नमस्कार,
आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
" धुंदी प्रेमाची "
आपला प्रज्वल 🙄... हे काय लागलीच आपण आपला प्रज्वल म्हणायला लागलो... काहीतरीच 😊
चला मॅडम कामाला लागा... आपले लेक्चर सुरु होईल.. अनुया विचारातच निघाली.
आता वर्गात अभ्यासाला सुरुवात झाली होती. दोन लेक्चर झाल्यावर ठरल्या ठिकाणी प्रज्वल नेहा आणि अनुया भेटले. तिथेच प्रज्वलने दुबे सरांना बोलावले.
नेहा : गूड मॉर्निंग सर !!
दुबे सर : व्हेरी गूड मॉर्निंग.. प्रज्वल सांगत होता की फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी खूप मोठे कांड होता होता वाचले.ते देखील तुमच्या हुशारीमुळे....
नेहा : थँक्स सर !! पण लकीली मी त्या मुलांना शीतपेयात पावडर मिसळताना पाहिले म्हणून... नाहीतर अनर्थ घडला असता.
प्रज्वल : नेहा !!तो फोटो सरांना दाखव ना....
नेहाने तीच्या फोन मधील फोटो दाखवला....
दुबे सर : नेहा !! हा फोटो मला ट्रान्सफर कर... हा घे माझा नंबर....
नेहाने फोटो ट्रान्सफर केला.
दुबे सर :आता मी काय सांगतो ते नीट ऐका.... प्रज्वल तू देखील.... माझ्या कडे प्रूफ आले आहे.... आता तू, नेहा!! आणि अनुया !!या गोष्टीला ईथेच विसरून जा.... नेहा !!हा फोटो तू तूझ्या मोबाईल मधून डिलीट कर.... या मुलांना चुकूनही खबर लागायला नको की तूम्ही हुशारी करून विन्याचा डाव हाणून पाडला.... कारण या मागे नक्कीच विश्वास असणार....
प्रज्वल : बापरे 😳.... विश्वास
नेहा : विश्वास 🤔
दुबे सर : आपल्या कॉलेजला लागलेला खूप मोठा डाग आहे तो... खूप मोठा गुंडा.... नेहा !!, अनुया !!तुम्हा दोघींव्यतिरिक्त ही गोष्ट अजून कुणाला माहिती आहे??
नेहा : सायली आणि गीतिकाला...
दुबे सर : हे बघा तूम्ही चौघी प्रज्वल आणि मी बस्स ईतक्याच जणांना आता ही गोष्ट माहिती आहे. आणि तुम्हाला त्या गुंडांकडून काहीही त्रास नको असेल तर तूम्ही ही गोष्ट अजून कुणालाही सांगणार नाही...
नेहा : सर पण मग त्याला असं घाबरून राहायचं🤔... मग तर तो अजून शेफारेल....
दुबे सर : वाह बोल्ड आहेस गं?? तसं काही नाही तूम्ही अजून या कॉलेजमध्ये नवीन आहात... त्या मुलांना योग्य ती शिक्षा तर मी करणारच पण तुम्हा मुलींना त्यांच्यापासून काही त्रास नको म्हणून मी हे सांगत आहे... तसं तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.... कॉलेजमध्ये नवीन असून सर्वांच्या नकळत तूम्ही त्यांचा डाव हाणून पाडला.
अनुया : थँक्स सर !!😊
दुबे सर : चला मुलींनो!! मी निघतो, काळजी घ्या.....
प्रज्वल : नेहा!! दोन मिन. थांब मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे....
नेहा काय 🔥🔥 चला अनुया mam आपले ईथे काही काम नाही....
नेहा : काय 😳?? काय बोलायचे आहे??
प्रज्वल :अगं अनुया !!तू कुठे निघालीस??
अनुया : तूला नेहाशी काहीतरी पर्सनल बोलायचे आहे ना😡
प्रज्वल : अगं अनुया !!मला तुम्हा दोघींशीही बोलायचे आहे.. पर्सनल वगैरे काही नाही... दुबे सर जे सांगतात त्यात तथ्य आहे... विश्वास खूप मोठा गुंड आहे.... त्याला पूर्ण कॉलेज घाबरते.... नेहा!! मगाशी तू सरांना म्हणालीस की असं घाबरून कसं चालेल... पण खरं सांगायचं तर तो खूप डेंजर आहे... मला ईतकंच सांगायचं की घडलेली गोष्ट गोपनीय असू द्या... तुम्हाला काही दिवसांनी कळेलच विश्वास कसा आहे ते.....
अनुया : ठीक आहे. आम्ही ही गोष्ट गोपनीय ठेऊ... चला निघतो प्रज्वल सर आम्ही....
प्रज्वल : अनुया !!
अनुया :काय?? 🙄
प्रज्वल : तू मला फक्त प्रज्वल म्हटलं तरी चालेल??
अनुया :काय 😍
नेहा : म्हणजे आम्ही प्रज्वल सर म्हणायचे का? 🙄
प्रज्वल : नाही गं नेहा !!हे सर वगैरे introduction पुरतं असतं गं.... बाकी काय आम्ही पण तर विद्यार्थीच ना....
अनुया : चल येतो आम्ही....
अनुया आणि नेहा कॅन्टीन मध्ये गेल्या... तिथे सायली गीतिका अंजली आणि यास्मिन या दोघींची वाट पहात बसलेल्या होत्या...
सायली : काय गं काय बोलले दुबे सर??
अनुया : काही नाही गं प्रज्वल त्या दिवशी माझ्यावर चिडला होता ना तीच समजूत काढत होते...
गीतिका : पण प्रज्वलने त्याच दिवशी माफी मागितली होती ना....
