नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...............................................................................
"धुंदी प्रेमाची "
गीतिका : बापरे कसला डेंजर अनुभव होता तो😳. काय त्या किळसवाण्या नजरा😥... बापरे मला तर अजूनही खूप भीती😱 वाटत आहे.
सायली : माझे तर पाय अजूनही थरथरत आहेत.
नेहा : त्यात काय ईतकं घाबरायचं?? 🤔आता आपण सुखरूप बाहेर पडलो ना. खरं सांगावं तर मला तर खूप उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची....
अनुया :नेहा !!त्याची काय गरज आहे?? चला लवकर ती बस लागली आहे.. आपल्या कॉलेज कडे जाणारी...
सगळ्या बसस्टॉप वर पळाल्या. त्यांना पळताना पाहून बस ड्राईव्हरने बस थोडी जास्त वेळ थांबवली. चौघीही बस मध्ये चढल्या आणि चौघीनींही एक सुस्कारा सोडला.
आता थोडी भीती आणि असुरक्षितता कमी झाली.
थोडया वेळात चौघीही हॉस्टेलच्या गेट जवळ पोहोचल्या. गेट लाऊन घेण्याची वेळ झालीच होती तितक्यात त्या चौघीनी हॉस्टेलमध्ये प्रवेश केला.
अनुया : सुटलो एकदाचं, सर्व काही सुरळीत झाले.
सायली :नाही तर काय?? नुसती धडकी भरली होती..
गीतिका : खरंच आता समजत आहे.. आपल्याला हॉस्टेल मध्ये राहणं म्हणजे नुसतेच शिकण्यासाठी राहणे नव्हे तर आई वडिलांशिवाय आपण कसे सर्वच मॅनेज करतो आलेल्या संकटाना आपण कसे तोंड देतो. या साठी आहे.
नेहा :यार, तूम्ही फारच घाबरता... काय वेगळं होतं त्यात... माणसासारखी माणसे तर होती ती... परिस्थितीमुळे वाम मार्गाला लागलेली.. मला जर चान्स मिळाला तर मला नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून घायला आवडेल😊.
अनुया : ओ समाजसेविका मॅडम !! आधी आपलं शिक्षण पूर्ण करूया... मग जाणून घ्या तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे ते.
सायली : माझे तर स्पष्ट मत आहे. आपल्याला ईथे आपल्या आईवडिलांनी कश्यासाठी ठेवले आहे. आपल्या शिक्षणासाठी. त्यात काही व्यत्यय नको..
मी सांगते नेहा !!माझ्या कुटुंबातील हॉस्टेल मध्ये राहणारी मी एकमेव मुलगी आहे.
मला जेव्हा हॉस्टेलला ठेवले गेले तेव्हा माझ्या आईवडिलांना बऱ्याच नातेवाईकांना तोंड द्यावे लागले. पण माझ्या आईवडिलांनी देखील कडक शब्दात सुनावले.माझ्यासाठी ते ठामपणे उभे राहीले.
आता मला त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. आणि हे समाजसेवा वगैरे जेव्हा आपण जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहू तेव्हा नक्की करू...
गीतिका : हो सायली तू एकदम बरोबर बोललीस आणि अजून एक... आपण सोबत कुठलाही खर्च केला तर तो वाटून घ्यायचा मग ती अनुया का असेना...
अनुया : हो हो.... मी थोडीच कमवते.... माझ्या बाबांचे पैसे आहेत ते...
नेहा :अगदी बरोबर👍... कारण सगळ्यात जास्त भांडण पैश्याच्या कारणामुळे होतात... आणि सायली !!मला तूझी समाजसेवेची गोष्ट पटली बरं का?? मी यावर नक्कीच विचार करेन.
हे काय?? 🤔ओहो डायरी?? 📔कुणाची डायरी आहे ही... काहीतरी लिहिलेलं दिसत आहे....
नेहा !! प्लीज दे ती डायरी📔 ईकडे... असं कुणाचं काही पर्सनल वाचत नसतात... अनुया नेहाच्या मागे पळाली...
नेहाने डायरी उंच हातात पकडली आणि ईकडे तिकडे पळू लागली.
अनुया नेहावर जाम चिडली 😡... नेहा !!बस कर बरं, दे ती डायरी ईकडे....
नेहा : बापरे 😳अनुया !!किती तो राग😡.... नाही वाचत तूझी डायरी.... हे घे....
थँक्स... म्हणून अनुयाने तीची डायरी कुलूप असलेल्या बॅग मध्ये ठेऊन दिली.
नेहा : काय गं अनुया !!ईतकं काय चिडायला झालं ? तसं तर आम्हाला सगळं काही माहिती आहे की..
अनुया : नेहा !! हो तुम्हा तिघीना सगळं काही माहिती आहे. तरीही.... मला ईतकंच कळतं की आपण कुणाची खाजगी डायरी आणि खाजगी पत्रे कधीच वाचायची नाही....
नेहा : बरं!! या पुढे लक्षात ठेवीन मी....
तितक्यात गीतिकाचा 📳फोन वाजला... फोन 📳प्रायव्हेट नंबर वरून आला होता...
हॅलो गीतू....
गीतिका : हॅलो कोण बोलत आहे??
गीतू मी तूझा फॅन....
गीतिका :😳काय?? कोण बोलत आहेस?? अन हे फॅन वॅन काय नाटक लावले आहे....
गीतू.. माझी होशील का गं.. एक विकृत असा आवाज एका किळसवाण्या पद्धतीने गीतिकाला विचारत होता ....
