आमच्यासारखे आम्हीच (भाग 29)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

अनुयाने फोन स्पीकरवर केला....

नेहा :प्रज्वल!! पाच मिनीटांनी व्हिडिओ कॉल कर....

प्रज्वल ने फोन कट📳 केला...

अनुया : व्हिडीओ कॉल 🤔 तो आता कश्याला??

नेहा : मी तूला फक्त पाच मिनिट वेळ देते तू तयार होऊन गीतिकाच्या रूममध्ये ये...

नेहाचं हे काय चाललंय?? 🤔arranपाच मिनिट,पाच मिनिट काहीही असो प्रज्वलने मला बर्थडे wish केलं😍😍... ते देखील सगळ्यांनी wish करण्याआधी😊....असा विचार करत करत अनुया तयार झाली....

गीतिकाच्या रूमचे दार लावलेले होते....लावलेले दार बघून अनुया एकदम गोंधळून गेली....

अनुयाने गीतिकाच्या रूमचा दरवाजा ठोठावला....

दरवाजा उघडताच अनुया एकदम विस्मयचकित 😳झाली....

रूमची arrangement एकदम बदललेली होती... हार्टच्या आकाराचे फुग्यांनी रूम डेकोरेट  केली होती.रूम खूपच आकर्षक वाटत होती... समोर एक छोटासा टेबल ठेवला होता... त्या टेबलवर अनुयाला आवडणारा ब्लॅक फ़ॉरेस्ट केक ठेवलेला होता 😍😍.... अनुयाला सगळं सरप्राईज  करणारं होतं....

अनुया : बापरे 😳नेहा, गीतिका, सायली हे तूम्ही कधी केलं??🤔 आणि हे सगळं तूम्ही कधी मागवलं??मला तर त्याचा थांगपत्ता देखील लागला नाही.... थँक्स अ लॉट...

नेहा : अगं अनुया!! थँक्स म्हणायची ईतकी घाई करू नकोस.... और बहोत सारे surprises बाकी है 😍😍😍

अनुया : खरं??🤔 wow, मग तर आज माझा खरंच स्पेशल day आहे...

नेहा : चला आला प्रज्वलचा व्हिडिओ कॉल....आपण काय करू या प्रज्वलला ना ईथे कोपऱ्यात ठेऊ... म्हणजे त्याला सगळं दिसेल...

अनुया :काय??😍😍🥰🥰

नेहाने व्हिडीओ कॉल accept केला...

नेहा : हे बघ प्रज्वल!! व्यवस्थित डेकोरेशन झालं ना अगदी तूला पाहीजे तसं...

प्रज्वल :😊परफेक्ट, नेहा असल्यावर होणारच... त्यात वादच नाही...

सायली : ए प्रज्वल!! प्लॅनिंग जरी तुमचं असेल ना तरी डेकोरेशन आम्ही सुद्धा केलंय... समजलं 😡..

प्रज्वल : बरं.. तूम्ही सर्वांनी मिळून अगदी परफेक्ट डेकोरेशन केलंय...

अनुया : 😳नेहा!!प्रज्वल!! किती धक्क्यावर धक्के देणार आहात तूम्ही....

नेहा : हो का?? चला cake 🎂कट करू या...

अनुया :omg... माझा favourite ब्लॅक फ़ॉरेस्ट केक

नेहा : अनुया!! हे सगळं प्रज्वलने केलं आहे बरं... खास तुझ्यासाठी.😍😍..

अनुया : 😊 माझ्यासाठी...🥰🥰 थँक्स... थँक्स अ लॉट प्रज्वल...

प्रज्वल : मला असलं थँक्स नकोय... स्पेशल थँक्स पाहिजे आहे 😉

ओय होय.... How romaintic...तिघी पण एकसुरात म्हणाल्या....

अनुया आणि प्रज्वल दोघेही लाजून चुर्रर्र झालेले होते...🥰🥰🥰

नेहा : अनुया!!आता लवकर केक कट कर... हॉस्टेलच्या मुली तूला wish करण्यासाठी येणार आहेत....

अनुयाने तिच्या चार प्रिय मैत्रिणीच्या साक्षीने आणि प्रज्वलच्या साक्षीने केक कट केला....

नेहा : अनुया!!आता प्रज्वलला केक भरव....

अनुया :😳  नेहा!!काहीतरीच काय??🥰🥰 

नेहा : प्रज्वल!! तुझ्यासाठी खास उद्या पार्टी 😉....

अनुया : हो प्रज्वल!!नक्कीच येशील....

प्रज्वल : जो हुकूम मेरे आका😉...

मै जोरू का गुलाम बनके रहुंगा... नेहा मुद्दाम प्रज्वलला चिडवयला लागली...

