नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
...........................................................................
विश्वासला निवडणूक तोच जिंकून येईल असा आत्मविश्वास होता.
प्रचारासाठी दहा दिवस मिळाले होते.
विश्वासने जोरदार धमकी वजा प्रचार सुरु केला.
जागोजागी तो विद्यार्थी जमा करत असे आणि जर जागृती पॅनलला vote केले नाही तर गाठ माझ्याशी आहे.
असं समजू नका की तुम्ही जागृती पॅनलला vote केले नाही तर मला नाही समजणार.अश्या धमक्या देत असे.
ईकडे श्वास पॅनल वाल्यानी आता एक ऑनलाईन zoom मिटिंग ठेवली.
अमित : चला, आता आपल्याला शांत बसता येणार नाही. आपल्याला groupism न करता man to man पब्लिसिटी करावी लागणार आहे. त्या साठी तूम्ही प्रत्येकाला personally भेटा किंवा फोन करा, मेसेज करा. जे जमेल ते माध्यम वापरा. आणि प्रचार करा. मी प्रचाराचे पोस्टर आणि बॅनर तयार केले आहेत. उद्या कॉलेज सुरु होण्या आधी मला भेटा. आणि तुमच्यासोबत घेऊन जा... नेहा तूला हे आजच मिळून जातील. माझा एक मित्र हॉस्टेलवर घेऊन येईल. तू मात्र ते व्यवस्थित घे... म्हणजे विश्वास तूझी अडवणूक करू शकणार नाही.
चला आता कामाला लागा... निडर रहा... आणि जर त्या विश्वास किंवा विनय ने जर तुम्हाला कुणाला काही त्रास दिला तर मला कळवा.
निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाली. सगळीकडे एक वेगळे वातावरण तयार झाले.जो तो अगदीच उत्साहात होता.प्रत्येकाच्या तोंडात फक्त राजकारणाचा विषय होता.
नेहाला हॉस्टेल वर रशीद नावाच्या मुलाने पोस्टर आणून दिले. रशीद हा कॉम्प्युटर सायन्सचा तिसऱ्या वर्षाचा मुलगा होता.सेक्रेटरीसाठी तो श्वास पॅनल कडून उभा होता.
रशीद : नेहा !! हे पोस्टर जरा जपून हे तुमच्या हॉस्टेल च्या पोर्च मध्ये लाव... हे टीव्ही रूम मध्ये आणि हे मेस मध्ये... हे छोटे छोटे बॅनर प्रत्येक मजल्यावर लाव.... आणि हे फ्लायर्स प्रत्येक रूम मध्ये वाट... तू मदतीला यास्मिनला घे...
नेहा : 😳 यास्मिन?? ती कुठे आहे... तीची आणि आमची चार दिवसापासून भेटच नाही....
रशीद : उमेदवारी फायनल होईपर्यंत कुणालाही भेटू नको असं मीच तिला सांगितलं होतं. कारण ती अंजली पण तुमच्यासोबत रहात होती ना....
नेहा : हूं...
रशीद : ती बघ आली यास्मिन....
नेहा :अरे यास्मिन !! तू... अच्छा हुआ तू हमारे साथ है | अभी दिव्या तू और मै तीनो मिलके अच्छा प्रचार करेंगे...
चलो यास्मिन !!हम आते है |खुदा हाफिज...
असं म्हणून रशीद निघून गेला.
यास्मिन मात्र जाणाऱ्या रशीदकडे पाहतच राहिली....
नेहा : क्या बात है यास्मिन !! तुम्हारी नजरे 😍😍तो हमको बहोत कुछ कह रही है |
यास्मिन :😊 रशीदने मला प्रपोज केलं.... पण मी अजून काहीच उत्तर दिले नाही.... असं कसं एकदम उत्तर देऊ... मी आताच तर कॉलेज मध्ये आले.
नेहा : हे wow.... आपल्या बॅच मधलं पहिलं प्रपोजल 😍😍पण कसं केलं?? 🤔
यास्मिन : हां... चार दिन पहले उसने मुझे फोन किया और डायरेक्ट पूछ लिया. तबतक मुझे कौन रशीद मालूम भी नही था... पर प्लीज अभी किसीको मत बताओ....
नेहा : अच्छा ये बात है तो... सॉरी, पर मै सायली, अनुया और गीतिका से नही छुपा सकती....
यास्मिन :हूं...