सायली : गीतिका !!एवढं घाबरायला काय झाले?? आन बघू तो फोन📳 ईकडे
सायलीने फोन घेतला....
सायली : हॅलो कोण बोलत आहे??
ए सायली !!माझ्या गीतूला फोन दे जास्त नाटकं करू नकोस...
सायली :😳 माझं नाव याला कसं माहिती.... माझा आवाज?? बापरे डेंजर....
सायली : गीतिका !!फोन नंबर ब्लॉक कर... जो कुणी आहे तो खूप डेंजर आहे... त्याने चक्क आवाजावरून माझे नाव ओळखले....
घाबरून गीतिकाने तो नंबर ब्लॉक केला.....
अनुया : काय गं सायली !!आणि गीतिका !! कोण होतं फोनवर तुम्हाला ईतका घाम का फुटला आहे??
सायली आणि गीतिकाने फोनचा प्रकार सांगितला....
नेहा : गीतिका आणि सायली!!हा जो कुणी आहे चांगला मवाली दिसतोय.... याला नुसतं घाबरून चालणार नाही... कारण आज तूम्ही एक नंबर ब्लॉक केला उद्या तो दुसऱ्या नंबर वरून फोन📳 करेन.
गीतिका : नेहा !!यार घाबरवू नकोस ना....
नेहा : गीतिका !! अगं असं घाबरून कसं चालेल... आपल्याला आता जर त्याने परत असं काही केलं तर काय करायचे हे ठरवावे लागेल....
अनुया : नेहा !! मला तुझं म्हणणं पटतंय पण हा उगाचच issue होणार नाही का??
नेहा : issue?? गीतिका मला सांग हा तूझा फोन नंबर कुणाकुणाजवळ आहे....
गीतिका : मम्मी, पप्पा आणि भैया.... बस बाकी तुम्हा तिघींकडे...
नेहा : तरी त्या व्यक्तीला तूझा नंबर मिळाला बरोबर??
गीतिका : हो..
नेहा : आणि त्याने सायलीचा आवाज देखील ओळखला....
गीतिका :हो....
नेहा : म्हणजे ही व्यक्ती तुम्हा दोघीना चांगली ओळखते....
गीतिका :हो....
नेहा : म्हणूनच मला वाटते की आपण ही गोष्ट आपल्या आईवडिलांना आणि ईथे कुणी वरिष्ठ शिक्षकाच्या कानावर घालायला हवी..... गीतिका !!जर समजा त्याने पुन्हा फोन केला तर माझ्या किंवा अनुयाच्या हातात फोन दे... तो आम्हाला देखील ओळखतो का ते बघू.....
गीतिका : बापरे 😳आता तर मला कुठलाही फोन 📳नको...
सायली : हो, मला तर खूप डेंजर व्यक्ती वाटली ती.....
बरं जाऊदे विषय बदला.... आपल्याला mathmatics चे होमवर्क दिले आहेत ते करू.....
थोडंसं सावरून का होईना चौघीजणी अभ्यासाला लागल्या.
रोहन आणि प्रज्वलची दाट मैत्री व्हायला लागली. सिनियर ज्युनियर असा फरक आता त्यांच्यामध्ये उरला नव्हता.
प्रज्वल रोहनला वेळोवेळी मार्गदर्शन करत असे. अवघड विषय सोप्पा कसा करायचा याच्या ट्रिक्स सांगत असे.
असच समजावून सांगताना प्रज्वलचे रोहनच्या वहीच्या शेवटच्या पानाकडे लक्ष गेलं.
तिथे त्याने कुणाचे तरी नाव लिहिलेले आणि खोडलेले दिसले.
प्रज्वलची त्या पानावर नजर जाताच रोहनने त्याची वही लपवण्याचा प्रयत्न केला...
प्रज्वल : काय रोहन !!कुणाचे नाव लिहिलेय??
रोहन : क क कुणाचे नाही.... बस ते असंच time पास....
प्रज्वल :" शाहरुख खान "सारखं काय बोलतोस?? तरी कुणाचं नाव??
रोहन : जाऊदे ना प्रज्वल.... nothing serious.....
प्रज्वल : तरी... हा आता लक्षात आलं हे तू F L A M E S
केलंस ना..
रोहनने लाजून मान खाली घातली....
प्रज्वल : अरे लाजतोय काय? कोण जाने उद्या मी तूला मदत करेन.....
रोहन : सायली 😍
प्रज्वल : सायली... म्हणजे त्या चौकडी 🤷♂️मधली??
रोहन : चौकडी?? 🤔
प्रज्वल : काही नाही रे... त्या कळंबोलीच्या चौघीना आम्ही सिनियर्स चांडाळ चौकडी म्हणतो🤭🤭. सुरुवातीपासून जरा जास्तच ऍक्टिव्ह आहेत... म्हणून....
रोहन :अच्छा !!असं आहे तर....
प्रज्वल : सायलीला माहिती आहे का?
रोहन : क क काय?? नाही... बिलकुल नाही...
प्रज्वल : पुन्हा शाहरुख 🤦♂️... काय रे रोहन किती घाबरतोस...
रोहन : नको बाबा प्रज्वल !!मी या फंदातच पडत नाही... उगाचच तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नसले तर....
टॉपिक चेंज.... तो विकी आपल्या रूमकडे येत आहे... खिडकीतून बघून प्रज्वल म्हणाला....
क्रमश :
भाग 10 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या लाईन वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या