नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...................................................................
" वारे निवडणुकीचे "
जागृती पॅनल
श्वास पॅनल
मैत्री पॅनल
नियती पॅनल
असे चार पॅनल तयार झाले होते....
फायनल मधून सगळ्या ब्रॅंचेस मधून केवळ 1 मुलगा आणि मुलगी प्रेसिडेंट साठी उभे राहीले
तर तश्याच पद्धतीने तिसऱ्या वर्षातील 1 मुलगा आणि मुलगी सेक्रेटरी साठी.
दुसऱ्या वर्षातील 1 मुलगा आणि मुलगी खजिनदार म्हणून
तर प्रथम वर्षातील सगळ्या तुकड्यांमधून 1 मुलगा boys representative तर मुलगी girls representative म्हणून उभे राहीले होते.
यातून ज्या पॅनलला सगळ्यात जास्त मते पडतील तो पॅनल निवडून येणार. आणि कॉलेजमध्ये घडणाऱ्या सगळ्या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार असा नियम होता.
आता चार ही पॅनलच्या मिटिंग सुरु झाल्या होत्या.
जागृती पॅनल हा विश्वासचा पॅनल होता. पण विश्वासला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्यामुळे नियमानुसार त्याला उमेदवार म्हणून उभे राहता येत नव्हते.म्हणून त्याने त्याचा मित्र विन्याला उमेदवार म्हणून उभे केले होते. आणि त्या पॅनलचे धमकी वजा प्रचार सुरु झाले.
तसंच मैत्री पॅनल आणि नियती पॅनल चे सुद्धा जोरदार प्रचार सुरु झाले होते.
नेहा : अनुया !!तूझ्या प्रज्वलला सांग ना... जागृती, मैत्री आणि नियती पॅनलने खूप जोरदार प्रचार सुरु केला आहे.
अनुया :नेहा !!" प्रज्वल"... माझा कधीपासून झाला?? पण खरंच गं बाकी पॅनलच्या मिटिंग सुरु झाल्या आहेत...
नेहा : हो ना... आमचं तसं काहीच नाही 😒...अनुया !!अगं नवीन श्वास पॅनल whatsapp group तयार झाला आहे...
अगं आमचा प्रेसिडेंट काही instruction देत आहे.
अनुया बघ ते काय म्हणत आहेत.....
Hi everyone.
मी अमित... आपल्या पॅनलचा प्रेसिडेंटसाठी उभा असलेला उमेदवार.
बाकीच्या तिन्ही पॅनलच्या मिटिंग आणि प्रचार पाहून तुम्हाला असं वाटत असेल की मी अजून काहीच प्रचार सुरु का नाही केला.
तर आता नीट लक्ष द्या.
आपण आताच प्रचार करायचा नाही. भेटायचं देखील नाही. बाकी पॅनलला वाटले पाहीजे की आपला पॅनल म्हणजे एकदम passive पॅनल आहे.
आपली ह्या ग्रुपवरची चर्चा अतिशय गोपनीय राहील. बाकी सारे उमेदवार मला व्यवस्थित माहिती आहेत फक्त नेहा आणि रोहन तूम्ही नवीन उमेदवार आहात. चुकूनही ग्रुप भेदी पणा करायचा नाही.
तिन्ही ग्रुपला वाटलं पाहीजे की आपला पॅनल पण पूर्ण तयार नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण प्रचारच केला नाही तर मग आपला पॅनल निवडून कसा येणार?? 🤔
तर तसे नाही आपण प्रचार करायचा गनिमी काव्याने करायचा पण तो देखील आता नाही....
रोहन :मग कधी??
अमित :सांगतो सांगतो.... फॉर्म वापस घेण्याची तारीख आजपासून बरोबर दहा दिवसांनी आहे. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो जो ग्रुप जास्त उड्या मारतो त्या ग्रुपला विश्वास धमकी देऊन फॉर्म मागे घ्यायला लावतो. त्या साठी कधी कधी तो खऱ्या राजकारणाचा वापर देखील करतो.
