नमस्कार,
काही खाजगी कारणास्तव मी येत्या आठवड्यात प्रदर्शित करू शकले नाही.माझ्या या खाजगी कारणामुळे होणाऱ्या विलंबामुळे वाचकांच्या होणाऱ्या गैरसोयीस कारणीभूत असल्या कारणाने मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते 🙏
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
" धूंदी प्रेमाची "
प्रज्वल : अगं नेहा !!पण अनुया माझ्या वर जाम चिडली असणार आहे... ती माझ्या बोलावण्याने तरी काय येणार??
नेहा : मी काय सांगू... पण तूम्ही बोलावले नाही तर ती डिनर ला येणार नाही....
प्रज्वल : बरं तीचा 📳फोन नंबर दे बरं....
नेहा : हा घे... 74--------
प्रज्वलने अनुयाला फोन लावला....
अनुया हॉस्टेलच्या रूम मधील बेडवर पहुडली होती... आणि रडत😭 होती
रडता रडता😭 अनुयाने फोन📳 पाहीला.... unknown number 🤔..
अनुयाने जरा विचार करतच फोन 📳उचलला....
अनुया :हॅलो
प्रज्वल : हॅलो अनुया !! सॉरी गं
अनुया : कोण बोलतंय??
प्रज्वल : मी प्रज्वल बोलतोय...
"प्रज्वल" नाव ऐकताच अनुयाच्या काळजात एकदम धस्स😍 झालं तरी स्वतःला सावरून अनुया म्हणाली.... आता कशाला फोन केलाआहेस 😡
प्रज्वल :सॉरी अनुया !! अगं मला नेहानी सर्व काही सांगितलं... प्लीज प्लीज माफ कर गं.... हे बघ माझा राग तू जेवणावर नको काढूस....
अनुयाला कितीदा सॉरी म्हणतोय... मला एकदा तरी सॉरी म्हणाला का हा.... नेहा प्रज्वलकडे 🙄पाहून विचार करत होती...
अनुया : ठीक आहे येते मी... पण पुन्हा बोलताना जरा विचार करून बोलायचं....
प्रज्वल : अगं हो गं बाई !!ये लवकर आम्ही जेवायचं थांबलं आहोत.... असं म्हणून प्रज्वलने फोन📳 ठेवला...
प्रज्वल : नेहा !! थँक्स गं तू अनुयाचा फोन नंबर दिला म्हणून मी तीची माफी मागू शकलो...
नेहा : 🙄 ठीक आहे....
प्रज्वल : नेहा !!
नेहा :काय?? 🤔
प्रज्वल : सॉरी गं... या सगळ्या गोंधळात तूला सॉरी म्हणायचं मात्र राहून गेलं....
नेहा : its ok 😊
अनुया आली, सर्वांनी हसत खेळत डिनर केले.... आता कुणाच्याही मनात कसलाच किंतु उरला नव्हता..
पण प्लॅन फसल्यामुळे विश्वासचे मित्र मात्र सैरभैर झाले😡😡 होते...
विश्वासच्या मित्रांनी नेहा आणि अनुयाची गरबडीत होणारी टक्कर पाहिली होती... त्या मुळे शीतपेय चुकून सांडल्या गेले असाच त्यांचा समज झाला होता....
रूमवर गेल्यावर अनुया मात्र एकदम हवेत होती... कळत न कळत तिच्या क्रशने 😍😍तिला चांगलाच भाव दिलेला होता...
गीतिका : किती मज्जा आली ना.... मस्त काम केलं आपण कुणालाही नकळता त्या गुंड लोकांचा प्लॅन फसला...
सायली : एक दो तीन चार, चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार 😂😂😂😂
नेहा :😂😂😂 हो पण मला प्रज्वलला सगळं सांगावं लागलं....
अनुया : नेहा थँक्स 😊😍 आज तूझ्यामुळे प्रज्वल......
नेहा : ओहो ओहो आता तर काय एकमेकांना फोन नंबर मिळाले....
अनुया : अगं नेहा !!तो माझा क्रश 😍आहे. त्याला या बद्दल काहीच कल्पना नाही...
नेहा : हं.....
तितक्यात अंजली आणि यास्मिन रूममध्ये आल्या.
यास्मिन : अनुया !!क्या हुआ था?? तुम ऐसे अचानक बीच हॉस्टेल पे आये थे|
तितक्यात नेहा काही बोलणार की अनुयाने नेहाला 🤫नको बोलू म्हणून खुणावले....
अनुया : कुछ नही....यास्मिन तुम्हारा स्किट भी बहोत बढिया रहा....
