"अनामिका "

अनामिकाची तिशी ओलांडली होती. तरी देखील ती लग्नासाठी तयार होत नव्हती. 

अनामिका लग्नासाठी का नकार देत आहे याचं एकही स्पष्ट कारण तिच्या आईवडिलांसमोर येत नव्हते... 

आतापर्यंत अनामिकाच्या आईवडिलांनी तीचे खूप लाड केलेले होते. ती जे म्हणेल ते ऐकत होते. पण आता मात्र हद्द झाली होती... 

अनामिकाच्या आईने एका चांगल्या स्थळासाठी तिला तयार केले... परंतु ऐनवेळी त्या मुलाला फोन📳 करून अनामिकाने मला लग्न करायचे नाही असे क्लिअर सांगून दिले. 

अनामिकाच्या आईवडिलांना मात्र अनामिकाच्या अश्या वागण्याचे गूढ कळतच नव्हते.... 

अनामिकाला दुसरं कुणी आवडत असेल तर त्या मुलासोबत लग्न लावून देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली होती...

पण अनामिकाचे तसेही काही नव्हते. तिच्या आईवडिलांनी घाबरून जाऊन तिच्या सर्व शारीरिक तपासण्या देखील करून घेतल्या. त्या सगळ्या नॉर्मल होत्या मग तरी देखील अनामिका लग्नाला नकार देत आहे हे थोडं विक्षिप्त वाटत होतं.....

अनामिकाच्या नातेवाईकांनी अनामिकाबद्दल काही बाही अफ़वा पसरवण्यास सुरुवात केली..... 

कुणी तीचे बाहेर अफेअर आहे असं म्हणत... तर कुणी तिच्या शरीर यष्टीवर  प्रश्नचीन्ह उठवत.... 

 या नातेवाईकांच्या अश्या प्रश्नांना तोंड मात्र अनामिकाच्या आईवडीलांना द्यावे लागे... त्या मुळे आता अनामिका आणि तिच्या आईवडिलांनी नातेवाईकांमध्ये मिसळणे बंद केले होते... कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाणे बंद केले होते....

अनामिकाच्या आईवडिलांनी शेवटी एका समुपदेशकाला गाठून अनामिका लग्नाला का तयार होत नाही याचे कारण जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यासमोर एक धक्कादायक सत्य समोर आले.... 

अनामिका आणि तीची मैत्रीण स्वरा या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.... स्वरांचं विनोदवर प्रेम होतं... त्या दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या.... नंतर काही दिवसांनी पळून जाऊन लग्न केले.... 

जरी स्वरा पळून गेली होती तरी ती अनामिकाच्या नियमित कॉन्टॅक्ट मध्ये होती... काही दिवस चांगले वागवल्यावर विनोदने आता खरं रूप दाखवायला सुरुवात केली होती... स्वरा त्याच्या तावडीत पूर्णपणे सापडली होती....विनोद तिला खूप मारहाण करायचा... शारीरिक छळ करायचा.... शेवटी एक दिवस त्याला कंटाळून स्वराने आत्महत्या केली होती.... 

जेव्हा अनामिकाला समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीने स्वराचे यात चुकले होते, त्या मुळे तिच्यासोबत असे वाईट घडले असे सांगितल्यावर...

अनामिकाने तिच्या मामेबहिण आरतीचे उदाहरण समुपदेशकास दिले... आरतीचा विवाह अगदीच रीतसर झाला होता...तरी देखील आरतीचा नवरा सतीश खूप खराब निघाला... तिला तर मारहाण, छळ आणि सासुरवास होत होता.... त्याला कंटाळून जाऊन आरतीने देखील असेच टोकाचे पाऊल उचलले होते.....

ईतकेच काय अनामिकाचे वडील देखील तिच्या आईला बऱ्याच वेळेस पिऊन मारहाण करत असत.... त्या गोष्टीचा परिणाम अनामिकाच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता....

लग्न म्हणजे हे आयुष्य उध्वस्त होण्याचे एक कारण आहे हे तिच्या मनात पक्क ठसले होते....

 समुपदेशकाला आता अनामिकाच्या आईवडिलांचे देखील समुपदेशन करावे लागेल याची खात्री पटली होती.... 

समुपदेशकाने मग अनामिकाच्या आईवडिलांचे देखील समुपदेशन केले... 
अनामिकाच्या आईवडिलांना अनामिकाची भीती आता समजली होती.... 
अनामिकाच्या नातेवाईकांमधील चांगली उदाहरणं असतील अश्या नातेवाईकांसोबत... अनामिकाची भेट घडवून आणण्याचे काम तिच्या आईवडिल करायला लागले ..... 

तरी देखील नियमित समुपदेशन करून अनामिकाला तीचे मतपरिवर्तन करण्यासाठी जवळ जवळ एक वर्ष गेलं....

 मतपरिवर्तन झाल्यावर देखील तिच्या वयामुळे वरसंशोधन करणे देखील खूप अवघड गेले.... 

शेवटी अनामिकाचे लग्न झाले.....तिच्या नशिबाने तिला तिच्या मनासारखे चांगले सासर मिळाले... पण विचार करा हेच तिला काही कॉम्प्रोमाइज करावे लागले असते तर.... 

वाढत्या वयात आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींचा कुणाच्याही मनावर किती खोलवर परिणाम होऊ शकतो... निदान स्वतःच्या घरी चांगले वातावरण असेल तर असं काही विपरीत घडणार नाही.

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या