प्रज्वल : असू दे,असू दे... बरं मला वाटतं आता मी कॉल बंद करावा... बाकी मुली येतील ना....पण नेहा!! ते दाखव प्लीज... काहीतरी खुणावत प्रज्वल म्हणाला...

नेहा : हो रे प्रज्वल!! दाखवते.... तूझ्यासमोर दाखवू का...

प्रज्वल : नको नको... तुम्हालाच नंतर उशीर होईल.... चला ठेवतो मी फोन... अनुया!!पुन्हा एकदा happy बर्थडे...

अनुया :🥰 थँक्स 😊

गीतिका : नेहा!!प्रज्वल काय दाखव म्हणाला...

श्श 🤫... मुलींचा घोळका ईथेच येत आहे.... तो दुसरा एक छोटा केक त्या तिथे ठेवला होता तो काढा गं...रूमच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या कार्टून कडे बोट दाखवत नेहा म्हणाली....

गीतिकाने केक काढला

अनुया : हे काय?? आता🤔... आणि हे कुणी आणलं??

यास्मिन :अपने बॅच के लडकियोंने  काँट्रीब्युशन करके लाया.. हम तो डेकोरेशनका भी बोल रहे थे... लेकीन नेहाने बोला की डेकोरेशन हम करेंगे... पर क्या सही डेकोरेशन कीया है ना....

अंजली : अनुया!! खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे... माझ्या पण बर्थडेला असंच डेकोरेशन करायचं बरं का, बरं लवकर केक कट कर... केक खूप यम्मी😋😋 दिसत आहे.....

 अनुयाने परत एकदा केक🎂 कट केला....

अंजली : अनुया!! आता तू किती वर्ष म्हातारी झाली आहेस गं 🙄

यास्मिन : क्या अंजली!!कुछ भी क्या बोल रही हो ??

अंजली : अरे यास्मिन मेरे कहने का मतलब कितनी yrs old 😉

अनुया : 18 पूर्ण... आता मी खरी खुरी मतदार 😇...

आणि खरी खुरी उमेदवार नेहा हळूच अनुयाच्या कानात म्हणाली..

केक कट झाल्यावर सायलीने कार्टून मधले सामोसे काढले... सोबत पेपर प्लेट्स होत्या... सगळ्यांना सामोसे देऊन झाले....सोबत कोल्ड ड्रिंक्स देखील होते...

सर्वांचे खाणे झाल्यावर मस्ती मजा सुरु झाली.... गाणे लाऊन डान्स देखील झाला.... रात्रीचा एक वाजून गेला तरी सगळ्या मुलींच्या अंगात एक उत्साह संचारला होता... फ्रेशर्स मुलींचं तर पहिलं बर्थडे सेलेब्रेशन होतं... त्यांना हा पहिला वहिला अनुभव खूप आनंद😍😍 देऊन जात होता....

खूप नाचून थकल्यावर एक एक करून सर्वचजणी झोपण्यासाठी निघून गेल्या...

गीतिका :खरंच आज किती मज्जा आली ना... मी तर माझ्यासोबत काल काय घडलं हे देखील विसरून गेले...

सायली : खरंच खूप छान सुरुवात झाली अनुयाच्या बर्थडे ची.

अनुया : थँक्स अ लॉट नेहा, सायली आणि गीतिका..

सायली : का गं नेहा!! ईतक्या दिवसापासून  हे चालू होतं का? प्रज्वल आणि तूझ्यामध्ये...

नेहा : हा हा हा.... मग तूला काय वाटलं.??🤔...अगं मी पण थोडा सस्पेन्स create केला... बघत होते अनुया माझ्याशी कधी भांडते ते...

अनुया : खडूस... तूला त्याच्यासोबत बघून ईकडे माझा जीव जात होता आणि तू....

नेहा : अनुया!! प्रज्वललाच तूला सरप्राईज द्यायचं होतं... मी तरी काय करणार.... पहिल्या वेळेस प्रज्वल मला भेटला तेव्हा त्याने तूझ्या बर्थडेची तारीख कन्फर्म करून घेतली होती ...त्याच वेळेस मला ईतका आनंद झाला होता..
पण मला प्रज्वलने वॉर्निंग दिली होती... त्याला surprise द्यायचं होतं म्हणून... मग त्याच संदर्भात प्लॅन करण्यासाठी आम्ही भेटत होतो 😊...

अनुया : नेहा!!मी काय बोलू... थँक्स अ लॉट dear...

नेहा : अगं अनुया!! ईतकी हुरळून जाऊ नकोस.... सरप्राईज अजून संपलं नाही dear....

अनुया :म्हणजे??🤔

क्रमश :
भाग 30 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचायची असल्यास खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या