नेहा :अरे हा यास्मिन !!तुमने डान्स क्यूँ नही किया?? तुम तो अच्छेखासे डान्सर हो |
यास्मिन : मेरे अब्बू को बिलकुल पसंद नही है | की मै स्टेजपे डान्स करू...
नेहा : अच्छा !!
अंजली : चला मुलींनो गूड नाईट.... आज खूप थकवा आला आहे.....
सगळ्या जणी झोपायला आपापल्या रूमवर गेल्या....
अनुया मात्र आज खूप बेचैन होती.... राहून राहून घडणाऱ्या घटनांचा घटनाक्रम आठवून मनात हुरळत होती.....नुसतीच कूस बदलत होती...प्रज्वलचे तिच्यावर चिडणे आणि थोड्याच वेळाने त्याने मागितलेली माफी तिला एक स्वप्नच वाटत होते....
खरंच प्रज्वल आपल्या आयुष्याचा भाग झाला तर?? 🤔 पण हे कसं शक्य आहे?? त्याला मी आवडते की नाही हेच माहिती नाही. मी तर खूपच पुढचा विचार करत आहे.
तितक्यात अनुयाच्या फोन वर मेसेंजरची tone वाजली.
अनुयाने पाहिलं... प्रज्वल?? 🤔ओ माय गॉड.. प्रज्वलच... काय म्हणतोय??
प्रज्वल :Hi
अनुया : Hi
लगता है आग दोन्हो तरफ बराबर की लगी है |😍😍..अनुया मनात विचार करत होती.
प्रज्वल : झोपली नाहीस अजून..
अनुया :आता झोपणारच होते की मेसेंजरची बीप वाजली..
प्रज्वल : सॉरी अनुया !!मी खूप लवकर रिऍक्ट झालो... मला माफ केलं आहेस ना??
अनुया : हो सर, हो...
प्रज्वल : बरं ऐक ना??
अनुया(😳) :काय 🤔??
प्रज्वल : अगं नेहाला प्लीज सांगशील का?? विन्याचे ते फोटो डिलीट करू नकोस म्हणून...
अनुया : हं, सांगते....
प्रज्वल : चल बाय, मी हे सांगण्यासाठीच मेसेज केला होता. गूड नाईट...
अनुया : अच्छा बाय, गूड नाईट...
म्हणे हे सांगण्यासाठी मेसेज केला😏.... मग नेहाला डायरेक्ट कॉल करायचा ना.. हूं 😏
अनुया : नेहा !!अगं प्रज्वलचा मेसेज होता तुझ्यासाठी...
नेहा : ओहो आता चॅटिंग, वॉटिंग... प्रोग्रेस है 😉
अनुया :कसला प्रोग्रेस?? अगं तुझ्यासाठी मेसेज होता की विन्याचे फोटो तू डिलीट करू नकोस म्हणून.... तूला डायरेक्ट कॉल करून सांगायचं ना... मला मेसेज केला 😡
नेहा :😳बापरे अनुया !!किती jealous फील करत आहेस.... अगं त्याच्याकडे माझा फोन नंबर नाहीये म्हणून केला असेल गं...
अनुया : 😏 जाऊदे... मुलं असतातच अशी...
रागा रागातच 😡अनुयाला झोप लागली....
रविवार उगवला... सगळ्या मैत्रिणींचा हॉस्टेलवरचा पहिला रविवार होता. सगळ्या आळसावल्या होत्या. फ्रेशर्स पार्टीची धूंदी अजून त्यांच्या मनात होती.
नेहा : कित्ती मज्जा आली ना?? 🤔एक दो तीन चार...
चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार असं म्हणत सायली आणि गीतिका देखील अनुयाच्या रूम मध्ये आल्या.
कसली मज्जा गं?? अंजली रूम मध्ये एन्ट्री करत बोलली...
नेहा काही सांगणार तितक्यात गीतिकाने तिच्याकडे पाहून डोळे वटारले 😳
नेहा : अगं किती नाचलो आपण आणि ते माने सर कसे पॅन्ट पकडून पकडून नाचत होते 😂😂😂
अनुया : हो आणि त्या एक मॅडम... किती सुंदर 😍आहेत ना दिसायला पण किती लाजत होत्या...
सायली : हो त्या सिनियर्स मुद्दाम त्या मॅडमना डान्स करायला लावत होत्या
एकंदर किती खेळीमेळीच्या वातावरणात पार्टी झाली...
अनुया : खूप भूक लागली आहे यार... आज कॅन्टीनपण चालू नाही....
