किती तो फाईल्स चा पसारा दोन दिवस मी काय नव्हते काय ऑफिसची अवकळा आणली आहे अनय सरांनी. भरीस भर म्हणून दोन दिवसातच धुळीचे साम्राज्य देखील पसरले होते.
सगळंच कसं लख्ख करून मोहिनीने सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्या. आणि अनय ऑफिसला येण्याची वाट पहात बसली.
खरं तर मोहिनीला अनयचे काम करायला खूप आवडायचं. ती त्याचे काम एकदम मनापासून करायची.अगदी सहाच महीने झाली होती तीने ऑफिस जॉईन करून.पण या सहा महिन्यात ती अनयला काय हवं, काय नको, काय आवडलं काय नाही हे फक्त त्याच्या हालचाली वरून ओळखत असे.
अनयला देखील मोहिनीची खूप सवय झाली होती. आपल्या छोटया छोटया गोष्टींची देखील मोहिनी ईतकी काळजी घेते हे त्याला मनोमन आवडायचं.
अनय ऑफिसला आला. मोहिनीची आणि अनयची नजरा नजर झाली. अनयच्या नजरेतच दोन दिवसांचा विरह किती असह्य झाला आता पुन्हा अशी सुट्टी घेऊ नकोस असे मोहिनीला जाणवत होते.जणू काही तीने देखील नजरेनेच होकार दिला होता.
अनय आणि मोहिनी दोघेही एकमेकांमध्ये मनाने गुंतले होते. पण.... हा पण त्यांच्या दोघांच्याही मध्ये येत होता.
कारण दोघांनाही एक भूतकाळ होता.त्या भूतकाळामध्ये दोघेही जखडले गेले होते. आणि दोघांनाही एकमेकांचा भूतकाळ माहिती नव्हता.
मोहिनी ही एका शहीद सैनिकाची पत्नी होती. लग्नानंतर जेमतेम सहा महीने त्यांचा संसार नंतर सीमेवर बोलावणं आलं आणि त्यातच तो शहीद झाला.
एकुलता एक मुलगा त्याच्या आईवडिलांची जबाबदारी मोहिनीवर पडली.
सुरवातीला सहा महीने कसेबसे काढले. पण आता आर्थिक ताण सुरु झाला. तिघांचा उदरनिर्वाह कसा करायचा?? मोहिनी नौकरीच्या शोधात निघाली. जास्त शिक्षण नसल्याने मोहिनीने पर्सनल सेक्रेटरीची नौकरी पकडली.
सुरुवातीला मोहिनी अगदीच कडक वागायची. अगदीच कामापुरते काम असा व्यवहार ठेवायची. पण एके दिवशी ऑफिस बाहेर पडल्यावर काही वाह्यात मुले मोहिनीला छेडत असताना अनयने त्यांची चांगली खरडपट्टी काढली.त्या मुळे मोहिनी अनय कडे नकळत ओढली गेली होती.
अनयचा भूतकाळ देखील असाच काहीसा होता. अनय विधुर होता.अनय चा विवाह होऊन सहा महीने झाले की त्याच्या पत्नीला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले ते ही अगदीच शेवटच्या स्टेजला. त्यानंतर तीन महीने अविरत तिच्या सेवेत अनय होता. पण नियतीपुढे त्याचे काहीच चालले नाही.
अनयचे त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम होते. तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून तो स्वतःला सावरू शकत नव्हता.तिच्या मृत्यूनंतर तो वर्षभर सैरभैर झाल्यासारखे वागत होता.
पण शेवटी आईवडिलांची जबाबदारी त्या साठी त्याला भानावर यावेच लागले आणि मग स्वतःला कामात व्यस्त करून घेतले. नशिबाने साथ दिली आणि अनय आता शहरातील नामांकित व्यावसायिक बनला होता.
मोहिनीला तीचे सासूसासरे लग्न कर म्हणून तगादा लावत होते तर अनयला त्याचे आईवडील.अश्याच वातावरणात अनय आणि मोहिनीची भेट झालेली.पण दोघांनाही एकमेकांच्या भूतकाळाबद्दल काहीच माहिती नव्हते. अनयला मोहिनी अविवाहित वाटत होती तर मोहिनीला अनय. त्या मुळे स्वतःच्या भावना दोघेही व्यक्त करत नव्हते.
आणि एक दिवस अचानक मोहिनी कामावर असताना तिच्या सासूबाईचा फोन आला. तिच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.शेजाऱ्यांच्या मदतीने मोहिनीच्या सासूबाईने सासऱ्याला हॉस्पिटलला ऍडमिट केले होते.
फोन ऐकताच मोहिनी मात्र जाम घाबरली.. माझ्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे मला जाणे अत्यंत आवश्यक आहे हे अनयला सांगितले.
अनयला सासरे हा शब्द ऐकून खूप मोठा धक्का बसला....मोहिनीने आपल्याला फसवले असं क्षणभर त्याला वाटून देखील गेले.पण तीने कुठे आपल्याला शब्द दिला होता. जाऊदे आता जास्त विचार नको.
मोहिनी :अनय सर !!मी निघू ना??
अनय : नाही 😡... थांब... i mean मी तूला सोडतो.त्यांना कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट केले आहे??
