"अपघात शाप की वरदान "

खूप प्रयत्न केल्यावर विनायकला आता कुठे कायमस्वरूपी नौकरी लागली होती. ती पण junior क्लार्क खरं तर त्याचे शिक्षण बी.ए., एम.ए, बी एड झालेलं होतं.(भाषा मराठी. )


विनायक चे आईवडील शेती करत असत.अगदीच दीड एकर जमीन ती पण कोरडवाहू.त्यावर कसे बसे खाऊन पिऊन घर चालत असे.

विनायक हुशार असल्याने तो शिकत गेला.घरच्यांनाही वाटायचं शिकून मोठा साहेब होईल.पण शिक्षणानंतर त्याला नौकरीच मिळेना.

मामाची मुलगी (छाया) सांगून आली जेमतेम दहावी शिकलेली आणि विनायकच्या आईवडिलांनी त्याचे लग्न लावून दिले.आता जबाबदारी वाढली.मग ज्या सरकारी नौकरीसाठी जागा निघतील तिथे तो फॉर्म भरू लागला. शिपायाच्या नौकरी साठी देखील अर्ज केला.

मग एका ठिकाणी जिल्हा परिषदेत जुनिअर क्लार्क च्या जागा निघाल्या.त्याला योगायोगाने मराठी टायपिंग येत होतं. त्याच्या जोरावर त्याला नौकरी मिळाली. 

आता त्याचा सुखाचा संसार सुरु झाला.नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली.नौकरी लागून वर्ष झालं होतं. 
चला आज आपण बाहेर जेवायला जाऊ आज मला नौकरीला एक वर्ष झाले आहे.

छाया पण आनंदाने तयार झाली. दोघेही ऑटोने हॉटेल कडे जायला निघाले.हॉटेल जवळ गेल्यावर हॉटेलच्या विरुद्ध रस्त्यावर ऑटो वाल्याने ऑटो थांबवला.आता दोघांनाही रस्ता ओलांडावा लागणार होता.दोघांनी एकमेकांचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागले.तितक्यात एक वेगवान ट्रक त्यांच्या दिशेने येऊ लागला. त्या ट्रक च्या वेगाचा त्यांना अंदाजा आला नाही.आता आपलं काही खरं नाही याची विनायकला चाहूल लागली. त्याने वेळ न दवडता छायाला समोर ढकलून दिले व एकदम काय झाले त्याला समजलेच नाही.विनायकला अपघात झालेला होता.तो बेशुद्ध पडला.छाया ला नुसते खरचटले होते. तिने लागलीच बाजूला असलेल्या ऑटोला विनवणी करत विनायकला सरकारी दवाखान्यात नेले.विनायकवर लागलीच उपचार सुरु झाले. 

विनायक शुद्धीवर आला तेव्हा त्याचे धाबे दणाणले.त्याचे दोन्ही पाय गुढघ्यापासून त्याने अपघातात गमावले होते.ते पाहून त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता . त्याला आता जगावेसेच वाटत नव्हते. एक वेळ आत्महत्येचा विचार मनात चमकून गेला. पण करणार कशी? विनायकला हालचाल करायला देखील छायाची मदत लागत होती. विनायकला खूप असह्य वाटत होतं. तसं त्यानं छायाला बोलूनही दाखवलं. 

छाया म्हणाली हा जीव तर तुमच्यामुळेच वाचला ना.आपल्या बाळालाही काही झाले नाही मग तुम्ही असा का विचार करता.होईल सगळं नीट.

छायाचं इतकं सकारात्मक वागणं विनायकला खूप आश्चर्य वाटलं. काही दिवस उपचार झाल्यावर विनायकला घरी आणण्यात आले.

छाया गरोदर असल्याने आता तिला विनायकचे काम करायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. परवडत नसताना देखील त्यांना एक मजूर त्या कामासाठी लावला होता. पगाराचे काही उरलेले पैसे तर उपचारासाठी खर्च झाले होते.कसा बसा आईवडिलांच्या शेतीवर उदरनिर्वाह चालू होता.नौकरी कायमची सुटली.

नववा महिना संपत आला आणि छायाची डिलेव्हरी झाली. कन्यारत्न प्राप्त झाले. सर्वजण खूप खूष झाले. पण विनायक ला आता आपले घर कसे चालणार याचं टेन्शन यायला लागले. 

विनायक आता प्रयत्न करून कसाबसा स्वतःच स्वतः उठायला शिकला होता. आपण आता काय करायचे विनायक सतत विचार करत असे.विचार करत असतानाच त्याला समोर वही आणि पेन दिसले. ती त्याची हिशोबवही होती. त्याने ती वही आणि पेन घेऊन त्याच्या मागच्या भागात काही लेख लिहायला लागला. त्याचे मराठी चांगले होतेच.त्याने अजून काही वह्या मागवल्या आणि लिहायला लागला. 
 विनायकला त्याचा एक मित्र "अर्जुन" भेटायला आला.अपघात झाल्यावर तो प्रथमच त्याला भेटायला आला होता.चहापाणी झाल्यावर निघता निघता अर्जुन विनायकला म्हणाला काही पैश्यांची मदत वगैरे लागली तर सांग. 
विनायक म्हणाला पैसे नको, इथे बस हे माझे लेख वाच, सांग तूला कसे वाटतात ते. आणि त्याचं मला पुस्तक छापायचं आहे.अर्जुनने ते लेख वाचले त्याला खात्री पटली की याचे पुस्तक खूप चालणार.अर्जुनने ते छापले आणि प्रकाशित केले.त्याच्या पुस्तकाला खूप मागणी वाढली.खूप नफा झाला. आता विनायकला पुढे काय करायचे हे सांगण्याची गरज नव्हती. तो एकामागून एक अशी पुस्तके लिहायला लागला. खूप पैसा जवळ आला. आता त्याच्याजवळ स्वयंचलित व्हीलचेअर होती.त्याचं दुसऱ्यांवर अवलंबून राहणं खूप कमी झालं होतं.
आणि काही महिन्यातच विनायकला चांगले दिवस आले. तो गावातील धनाड्य व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. 
Post आवडल्यास like करा.share करायची असल्यास नावासहित share करा. 
©®डॉ सुजाता कुटे. 
.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या