आमच्यासारखे आम्हीच (भाग 19)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

निकाल लागला की दहा मिनिटातच ढोल ताशे वाले आले.
 
अमितच्या समर्थकांनी गुलाल उधळला.

मुले नाचू लागली. निवडून आलेल्या उमेदवारांना खांद्यावर घेऊन नाचू लागली.  

नेहा, दिव्या, अनुया,  सायली, गीतिका, आणि तिथे असलेल्या सगळ्या मुलींनी डान्स सुरु केला.

नृत्य करता करता गीतिकाचे लक्ष तिथे उभे असणाऱ्या गीतेश सरांकडे गेले. 

गीतेश सरांना पाहताच गीतिका एकदम थबकली. 
आपण इतक्या मुलामुलींमध्ये डान्स करत आहोत हे गीतेश सरांना आवडले की नाही. ह्याची तिला शंका वाटायला लागली होती.  

 गीतेश सरांना गीतिकाचे मुला मुलींसोबत डान्स करणे आवडले नाही. असे त्यांनी खुणेनेच दर्शविले. 

गीतिका ते बघून उदास झाली... उदास मनाने एका कोपऱ्यात उभे राहून बाकी मैत्रिणींना लक्षात येणार नाही अशी उभी राहिली. 

सायलीने मात्र हे हेरले. सायलीला गीतेश सरांबद्दल अंदाज आलाच होता. पण आता गीतिका आणि गीतेश सरांकडे पाहून तीची खात्री पटली. 

पण आता गीतिकाकडे बघून सायली देखील कमालीची अस्वस्थ झाली.

 अंजली देखील  हिरमुसल्या चेहऱ्यानी तिथून निघून जाऊ लागली. आणि रडायला लागली 
नेहाने अंजलीला थांबवलं....तिचे डोळे पुसले. आणि सोबत डान्स करायला लावला. 

सुरुवातीला हिरमुसलेली अंजली हळूहळू पुन्हा खुलायला लागली....

 मग बेभान होऊन सर्वांनी ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत मिरवणूक काढली. 

जागृती पॅनलचे बाकीचे उमेदवार मात्र श्वास पॅनलला मनातल्या मनात शिव्या देत होते. 

पण विश्वासची दमदाटी प्रचाराच्या काही दिवसापासूनच त्यांना नकोशी झाली होती.

 एका अर्थाने श्वास पॅनल निवडून आला म्हणून त्यांना आनंद झालेला होता. 

विश्वासमुळे रोज रोज येणारे दडपण आता नाहीसे झाले होते.

श्वास पॅनल मधल्या सगळ्याच उमेदवारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.सगळीकडे आनंदी आनंद झाला होता. 
मिरवणूक झाल्यानंतर मुले त्यांच्या रूमवर तर मुली हॉस्टेल वर गेल्या... हॉस्टेल वर देखील मुलींचे नाचून स्वागत झाले.
घोषणा झाल्या. 

तो दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा गेला. दिवसभराचा मानसिक ताण आणि शारीरिक ताण असल्यामुळे सगळेच थकून लवकर झोपी गेले. 

दुसऱ्या दिवशी सायलीने गीतिकाशी गीतेश सरांबद्दल बोलायचे असे ठरवले. रविवार असल्यामुळे सगळेच जण आळसावले होते. आधल्या दिवशीचा शीण होताच. 

गीतिका अंघोळीला गेल्याचे पाहून सायली, नेहा आणि अनुया जवळ आली. 

सायली : नेहा!!अनुया !! मला तुमच्याशी गीतिकाबद्दल महत्वाचे बोलायचे आहे. 

नेहा : काय 🤔?? 

सायली : मला असं वाटतं नुसतं वाटतं नाही खात्रीच आहे... की गीतिका गीतेश सरांकडे आकर्षित झाली आहे. आणि सर पण तिला रिस्पॉन्स देत आहेत... 

नेहा: 😳 काय??  कसं शक्य आहे... अगं सायली !!तू काहीही नको बोलूस...तू गीतिकाला विचारलं आहेस का?? 