नेहा : इतकंच ना... फिर ये नेहा शेफ किस कामकी... चला मी मॅग्गी बनवते....
गीतिका: 😂😂😂 शेफ और मॅग्गी?? 😇
सायली : अंजली !!यास्मिन कुठे आहे??
नेहा :शैतान का नाम लिया और शैतान हाजीर...
यास्मिन : शैतान कोन मै?? अच्छा और तुम महाशैतान 😂😂...
हसत खेळत, खाण्यासाठी काहीतरी नवीन प्रयोग करत, आरामशीर गप्पा मारत दुपारच्या जेवणाची वेळ झाली.
लगबगीने अंघोळ उरकून सगळ्याजणी जेवायला मेस मध्ये गेल्या... जेवणात गुलाबजाम डिश होती.....
अनुया :अरे वा गुलाबजाम... 😍
फुलाबाई :पोरींनो ही फिस्ट आहे बरं का?? आज म्हणजे दर रविवारी संध्याकाळी मेस बंद असते... तूम्ही समोरच्या हॉटलातून डब्बा मागवून घेऊ शकता...हा त्यांचा फोन नंबर जवळ ठेवा....
या चार मैत्रिणी आणि अंजली आणि यास्मिन संध्याकाळी बाजारात सिटी बसने गेल्या....
सगळ्यांना हा नवीन अनुभव होता मनात धाकधूक तर होतीच पण सर्व मैत्रिणी सोबत असल्यामुळे त्यांची भीती कमी झाली होती...
कुठले दुकान चांगले आहे??जवळपास कुठे काय मिळते या सर्वांची चौकशी दिव्या आणि कीर्तीला (सिनियर्स ) करून घेतली होती .... एक फेरफटका मारून आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करण्यात आली... आणि स्नॅक्स च्या हॉटेल मध्ये पावभाजी खाण्यात रविवारची संध्याकाळ निघून गेली...
सोमवार उजाडला...
सगळ्या जणी तयार होऊन कॉलेज मध्ये सोबतच जात असताना कॉलेज च्या आवारात त्यांना प्रज्वल दिसला.. प्रज्वल दिसताच अनुयाने नेहाचा हात पकडला आणि तिला ओढून जसं काय तीने प्रज्वलला बघितलेच नाही असे दाखवून दुसऱ्या दिशेने चालू लागली.....
तितक्यात प्रज्वलने आवाज दिला...
प्रज्वल : नेहा !!
नेहा 🙄 हूं 😏...फारच नेहा नेहा करत आहे हा... अनुयाचा अजून तीळपापड झाला... तिच्या हाताची पकड ढिली झाली...
नेहा : काय?? प्रज्वल सर....
प्रज्वल : तू तो विन्याचा फोटो डिलीट नाही केलास ना?? काल मी अनुयाला मेसेज केला होता.
नेहा : हो, हो... नाही केला मी डिलीट....
प्रज्वल :गुड, आता ऐक... मी आता जरा घाईत आहे... लेक्चर आहे... दहा वाजता जेव्हा आपल्याला थोडा फ्री वेळ मिळतो तेव्हा मला ईथेच भेट आपण हा फोटो दुबेसरांना एकदा दाखवू..... चल निघतो मी.
नेहा : ठीक आहे...
प्रज्वल बस्स कररे ज्युनियर शी गुलुगुलु बोलणं... अडकशील... प्राचीने टॉन्ट मारला....
टॉन्ट ऐकून नेहाला खूप ऑड वाटले.... तिथून पळून जावेसे वाटले.
प्रज्वल : कुछ भी क्या प्राची?? ... तसं असतं तर मी तूझ्यात अडकलो नसतो का?? 😉 तुझ्याशी पण तर गुलुगुलु बोलतोच की मी....
प्रज्वलने जणू त्याच्या शब्दाने प्राचीला सणसणीत चपराकच मारली....
प्राची : प्रज्वल !! ज्युनियरच्या समोर तू माझा अपमान करत आहेस... this is not good😡...
प्रज्वल : प्राची !!अपमान कसला अपमान?? तू उगाचच काहीही बोलू नकोस ना मग....
प्राची : i will see you later 😡
प्राची आणि प्रज्वल तिथून निघून गेले....
अनुया मात्र मनोमन खूष झाली 😊....चला म्हणजे आपला प्रज्वल असा तसा नाहीये तर 😇.... आपला प्रज्वल 🙄...
क्रमश :
भाग 8 वाचण्यासाठी निळ्या line वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या