नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
दुपारच्या लंच नंतर सगळ्या जणी रूमवर पहुडल्या होत्या. तितक्यात गीतिकाला तिच्या मम्माचा कॉल 📳आला.
गीतिकाचे मम्मा आणि पप्पा गीतिकाला भेटायला हॉस्टेलला आले. आणि सोबत गीतिकाला भरमसाठ खायला आणलं...
हॉस्टेल मध्ये ग्राउंड फ्लोर ला स्पेशल गेस्ट रूम होती.. तिथे पालकांना थांबता येत होतं...तिथे ते गीतिकाची वाट पाहत बसले. त्यांच्या सोबत छोटू देखील होता...
गीतिका, अनुया, सायली आणि नेहा चौघीही त्यांना गेस्ट रूम मध्ये भेटायला आल्या....
गीतिकाचे पप्पा : काय मुलींनो, कसं वाटत आहे कॉलेज...
अनुया : कॉलेज छान आहे. सिनियर्स पण मदत करतात... सुरुवातीला खूप भीती वाटायची पण आता मोकळं वातावरण आहे .
नेहा : काका !! आम्ही कॉलेज मध्ये जातो.. लेक्चर आहे... गीतिका !! तू ईथेच थांब....
गीतिका : हो, तुम्हाला उशीर होईल निघा आता.
गीतिकाचे पप्पा : गीतू !! चल जरा... तूला कोण त्रास देत होतं जरा त्याची आणि माझी भेट करवून दे...
गीतिका : पप्पा !! तो आता कळंबोलीला परत गेला आहे... त्याचा मामा इथला कॅन्टीनचा मालक आहे. पण आमच्या गीतेश सरांनी त्याची चांगली खरडपट्टी काढली. आणि छोटू !!असं माझा नंबर कुणालाही देत नसतात...
छोटू : अं अं.. मला काय माहिती तो दादा तूला त्रास देईल म्हणून... तो तर म्हणाला होता मी गीतिका दीदी चा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून....
गीतिका :असू दे... पण असं कुणीही नंबर मागितला तर द्यायचा नाही...
छोटू : ओके, नाही सांगणार...
गीतिका : गुड बॉय.... पण बाबा !!आता सगळं सॉर्ट आऊट झालं ना....
गीतिकाचे पप्पा : तरी पण चल माझ्यासोबत....
गीतिकाचे पप्पा गीतिकाला सोबत घेऊन प्रिन्सिपॉल केबिन मध्ये गेले....
गीतिका : मे आय कम ईन सर !!
प्रिन्सिपॉल : yes, come in...
गीतिका : सर माझे पप्पा....
गीतिकाचे पप्पा : नमस्कार सर...
प्रिन्सिपॉल : नमस्कार, बोला काय म्हणते माझी विद्यार्थिनी??
गीतिकाच्या पप्पानी राजू बद्दल सगळं प्रिन्सिपॉलला सांगितलं...
प्रिन्सिपॉलने कॅन्टीन मालक आणि गीतेश सरांना केबिन मध्ये बोलावून घेतलं.....
प्रिन्सिपॉलने राजू बद्दल माहिती घेतली... कॅन्टीनच्या मालकाने आधीच राजुला परत गावी पाठवल्यामुळे गीतिकाच्या पप्पाना विशेष बोलता आले नाही...
गीतिकाचे पप्पा : गीतेश सर !!तुमचे कसे आभार मानावे मला हेच कळत नाहीये... मनापासून धन्यवाद सर....
प्रिन्सिपॉल सर !! तुमच्या कॉलेजचे खूप नाव आहे आणि तुमच्या कॉलेजचे रेकॉर्ड देखील खूप चांगले आहे म्हणून मुलीचे ऍडमिशन झाल्यावर आम्ही निश्चिन्त होतो.. पण या कालच्या प्रकाराने आम्ही फार परेशान झालोय....
प्रिन्सिपॉल सर : तूमची काळजी मी समजू शकतो...
पण गीतिकाने देखील आम्हाला थोडी जरी कल्पना दिली असती तर आम्ही ताबडतोब ऍक्शन घेतली असती.
तरी देखील खबरदारी म्हणून आम्ही आता या कॅन्टीन मालकाला एक पत्र काढून त्याच्याकडे काम करणाऱ्याची यादी निश्चित करून घेऊ...
या पुढे या कॅम्पसमध्ये तरी असला प्रकार घडणार नाही याची मी ग्वाही देतो.
तूम्ही आता निश्चिन्त व्हा.