आपण जर एकदम passive दिसलो तर विश्वासला वाटेल की त्याला आपल्यापासून काही धोका नाही. मग तो आपल्या नादी लागणार नाही. मी गॅरेंटीने सांगतो विश्वास मैत्री पॅनल आणि नियती पॅनलला फॉर्म मागे घ्यायला लावणार.
आणि आता रोहन आणि नेहासाठी वॉर्निंग.... की आपल्या या मिटिंगची भनक त्या विकी किंवा अंजलीला लागली नाही पाहीजे... कारण एक छोटीशी चूक देखील आपल्याला भारी पडू शकते.
कुणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास विचारू शकता.
आणि शेवटी सगळ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स 👇.
फोन चे ग्रुप नोटिफिकेशन बंद करा..
आपला ग्रुप प्रायव्हेट ठेवा.
मेसेंजर लॉक करून ठेवा...
जेणेकरून कुणाच्याही हातात तुमचा फोन गेला तर त्यांना ते उघडता येणार नाही.
नेहा :😳 बापरे ईतकं जपावं लागणार??
प्रज्वल : हो, कारण विश्वास कसा आहे ते तुम्हाला माहिती नाही...
अमित : चला... मला काय सांगायचे होते ते सांगून झाले. Good night.
नेहा :अनुया !! "अंजली" बघ ना कशी सेल्फिश निघाली ना... आपल्याला कळू न देता त्या विश्वास गुंडाच्या पॅनल मध्ये गेली...
अनुया :अगं नेहा ते एका अर्थाने बरंच झालं.. तुमच्या श्वास पॅनल मध्ये सगळे चांगले लोकं दिसत आहेत... उगाचच ती सेल्फिश अंजली त्यात ऍड झाली असती.
नेहा : अनुया 🤫... अंजली इकडेच येत आहे..
अंजली :hi नेहा !!hi अनुया !!
अनुया :hi अंजली !!
नेहा :hi अंजली !!
अंजली :काय म्हणतोय श्वास पॅनल??
नेहा : श्वास पॅनल 🤔??
अंजली : मला उल्लू नको बनवू गं... मला सगळं माहिती🙄....
नेहा :😳सगळं माहिती... काय सगळं माहिती....
हिला आता काय माहिती झालं असेल🤔. नेहा एकदम विचारात पडली.
अंजली : हेच की तुमचा पॅनल तयार झाला आहे...
नेहा : अगं कसला पॅनल?? .... कुणाची ओळख ना पाळख... काहीच खरं दिसत नाही.... मला तर वाटते की उमेदवार तरी पूर्ण झाले की नाही....
अंजली :असला कसला गं तुमचा पॅनल .... आमचा जागृती पॅनल बघ... आतापर्यंत चार मीटिंगा झाल्या..... एकदम भारी भारी लोकं आहेत त्यात.... बरं झालं विकीने मला विचारलं म्हणून 😊
नेहा : 😳, ग्रेट... मला तर वाटतं तुम्हीच जिंकणार... अगं माझी पण काही ईच्छा नव्हती उमदेवार म्हणून उभे राहण्याची... पण त्या पॅनलला कुणी मिळेना.... मग काय मलाच जबरदस्तीने उमेदवार व्हावे लागले...
अंजली :😂😂😂 जबरदस्तीने... हे मात्र खरं म्हणालीस तू, की जिंकणार तर आमचाच पॅनल....
एका रूम मध्ये इलेक्शन fever चालू होतं तर दुसऱ्या रूम मध्ये शुभचिंतकाने केलेल्या फोन मुळे निर्माण होणारी धास्ती.....
गीतिका आणि सायली दोघीही त्या unknown नंबरच्या कॉल मुळे परेशान झाल्या होत्या. दोघीही कोण असू शकेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सुगावा काहीच लागत नव्हता.
पण एक गोष्ट मात्र नक्की होती की तो जो कुणी होता तो त्यांच्यावर चांगलं पाळत ठेऊन होता. बरोबर त्या हॉस्टेलला असताना फोन करायचा.