मोहिनीने हॉस्पिटलचा पत्ता सांगितला... अनय आणि मोहिनी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
तिच्या सासऱ्यांना आय सी यू मध्ये ठेवण्यात आलेले होते आणि त्यांची प्रकृती आता स्थीर होती.
आय सी यू बाहेरच मोहिनीच्या सासूबाई बसलेल्या होत्या . मोहिनीला पाहताच ती मोहिनीच्या गळ्यात पडून मनसोक्त रडल्या.
मोहिनी : आई !!काही होणार नाही बाबांना... तूम्ही नका काळजी करू.
थोडे सावरल्यावर मोहिनीने अनयची ओळख करून दिली.
मोहिनी :आई डॉक्टरची केबिन कुठे आहे?? मी एकदा त्यांची भेट घेते... अनय सर !!मी एकदा डॉक्टर कडे जाऊन येते. तुम्हाला उशीर होत असेल तर तूम्ही जाऊ शकता
अनय : मोहिनी !! तू एकदा डॉक्टर शी बोलून घे. मी आईंसोबत थांबतो. तू परत आल्यावर मी निघतो.
मोहिनी : ठीक आहे सर
खूप गुणी आहे माझी सून मला माझ्या मुलाची कमतरता बिलकुलच भासू देत नाही. मोहिनीच्या सासूबाई मोहिनीकडे बघून म्हणाल्या....
अनय : म्हणजे?? तूमचा मुलगा तुमच्याजवळ रहात नाही का??
मोहिनीच्या सासूबाई : तुम्हाला मोहिनीने काहीच सांगितले नाही का? माझा मुलगा वर्षभरापूर्वी बॉर्डर वर शहीद झाला. तेव्हापासून मोहिनीने आमची जबाबदारी उचलली. आम्ही किती म्हणतोय तिला लग्न कर लग्न कर म्हणून पण आमचा विचार करून ती कुठलेच पाऊल उचलत नाहीये.
अनय : काय?? 😳
एकामागे एक असे चित्रविचित्र धक्के अनयला बसत होते. अनय मात्र पुरता गोधळला होता. अचानक काहीतरी आठवल्याचे सोंग करून अनय तिथून निघून गेला.
मोहिनी डॉक्टरशी बोलून तिच्या सासूबाईजवळ आली...
मोहिनी : आई !!अनय सर गेले का??
हो त्यांना काहीतरी अचानक आठवले आणि गेले. बाकी काय म्हणाले डॉक्टर मोहिनीच्या सासूबाई जरा काळजीने म्हणाल्या...
मोहिनी :आई !! डॉक्टर म्हणाले की तुमच्या आई खूप धाडसी आहेत वेळेवरच बाबांना आणले म्हणून सलाईन आणि इंजेक्शनने भागले नाहीतर अँजिओप्लास्टी करावी लागली असती.
बाबांना लवकरच सुट्टी मिळेल.
सुट्टी मिळेपर्यंत मोहिनी काही ऑफिसला गेली नाही.
चार दिवसानंतर मोहिनी बरोबर ऑफिसला गेली.गेल्यावर पहिल्यांदाच ऑफिस मध्ये सगळ्या गोष्टी जागेवर होत्या. नेहमीसारख्या विखुरल्या नव्हत्या. मोहिनीला काहीतरी चुकल्यासारखे वाटले.
गेल्या गेल्या अनयने तिला केबिन मध्ये बोलावले. चार दिवसांच्या विरहानंतर दोघेही एकमेकांना बघत होते. पण आज मात्र मोहिनीला अनयची नजर थोडी वेगळी वाटत होती. नेहमीच नजर चोरून बघणारा अनय मात्र आज वेगळ्याच आत्मविश्वासाने एकटक मोहिनी कडे बघत होता. मोहिनी मात्र तीची नजर चोरत होती.
अनय : मोहिनी !!आलीस आता कसे आहेत तूझे सासरे??
मोहिनी : कालच डिस्चार्ज मिळाला.
अनय : मोहिनी !!आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर एक डिनर ची अपॉइंटमेंट आहे तू पण सोबत येशील.
मोहिनी : ठीक आहे सर !!
ऑफिस सुटल्यावर अनयने मोहिनीला त्याच्या गाडीतून हॉटेलला नेले.
हॉटेल मध्ये फक्त दोघांसाठी एक टेबल बुक केलेला होता.
मोहिनी मात्र पार गोंधळून गेली. जेवणासाठी बसल्यावर अनय मोहिनीला म्हणाला मोहिनी !! माझ्या खाजगी आयुष्याची तू पर्सनल सेक्रेटरी होशील का?
मोहिनी :म्हणजे?? 😳
अनय : मला माझे उर्वरित आयुष्य तुझ्यासोबत काढायचे आहे. तू माझ्या आयुष्याचा भाग होशील का?? माझ्याशी लग्न करशील??
मोहिनी : पण तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये...
अनय : मला सगळं कळालं आहे. पण या उलट तुलाच माझा भूतकाळ माहिती नाहीये. असं म्हणून अनयने त्याचा भूतकाळ मोहिनीला सांगितला.
मोहिनी : ते सगळं खरं आहे पण माझ्यावर माझ्या सासू सासऱ्यांची जबाबदारी आहे.
अनय : या पुढे आपण दोघे मिळून त्यांची जबाबदारी स्वीकारू. मग तर तूझी काही हरकत नसेल ना..
मोहिनीने लाजून होकार दिला 😍😍....
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या