नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...........................................................................
" वारे निवडणुकीचे "
" चाहूल प्रेमाची "
गीतिकाला एकदम असं दचकतना पाहून नेहा आणि अनुयाला आश्चर्य वाटले....
फोन 📳पाहून गीतिका म्हणाली मम्माचा फोन आहे... गीतिका आणि सायली निश्चिन्त झाल्या.
नेहा :काय गं सायली !!गीतिकाला अजूनही ते फोन📳 येत आहेत का??
अनुया : नेहा!! गीतिकाकडे बघ ना ती फोनवर 📳रडत आहे.
नेहा : अरे हो... अगं होम सीक वाटत असेल तिला.
सायली : गीतिका आणि मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी आलो🙄 पण त्या अंजलीला पाहून माझं डोकंच सरकलं... त्या मुलाचा फोन📳 आला तेव्हा गीतिका एकदम चिडून😡 बोलली, तर तो म्हणाला, की मी चार वाजता कॅन्टीन मध्ये येत आहे. तेव्हा तू मला ओळख....
अनुया :😳 बापरे म्हणजे तो याच कॉलेजचा आहे तर....
तितक्यात गीतिका स्वतःचे डोळे पुसत तिघींजवळ आली...
नेहा : गीतिका !! तूला काकुंशी बोलून आता बरं वाटत आहे का??
हो नेहा !!पण काहीही असो या वीकएंडला मी घरी जाणार.या फोन 📳प्रकाराने मी खूप कंटाळले आहे. आणि गरज पडली तर आई बाबांना सांगून त्या शुभचिंतकाला जेलची हवा दाखवणार....गीतिका तीचे डोळे पुसत म्हणाली.
अनुया :गीतिका !!नको अशी परेशान होऊ.आपण आज चार वाजता सोक्षमोक्ष लावून टाकू....मोहीम नंबर दोन 😉
नेहा :yes, एक दो तीन चार, चारो मिलके साथ चले तो कर दे चमत्कार 😂😂😂
हे वाक्य म्हटले की चौघीना स्फूर्ती आली.....
रोहनला मात्र प्रज्वल वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. रोहनला विश्वासच्या पॅनल बद्दल सगळी माहिती झाली होती.
विश्वासने रोहनला बोलावून घेऊन आधीच धमकावले होते..
खबरदार, जर तू श्वास पॅनल कडून उमेदवार म्हणून उभा राहिलास तर😡....
अशी जोरदार धमकी दिली होती.
धमकी मिळाल्यावर साहजिकच रोहन खूप घाबरला होता. पण प्रज्वलने त्याला हिम्मत दिली.
असंही आपला पॅनल पूर्ण झाला आहे हे विश्वासला दहा दिवसांनी कळेल.नंतर तो आपलं काहीच करू शकणार नाही. तसेही दुबे सर आपला खूप मोठा मॉरल सपोर्ट असणार आहे.याची जाणीव प्रज्वलने रोहनला करून दिली.
चार वाजले, चौघीही जणी कॅन्टीन मध्ये आल्या. कॅन्टीन तर मुलामुलींनी खचाखच भरली होती.
गीतिका : सायली ईतक्या गर्दीत मी त्याला कसा ओळखणार?? मला तर खूप भीती वाटत आहे...
सायली : गीतिका !!घाबरू नकोस गं... आपली मोहीम आहे ना.... ती फक्त आपल्याला फत्ते करायची आहे.. आज फक्त बघुयात कोण आहे ते... मग आपल्याला ठरवता येईल काय ऍक्शन करायची आहे ते....
अनुया : प्रज्वल पण आहे 😍....
नेहा : हो आणि रोहन पण... जाऊदे ठरल्या प्रमाणे आमची काहीच ओळख नाही असं वागायचं आहे... आपण त्या कोपऱ्यात बसूया म्हणजे आपल्याला सगळ्यांना न्याहाळता येईल....
चौघी जणी कोपऱ्यात टेबल ठेवला होता तिथे जाऊन बसल्या...
अनुया मात्र प्रज्वलच्या नकळत त्याच्याकडे अधून मधून कटाक्ष टाकत होती. 😍😍
नेहा : गीतिका !!आता तू त्याला कॉल📳 कर....
गीतिका : अगं त्याचा फोन स्विच ऑफ येत आहे... शी... किती फालतूपणा आहे हा..... एक तर आता हळूहळू कॅन्टीन रिकामे होत आहे.... कसं ओळखणार त्याला...
सायली : तोपर्यंत आपण कॉफी ऑर्डर करू...
सायलीने कॉफी ऑर्डर केली....आणि कॉफी येईपर्यंत चौघीजणी सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना न्याहाळत होत्या. पण संशयास्पद असं काहीच वाटत नव्हतं... एक एक करून सगळे जण कॅन्टीनच्या बाहेर पडले. आता कॅन्टीनमध्ये ह्या फक्त चौघी होत्या.
कॉफी आली... चौघीनींही कॉफी संपवली....
नेहा :आता काही तो येत नाही....
असा कसा नाही येणार.... कॉफीचे रिकामे कप घेऊन जाणारा मुलगा बोलला... त्याने स्वतःचा चेहरा ट्रे ने झाकून घेतला होता...
गीतिका : कोण तू??
त्या मुलाने ट्रे खाली करत स्वतःचा चेहरा दाखवला....
गीतिका त्याला बघून तडक उभी राहिली 😳तू 😡
सायली देखील त्याला बघतच राहिली आणि म्हणाली तू... तू ईथे कसकाय आला आहेस😡...??
गीतिका : माझी चापट विसरलास वाटते... माझ्या हातचा पुन्हा एकदा मार खायचा का 😡
चापट आवडली म्हणून तर इथपर्यंत आलो... गाल चोळत तो मुलगा म्हणाला😏....
