"श्रेष्ठ कोण "

राधाबाईच्या सुखी घराला जणू नजरच लागली होती.
आज त्यांच्या दोन्हीही सुना घरातुन वेगळे निघायचे असा अट्टहास करत होत्या..

 त्या साठी घरामध्ये सतत वाद चालू होते. त्या वादाला घरातले सगळे कंटाळले होते. शेवटी वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागला...

पण असं काय घडलं होतं...की दोन्हीही सुनांसोबत एकत्र तीन वर्ष देखील राधाबाई काढू शकल्या नव्हत्या.... 

 राधाबाईचा मोठा मुलगा अभय व्यावसायिक होता.अभय दिवस रात्र काम करत असे. तो कामामध्ये ईतका व्यग्र होता की त्याचे सतत स्वतःच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करत असे.... 

त्याच कारणामुळे अभय साठी गृहिणी असणारी बायकोच योग्य ठरेल असे राधाबाईंना वाटले. मग त्यांनी स्वतःची भाची लक्ष्मीला सून करून घेतले. 

सुरुवातीला राधाबाई सुनेचे खूप कोडकौतुक करत असत. लक्ष्मी देखील सगळ्या कुटुंबाची काळजी तितक्याच प्रेमाने घेत असे.सगळं काही छान चालले होते. लक्ष्मी त्या घरातील एक महत्वाची व्यक्ती झाली होती.

 असेच दोन वर्ष चालले.
 त्यानंतर राधाबाईच्या दुसऱ्या मुलाचे विनयचे लग्न झाले. विनयचा तसा प्रेमविवाह...

 दोघेही एकाच शाळे मध्ये शिकवत असे. पूर्वा देखील नवीन घरात खूप समंजसपणे राहण्याचा प्रयत्न करत होती . जमेल तितकी मदत घरकामात करत असे.  

पण काही दिवसांनी जसजसे सणवार सुरु झाले...

 तस तसे घर कामाचा ताण लक्ष्मीवर जास्त पडू लागला.

शाळेत देखील सणवार साजरे करायचे असल्यामुळे पूर्वाला शाळेतले काम करणे गरजेचे असे.  

राधाबाईने देखील दोन्हीही सुनांमध्ये तूलना करणे सुरु केले.

जेव्हा सण असेल तेव्हा लक्ष्मी किती करते असं सगळ्यांनाच जमत नसतं. काही लोकांना तर कामचुकार पणा करण्याची संधीच पाहीजे असा उल्लेख राधाबाई मुद्दाम पूर्वा समोर करत असत.

 ज्यावेळी कुठला महत्वाचा व्यवहार करण्याचे काम पूर्वा करत असे किंवा बँकेची कामे, लाईट बिल, किराणा,काही महत्वाची खरेदी त्या वेळेस पूर्वाचे कौतुक करत असत पण प्रत्येकवेळी त्याची तुलना देखील लक्ष्मीसोबत होत असे. राधाबाई म्हणत असत किती मोठं काम केलं आज माझ्या हूशार सुनेने...

 अश्या कामासाठी शिक्षण असावं लागतं, नौकरी करावी लागते स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते... ...

 राधाबाईच्या अश्या बोलण्याने लक्ष्मी देखील खूप दुखावली जात असे. 

राधाबाईंच्या अश्या वागण्यामुळे आता लक्ष्मी आणि पूर्वा देखील एकमेकांना बरे पाहत नसत. दोघींमध्ये हेवेदावे सुरु झाले होते. सुरवातीला प्रेमाने राहणाऱ्या दोघी जावा आता एकमेकांना नकोश्या झाल्या होत्या. 

घरामध्ये वाद ईतके विकोपाला गेले होते की दोघीनींही एकाच घरात राहून दोन वेगवेगळे स्वयंपाकघर मांडले होते. पण राधाबाई कधी कधी त्यातही दोघींची तुलना करत असत त्या मुळे सरते शेवटी अभय आणि विनयने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

का घडलं होतं असं?? काय कारण होतं... लक्ष्मी आणि पूर्वा दोघीही आपापल्या कामात निपुण होत्या.दोघीही एकसारखी मेहनत घेत होत्या मग असे का?? 

राधाबाईने दोघीमध्ये तुलना करणे सुरु केले म्हणून?? माझं तर मत आहे गृहिणी असो वा नौकरदार /व्यावसायिक कुठलेच काम कमी नसते..दोन्हीही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ.....   आपण प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघितलं तर असा प्रश्नच उद्भभवणार नाही. आपला दृष्टीकोन जर बदलायला हवा... तुम्हाला काय वाटतं?? 🤔🤔

.नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या