नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
थिएटर ला सगळ्या गेल्या खऱ्या पण एकदा विश्वासघात झाल्यामुळे आता अंजलीवर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं.
त्यामुळे सायलीने नेहाला थिएटर near me असं search करायला लावलं होतं....
नेहाने गुगल वर search केलं होतं.. ... inox थिएटर हॉस्टेल पासून जास्त दूर नव्हते.... कॅब बूक करून .. कॅबने सर्वजण थिएटर पर्यंत गेल्या होत्या... ...
सगळ्याजणी दुपारी पिक्चर बघायला थिएटर मध्ये गेल्या तेव्हा ... जवळचे थिएटर असल्यामुळे कॉलेजचे बरेच जण पिक्चर बघण्यासाठी आले होते......
थिएटर मध्ये खूप गर्दी होती...
प्रज्वल आणि रोहन देखील पिक्चर बघण्यासाठी आले होते.
प्रज्वलला थिएटर मध्ये बघताच अनुयाच्या हृदयाची धडधड वाढली. तर सायलीला बघून रोहनची हालत काही वेगळी नव्हती.
अनुया : नेहा !!ते बघ प्रज्वल 😍आणि रोहन.....
नेहा : कुठे आहे... ओ ते तर आपल्या कडेच येत आहेत...
प्रज्वल : hi नेहा !! Hi girls....
Hi नेहा काय??🙄 जा मी नाही करत तूला hi.... अनुया मनातच म्हणाली...
नेहा !! आम्ही ईथे आलेलं तुझ्या मैत्रिणीला आवडले नाही वाटतं... प्रज्वल अनुया कडे चोरटा कटाक्ष टाकत म्हणाला...
अनुया : नाही... तसं काहीच नाही....
प्रज्वल : मग hi नाही केलंस...
म्हणजे इतक्या सगळ्या मध्ये मी त्याला hi केलं नाही हे त्याच्या लक्षात आलं🤔....
प्रज्वल :अगं अनुया !!काय विचार करत आहेस...
अनुया :अं, काही नाही...
प्रज्वल : बरं तूम्ही टिकेट्स काढले का??
नेहा :हो ऑनलाईन काढले....
प्रज्वल : माझा तोच मूर्खपणा झाला.. मी ऑनलाईन काढलेच नाही... आणि ही गर्दी पाहून आता मिळतील की नाही ह्याची गॅरेंटी नाही...
नेहा :आण ते पैसे ईकडे... मी try करून बघते...
असं म्हणून नेहा पटकन तिकिटांच्या रांगेत घुसली...
प्रज्वल : कसली बोल्ड आहे नेहा😊.... पटकन टिकेट्स काढायला गेली पण....
अनुया : हूं 🙄...अनुया चा जळून जळून तीळ पापड झाला होता.
सायली : hi रोहन !! Congratulations.... boys representatve झाल्याबद्दल, बाकी सर्वाना काल congrats केले पण तूला करायचे राहीले होते...
थँक्स अ लॉट... मला वाटलं विसरलीस 😊....
सायली : असं कसं विसरेन...
रोहन : 😳 अं...
सायली :अरे बॅचमेट ना तू... त्यातल्या त्यात इंट्रो पार्टनर.... तूला कशी विसरेन.
रोहन : अच्छा... असं आहे तर...
नेहाने टिकेट्स काढून आणले...
नेहा : प्रज्वल !! हे घे टिकेट्स...
प्रज्वल : थँक्स अ लॉट... नेहा !!तुने ये करके दिखाया...
कुछ चीजे experience से होती है....नेहाने तीची कॉलर उंच करत म्हटलं... चला आता दरवाजा ओपन झाला आहे... आत जाऊन बसू....
पिक्चर बघितल्यानंतर सर्व मैत्रिणी खूप खूष झाल्या होत्या...
अनुया :खरंच प्रेम असावं तर असं....
नेहा : हो बाई, मला पण ते ऍक्शन पिक्चर आवडतच नाहीत... हे अश्या प्रकारचे शांत आणि रोमँटिक पिक्चर आवडतात....
सायली : पिक्चर छान होता पण आता खूप भूक लागली यार.... चला हॉटेल मध्ये जाऊ...
यास्मिन : चलो तुम्हे एक अच्छे हॉटेल मे लेके जाती हूँ...नाम है हॉटेल पेशवा... बहोत अच्छी और सस्ती व्हेज थाली मिलती है...
यास्मिनने हॉटेल पेशवा मध्ये नेलं....
हॉटेलचे वातावरण एकदम छान होते... जागोजागी स्वछता देखील होती... सर्व वेटर्स एकसारख्या पोशाखात होते... आणि सगळ्यांशी अदबीने वागत होते....
अंजली :अरे वा यास्मिन !!ये सच मे बहोत अच्छा हॉटेल है |
सगळ्याजणी रिकामा टेबल पाहून तिथे बसल्यावर लागलीच वाढण्यासाठी सुरुवात झाली....
सगळ्यांना जाम भुका लागलेल्या होत्या सर्वांनी जेवायला सुरुवात केली...
अनुया : यास्मिन !! थँक्स यार... क्या सही जगह चूनी है | खाना भी बहोत बढिया है |
यास्मिन :वो क्या है ना... मुझे नॉनव्हेज ज्यादा पसंद नही...इसीलिये मेरे अब्बूने मुझे ये जगह बताई है |
अंजली : गीतिका !!काय झालंय तूला... तूझी तब्येत ठिक नाही का?? तू एक शब्द देखील बोलली नाहीस....
गीतिका : काही नाही गं... माहिती नाही काय कारण आहे ?? पण मला खूप बोर होत आहे... शांत राहावंसं वाटत आहे.... काहीच बोलावंसं वाटत नाही...
अंजली :प्रेमात बिमात पडलीस की काय?? ही सगळे लक्षणें तर प्रेमात पडल्याची लक्षणे आहेत....
गीतिका : काहीही काय बोलतेस अंजली 😡...
अंजली : अरे तूला राग आला... सॉरी मी तर आपलं सहजच...
गीतिका : प्लीज, मी आधीच बोर झाले आहे.. त्यात असा काही विषय नको...
गीतिकाचं असं वागणं सगळ्याच मैत्रिणींना खटकत होतं.... तीची चिडचिड पाहून आता नेहा, सायली आणि अनुयाला काळजी वाटायला लागली.....
कॅब कडे जाता जाता अंजलीने गीतिकाला एकटं गाठलं आणि म्हणाली गीतिका !!तू कितीही नाही म्हण पण ती व्यक्ती कोण आहे ते मी ओळखलं आहे आणि मी तूला त्यासाठी नक्कीच मदत करेल....
गीतिका :अगं तसं काही नाही....
अंजली : "गीतेश सर " हो ना... काल मी बघितल्या तुमच्या खाना खुणा.... तू काळजी करू नकोस... मी कुणालाच काही सांगणार नाही....
गीतिका ला एकदम आश्चर्य वाटले आणि चांगलं पण... कारण गीतिकाला आता अंजलीचा खूप मोठा आधार वाटायला लागला....
अंजलीने मात्र सर्वांच्या नकळत दुसरे विश्वासघातकी पाऊल उचलले होते. निवडणूक जिंकूनही तिला गर्ल्स representative होता आलं नव्हतं... आणि नेहा गर्ल्स representatve झाली होती हे तिला फार खटकलं होतं. गीतेश सरांमुळे अंजलीचे काम जास्त सोपे झाले होते
सगळ्या जणी वेळेतच हॉस्टेल मध्ये पोहोचल्या......
क्रमश :
पुढे वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या