गीतिका!! या पुढे तूला कसलाही त्रास झाला तर मला भेटून सांग.
गीतिका : हो सर !!
बाकी विषयांच्या शिक्षकांना देखील भेटून झाल्यावर गीतिकाच्या पप्पाने गीतिकाला बाहेर हॉटेल मध्ये जेवायला नेले.
छान मनमोकळ्या गप्पा झाल्या....
मम्मा आणि पप्पा आल्यामुळे गीतिका खुलली होती... खूप आनंदी झाली होती....
भरीस भर म्हणून गीतिकाच्या पप्पानी गीतेश सरांची खूप स्तूती केली होती. त्यामुळे गीतिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
जेवण झाल्यावर गीतिकाने तिच्या खास मैत्रिणींसाठी पिझ्झा पार्सल करून घेतला...
गीतिकाला हॉस्टेलवर सोडून तीचे मम्मा आणि पप्पा परतीच्या प्रवासाला निघाले.
प्रज्वल आणि रोहन देखील आता प्रत्येकाला भेटून श्वास पॅनलचा प्रचार करत होते.... तसं ज्या व्यक्ती मुख्यतः चांगल्या असतात आणि मनमिळाऊ असतात त्या व्यक्तींना प्रचार करण्याची विशेष अशी गरज नसतेच असं त्यांच्या मित्राचं मत होतं... प्रत्येकजण आम्ही आमचं वोट श्वास पॅनलला देणार हेच सांगत होते.....
.प्रज्वल : रोहन !! हे सगळेच म्हणतात की हे श्वास पॅनल वोट देणार असं जर खरं झालं तर बहुमत आपल्याच पॅनलला मिळणार....
रोहन : पण विश्वासच्या भीतीने जर सगळेच वोट त्यांना गेले तर...
प्रज्वल : 😂😂😂 तरीपण आपण जिंकणार...
रोहन : 😳 ते कसं काय 🤔??
प्रज्वल : त्यावेळी मी हुकुमाचा एक्का बाहेर काढणार??
हुकुमाचा एक्का?? काय आहे हुकुमाचा एक्का🤔...असे विचारत विकी एकदम दोघांच्या समोर प्रगट झाला....
प्रज्वल : रोहन !! मला वाटलंच की आपलं बोलणं कुणीतरी चोरून ऐकत आहे.... म्हणूनच मी हुकुमाचा एक्का म्हणालो आणि बघ चोर कसा समोर आला ते...
हुश्श बरं झालं हा विकी अचानक समोर आला... नाहीतर माझे सिक्रेट जे की अमितला देखील माहिती नाही ते ओपन झाले असते 🙄....
रोहन : अरे विक्या!! तू कुठून उगवलास...
विकी : मी ईथे बाजूलाच होतो...ते काय ना, माझं कामच आहे माझ्या खास मित्रांकडे लक्ष देणं.... तेच करत होतो..
रोहन : विक्या !! याला लक्ष देणं नाही... हेरगिरी म्हणतात...
😂😂😂 जेम्स बॉण्ड 007...असं म्हणून विकीने दोन बोटांची पिस्तोल करून त्यावर फुंकर घातली...
रोहन : विकी !!तुमचा प्रचार करून झाला वाटतं....
विकी : चाललो चाललो...तिकडेच चाललोय....
रोहन : जा मग... उशीर होईल नाहीतर....
विकी तिथून निघून गेला....
प्रज्वल :बापरे 😳रोहन !!या विकीपासून खूप सावध राहावे लागणार....
रोहन : म्हणजे तूझा खरंच काही हुकुमाचा एक्का आहे...मला वाटलं तू खरंच विकीची चोरी पकडण्यासाठी म्हणाला...
प्रज्वल : तूला खरंच तसं वाटलं ना... बरं झालं म्हणजे विकीला देखील खरं वाटलं असेल.... जाऊदे मी आताच काही बोलत नाही....
मेसेंजरची बीप वाजली.... गीतिकाने एकदम फोन बघितला....
सायली : काय गं गीतिका !! कुणाच्या मेसेजची वाट पाहत आहेस... इतक्या तातडीने फोन उचललास ते...
गीतिका : अं, कुणाचा नाही.... सहजच... मम्मा, पप्पा आताच गेले ना... म्हणून जरा बोर होत आहे....
सायली : अच्छा... पण एकंदर छान झालं... काका आणि काकू येऊन गेले....
गीतिका : हं....मेसेंजर वर स्मित करून गीतिका मेसेज type करत होती..
क्रमश :
भाग 18 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या