नेहाने अंजली आणि यास्मिनच्या नकळत गीतिकावर डोळे😳 वटारले व आताच काही बोलू नको असे खुणावले 🤫
अंजली : चला गं पोरींनो लवकर काहीतरी ऑर्डर करा.. लेक्चरची वेळ होत आहे...
नाश्ता करून मुली लेक्चर अटेंड करायला गेल्या....
विकी : आजकाल आपल्या क्लास मधल्या मुली जास्तच शहाण्या झाल्या आहेत🙄... सिनियर मुलांसोबत तास न तास गप्पा मारत आहेत...
नेहा :😡 ए विकी !!तू तुझं काम कर ना.... उगाचच आमच्या नादी कशाला लागतोस....
विकी : मी काय तुमचे नाव घेऊन बोललो का?? चोराच्या मनात चांदणे त्याला मी काय करणार??
सायली : नेहा !! जाऊदे गं मुर्खांच्या नादी लागत नसतात....
कॉलेज सुटले...आज जरा अभ्यासाचे विषय झाल्यामुळे कुठला शिक्षक कसा शिकवतो... कुणाचे किती समजले यावर गप्पा चालू होत्या....
रूमवर आल्यावर आता फक्त या चौघी सोबत होत्या...
गीतिका : नेहा !! बोल आता त्या प्रज्वलने कशासाठी बोलावले होते...
नेहा आणि अनुया ने प्रज्वल आणि दुबे सरांसोबत काय बोलणे झाले आली सरांनी काय वॉर्निंग दिली हे सायली आणि गीतिकाला सांगितले...
नेहा :सायली आणि गीतिका!! आपल्याला हा प्रकार एकदम गोपनीय ठेवायचा आहे... इव्हन अंजली आणि यास्मिनला देखील हे सांगायचे नाहीये....
गीतिका :अच्छा, म्हणून मला तू मघाशी खुणावले?? ....
नेहा :हो... पण मी हा फोटो डिलीट करणार नाही. माझ्या सिक्रेट app मध्ये जपून ठेवणार आहे. जी की फक्त मलाच ओपन करता येईल..
अनुया : as you wish... फक्त गोपनीयता बाळगा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही....
आता चौघीही बऱ्यापैकी कॉलेजमध्ये रूळल्या होत्या.... चौघीही सतत सोबत रहात असल्यामुळे त्यांना होम सीकनेस जरा कमी जाणवत होता.
या उलट यास्मिनचे होते ती दर पंधरा दिवसाला ती घरी जात असे.
अश्याच एका संध्याकाळी या चारही मैत्रिणी बाजारात गेल्या.त्यांना काही आवश्यक ती स्टेशनरी आणि काही आवश्यक ते साहित्य खरेदी करायचे होते.
खरेदी करता करता चौघी जणी एका अनोळखी बोळीमध्ये शिरल्या. एकमेकींच्या गप्पा आणि गोंधळात आपण कुठल्या चुकीच्या एरियामध्ये घुसलो हे त्यांच्या लक्षातच आले नाही.
थोडं पुढे गेल्यावर नेहाची नजर सहज वर गेली...
नेहा : अगं अनुया !!😳 हे लोकं आपल्याकडे कसल्या घाणेरड्या नजरेने बघत आहेत बघ...
अनुया : अरे हो की?? त्या स्त्रिया बघ कसल्या तयार होऊन बाहेर उभ्या आहेत ना? किती भडक मेक अप?? 🤔
सायली : ओ माय गॉड आपण चुकून रेड लाईट एरियामध्ये आलो आहोत की काय?? 😳
ते ऐकून चौघींची भीतीने गाळणच उडाली
गीतिका : काय?? 😭
नेहा : गीतिका !!प्लीज रडू नकोस... आपण आल्या पावली परत जाऊ... मला त्या दिव्यानी सांगितले होते की चुकून या साईडला जाऊ नका.. ते ह्या कारणामुळे....
हे तूम्ही ईथे काय करताय चला निघा ईथुन... एक भडक मेक अप मध्ये असलेली स्त्री जरा रागातच 😡या चौघींवर ओरडली. जणू काही या चौघींची तिला खूप काळजी होती.
चौघीनी वेळ न दवडता तिथून काढता पाय घेतला आणि त्या बोळीत या पुढे चुकूनही शिरणार नाही याची जणू शपथ घेतली.
चौघीही त्या एरियाच्या बाहेर आल्या खऱ्या पण त्यांची मनं मात्र तिथेच अडकली होती. कारण त्या बोळीच्या बाहेर येताच त्यांना कमालीची अस्वच्छता आणि दुर्गंधी जाणवली.
ज्या रेडलाईट एरियामध्ये आपण गेलो होतो तो किती स्वच्छ होता आणि तिथे वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता. ही गोष्ट त्यांना मान्य करावीच लागत होती.
सायली : बापरे सुटलो एकदाचं.... नाहीतर 😳.. या पुढे विचारच करायला नको.
नेहा : मी खरं सांगू का?? मला जर संधी मिळाली तर मला यांच्या आयुष्या बद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
अनुया : नेहा मॅम !!अजून आपले शिक्षण बाकी आहे.... आपल्या आई वडिलांना जर असं काही कळालं तर आपले पुढचे शिक्षण बंद होईल....
गीतिका : चला लवकर....आपल्याला उशीर झाला तर हॉस्टेलचे गेट बंद होईल... आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण चुकून रेडलाईट एरियामध्ये गेलो होतो हे अंजली आणि यास्मिनला देखील कळता कामा नये....
क्रमश :
भाग 9 वाचण्यासाठी निळ्या लाईन वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या