नेहा : गीतिका आणि सायली... जाऊ द्या त्याच्याशी नको वाद घालायला आपण या कॅन्टीनच्या मालकाला याच्याबद्दल सांगू.....
बघा बघा सांगून बघा😏... कुत्सितपणे 😁हसून जणू काही त्याने एक प्रकारे आव्हानच दिले होते.
गीतिका : Excuse me... uncle हा कॉफीचे मग घेऊन आलेला मुलगा मला पाच सहा दिवसापासून फोन करून त्रास देत आहे. त्याला तुमच्या कॅन्टीन मध्ये नका ठेऊ.तो मलाच काय ईतर मुलींना देखील त्रास देईल.
हे बघा, तो मुलगा माझा भाचा आहे आणि मी त्याला चांगला ओळखतो. तो असला काही फालतूपणा करणार नाही. उलट तुम्हीच त्याला काहीतरी त्रास दिला असणार.
तो मला आधीच म्हणाला होता की त्या कळंबोलीच्या मुली खूप तापदायक आहेत म्हणून.
कॅन्टीनच्या मालकाचे हे वाक्य ऐकताच नेहा खूप रागात आली 😡
नेहा : गीतिका !! या लोकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही.आपण प्रिन्सिपॉल आणि पोलीस कंप्लेंट करूया... तसंही तू याचे कॉल रेकॉर्ड केलेच आहेत ना....
पोलिसांची धमकी कुणाला देतेस गं म्हणून तो मुलगा चवताळून नेहाच्या दिशेने आला. तितक्यात गीतेश सर कॅन्टीनमध्ये आले.
गीतेश सर : काय गोंधळ चालू आहे ईकडे??
नेहा : सर बघा ना?? असं करत नेमकं गीतिका सोबत काय घडलं हे सरांना सांगत होती.
गीतिका मात्र शांत होती.... गीतेश सरांची कॅन्टीन मधली दमदार एंट्री तिला खूपच भावली होती.त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर काळा गॉगल तिच्या आवडत्या परफ्युमचा सुगंध. सरांचे एकदम टकाटक राहणीमान क्षणात हिप्नोटाईज झाल्यासारखे ती त्यांच्याकडे आकर्षित झाली.
गीतेश सर : काय?? तुम्हाला या कॉलेज कॅम्पस मध्ये कॅन्टीन चालवायची की नाही?? 😡
कॅन्टीन मालक : सॉरी सॉरी सर, मी आता त्याला झापतो... ए राजू चल ईकडे ये.... त्या ताईची कान पकडून माफी माग...
कान पकडून राजुने गीतिकाची माफी मागितली.... आता पुन्हा त्रास देणार नाही असे देखील राजुने कबूल केले.
नेहा : पण मला एक कळत नाही तू ईथे कसाकाय?? 🤔तूला गीतिकाचा फोन नंबर कुठून मिळाला??
राजू : मी गीतिकाच्या घरा जवळच राहतो... ती तिथे असताना मी तीचा पाठलाग करायचो.मी एक दिवस तिला प्रपोज केले होते तर गीतिकाने माझी खूप कान उघाडणी केली.
मी नाही ऐकलं तर एक दिवस मला जोऱ्यात चापट मारली 😡मला त्या वेळी गीतिकाचा खूप राग आला. मी त्याचा बदला घ्यायचा ठरवलं.
पण गीतिकाचा ईथे नंबर लागल्यामुळे तीचे दिसणे बंद झाले होते. मी फार अस्वस्थ झालो. मग एके दिवशी गीतिकाच्या छोटया भावाकडून मी आयडियाने गीतिकाचा फोन नंबर आणि इथला पत्ता मिळवला . योगायोगाने माझे मामाच ईथे कॅन्टीन मालक असल्यामुळे मला अजून सोपे झाले.....
सायली : बापरे 😳...पण तू मला कसाकाय ओळखतॊस?? 🤔
राजू :मी फक्त तुलाच नाही तर नेहा आणि अनुयाला देखील ओळखतो.
गीतेश सर : बरं त्या ओळखीचा आता पुन्हा गैरवापर करू नका म्हणजे झालं.. तू गीतिका... तू देखील त्याला चापट मारली होती त्या बद्दल सॉरी म्हण... म्हणजे त्याच्या मनात तुझ्याबद्दल राग राहणार नाही...
गीतिका : हे बघ राजू !! मला तर आतापर्यंत तूझे नाव देखील माहिती नव्हते... तू माझा पिच्छा सोड...तूला मी चापट मारली होती त्या बद्दल सॉरी.
गीतेश सर :हे फार नम्र पणे झाले, राजू !!खरं तर तूझ्या आगाऊपणाला माफी नाहीच... पण याद राख या पुढे चुकूनही तूझा फोन गीतिकाला गेला तर.... माझ्याशी गाठ आहे 😡...
आणि तूम्ही तुमच्या भाचाला समजावून सांगण्या ऐवजी मुलींनाच दोष देत होते.हे पहिलं आणि शेवटचं.... या पुढे असं घडायला नको....
कॅन्टीन मालक :हो सर, हो सर...
गीतेश सर :मुलींनो !!तूम्ही आता हॉस्टेल वर परत जा... गीतिका !! तूला परत असा काही त्रास झाला तर मला सांग
बरं झाले ऐनवेळी गीतेश सर आले.... नाहीतर कॅन्टीन मालक देखील शेफारल्या सारखे वागत होता..गीतिका मनात विचार करत तिच्या नकळत गीतेश सरांकडे एकटक बघत होती.
क्रमश:
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या