नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...................................................................
गीतिकाचे गीतेश सरांकडे एकटक बघणे गीतेश सरांच्या नजरेतून चुकले नाही.
या वेळेस गीतेश सरांना जास्त मेहनत न करताच सावज मिळाले होते.
गीतेश सर : गीतिका !! हा माझा मोबाईल नंबर घे... जर परत याने किंवा कुणीही त्रास दिला तर मला कॉल 📳कर....
गीतिका :ठीक आहे सर... असं म्हणून गीतिकाने गीतेश सरांचा नंबर save करून त्यांना miss कॉल दिला... सर!! हा माझा फोन 📳नंबर....
गीतेश सर :अच्छा 😊, चला मी निघतो तूम्ही देखील हॉस्टेलला निघा कॉलेज बंद होण्याची वेळ झालेली आहे.
नेहा : हो सर !!
सगळ्या जणी हॉस्टेलला आल्या... येत असताना नेहा सायली आणि अनुया या तिघींची बडबड चालू होती.. पण गीतिका?? गीतिका मात्र एकदम शांत होती. त्यात एक मंद वाऱ्याची झुळूक गीतिकाला स्पर्शून गेली.गीतिका आपल्याच तंद्रीत स्मित करत चालत होती.
गीतिका !!काय झालं आहे तूला?? तू काय विचार करत आहेस? सायलीने गीतिकाला हलवून विचारले.
गीतिका :अं, काही नाही... गीतेश सर किती डॅशिंग आहेत गं... आणि हँडसम पण....
सायली : ओ मॅडम त्यांच्या शरीरयष्टीवर जाऊ नका .. चांगले अर्ध्या वयाचे असतील ते.
गीतिका : but he is nice guy...
नेहा : गीतिका !! प्रेमात बिमात पडलीस की काय??चुकूनही त्या दिशेने जाऊ नकोस... आपल्याला विकी आणि प्रज्वलने काय सांगितले होते ते लक्षात आहे ना??
गीतिका :नाही गं नेहा !!मी कशाला प्रेमात पडतेय... पण मला ते सर जाम आवडले आहेत. मला नाही वाटत ते सर ईतके खराब असतील??
अनुया : जाऊदे आता ते फोन📳 प्रकरण मिटलं. नाहीतर आपल्याला नक्कीच पोलीस केस करावी लागली असती.
सायली : हो आणि तो कॅन्टीनचा "मालक "तो पण किती उर्मट होता.....
गीतिका मात्र वेगळ्याच धुंदीत होती.सरांना फोन नंबर दिल्यावर त्यांच्या चेहऱ्याची स्माईल तिच्या नजरेसमोरून जात नव्हती.
विश्वासने त्याच्या पॅनलचे प्रचाराचे काम जोरदार सुरु केले होते. मैत्री आणि नियती पॅनल देखील प्रचार करण्याचा प्रयत्न करत. पण प्रत्येक ठिकाणी विश्वासचे मित्र तिथे जाऊन त्यांच्या कार्यक्रमाचा पचका करत असत.
दुसऱ्या दिवशी कॉलेज कॅम्पस मध्ये नेहाची देखील विश्वासने अडवणूक केली.
विश्वास : ए नेहा !! तू ज्युनियर आहेस... ज्युनियर सारखं राहायचं... समजलस ना... काही उमेदवार म्हणून उभे राहण्याची गरज नाही....
मी, मी तर... माझं फक्त नाव घेतलं आहे... पण मला वाटते आमचा पॅनलही पूर्ण झाला की नाही. नेहा एकदम घाबरलेल्या आवाजात बोलली....
विश्वास : 😂😂😂 ते तर होणारच.... मीच तुमचा पॅनल पूर्ण होऊ देत नाही... तू बघतच राहशील.... पण तू लक्षात ठेव... मी काही सारखं सारखं समज देणार नाही....
नेहा : हो सर,
विश्वास : सर 😂😂 😂 good....
विश्वासच्या धमकीने नेहा थोडी परेशान झाली....
तू या नेहाला कमी समजू नकोस.... तूझा तो पिद्दू आहे ना विनय त्याचा पॅनल कसा पडतो बघ... अगदीच तोंडावर.... असा एक सणसणीत विचार नेहाच्या मनात येऊन गेला. जणू त्या विचाराद्वारे नेहाने विश्वासला एक प्रकारचे आव्हानच दिले होते.मनातल्या मनात हसून ती क्लास मध्ये गेली.
