नमस्कार, आधीच्या कथेचा अनुभव बघता मी आमच्यासारखे आम्हीच ह्या कथेचे भाग दर बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ब्लॉगर वर share करणार आहे...
जेणेकरून आपल्याला वाचनामध्ये खंड पडणार नाही आणि मला लिखाणासाठी तितकाच वेळ मिळेल
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...............................................................................
" धुंदी प्रेमाची, वारे निवडणुकीचे "
चौघीही हॉस्टेल कडे निघाल्या सोबत अंजली आणि यास्मिन देखील होत्या....
यास्मिन : क्या बात है सायली!! वो रोहन तूझे लाईक करता है क्या??
सायली : नही रे यास्मिन !! मुझे ऐसा नही लगता..
यास्मिन : सायली !! पर इतने सारे girls को छोड के उसने खाली तुमसेही पूछा....
सायली : अरे अपने क्लासवाले इंट्रो की दिन वो मेरे पास बैठा था |उसने मेरा इंट्रो दिया इसीलिये उसे मुझसे बात करना comfirtable लगता होगा.. और वैसे भी मै किसी चुनाव के लिये खडी नही रहनेवाली....
अनुया : मुलींनो एक लक्षात घ्या... आपल्या पैकी फक्त एक जणच निवडणुकीला उभे राहील.... जेणेकरून त्या व्यक्तीला आपल्याला व्यवस्थित सपोर्ट करता येईल..
गीतिका :हो अनुया !! मला तुझं म्हणणं पटतंय....
अंजली : मग मी उभी राहू का??
सायली : हो चालेल की...
लंच च्या वेळी मेस मध्ये नुसतीच येणाऱ्या इलेक्शन ची चर्चा होती....
आता वातावरण एकदम खेळीमेळीचे झाले होते.
जेवण करून सगळ्या मैत्रिणी आपल्या रूमवर जाऊन पहुडल्या.
तितक्यात गीतिकाचा फोन📳 वाजला.गीतिकाने नुकतेच डोळे बंद केले होते. न पाहताच तीने फोन उचलला...
तिकडून आवाज आला... गीतू... झाले का जेवण?? ...
गीतू शब्द ऐकताच गीतिकाने खाडकन डोळे उघडले. गीतिका खूप घाबरली आणि म्हणाली कोण बोलतंय...
फोनवर आवाज आला :अग गीतू !!ओळखलं नाही का?? मी, मी तूझा शुभचिंतक... छद्मीपणाने हसून ती व्यक्ती म्हणाली....
गीतिका : क कोण शुभचिंतक??
ती व्यक्ती : हा हा हा.... कळेल कळेल....
आणि फोन कट....
गीतिका फोननंतर खूप घामाघूम झाली होती... फोन नंबर ब्लॉक करून काही फरक पडणार नाही हे आता तिच्या लक्षात आले होते....
सायली : गीतिका !! किती घामाघूम झाली आहेस गं.... कालच्या व्यक्तीचा फोन होता का??
गीतिका : हो सायली !!मला तर आता खूप भीती वाटायला लागली आहे....
नेहा : गीतिका !!सायली !!चला लवकर दोनला पाच मिनिटे कमी आहेत....
अनुया : चला गं नाहीतर उशीर होईल... दुबे सरांचे लेक्चर आहे. उशीर झाला तर समोरची जागा मिळणार नाही...
क्लास मध्ये दुबे सर अजून आलेले नव्हते तितक्यात गीतिकाने आलेल्या फोन बद्दल नेहा आणि अनुयाला सांगितले.
नेहा : बघ गीतिका मी म्हणाले होते ना ब्लॉक करून याचं काही होणार नाही.... आपल्याला आपल्या वरिष्ठांच्या कानावर घालावे लागेल...कदाचित पोलीस कम्प्लेंट सुद्धा....
अनुया : कॉलर आय डी अँपवर काहीच नाव येत नाही का??
गीतिका : काल प्रायव्हेट नंबर म्हणून लिहून आले होते. आज अननोन नंबर म्हणून लिहून आले. 😒
नेहा : शू 🤫....दुबे सर आले आपण हे लेक्चर संपल्यावर त्यांना भेटू आणि या फोन बद्दल सांगू....
दुबे सर आले तरी क्लास मधील मुलांचा गोंधळ चालू होता. वर्गात निवडणुकीबद्दल चर्चा चालू होती...
दुबे सर: my dear students !!जरी आपल्या कॉलेज मध्ये इलेक्शन अनाऊन्स झाले आहे तरी अभ्यासही तितकाच महत्वाचा आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते लेक्चर संपल्यावर विचारा... कारण आपल्याला basics शिकणे जास्त महत्वाचे आहे. 😊
लेक्चर संपल्यावर सगळ्या मुलांनी दुबे सरांना गराडा घातला त्यामुळे गीतिकाचा प्रॉब्लेम सरांना सांगता आला नाही.
अनुया : गीतिका !!आपण रेक्टर मॅमना सांगून बघायचे का??
गीतिका : रेक्टर मॅम आपलं ऐकतील?? मला नाही वाटत..
नेहा : हो तुझं खरं आहे गीतिका !! रेक्टर मॅम कधीच आपल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही... पहिले म्हणतील तूच काहीतरी केलं असेल?? तुझीच काहीतरी चूक असेल... उगाचच कशाला कुणी मागे लागेल....
गीतिका : हो ना आपल्या कुठल्याच गोष्टीला म्हणावं तितकं त्या सपोर्ट करत नाहीत..
नेहा : तूझी परवानगी असेल तर ही गोष्ट मी माझ्या पोलीस मामाला सांगू का?? योगायोगाने कालपासून त्याची ड्युटी सायबर क्राईमला लागली आहे. आपल्याला निदान माहिती तर होईल की असा आगाऊपणा कोण करत आहे??
