आमच्यासारखे आम्हीच (भाग 16)

नमस्कार, 

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

गीतेश सर : का, काय झालं... का थांबलीस... 

गीतिका : सायली आली... मी नेट बंद करते.... बाय.... असं म्हणून गीतिकाने मोबाईल data ऑफ केला. 

तितक्यात गीतिकाचा फोन 📳वाजला... रिंगटोन ऐकून गीतिकाला एकदम छातीत धस्स झालं. 

पाहते तर तिच्या मम्माचा फोन 📳होता. 

गीतिका : हं मम्मा !!बोल... 

गीतिकाची मम्मा  : गीतू बेटा !!मी आणि पप्पा, तूला भेटण्यासाठी उद्या येत आहे... 

गीतिका : 😳 का?? काय झालं?? 

गीतिकाची मम्मा : अगं मागे तू किती परेशान होतीस... तू फोनवर रडल्यापासून मला करमतच नाहीये... तू विकेंडला येणार होतीस ते पण आली नाही.. 

गीतिका : अगं मम्मा त्या दिवशी मला खूप होम सीक वाटत होतं. तू पॅनिक होणार नसशील तर एक गोष्ट सांगू का?? 

गीतिकाची मम्मा :  का काय झालं 😳.... 

गीतिका : तू काळजी करू नकोस... तूला आठवते का कळंबोलीला एक मुलगा मला येता जाता खूप त्रास देत होता.... मी त्याला थोबाडीत दिली होती ... 

गीतिकाची मम्मा :  हो, त्याचं आता काय?? 

गीतिका :आपल्या छोटूच्या कृपेने तो इथपर्यंत पोहोचला होता....

गीतिकाची मम्मा :आपल्या छोटूच्या कृपेने??  🤔

गीतिका : अगं त्या मुलाने छोटू कडून माझा adress आणि फोन नंबर घेतला होता. 

गीतिकाने तिच्यासोबत काय काय घडले हे सर्व सांगितले आणि गीतेश सरांनी त्याला कसं वठणीवर आणलं ते देखील सांगितले.. 

गीतिकाची मम्मा : बापरे 😳गीतू !!तुझ्यासोबत ईतकं सगळं घडून गेलं आणि तू आम्हाला एक अवाक्षरही सांगितले नाहीस... 

गीतिका : अगं मम्मा पण गीतेश सरांमुळे आता सगळं नीट झालं ना.... 

गीतिकाची मम्मा : ते काही नाही.... आता तर आम्हाला नक्कीच पुण्याला यावे लागेल.

गीतिका : बरं या तूम्ही, पण माझी काळजी करू नको. सगळं काही ठीक झालं आहे आता....

आता या चौघींसोबत यास्मिन देखील होती.... कॉलेज कॅम्पस मध्ये जाताच रशीद या पाच जणींना भेटायला आला. 

रशीद : नेहा !! काय म्हणतोय प्रचार... बॅनर्स लावले ना... 

नेहा : हो... 

नेहा !! भेटल्यावर काही सलाम वगैरे करायची पद्धत नसते का? रशीद यास्मिन कडे पाहून म्हणाला.... 

यास्मिन : सलाम, वॉलेकूम 

नेहा आम्ही जरा पुढे जाऊन थांबतो. यास्मिन तू रशीदशी बोलून ये... 

रशीद : हूं, ... यास्मिन तुमने हमारे प्रपोजल का जवाब नही दिया... 

यास्मिन : जवाब 😳.... क्या जवाब दू |कैसे दू?? सच कहू तो मै आपको जानती तक नही... ऐसे कैसे हा बोल सकती हूँ  | 

अच्छा तो फिर friends, असं म्हणून रशीदने शेकहॅन्ड साठी हात समोर केला.... 

 ठीक है | friends 😊   असं म्हणून यास्मिनने देखील शेकहॅन्ड केलं.... 

नेहा मेरा वेट कर रही है |मै निकलती हूँ... असं म्हणून यास्मिन नेहा जवळ गेली.... 

नेहा : क्या यास्मिन !!शेकहॅण्ड वगैरा.... हा कह दिया क्या?? 

यास्मिन : नही रे... अभी तो फिलहाल सिर्फ friendship.... 

नेहा : चलो शुरुवात तो हुई ना | 😊

यास्मिन : काय की शुरुवात...ना जान ना कुछ पहेचान चले प्रपोज करने... नेहा तू मला सांग तूला तरी पटतंय का हे....

नेहा : हो ते तर खरं आहे गं.....

नेहा : गीतिका !! दोन दिवसापासून बघते आहे... तू अशी गप्प गप्प का आहेस?? 

गीतिका : काहीच नाही गं... माझ्या फोनवर रडण्यामुळे माझे मम्मा आणि पप्पा येणार आहेत. कदाचीत आज दुपार पर्यंत येतील देखील.... ते राजू प्रकरण आईला मी फोनवर सांगितलं... आता ती जास्तच काळजी करत आहे... मला वाटतंय सगळं तर मिटलं होतं....मी उगाचच मम्माला सांगितलं.... 

नेहा : अगं गीतिका !!उलट तू चांगलं केलंस मम्माला सांगून....  अश्या गोष्टी आपल्या आईवडिलांना नक्कीच  माहिती असाव्यात.... अगं आपण खूप नशीबवान आहोत आपल्या आईवडिलांच्या बाबतीत....ते आपल्याला समजून घेतात....उलट त्यांना तू सांगितले नसते ना त्याची काळजी वाटली असती. 

तितक्यात गीतेश सर समोरून गेले.... 

नेहा गीतिकाशी बोलत होती पण गीतिकाचं लक्ष मात्र पार विचलित झालेलं होतं.... गीतिका एकटक 😍गीतेश सरांकडे पाहत होती. गीतेश सर देखील समोरून जाता जाता स्मित😊 करत होते... 

काल रात्रीचे बोलणे झाल्यावर गीतिकाच्या गुडमॉर्निंग मेसेजला गीतेश सरांचा रिप्लाय आलेला नव्हता. त्या मुळे देखील ती कमालीची अस्वस्थ झालेली होती.
गीतेश सर मी  काल फोन कट केल्यामुळे रागावले असतील का? असाच विचार ती मनोमन करत होती. 

अनुभवाच्या जोरावर गीतेश सरांनी आपल्याला हव्या त्या मुलीला कशाप्रकारे आकर्षित करायचं हे सगळं माहिती होतं. आणि त्यातल्या त्यात गीतिका नावाचा मासा काहीच मेहनत न करता त्यांच्या गळाला लागला होता. फक्त तिला आता जास्तीत जास्त कसं जाळ्यात अडकवायचं हे मात्र त्यांना बरोबर जमत होते. मेसेजला रिप्लाय न देणं हा त्यांच्या खेळीचा प्रकार होता. आणि आता मुद्दाम स्माईल देणं हा देखील.... 

गीतेश सरांच्या एका स्माईलने😊 गीतिकाच्या जीवात जीव आला.
क्रमश :
भाग 17 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लीक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या