐ हसी जबसे देखा मैने तुझको
विकीला- कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाये का
सायलीला - आँखोकी गुस्ताखीयां माफ हो|...
गीतिका - खुदको क्या समझती है |इतना अकडती है|
यास्मिन - चेहरा है या चाँद खिला जुल्फ घनेरी श्याम है क्या
अंजली - परी हूं मै, ना ना ना छुना... मुझे दूर ही रहना
Musical फिश पॉंड्स संपले...
प्रत्येकाला चांगला फिश पॉन्ड मिळाल्याने प्रत्येक जण आनंदाने हुरळून गेला होता....
नंतर फ्रेशर्स चा फॅशन शो होता...
त्याच्या सोबतच प्रत्येक जोडीने आपापल्या फिल्ड च्या प्रतिकृती तयार केल्या होत्या...
जसं की एका बिल्डिंग ची प्रतिकृती तयार केलेली होती त्या मध्ये काही सेन्सर ठेवले होते त्या नुसार त्याचे दरवाजे, पडदे एका ठिकाणाहून ऑपरेट करता येत होते....
सगळेच सिनियर्स लेक्चरर आणि प्रोफेसर मंडळी मुलांचे काम बघून अवाक झाले होते.....
रोहन ने अनाऊन्समेन्ट केली....जी आपल्या फॅशन शो ची थीम आहे त्याच थीमनुसार आम्ही हे प्रोजेक्ट तयार केले आहे...
जसे आपल्या फॅशन शो मध्ये सर्व राज्य एकत्र येऊन "अनेकता मे एकता "चे प्रदर्शन दाखवतो तसेच आम्ही एकच प्रोजेक्ट पण आपल्या इंजिनियरिंग च्या जास्तीत जास्त फिल्ड वापरून हे परिपूर्ण बिल्डिंगचे मॉडेल तयार केले आहे .....
टाळ्यांचा गडगडाट झाला... नवीन बॅच खूप हुशार आहे आणि नक्कीच आपल्या कॉलेजचे नाव प्रसिद्ध करेल असा आत्मविश्वास प्रिन्सिपॉलला वाटायला लागला होता ....
नंतर स्किट होते.... स्किट मध्ये नवीन ऍडमिशन घेतलेला विद्यार्थी सिनियर्सला किती घाबरतो आणि नंतर सिनियर्स कसे छान सांभाळून घेतात हे दाखवण्यात आले.... आणि सोबतच ग्रुप डान्स करून त्यांचे आभार मानले गेले...
नंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नृत्य करून लेक्चर, प्रोफेसर आणि प्रिन्सिपॉल सगळ्यांचे देखील मनापासून आभार मानले....
ही कॉलेज मधली पहिली अशी बॅच होती ज्यांनी त्यांच्या शिक्षकांना देखील नृत्याद्वारे अभिवादन केले होते....त्या मुळे शिक्षक मंडळी खूप खूष झाली होती.....
म्हणतात ना जिथे जिथे अतिशय आनंद घडतो त्या नंतर काहीतरी विपरीत घडते....
अचानक मांडवाच्या एका बाजूने फटाक्यांचा आवाज आला.... आवाजाच्या दिशेने सर्वच जण धावले...
सगळेच जण मंडपाच्या दुसऱ्या दिशेला विन्या आणि त्याच्या मित्रांनी सर्वांच्या शीतपेयात काहीतरी पावडर मिसळली...
पण वॉशरूम मधून बाहेर येताना नेहाला या मुलांच्या हालचाली दिसल्या...एका कोपऱ्यात जाऊन त्या मुलांच्या नकळत तीने तिच्या मोबाईल वर फोटोच्या माध्यमातून त्या टिपल्या....
नेहा नंतर हळूच मंडप मध्ये आली.... आता ही गोष्ट पहिले कुणाला सांगायची याचा विचार करू लागली.... तितक्यात तिला समोर अनुया दिसली.... अनुया मात्र प्रज्वलचा एक मिनिट शो मधला खेळ पाहण्यात मग्न होती.... नेहा अनुया जवळ गेली...
नेहा :अनुया !!माझ्यासोबत जरा बाजूला येते का मला तूला खूप महत्वाचे बोलायचे आहे....
अनुया : नेहा !!अगं तो प्रज्वल बघ ना 😍
नेहा : अनुया !!मी नंतर बघते तू प्लीज जरा बाजूला येतेस का??
नेहाने अनुयाला ओढून बाजूला नेलं.... तिला तसं ओढून नेताना गीतिका आणि सायली ने बघितले....
त्या देखील काहीतरी गोंधळ आहे हे समजून नेहाजवळ धावत आल्या... नेहाने तिघीनांही त्या मुलांबद्दल सांगितले...
गीतिका : नेहा !!मग आता वाट कशाची बघत आहात... सगळेच जण शीतपेय घेण्याच्या आधी आपण काहीतरी करू....
सायली: एक दो तीन चार, चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार.... असं म्हणून त्या शीतपेयाजवळ आल्या... सगळेच जण डीजे च्या तालावर नृत्य करण्यात मग्न होते...
पण शीतपेय सगळे मंडपाच्या एका कोपऱ्यात ठेवलेली होती....
