आमच्यासारखे आम्हीच (भाग 10)

नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे... 
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................
 
                           " धुंदी प्रेमाची "

प्रज्वल :त्या विकीला काय उठसूट ईकडे यावेसे वाटते रे... 

रोहन : बाकी त्याच्याशी कुणी नीट बोलत नाही ना... 

प्रज्वल : ये विकी ये.... काय म्हणतोस कसं काय येणं केलं?? 

विकी : रोहन !!काय करत आहेस?? 

रोहन : आताच होम वर्क करायला बसणार होतो... 

विकी : अरे बापरे 😳किती सिन्सियर??  

रोहन : मला जास्त मेहनत घ्यावी लागते... मी तुझ्यासारखा टॅलेंटेड नाहीये... 

विकी :😊 मी तर बाबा फक्त परीक्षेच्या आधल्या दिवशी अभ्यास करून पास होतो... 

रोहन :कसं काय येणं केलंस?? 

विकी : मला तुझ्याशी थोडं खाजगी बोलायचे होते... 

प्रज्वल :😂 रोहन !!मी जरा फेरफटका मारून येतो.. तो पर्यंत तूम्ही काय बोलायचे ते बोलून घ्या... 

रोहन :अरे प्रज्वल !!तू कश्यासाठी जातोस थांब आम्हीच बाहेर जातो... 

प्रज्वल : तसं नाही... मलाही बाहेर राऊंड मारायचा आहे.... 

रोहन : बरं ठीक आहे... 

प्रज्वल निघून गेला... जाता जाता हळूच त्याने रोहनला बेस्ट लक "म्हणून खुणावले😉.... 

विकी : रोहन !!तूला माहिती आहे मी सगळ्यापेक्षा वेगळा राहतो म्हणून मी किती हँडसम दिसतो ना? 

रोहन : तूला हे खाजगी बोलायचे होते.... 

विकी : अरे आपल्या क्लासमधल्या मुली फक्त मलाच पाहत असतात... 

विकीचे ते वाक्य ऐकून रोहन हलकेच हसला 😊त्याने विकीला  मुद्दाम चढवायला सुरुवात केली... 

रोहन : हो यार विकी !!मी पण पाहिलं तू वर्गात आला की सगळ्या मुली खूप खूष होतात.... 

 हो ना !!तू पाहिलं ना.... आहेच स्मार्ट मी त्याच्या केसांवरून हात फिरवत विकी म्हणाला... 

रोहन : मग एखाद्या मुलीने प्रपोज वगैरे केले की काय 😉

विकी : नाही रे... मुलींनी मला निवडलं पण मी त्यांच्यापैकी एकाला निवडलं पाहीजे ना.... ती अंजली ती तर नुसतीच माझ्याकडे बघत असते.... आणि ती नेहा माझ्याशी बोलायचा चान्स बघत असते.... आणि ती सायली.... 

सायलीचे नाव घेताच रोहनच्या तळपायाची आग 😡मस्तकात गेली.... 

रोहन :ए विकी !!बस कर तूझ्या फुशारक्या....

विकी :फुशारक्या नाही रे... खरं सांगतोय मी... 

रोहन : तू निघ ईथुन.... पुन्हा आमच्या रूमवर यायचं नाही... उगाचच फालतूची बडबड करत असतोस.... 

तितक्यात प्रज्वल तिथे आला....

प्रज्वल :काय झाले रोहन तू ईतका का चिडला आहेस? ... 

रोहनने "विकी" काय बडबड करत होता ते एकदम रागाने-😡 प्रज्वलला सांगितले.... 

प्रज्वल : ए विकी !! मला असली फालतू बडबड माझ्या रूमवर चालणार नाही... आणि एक गोष्ट लक्षात ठेव तूला  मुलींबद्दल असलं काही बोलण्याची गरज नाही... तू विनाकारण मुलींना बदनाम करत आहेस.... 

विकी : बदनामी आणि मी... मी खरं तेच बोलतोय... 

रोहन :प्रज्वल!! तो सर्किट आहे रे.... त्याला इथून जायला सांग 😡

प्रज्वल :विकी !! प्लीज 😡... 

दोघेही चिडलेले बघून विकी तिथून सटकला.... 

दुबे सरांनी फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी काय घडले हे प्रिन्सिपॉल आणि कॉलेज कमिटी समोर फोटो दाखवून सांगितले... 

प्रिन्सिपॉल : बापरे 😳आता इथपर्यंत मजल गेली का त्या पोरांची... आता काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल... 

कॉलेज कमिटी मेंबर : ब्लॅक लिस्ट मध्ये टाका... वॉर्निंग लेटर काढा... 

दुबे सर : माफ करा सर, पण या आधी आपण हे बऱ्याचदा केले आहे... आपली कॉलेज कमिटी त्याच्यावर ऍक्शन घ्यायला कमी पडत आहे.... पण सर, अश्याने विश्वास आणि त्याच्या गँगची गुंडागर्दी खूप वाढेल... माझी आपल्या कॉलेज कमिटीला विनंती आहे की यावर काहीतरी मार्ग काढावा.... 

प्रिन्सिपॉल : आपण एक करू शकतो.... विश्वास आणि त्याच्या मित्रांसाठी एक मिटिंग आपल्या शहरातील राजकारणी मंडळी सोबत ठेऊ.... त्यांच्यासोबत चर्चा करू... कदाचीत यातून काही रीतसर मार्ग निघेल.... 

कॉलेज कमिटी मेंबर : ठीक आहे... प्रिन्सिपॉल चा पर्याय मला योग्य वाटत आहे.... मी आपल्या शहरातील राजकारणी मंडळाशी बोलून लवकरात लवकर मिटिंग फिक्स करतो...

