कार्तिकचे त्याच्या आजी आजोबावर खूप प्रेम होते... खरं तर त्याच्या आजी आजोबांना त्यांच्या गावातील घरात राहायला आवडत होते....
पण कार्तिकच्या हट्टापायी कार्तिकच्या आई वडिलांनी अगदीच त्याच्या लहानपणापासून त्यांना शहरात स्वतःजवळ ठेवले होते.....
त्यांनाही वाटायचे की खेडेगावात आपल्या आईवडिलांची काळजी कोण घेणार?? त्या पेक्षा ईथेच शहरात कार्तिकच्या हट्टाचे कारण सांगून त्यांना ठेवलं होतं....
कार्तिकच्या आजी आजोबांना देखील कार्तिकच्या आईवडीलांची काळजी समजत होती म्हणून गावाकडे असलेला ओढा बुद्धीच्या ओझ्याखाली दाबून ठेवला होता.....
त्यातच आता कोरोनाच्या विळ्ख्यामुळे सगळ्यांनाच जास्त करून घरी राहावे लागले.....
कार्तिकचे वय नुकतेच अठरा वर्ष पूर्ण झाले होते ...
कार्तिकचे आईवडील नौकरीमुळे सतत घराबाहेर रहात असल्यामुळे तोच आजी आजोबांच्या सानिध्यात जास्त रहात असे.....
कोरोनाचा जसा जसा प्रादुर्भाव त्यांच्या शहरात झाला तस तसे घरातील सगळेच व्यक्ती घाबरून गेले.....
तश्यातच कार्तिकच्या खास मित्राला कोरोना झाला... त्याच्यामुळे तो अजून बिथरला...
पण त्याच्या मित्राला काहीच त्रास नव्हता... पण लोकांमध्ये पसरू नये म्हणून त्याला ऍडमिट केलं गेलं....
त्या मित्राने स्वतःचा एक व्हिडिओ बनवून डॉक्टरने मला उगाचच ऍडमिट केले आहे... कदाचीत त्यांचे रिपोर्ट ही खोटे असतील हे पहा मला काहीच झाले नाही असं म्हणून त्याने एका चांगल्या चालणाऱ्या सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड केला....
या गोष्टीचा परिणाम कार्तिकच्या मनावर झाला कार्तिकला वाटले हा कोरोना वगैरे काही नाही.....
घराच्या बाहेर पडताना मास्क लावणारा कार्तिक विना मास्क घराच्या बाहेर पडायला लागला... वेळोवेळी सॅनिटायझर वापरणं देखील त्याने बंद केले....सुरुवातीला बाहेरून आल्यावर तो अंघोळ करत असे... त्याचे कपडे साबणाच्या डिटर्जंट मध्ये टाकत असे... पण आता त्याला त्याचाही कंटाळा आला होता.....
पण त्याच्या या वागण्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला.... त्याच्या आजी आजोबांना अचानक ताप सर्दी खोकला आणि धाप लागायला लागली....
आता कार्तिकच्या आजोबांना श्वास घ्यायला खूप त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना लागलीच हॉस्पिटलला घेऊन गेले पण व्यर्थ.... आजोबांचा जीव गेलेला होता.....
आजी देखील फारश्या बऱ्या नव्हत्या त्यांना देखील ऍडमिट केले गेले... covid पॉसिटीव्ह असा रिपोर्ट आल्यावर घरातील सगळ्यांच्या तपासण्या केल्या गेल्या..... सगळ्यांचे रिपोर्ट पॉसिटीव्ह आले....
आता खरी कसरत सुरु झाली....
अती निष्काळजी पणा करून आपले प्रिय आजोबा कार्तिक ने गमावले होते....
आजी देखील खूप सिरीयस होती.... आई वडिलांना येणारा ताप देखील उतरत नव्हता....
त्यांनाही ICU मध्ये ऍडमिट करावं लागलं.... महागडी इंजेक्शन्स द्यावे लागले.....
सगळ्यात कमी त्रास हा कार्तिकला होता......
कार्तिकला त्याच्या अश्या वागण्याच्या पद्धतीचा आता खूप पश्चाताप होत होता....
पण वेळ निघून गेली होती... आणि आता त्याने त्याची प्रिय आजी देखील गमावली होती..... आणि आईवडील जवळ जवळ महिनाभर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट तर नंतरचा एक महिना पूर्ण अशक्तपणा जाणवत होता.... m
ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य असे की आज आपल्या अवती भवती असे कितीतरी कार्तिक वावरत आहेत जे या नियमांचे पालन करत नाहीत...
मी तर म्हणेन फक्त स्वतःसाठी नाही तूम्ही आपल्या प्रिय आप्तांसाठी काळजी घ्या....
आणि काय काळजी घ्यायची आहे हे आज अगदीच चार ते पाच वर्षाच्या मुलाला देखील तोंडपाठ झालेले असेल... म्हणून माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावरच आहे असा विचार ठेऊन जर आपण वागलो तर या मोठया संकटाला तोंड देऊ शकू... ...
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या