उघड उघड शीतपेय बदलता येत नव्हते... काय करावे काहीच सुचत नव्हते....
आणि आता शीतपेय सगळ्यांनी ग्लास उचलण्याची वेळ आली होती....
तितक्यात नेहाला एक कल्पना सुचली.... तीने अनुयाच्या कानात काहीतरी सांगितले दोघीनींही शीतपेयांचे ट्रे तयार केले.... आणि गरबडीत ग्लासेस वाटण्यासाठी निघाल्याचे नाटक करून एकमेकांच्या समोर आल्या आणि एकमेकांना धडकल्या.... दोघींच्याही ट्रे मधले शीतपेय सांडून गेले....
प्रज्वल : अनुया !!हे काय?? 😡अरे, तुम्हाला कुणी सांगितले होते हे कोल्ड ड्रिंक्स वाटायला... टेबलवरच होते ना?? सगळ्यांचे हातपाय धडधाकट आहेत... स्वतः घेतले असते.... तुम्हाला माहिती नाही किती काँट्रीब्युशन करून आम्ही सगळ्या ह्या arraingements केल्या आणि तूम्ही क्षणातच धूळीस मिळवल्या.... प्रज्वल खूप चिडला होता
आय एम सॉरी🥺 अनुया असं म्हणून तिथून रडतच निघून गेली 😭
पण प्रज्वल अजून चिडलेला😡 होता... त्याच्याजवळ अजून काही सिनियर्स जमा झाले.... प्रज्वल मात्र त्याचा राग व्यक्त करत होता...
मुलांचा घोळका बघून दुबे सर तिथे आले....
दुबे सर :प्रज्वल !! काय झाले कसला गोंधळ चालू आहे हा??
प्रज्वल : पहा ना ओ सर या नेहा आणि अनुयानी सगळे कोल्ड ड्रिंक्स सांडून दिले... आम्ही सगळं काँट्रीब्युशन करून आणले होते...
सर आम्ही हे मुद्दाम नाही केलं.... चुकून झाले... वाटल्यास आम्ही भरपाई देतो. नेहा थोडे तोऱ्यातच म्हणाली...
दुबे सर : ए विकी !!जरा ईकडे ये हे घे पैसे... आणि कोल्ड ड्रिंक्स आण बरं... प्रज्वल !!कोल्ड ड्रिंक्सच होते ते.. ईतकं चिडायचे नसते रे.... त्यांनी काय मुद्दाम थोडी केले...
नेहा : प्रज्वल सर !! तुमच्या चिडण्याने अनुया आज उपाशीच राहणार.... ती रडतच हॉस्टेलला गेली आहे....
प्रज्वल : मी थोडीच म्हणालो तिला उपाशीच रहा म्हणून😡.... तिच्या नाकाच्या शेंड्यावर ईतका राग असेल तर मी काय करणार??
नेहा : मला वाटते आता तूम्हाला सगळं खरं सांगावं लागेल... प्रज्वल सर !!जरा एक मिनिट बाजूला येता का मला तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे....
प्रज्वल : काय बोलायचे ते ईथेच बोल....
नेहा : प्रज्वल सर प्लिज !!महत्वाचे बोलायचे आहे... नंतर तुम्हाला कुणाला सांगायचं ते सांगा पण आता जरा बाजूला येऊन ऐका....
हं बोल आता पटकन प्रज्वल जरा बाजूला येऊन म्हणाला...
नेहाने प्रज्वलला घडलेला प्रकार सांगितला... ते ऐकून प्रज्वलला मात्र खूप मोठा धक्का बसला कारण आतापर्यंत कॉलेज मध्ये असे काही विपरीत घडले नव्हते....
प्रज्वल : नेहा !! तू त्या मुलांना पाहिले होते ना?? मग तू त्यांना ओळखू शकशील का??
नेहा :त्यांचा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही... एकदम गुंड मवाली सारखं राहणं... ते बघा आता पुन्हा आपल्या मंडपात एंट्री करत आहेत.... आणि हा बघ त्यांचा कोल्ड ड्रिंक्स मध्ये पावडर मिसळतानाचा फोटो....
प्रज्वलने विश्वासचे मित्र लागलीच ओळखले.... आता मात्र नेहा आणि अनुयावर ओरडण्याचा त्याला खूप पश्चाताप झाला होता...
प्रज्वल : नेहा !!अनुयाला बोलावतेस का प्लीज....
नेहा : प्रज्वल सर !!आता माझ्या बोलावण्याने ती येणार नाही
क्रमश :
भाग 7 वाचण्यासाठी निळ्या लाईन वर क्लिक करा 👇
.नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
6 टिप्पण्या
छान!!! खूप सहज सुंदर लिहिता.
उत्तर द्याहटवा👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
हटवाकिती सुंदर फ्रेर्शस पार्टी पण कोणी विघ्नघातकी असतातच. नक्कीच प्रज्वल अनुयाला समजावण्यात यशस्वी होईल का?
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाPlease next part lawkr taka na me 4 days zale wait krte.
उत्तर द्याहटवासॉरी, माझी थोडी तब्येत ठीक नसल्याने मी टाकू शकले नाही.. इथून पुढे नियमित टाकण्याचा प्रयत्न करेन
हटवा