आमच्यासारखे आम्हीच (भाग 18)

नमस्कार, 

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

सायली : काय गं गीतिका !!कुणाचा मेसेज आहे...मेसेज बघून गालातल्या गालात हसत आहेस. 

 अं, क, क कुणाचा नाही... असं म्हणून गीतिकाने तीचा फोन बाजूला ठेवला... 

सायली: गीतिका!! ईतकं घाबरायला काय झालं 🤔...खरं सांग काय लपवत आहेस माझ्यापासून.... 

गीतिका : मी काय लपवत आहे... कुठे काय?? काही नाही... काय सायली तू पण ना.... हे घे फोन 📳आणि चेक कर मी काय लपवत आहे ते.😡.. 

सायली : अरे तू तर रागावलीस.... अगं मी फक्त तूझी गंम्मत करत होते... 

सायली गीतिकाचे सांत्वन करन्यासाठी म्हणाली पण तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.

ज्या दिवसाची सर्वच जण आतुरतेने वाट बघत होते. तो दिवस उगवला.... तो दिवस म्हणजे मतदानाचा दिवस... 

कॉलेज मधील अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मुद्दाम शनिवारी मतदान ठेवण्यात आले.... 

मतदानाची वेळ सकाळी आठ ते बारा ठेवण्यात आली.. आणि दुपारी दोन नंतर निकालाला सुरुवात होणार होती. 

मतदानासाठी दहा बूथ उभारण्यात आले होते. आणि त्याची विभागणी ही वर्गानुसार केली होती. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 

ज्या त्या वर्गाचे बूथ असल्यामुळे कुणी सिनियर विद्यार्थी ज्युनियरला दमदाटी करू शकत नव्हता.प्रत्येक बूथवर पार्शिलीटी होणार नाही या साठी एक एक शिक्षक तैनात होता.. 

निवडणुकांचे नियोजन हे दुबे सर, गीतेश सर, माने सर आणि मोहिनी मॅडम ने खूप व्यवस्थित केलेले होते.

हळूहळू मतदार सुरु झाले.... 

काही ठिकाणी उमेदवारांनी मतदान करून बूथचे उदघाट्न केले. आणि नंतर मतदारांची रीघ सुरु झाली. 

श्वास पॅनल ने आपले काम गनिमी काव्याने सुरु केले. 

अमित आणि त्याचे सगळेच उमेदवार अधून मधून सगळ्या बूथ कडे चक्कर मारत होते. काही घोळ तर होत नाहीये याची खात्री करून घेत होते. 

मतदान करण्यासाठी जेव्हा फ्रेशर्स जात असत... बूथवर जाण्याआधी त्यांना विश्वास आणि त्याचे साथीदार त्याला गाठत असे.धमकी देत असे. त्या मुळे फ्रेशर्स मधला मतदार नुसता कावरा बावरा होऊन मतदान करायला जात असे. 

ईकडे विन्याने कॉलेज बाहेरचे काही मुले बोगस मतदान करण्यासाठी म्हणून आणली. जी मुले मतदानासाठी गैरहजर होती त्यांच्या नावावर ती बोगस मतदान करत होती. 

 जवळ जवळ कॉलेज सुरु होऊन दोन महीने पूर्ण होत असतील पण ही मुले आज पहिल्यांदाच कॉलेज मध्ये दिसली होती. 

नेहा : प्रज्वल !! ती समोर दिसत आहेत ती मुले तू ओळखतॊस का? 

प्रज्वल : नाही... मी देखील त्यांना आज प्रथमच पाहत आहे. नेहा !! Good observation 

नेहा :😊 thanks 

नेहाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नेहाने त्यांच्या नकळत तिच्या मोबाईल मध्ये फोटो काढून घेतले.
नेहाने काढलेले फोटो अमितला दाखवले. 

अमितने मतदान करणारी मुले आपल्या कॉलेजची नाही हे हेरले. 
अमित : नेहा !! हे फोटो माझ्याकडे ट्रान्सफर कर... मी ऐनवेळी दुबे सरांना दाखवतो... नेहा तू परत खूप मोठे काम केले आहेस... आता आपल्या पॅनलला कुणीच हरवू शकत नाही. 

मतदानाची वेळ संपत आली... प्रज्वलने देखील मतदान करणारी अनोळखी मुले दुबे सरांच्या नजरेत आणून दिली. 

मतदान संपले... श्वास पॅनल ने श्वास पॅनल की जय  आणि जागृती पॅनल नी जागृती पॅनल की जय अश्या जोरदार घोषणा दिल्या..... दोन्हीही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता.

दुपारी लंचच्या दरम्यान देखील इलेक्शन च्या गप्पा चालू होत्या. 

