"दुनिया गोल है "

विराज चा आज बाविसावा वाढदिवस होता.....

 आज त्याने वाढदिवसाच्या दिवशी मित्रांसोबत खूप धमाल करायचे ठरवले होते.

विराज शिकाऊ डॉक्टर होता.... त्याचं नुकतंच mbbs झालं होतं. आणि इंटर्नशिप चालू होती....

 त्यात तो सगळी कामे मन लाऊन करायचा त्यामुळे वाढदिवस सेलेब्रेशन साठी त्याच्या सरांनी त्याला लवकरच सुट्टी दिली होती....
 विराजला त्याचा वाढदिवस हा स्वतःचा दिवस वाटायला लागला होता.... तो खूप खूष होता... 

विराज आणि त्याचे पाच मित्र हॉस्टेल वरून गावामध्ये असणाऱ्या हॉटेल मध्ये जाणार होते आणि बाकीचे मित्र स्वःताहुन सेलेब्रेशन साठी येणार होते... 

सगळे मित्र तयार झाल्यावर रोडवर कोपऱ्यात असलेल्या ऑटो  रिक्षा स्टॅन्ड कडे गेले..... त्याने ऑटोरिक्षावाल्याशी बोलने सुरु केले.... तो ऑटो रिक्षावाला म्हणाला साहेब गाव बरंच दूर आहे जाण्याचे दोनशे रुपये लागतील...... वाढदिवसाच्या दिवशी वाद नको म्हणून विराज तयार झाला...... आणि बाकी दोन मित्रांना बसण्यासाठी दुसऱ्या ऑटोरिक्षा कडे जाऊ लागला...... 

तितक्यात त्याचा ठरलेला ऑटो रिक्षा वाला म्हणाला साहेब या दोघांनाही बसवा त्यांचे दोघांचे फक्त 50 रुपयेच वाढवतो..... 

विराज म्हणाला नको रे बाबा माझे पैसे जास्त गेले तर चालतील मी यांना दुसऱ्या ऑटोरिक्षात बसवतो ..... 

पण अचानक त्या ठरवलेल्या ऑटोरिक्षा वाल्याने अरेरावीची भाषा सुरु केली..... माझ्या ऑटो रिक्षामध्ये पाच लोकं बसल्या शिवाय मी ऑटोरिक्षा पुढे नेणार नाही.... 

विराज ऑटो रिक्षा वाल्याला म्हणाला अरे हे ट्रॅफिकच्या नियमात बसत नाही......

 पण ऑटो रिक्षेवाला काही ऐकायला तयार नव्हता.....

नियम बियम काही नाही......

पाच जण बसवता येतात...... 

 मग मात्र विराजला राग आला त्याने आपले मित्र त्या ऑटोरिक्षातून उतरवले आणि दुसरी ऑटोरिक्षा ठरऊ लागला.....

 पण ह्या ऑटो रिक्षेवाल्याने दुसऱ्या ऑटो रिक्षेवाल्याना धमकी दिली...... यांना बाहेर नेले तर माझ्याशी गाठ आहे..... 
ऑटोवाल्याच्या धमकीमुळे कुठलाही ऑटोरिक्षा त्यांना घेऊन जायला तयार होईना...... 
शेवटी विराज आणि त्याच्या मित्रांना सिटीबस ची वाट बघावी लागली..... आणि स्वतःच्या वाढदिवस सेलेब्रेशनला तो तब्बल तासभर उशीरा पोहोचला..... 

विराजला रिक्षेवाल्याचा खूप राग आला होता पण तो काहीच करू शकला नाही.....

दिवसामागून दिवस गेले.... 
विराजला या गोष्टीचा आता विसर पडला होता.... 
अचानक एके दिवशी त्याची अपघात विभागामध्ये ड्युटी असताना डोक्याला मार लागून गंभीर जखमी झालेली नऊ वर्षांची मुलगी काही लोकांना तिला उचलून आणले होते. 

..... विराज ने तपासून त्याचे सिनियर डॉक्टर येई पर्यंत सगळे प्राथमिक उपचार करून ठेवले होते..... स्वतः जातीने सिटी स्कॅन वगैरे करून घेतले होते..... नशिबाने तिच्या मेंदूला काही मार वगैरे लागला नव्हता....... डोक्याला टाके मात्र भरपूर पडले होते...... 

व्यवस्थित उपचार झाल्यावर विराज अपघात रूम च्या बाहेर कॉरिडॉर मध्ये आला..... तिथे एक माणूस चटकन त्याच्या पाया पडला..... साहेब माझ्या मुलीला वाचवा...... माझा राग तिच्यावर निघू देऊ नका..... विराज एकदम गोंधळून गेला.... तुमचा राग??त्याला काही समजेना.... 

विराज म्हणाला तुमच्या मुलीची तब्येत आता चांगली आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाही.... आणि तूम्ही असं का म्हणालात की माझा राग मुलीवर काढू नका म्हणून?? 
मग तो माणूस म्हणाला... साहेब !!मी तो रिक्षा वाला आहे.... मी तुमचं ऐकलं नाही आणि असेच जास्त जण या रिक्षामध्ये बसवत गेलो.... आज सकाळी मीच माझ्या घरचे सगळे आणि मुलीला रिक्षा मध्ये नेत होतो खड्डा आला आणि ती बाहेर फेकल्या गेली... जास्त जण बसलेले असल्याने ती अलगद बाहेर पडली..... 

विराजला वाढदिवसाच्या दिवशी घडलेली घटना आठवली.... तो रिक्षा वाल्याला म्हणाला.... दुनिया गोल है कुणाची कधी कशी परत भेट होईल सांगता येत नाही.... आणि ती घटना तर मी केव्हाच विसरून गेलो होतो... तसं ही त्या घटनेचा आणि तुमच्या मुलीशी मी वागण्याचा काहीही संबंध नाही.... मी माझं कर्तव्य पार पाडणारच..... आणि ट्रॅफिक नियमांचे म्हणाल तर ते बनलेत कश्यासाठी?? आपल्या  सुरक्षितते साठीच ना.... मान्य आहे सूरुवातील न समजल्याने आपल्याला ते अवघड वाटतील पण एकदा सवय झाली की आपणच नियमांचे उल्लंघन चुकूनही करणार नाही.... कुठल्याही गोष्टीची सवय लागायला थोडा वेळ लागतोच ना...... 

रिक्षा वाल्याने ते मान्य केले..... आता कधीही कुठल्याही व्यक्ती सोबत तो रिक्षा वाला वाद घालत नाही आणि नियमानुसार ऑटो रिक्षा चालवतो......

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang




Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या