"असं असावं सासर "

स्विमिंग चॅम्पियन अश्विनीच्या आयुष्यात आता आमूलाग्र बदलाव झाला होता..... कारणच तसे होते तीचा नुकताच अमित सोबत विवाह झाला होता.

अश्विनी आता नवीन संसारात बऱ्यापैकी रुळली होती... तीचा स्वभाव म्हणजे ती अगदीच मिळून मिसळून राहणारी एकदम आज्ञाधारक कधीही कुणाचे मन न दुखावणारी अशी होती.... 

अश्विनीच्या अश्या लाघवी स्वभावामुळे संपूर्ण नातेवाईकांमध्ये ती चांगली सुन म्हणून प्रसिद्ध झाली होती... 

पण या सगळ्यामध्ये तीचा स्वतःचा स्पोर्ट्सक्लब काढण्याचे स्वप्न मात्र हवेतच विरून गेले होते... त्याला मुख्य कारण म्हणजे ती ज्या शहरात रहात होती त्या शहरात मुलींना घराबाहेर पडणे म्हणजे अगदीच वाईट समजले जाई....कारण ते एक छोटेसे शहर होते... तेथील लोक मागासलेले होते आणि त्यातल्या त्यात अश्विनी तर त्या शहरातील एक सुनबाई होती.... 

या कारणामुळे कधी कधी ती हताश रहात असे.... अचानक एक दिवस त्या शहरात नवीन स्विमिंग पूल उभारला आहे अशी जाहिरात अश्विनीच्या नजरेस पडली.... 

अश्विनीला खूप आनंद झाला 😊

अश्विनी : अमित !! मला ह्या पूल वर जायचे आहे... तू त्या स्विमिंग पूल च्या मालकाला माझ्यासाठी वेळ विचारून घेतो का प्लीज?? 

अमित : अगं अश्विनी !! मला नाही वाटत की त्यांनी लेडीज साठी काही वेळ ठरवली असेल तरी तुझ्यासमोर मी एकदा त्यांना फोन लाऊन बघतो.... 

अश्विनी :हं?? 

अमितने फोन लावून विचारलं.... उत्तर त्याला जे अपेक्षित होते तेच झालं.... 

अश्विनी मात्र पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्याप्रमाणे कासावीस झाली होती... आपण ईतके स्विमिंग चॅम्पियन असून  काहीच करू शकत नव्हतो याची खंत वाटायला लागली होती .... 

त्या मुळे अश्विनी खूप उदास राहायला लागली.....मनातल्या मनात विचार करायची की हे किती मागासलेले लोकं आहेत.... ह्यांच्या ह्या मागासलेपणा मुळे माझे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही... 

अश्विनीच्या उदासीचे कारण कळून देखील घरातील मंडळी काहीच करू शकत नव्हती..... 

त्यातच अश्विनीचा बर्थडे आला.... अमितने तिच्या बर्थडेच्या दिवशी ग्रँड सेलेब्रेशन करायचे ठरवले.... पण अश्विनीच्या सासऱ्याने त्या सेलेब्रेशन साठी विरोध केला... 

अमित देखील त्याच्या बाबांच्या अश्या वागण्याने दुःखी झाला...  अश्विनीच्या स्वप्नांसाठी आता हे शहर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही असे त्याला वाटायला लागले... 

शेवटी छोटं का होईना आम्ही दोघेच अश्विनीचं बर्थडे सेलेब्रेशन करू म्हणजे निदान अश्विनी तरी खूष होईल असं समजून अमितने अश्विनीला आवडणारा ब्लॅकफ़ॉरेस्ट केक घरी नेला.... अश्विनी तो केक कापणार तितक्यात तिच्या सासर्यांचा तिला फोन आला.... 

अश्विनीचे सासरे : अश्विनी बेटा !!तू अमित ला घेऊन ताबडतोब आपल्या शहराच्या महादेव मंदिराजवळ या... मी ईथे चांगलाच अडकलो आहे.... 

अश्विनी आणि अमित घाबरतच महादेवाच्या मंदिराजवळ गेले.... बघतात तर काय अश्विनीचे सासू सासरे आई वडील आणि जवळपासचे सगळेच नातेवाईक आणि शेजारी दिसत होते.... एका रूमच्या दरवाज्याला रिबीन लावलेली होती आणि अश्विनीच्या सासऱ्याच्या हातात कैची.... ती कैची अश्विनीला देत तीचे सासरे तिला म्हणाले... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा... रूम मधून आत गेल्यावर अश्विनीला भव्य स्पोर्ट्स क्लब दिसला😳.... आणि समोर स्विमिंग पूल😳.... अश्विनीचा तर आनंद😊💃💃 गगनात मावेनासा झाला होता....

अश्विनी लागलीच सासऱ्यांच्या पाया पडली.... 

अश्विनीचे सासरे : बेटा अश्विनी !! तूझ्या बाबांना मी वचन दिले होते की मी अश्विनीला मुलीसारखी नाही मुलगी म्हणून वागवेल..... 

अमित : सॉरी बाबा !! तूम्ही ग्रँड सेलेब्रेशन नाही म्हटल्यावर तूमच्या बद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता.... 

अश्विनीचे सासरे : पण मग तुम्हाला सरप्राईज कसे मिळाले असते आणि आज जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर झळकत आहे तो मला कसाकाय बघायला मिळाला असता....
शेवटी अश्विनी देखील म्हणायला लागली सासर असावं तर असं असावं 
समाप्त 

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या