कुणी मतदानाविषयी, कुणी बूथ विषयी तर कुणी बोगस मतदानाविषयी बोलत होतं.

सगळ्या जणांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

ईकडे गीतेश सरांनी मात्र वेळ साधून डाव टाकला. सगळेच जण इलेक्शन मध्ये busy असतानाच त्यांनी गीतिकाला मेसेज केला.... 

गीतेश सर : hi dear 

गीतिका : hello sir 

गीतेश सर : काय करत आहेस? मतदान झाले का?? कॉलेज कॅम्पस मध्ये दिसली नाहीस... 

गीतिका : सर !! मी आणि माझ्या मैत्रिणी सर्वांनी सकाळी आठ वाजताच मतदान केले... 

गीतेश सर : अच्छा, मग मला उशीर झाला... बरं ऐक ना... मला एकदा तूला बघायचे 😍होते... प्लीज येशील का?? 

गीतिका : सर !!आता... आता निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस येते ना.... 

गीतेश सर : खरं तर मला भेटायचे होते. पण आज ईथुन सुटका नाही ना.... नाहीतर बाहेर छान हॉटेल मध्ये भेटलो असतो. 

गीतिका : 😳 काय?? बाहेर... 

गीतेश सर : हूं... काय हरकत आहे?? 

गीतेश सरांनी नेमकं गीतिका आपल्याला काय रिप्लाय देईल... भेटण्याची हिम्मत करेल का याचा अंदाजा घेण्यासाठी असा मेसेज केला होता. 

गीतिका : पण सर !!मी हॉस्टेल वरून बाहेर एकटी जाऊ शकत नाही... माझ्या मैत्रिणींना काय सांगू 🤔...त्यांना सोडून मी काहीच करत नाही... त्यातल्या त्यात एखाद्या हॉटेलला..... ते कसं शक्य आहे?? 

गीतेश सर : बरं असू दे.... तू काळजी करू नकोस... दुपारी कॉलेज मध्ये तर भेटू..... 

गीतिका : ठिक आहे सर !! 

निवडणुकीच्या निकालाची वेळ झाली... 

ऑडिटोरियम मध्ये मत मोजणी होणार होती. 

विश्वास आणि त्याचे साथीदार असल्यामुळे प्रिन्सिपल ने आधीच पोलीस यंत्रणा देखील बोलावून ठेवली होती. जेणेकरून काही विपरीत घडणार नाही 

मतमोजणीच्या वेळेस ऑडिटोरियम मध्ये सगळ्यात समोर उजव्या बाजूला श्वास पॅनल आणि त्याचे समर्थक तर डाव्या बाजूला जागृती पॅनल आणि त्यांचे समर्थक उपस्थित होते. 

स्टेज वर विन्या आणि अमित होते. तर दुबे सर, गीतेश सर, माने सर, आणि मोहिनी मॅडम चौघेही मतमोजणी करण्यासाठी होते. 

मतमोजणी चालू झाली... 
कधी श्वास पॅनल आघाडीवर तर कधी जागृती पॅनल आघाडीवर सगळे श्वास रोखून शेवटच्या राउंडची वाट बघत होते. 

आणि शेवटच्या राउंडचा निकाल बाहेर पडला जागृती पॅनल, दहा मतांनी जिंकला.... जागृती पॅनलने लागलीच जागृती पॅनल की जय अश्या घोषणा द्यायला सुरु केल्या.... 

तितक्यात अमितने निकालावर objection घेतले....
 नेहाने काढलेले फोटो अमितने दुबे सरांना दाखवले. आणि प्रज्वलने त्याच्या हुकमी एक्क्याची आठवण.. म्हणजेच फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी विन्याने शीतपेयात पावडर मिळवतानाचा  फोटोची आठवण दुबे सरांना करून दिली. 

दुबे सरांनी अमित जवळचा आणि स्वतःजवळचा फोटो पुन्हा प्रिन्सिपॉल समोर दाखवला.... 

प्रिन्सिपॉल सरांनी ते दोन्हीही फोटो विनयला दाखवले. मुख्य उमेदवारच अपराधी निघाल्यामुळे जागृती पॅनल ऐवजी श्वास पॅनलच कॉलेजची संसद चालवण्यासाठी दावेदार असल्याचे अनाऊन्स केले. 

निकाल ऐकताच विश्वास आणि त्याच्या साथीदारांनी धिंगाणा सुरु केला. 
पण तिथे असलेल्या पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतले.. 
श्वास पॅनल ने मात्र आनंदाने जल्लोष केला..... 

क्रमश :
भाग 19 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

.






.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या