कॉलेजच्या वेळा जणू त्याला तंतोतंत माहिती होत्या. यावरून तो याच कॉलेजमधला असेल असा अंदाज बांधता येत होता.
आज तर हद्दच झाली रूमवर असताना आता दुसऱ्यांदा त्याचा फोन वाजला 📳. गीतिका जरा घाबरली. पण आज जरा आवाज चढवयवायचा आणि कोण आहे ते विचारायचं हे तीने ठरवून ठेवले होते.
गीतिकाने फोन उचलला आणि म्हणाली कोण बोलतंय 😡का सारखे सारखे असे लपून फोन करत आहेस?? हिम्मत असेल तर समोर ये ना.
बापरे आज तर स्वारी रागात दिसतेय. 📳बरं बरं मी लवकरच तुझ्या समोर येईल समजला ना.. गीतिकाच्या आव्हानाला उत्तर देत तो बोलला.
गीतिका :लवकरच समोर येशील.... म्हणजे आता तूला माझ्यासमोर यायला काय मनाची तयारी करावी लागणार का?? माझा शुभचिंतक म्हणे... बांगड्या भर हातात.
बांगडया भर हातात हे वाक्य ऐकताच त्याचा पुरुषी अहंकार ठेचला गेला. अस्स का?? 😡होऊन जाऊदे सोक्ष मोक्ष. चार वाजता कॅन्टीन मध्ये ये मी तिथेच असेल. बघू मला ओळखते का??
गीतिकाने थरथरत्या हाताने फोन 📳ठेवला.
सायली : गीतिका !!काय झाले तूला?? तूझ्यात ईतकी हिम्मत आली कुठून?? 🤔सरळ त्याला आव्हानच दिलेस.
गीतिका : सायली !!मला खरंच माहिती नाही अचानक मला काय झाले होते. पण आता खूप भीती वाटत आहे. तो मला काही करणार तर नाही ना?? 🤔 बांगड्या भर म्हणाले तर तो खूप चिडला होता.
सायली :आता तर्क वितर्क करण्यात अर्थ नाही. आपण चौघी जणी जाऊ दुपारी चार वाजता कॅन्टीन मध्ये. बघूयात तर हे महाभाग आहेत तरी कोण?? चल आपण नेहा आणि अनुयाला सांगू.
गीतिका आणि सायली नेहाच्या रूम मध्ये गेल्या. अंजलीला पाहून सायलीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 😡
सायली :अंजली !! आता तू कशाला ईथे आलीस?? जायचे ना त्या तूझ्या जागृती पॅनल मध्ये.
नेहाने अंजलीच्या न कळत डोळे वटारले 😳आणि खुणेनेच सायलीला शांत 🤫राहायला सांगितले.
अंजली : अगं सायली!!तूला नाही कळणार, तसंही तूला राजकारणातलं काय कळतं म्हणा 😏
आता तर सायलीला राग एकदम अनावर😡 झाला. पण पुन्हा नेहाने शांत हो म्हणून खुणावले🙏.
अंजली : माझे बोलणे तुम्हाला आवडलेले दिसत नाहीये. असो मी निघते. मला आमच्या प्रेसिडेंटचा फोन येत आहे 😉...बघा मला किती भाव मिळत आहे....
असं म्हणून अंजली तिथून निघून गेली.
सायली: ही ईथे कशाला आली?? तीने आपल्याला धोका दिल्यापासून पार डोक्यात जात आहे.
नेहा : हे बघ सायली !!असं आता भांडून नाही चालणार.... आणि आपण आता शक्यतोवर तिच्या समोर निवडणुकांचा विषय टाळायचा.... नेहाने त्यांच्या पॅनलचे काय ठरले हे सायलीला सांगितले. आणि कदाचीत अंजली आपल्या पॅनलचे काय चालले याचा अंदाजा घेण्यासाठी ईथे आली असावी.
सायली : एकदम करेक्ट...
तितक्यात गीतिकाचा फोन 📳वाजला...
फोनच्या रिंगटोनने गीतिका एकदम दचकली
क्रमश :
भाग 13 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचायची असल्यास खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या