गीतिका : बापरे 😳.... पोलीस??
नेहा : अगं माझा मामा आहे....मला तो वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो.... बरं तूला ऑड वाटत असेल तर आपण आता नको सांगायला... पण ह्या मुलाने तूला पुन्हा त्रास दिला तर आपल्याला हे पाऊल उचलावे लागेल... अगं अनुया !!कुठे आहेस तूझा फोन 📳वाजत आहे....
अनुया :आले आले अगं बाजूला आपल्या क्लासमेट इलेक्शन बद्दल चर्चा करत होत्या ते ऐकत होते...
नेहा : कुणाचा फोन 📳 आहे??
अनुया : 😳📳 प्रज्वलचा फोन आहे....
नेहा : ओ हो.... 😉
अनुया : नेहा !!🤫 हं बोल प्रज्वल....
प्रज्वल : hi अनुया !!अगं मी या साठी फोन 📳केला होता. तुमचे इलेक्शनचे काय ठरले?? तुमच्या ग्रुप मधून कोण उमेदवार असणार आहे...
अनुया : अंजलीची ईच्छा आहे उमेदवार म्हणून उभी राहण्याची....
प्रज्वल: काय?? अंजली 🤔 ती तर त्या विकीच्या पॅनल मधून उभी आहे.... त्यांनी त्यांच्या पॅनलला नाव पण दिले आहे "जागृती पॅनल "
अनुया : काय?? पण ह्या बाबतीत अंजलीने आम्हाला काहीच सांगितले नाही. तरीच ती दुपारपासून गायब आहे....
प्रज्वल : ये पॉलिटिक्स है मॅडम !!अच्छे अच्छा की फीतरत बदल देता है...
अनुया : खरंच... बरं प्रज्वल ऐक ना अजून आम्ही इलेक्शन बद्दल काहीच ठरवलं नाही... तूला ठरवून संध्याकाळी सांगितले तर चालेल का??
प्रज्वल : हो चालेल की....
अनुया : ठीक आहे मी ठेवते फोन 📳...
गर्ल्स ब्रेकिंग news आहे... फोन ठेऊन अनुया म्हणाली....
नेहा : कसली news... सांग पटकन....
अनुया : अंजली विकीच्या जागृती पॅनल मधून girls representatve साठी उभी रहात आहे... शी कसला विचित्र पॅनल आहे तो... सगळे ते अनोळखी चेहरे... गुंड मवाली सारखे दिसणारे.....
नेहा : अन त्यात तो झेंडू 😂😂 पण ही अंजली.... धोकेबाज निघाली यार....
अनुया : तेच ना.... अंजली असं काही करेल असं वाटलंच नाही...
सायली : अगं दुपारपासून अंजली तर गायब आहेच पण यास्मिन?? ती कुठे गेली.... अंजली सोबत की ती देखील कुठल्या पॅनल मधून उभी राहिली....
नेहा : मला नाही वाटत यास्मिन उमेदवार झाली असेल पण ती कुणासोबत आहे हे सांगणे अवघड आहे.....
अनुया : बरं ते जाऊ द्या.... आपल्यापैकी उमेदवार म्हणून कोण इच्छुक आहे.... मला तर ते शक्य नाही... कारण मी तितकी बोल्ड नाही ...
सायली :आपल्या चौघींमध्ये बोल्ड नेहा आहे.... नेहा काय म्हणतेस?? होणार का गर्ल्स representative??
नेहा : माझी काहीच हरकत नाही पण आपल्या सिनियर्सना ते चालणार आहे का??
अनुया : का नाही चालणार... उलट त्यांना आपल्या चौघींपैकी एक जण पाहीजे...
नेहा :अगं सायली !!तूला तो रोहन विचारत होता की....
सायली : अगं नेहा !! त्या मुलांना काय माहिती.... गर्ल्स representative साठी तूच योग्य आहेस....
नेहा :पण सायली... i think he likes you😉
अनुया : हो... मला पण असं वाटलं....
सायली :तूम्ही उगाचच बाऊ करत आहे.... तसं काहीच नसणार आहे... आणि असलं तरी मला आवडायला पाहीजे ना 🙄....
अनुया : नेहा!! मग प्रज्वलला सांगू....
नेहा :अनुया !!किती ती फोन📳 करण्याची घाई... निमित्त माझे... पण 😇😇
अनुया :😡 जा नाही लावत फोन📳 मी...
नेहा :अरे अनुया !!तू तर रागावलीस.... सॉरी सॉरी लाव त्याला फोन 📳
अनुया : 😊ठीक आहे...
हॅलो प्रज्वल !!नेहा तयार आहे उमेदवार म्हणून.....
प्रज्वल : अनुया !!एकदम वेळेवर फोन केला आहेस बघ... आपल्या पॅनलचं नुकतंच नाव ठरले आहे... श्वास पॅनल....
अनुया :अरे वा छान नाव आहे.... श्वास पॅनल...
प्रज्वल :कॉलेजमध्ये टोटल चार पॅनल तयार झाले आहेत...मस्त मज्जा येणार....
अनुया :अच्छा....
प्रज्वल :चल ठेवतो फोन.... अजून बाकीचे उमेदवार ठरायचे आहेत..... बाय...
अनुया :😍बाय.....
क्रमश :
भाग 12 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
2 टिप्पण्या
Next part kdi post krnr aaht kiti days zale tumhi excitement lavun thevli but next part ajun post nhi kelt
उत्तर द्याहटवाSorry, kahi adchaninmule mala pudhche bhag lavkar post karta nahi aale.
हटवा