दुबे सर : ठीक आहे सर.... 

प्रिन्सिपॉल : कुणाला काही अजून बोलायचे आहे का?? 

दुबे सर : सर !! दरवर्षी प्रमाणे आपल्या कॉलेजच्या संसदेच्या निवडणूका घ्यायच्या आहेत. त्या साधारण कधी असणार आहेत. 

प्रिन्सिपॉल : निवडणुका दरवर्षी प्रमाणे सप्टेंबरच्या शेवटी होतील. पण त्यांचे उमेदवार हे येत्या पंधरा ते वीस दिवसात ठरले पाहीजे.... त्यांना प्रचाराला वेळ नको का द्यायला.... 

दुबे सर : ठीक आहे सर... 

प्रिन्सिपॉल : दुबे सर या साठी तुमच्यासोबत गीतेश सर आणि मोहिनी मॅडमला सोबत घ्या.... अजून जर कुणाला काही बोलायचे नसेल तर आजची मिटिंग ईथेच संपली असे मी जाहीर करतो. 

मिटिंग संपली.... तरी दुबे सर मात्र समाधानी नव्हते.... खरंच या मिटिंग मधून विश्वास विरुद्ध काही पाऊल उचलले जाईल का याची मात्र त्यांना खात्री नव्हती.

 तरीही पहिल्यांदाच या विश्वासच्या विरोधात ते खंबीरपणे उभे राहीले... याला कारण ती नेहा असावी असेच त्यांना मनोमन वाटून गेले. 😊

काय बोल्ड मुलगी आहे नेहा... माझ्या मुलीला देखील मी असंच बोल्ड करणार.... कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी तिला सहन करू नाही देणार... विचार करत करत दुबे सर घरी गेले.   

नेहा :अरे अजून तूम्ही झोपलेल्याच....मी बघ तयार झालेय... उठा लवकर पुन्हा सिनियर्सनी बाथरूम वर अतिक्रमण केलं तर आपल्याला रिकामं मिळायचं नाही... 

अनुया : झोपू दे ना नेहा !!.... काय यार तो मला प्रपोज🤩 करणारच होता की तू मला उठवलं 😒... 

नेहा : तो म्हणजे प्रज्वल का?? 

अनुया :हूं... 

नेहा :अगं मग चांगलं आहे की👍👍... सकाळी पडलेलं स्वप्न खरी होतात म्हणे.... 

अनुया : कसलं काय??  मला नाही वाटत... जाऊदे मी लवकर तयार होते... 

नेहा : तू तयार हो... मी सायली गीतिकाचे काय चालले ते बघून येते.. मी त्यांनाही उठवून आले होते.... 

दुबे सरांनी कॉलेज मध्ये संसदेच्या निवडणुकांबद्दल अनाऊन्स केले. 

नवीन विद्यार्थ्यांना आता या निवडणुकाची उत्सुकता लागली होती. काहीतरी नवीन प्रकार असल्यामुळे सगळीकडे तीच चर्चा चालू होती.

वर्गाच्या बाहेर पडल्या पडल्या ज्युनियर मुलांना सिनियर मुले भेटायला आली. मोठा घोळका तयार झाला.... 

आतापर्यंत कॉलेज मध्ये कधीच पाहिली नाही अशी मुले देखील त्या सिनियर मुलांच्या घोळक्यात होती. त्या पैकीच एक जण म्हणाला....

 फ्रेशर्स पैकी एक मुलगा आणि एक मुलगी आम्हाला उमेदवार म्हणून हवे आहेत जे कुणी इच्छुक असेल त्यांनी आम्हाला उद्या पर्यंत सांगा... मला माझा एक पॅनल तयार करायचा आहे....

मी उमेदवार म्हणून उभा राहतो की... विकी त्याच्या केसांवर हात फिरवून त्या मुलाला म्हणाला.... 

विकीला समोर जाताना पाहून फ्रेशर्स मध्ये एकच हशा पिकला 🤭🤭

ठीक आहे या मुलाचं नाव लिहून घ्या रे... असं म्हणून तो सिनियर मुलांचा घोळका तिथून निघून गेला... पण प्रज्वल तिथेच थांबला.... 

प्रज्वल : अनुया !!

अनुया : काय 😍

प्रज्वल : तू काय विचार केला आहेस?? 

अनुया : 😳कसला?? 

प्रज्वल :अगं हेच आपल्या कॉलेजचे इलेक्शन.... 

अनुया : आताच तर कुठे निवडणुकीचे कळाले आहे... 

प्रज्वल : हे बघ तू किंवा तुमच्या चौकडीतले कुणालाही होकार देऊ नका... 

अनुया : होकार?? म्हणजे?? आणि चौकडी 🤔

प्रज्वल :अगं उमेदवारी साठी म्हणत आहे मी.... आपला एक वेगळा पॅनल उभा राहील....  चौकडी म्हणजे चौघी गं.... 

अनुया :अच्छा !!

रोहन :सायली !!  तूझे काय ठरले.... 

वर्गाबाहेर पहिल्यांदाच रोहन सायलीशी बोलायचा प्रयत्न करत होता... सायलीला देखील त्याचे खूप आश्चर्य वाटले....

सायली :माझे काय ठरले म्हणजे... 

रोहन : अगं प्रज्वलच्या पॅनल मध्ये मी boys representative म्हणून उभा रहात आहे.. तू girls representative म्हणून उभी राहणार आहेस का?? 

सायली : कोण मी?? 🤔 मी नाही...... 

रोहन : बरं बरं असू दे... विचार कर आणि सांग अजून चांगला पंधरा दिवस वेळ आहे विचार करायला..... 

क्रमश :

भाग 11 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या