गीतिकाची नजर मात्र गीतेश सरांना शोधत होती. पण सर काही दिसत नव्हते क्लास जवळ गेल्यावर तिच्या हृदयाची एकदम धडधड वाढली. गीतेश सर एकदम तिच्या जवळ आले.
गीतिका : गुडमॉर्निंग सर !!
गीतेश सर : very गुडमॉर्निंग गीतिका !!काय म्हणतेस?? पुन्हा काही त्रास दिला नाही ना त्या राजुने....
गीतिका :नाही सर!! तसंही तुमच्या विरुद्ध वागण्याची कुणाची मजाल आहे.
गीतेश सर : हे मात्र तू खरं बोललीस 😂
गीतिका : येते सर !! असं म्हणून गीतिका तिथून निघून गेली आणि क्लास मध्ये जाऊन बसली.
सायली : गीतिका !! काय बोलत होते गं गीतेश सर??
गीतिका : काही नाही गं... पुन्हा त्या राजुने त्रास दिला का म्हणून विचारत होते.
सायली : गीतिका !! पण जरा सांभाळून बरं का?? नाहीतर उद्या आम्हाला कळायचं गीतिका गीतेश सरांच्या प्रेमात पडली🙄....
गीतिका : छे गं...
पण गीतिकाचे मन एका चित्र विचित्र अवस्थेत अडकले होते. राहून राहून ती गीतेश सरांचा विचार 🙄करत होती.कळत नकळत तिच्या डोक्यात सतत गीतेश सर डोकावत होते.गीतेश सरांबद्दल सुरुवातीपासून सगळं माहिती असताना देखील तिला गीतेश सर चुकीचे वाटतच नव्हते.
गीतिकाचे वीकएंडला घरी जाण्याचे देखील कॅन्सल केले. घराची ओढ कमी झाली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उजाडला.
विश्वासने बरोबर मैत्री आणि नियती पॅनलला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितला.
श्वास पॅनल पूर्ण तयार झाला नाही असा त्याचा गैरसमज झाल्यामुळे त्याने श्वास पॅनल मधील उमेदवारांना धमकी दिलीच नाही....
ऐनवेळी एक एक उमेदवार येत गेला आणि श्वास पॅनल पूर्ण झाला.
विश्वासने भरपूर शक्तीप्रदर्शन केले. त्याच्या धाकाने बरेच जण त्याच्यासोबत आले होते.
नेहा : रोहन !!त्या विश्वासचे शक्ती प्रदर्शन बघता सगळे जण त्यालाच मतं देतील...
रोहन :सगळे जण त्याच्या भीतीने आले आहेत. पण मतदान मात्र करणार नाही ईतकं नक्की....
उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर... साहजिकच फॉर्म मागे घेण्याची वेळ संपल्यावर श्वास पॅनल की जय, अश्या पूर्ण पॅनलने घोषणा दिल्या.
आता विश्वास आणि विनयला आपण कुठे चूक केली हे लक्षात आले.
विकी : तरी मी म्हणालो होतो... दुश्मनांना कधीही कमजोर समजू नये म्हणून...
विनय : ए विक्या !!जरा तूझ्या जिभेला लगाम घाल... कधी म्हणाला होतास तू?? काहीही आपलं फालतूची बडबड लावली आहे.....
विकी : मी अंजलीला म्हणालो होतो... हो की नाही अंजली...
अंजली : ए !!तू कधी म्हणाला होतास?? उगाचच माझं नाव पुढे करू नकोस समजलं ना....
विकीने होकारार्थी मान हलवली....
विश्वास : बरं ते जाऊ द्या... जे झालं ते झालं... आता आपल्याला यांचा प्रचारच होऊ द्यायचा नाही असं ठरवावं लागेल. वेळ कमी आहे... ग्रुप मिटिंग successful होऊच द्यायचे नाही.... बघुयात कसा प्रचार करतात ते... आणि अजून एक शेवटचा पर्याय बोगस वोटिंग 😂😂 ती तर आपल्या हातातच आहे.... त्यात ते हरणारच....
क्रमश :
भाग 15 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या