सायली : विचारलं तर ती खरं सांगेल असं तूला वाटतं का?? तसंही मी दोन तीन वेळेस तिला टोकलं देखील.. मला तर असं वाटतं ना की त्यांच्याशी ती चॅटिंग सुद्धा करते. 

अनुया : 😳 बापरे, तरीच काल ती थोडी विचित्र वागत होती... मोकळेपणाने नाचली नाही.... 

सायली : आता भीती अशी वाटत आहे की त्या फालतू माणसामध्ये गीतिका गुंतली तर.... 

नेहा :ए नाही, बिलकुल नाही....असं असेल तर आपल्याला तिला आधीच यातून बाहेर काढावे लागेल. 

गीतिका अंघोळ करून आली.... रूम मध्ये सायली नाही हे बघताच तीने तीचे मेसेंजर उघडले... आणि गीतेश सर ऑनलाईन आहे का हे बघत होती... 

गीतेश सरांचा एक मेसेज इनबॉक्स मध्ये येऊन पडला होता. 
Hi dear काही कामानिमित्त परगावी जात आहे. तिथे नेटवर्क नाही त्या मुळे काही बोलता किंवा चॅटिंग करता येणार नाही.... काम खूप महत्वाचे आहे... नाहीतर गेलो नसतो. तो पर्यंत तू मला मेसेज किंवा फोन करू नकोस.. मी परत आल्यावर मेसेज करेल... बाय, सी यू सून.... 

Oh आज सुट्टीचे गीतेश सर देखील नाही... खूप बोर होईल आता... 

ईकडे गीतेश सर मात्र त्यांच्या बायकोसोबत संडे एंजॉय करण्यासाठी गेले होते.... 
संडे म्हणजे माझ्यासाठी एकदम सोनेरी दिवस असतो. तो मला माझ्या लाडक्या बायकोसोबतच घालवायचा असतो. त्यासाठी मी माझा फोन देखील स्विच ऑफ करून ठेवणार असं म्हणून गीतेश सरांनी त्यांच्या बायकोवर वेगळे इम्प्रेशन पाडले होते. 

गीतेश सरांचे वागणे बघून आधीच्या चारही मुलींनी गीतेशला  का घटस्फोट दिला असेल ह्याचा प्रश्न त्यांच्या बायकोला पडत असे.... 
जाऊदे काही का असेना त्या मुळे ईतके छान गीतेश मला मिळाले.असा विचार त्यांची बायको करत असे. 

गीतिका एकटीच रूममध्ये बसली असता नेहा अनुया आणि सायली तिथे आल्या... 

नेहा : काय झालं गीतिका?? 🤔 तू बोर झालेली दिसत आहेस... 

गीतिका : काही नाही गं असंच.... 

नेहा : खरंच कालच्या इतक्या जल्लोषानंतर आज एकदम शांत शांत खूपच बोर होत आहे... 

अनुया : मग आपण एखाद्या पिक्चरला जायचे काय?? तसंही संध्याकाळी जेवण नसतंच... पिक्चर संपला की बाहेर काहीतरी खाऊन येऊ... 

सायली : पण आपल्याला टॉकीज वगैरे काहीच माहिती नाही... 

 पण मला माहिती आहे😊... मी पण येऊ का? 🤔अंजली रूम मध्ये प्रवेश करत म्हणाली.... 

नेहा : ठिक आहे😊... तू पण ये... यास्मिन ला पण विचार.... 

अंजली : यास्मिन देखील येईलच..... 

अनुया : चला तर मग आपण सहाही जण दुपारी दोनला निघू....

ठरल्याप्रमाणे सगळ्या जणी पिक्चर बघायला गेल्या.... गीतिका मात्र एकदम शांत शांत स्वतः च्या विचारात मग्न अशी दिसत होती. 

नेहा अनुया आणि सायली ला गीतिका मध्ये झालेला हा बदल प्रकर्षाने जाणवला
क्रमश :
भाग 20 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या