ठरल्याप्रमाणे पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले. फ्लायर्स देखील वाटण्यात आले.
हॉस्टेल वर जवळ जवळ सगळ्या मुलींचा सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.त्यामुळे नेहाला देखील आता खूप हुरूप येत होता.
निवडणुकीच्या वातावरणात सगळेच जण रमले असताना गीतिका मात्र एका वेगळ्याच विश्वात रमली होती.
गीतिकाने घाबरत घाबरतच सुरुवातीला गीतेश सरांना गुडमॉर्निंग चे इमेजेस असलेले मेसेजेस टाकायला सुरुवात केली.
गीतेश सर देखील smile पाठवून reply देत असत.
आता हळूहळू गीतेश सरांनी देखील गीतिकावर जाळे टाकायला सुरुवात केली.
बाकी सगळे जण निवडणुकीत व्यस्त असल्याचा गीतेश सरांनी बरोबर फायदा उचलला. आणि एक दिवस त्यांनी स्वतःहून गीतिकाला मेसेज केला.
गीतेश सर : गीतिका !! How are you...
गीतिका : i am fine sir... thanks and you sir??
गीतेश सर : i am not fine....
गीतिका : का? सर.. काय झालं??
गीतेश सर : जाऊदे... माझं दुःख मी उगाचच तूझ्या कडे कशाला उगाळू.... तू fine आहेस हे ऐकून बरं वाटलं...
गीतिका : सर असं नका करू... जे काही दुःख असेल ते सांगा.... हवं तर मला तूमची friend समजा...
गीतेश सरांनी टाकलेल्या जाळ्यात आता गीतिका पुरती अडकली....
गीतेश सर : अगं कुठून मला दुर्बुद्धी सुचली अन मी हे लग्न केलं... माझी बायको पॅरानॉईड आहे... सतत माझ्यावर संशय घेत असते... सतत माझ्याशी भांडण करत असते. नुसता पैसा पैसा करत असते.... तूच सांग.... मी एक प्रोफेसर किती कमावणार... बरं त्यात घर ही चालवायचं आणि हिचे नखरे पण सांभाळायचे.... जाम कंटाळा आला आहे बघ....
गीतिका : ओ.... फारच वाईट झालं... सर रागावणार नसाल तर एक विचारू...
गीतेश सर : विचार की...
गीतिका : कॉलेज मध्ये आल्या आल्या आम्हाला कळालं की तूम्ही या आधी चार जणींशी लग्न केलेलं... ते कसंकाय
गीतेश सर : माझं खराब नशीब.... अजून काय....
पहिल्या मुलीच्या वेळेस माझ्या आईवडिलांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले... सहा महिने राहिलो... पटलं नाही... मग घटस्फोट....
दुसरी तर आपल्या कॉलेज मधली... माझ्या खूप मागे लागली... वाटलं चांगला संसार करू शकू.... पण नंतर कळालं की तिला सिझोफ्रेनिया होता... अधून मधून वेडाचे झटके येत... एका झटक्या मध्ये तर तीने माझा गळा दाबला.... मग काय... पुन्हा एकदा घटस्फोट.....
तिसरीने बिचारीने मला खूप समजून घेतलं... पण एक दुसरीच व्यक्ती तिच्या आयुष्यात आली आणि ती देखील माझ्या आयुष्यातून निघून गेली....
चौथीच्या आईवडिलांना जेव्हा आमच्याबद्दल कळाले तेव्हा माझा आधीचा इतिहास बघून त्यांनी तिला जबरदस्तीने घटस्फोट घ्यायला लावला...
खरं सांगू गीतिका!! आता तर मला जगावंसंच वाटत नाहीये.... मला कोण समजून घेणार... माझ्या आयुष्यात यशस्वी असा संसारच लिहलेला नाहीये....
गीतिका : ओ सर !! असं म्हणू नका ना... तूम्ही ईतके डॅशिंग आहात की कुणीही तुमच्या प्रेमात 😍पडेल....
गीतेश सर : हो का.... मला आवडणारी व्यक्ती माझ्या प्रेमात पडेल का??
गीतिका :😳 तुम्हाला कोण आवडतं??
गीतेश सर : सांगून टाकू....
गीतिका : हो सर!! प्लीज...
गीतेश सर : गीतिका !!मला गीतिका आवडते....
गीतिका :😳 काय?? सर खरं.... मलापण तूम्ही 😍😍
क्रमश :
भाग 16 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या