नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
रोहन बिचारा सायली च्या विचारात गढून गेला... खरंच सायलीला मी आवडत असेल का?🤔 की दुसरं कुणी...
छे छे दुसरं कुणी नक्कीच नाही... सायली एकदम नाकासमोर सरळ चालणारी मुलगी आहे.... मी तिच्याकडे ईतकं बघतो पण ती माझ्याकडे बघेल तर शप्पथ🙄...
सायली बोलताना देखील अभ्यास विषय सोडून दुसऱ्या विषयावर बिलकुल बोलत नाही.....
😒जाऊदे रोहन आता आपल्या टेस्ट होणार आहेत.. त्या कडे लक्ष द्या... प्रोजेक्ट सबमिशन देखील अजून बाकी आहे...
क्लासमधील आता सर्वांना टेस्ट चे वेध लागले होते.... सगळीकडे अभ्यासाचे वातावरण सुरु झाले होते.
प्रोजेक्ट सबमिशन आणि बाकी पुस्तकी अभ्यास आता दिवसाचे 24तास देखील पुरेसे होत नसत....
साध्या टेस्ट असल्यामुळे नियमित कॉलेज चालू असताना असा अभ्यास सगळ्यांना करावा लागे.
कुणी रात्री जागून तर कुणी पहाटे लवकर उठून अभ्यास करत असे.
अनुयाचे आणि प्रज्वलचे देखील थोडेफार चॅटिंग होत असे...
अनुया : hi प्रज्वल!!
प्रज्वल : hi अनुया!! काय म्हणतेस कसं चाललंय सगळं??🤔
अनुया : काही नाही रे, या टेस्ट्स चं टेन्शन येत आहे...
प्रज्वल : अनुया!!अगं साध्या टेस्ट्स आहेत त्या.. त्यांना तू घाबरतेस 🤔??
अनुया : तसं नाही रे ए एम आणि ई डी ची जरा भीती वाटतेय... तसं दिव्या आणि मीनाने सगळं करून घेतलं आहे.... पण तरी देखील प्रश्न काय असतील?? काय माहिती....
प्रज्वल : ईतकच ना...तू नको टेन्शन घेऊ.....मी तूला गेसपेपर काढून देतो...
अनुया : चालेल....
प्रज्वल : तू अभ्यास कर... मी गेस पेपर काढून तासाभराने पोस्ट करतो... बाय
अनुया : बाय...
वा काय आमच्या लव्हस्टोरीची😍 सुरुवात आहे.... लव्ह लेटर च्या ऐवजी गेस पेपर 🙄.... चल प्रज्वल आता तूला लव्ह लेटर आय मीन गेस पेपर तयार करायचा आहे😊😍....
पहिल्या दिवशी mathmatics चा पेपर होता... प्रज्वलने गेसपेपर काढून अनुयाला पोस्ट केला.
वेळापत्रकानुसार प्रज्वलने गेस पेपर तयार केले आणि अनुयाला पाठवले....
अनुया आणि बाकी तिघी देखील ते गेस पेपर एकदा त्यांच्या नजरेखालून घालत असत....
अंजली : अनुया!!तूला प्रज्वलने गेस पेपर पाठवले म्हणे... मला बघू?🤔
अनुया :😳 तूला कुणी सांगितले??
अंजली : अजून कोण सांगणार??🤔विकीने..
अनुया : झेंडूने 🤔... त्याला कसं... अच्छा आलं लक्षात... रोहनमुळे.... बरं मी तूला फॉरवर्ड करते थांब....
अंजली : ह्याच्यात सगळे प्रश्न तर कव्हर केलेत.... गेस पेपर, म्हणे 😏....
अनुया : राहू दे... तू नको घेऊस हे गेस पेपर... तूझ्या सारख्या जिनियस मुलीच्या काहीच कामाची नाहीये😏...
अंजली : आता कसं बरोबर बोललीस... मी बाई माझा अभ्यासच करते...
टेस्ट्स झाल्या...... सगळेच प्रश्न प्रज्वलच्या गेस पेपर नुसार टेस्ट्स मध्ये येत आणि अवघड विषय आधीच कव्हर झाल्यामुळे सगळेच पेपर छान गेले.
प्रज्वलच्या गेस पेपर नुसार प्रश्न येत असल्यामुळे अनुया तर प्रज्वलवर अजून जास्त इंप्रेस😍😍 झाली.
ईकडे गीतिकाला गीतेश सर न चुकता गूड मॉर्निंग आणि गूड नाईटचा मेसेज करत....गीतिका मात्र आता रिप्लाय करत नव्हती.... तीला बऱ्याचदा वाटत असे की गीतेश सरांना एकदाचं ब्लॉक करून टाकावं... पण त्यांना कशाचाही संशय येऊ नये म्हणून ती ते सहन करत होती...
टेस्ट्स झाल्यावर ठरल्या प्रमाणे मिशन गीतेश सर सुरु होणार होतं.....
टेस्ट्स चा शेवटचा पेपर संपला.... आता चौघीनींही गीतेश सरांना कश्याप्रकारे धडा शिकवायचा ह्याचा विचार करायला सुरुवात केली.....
नेहा : गीतिका!! मला वाटतं की आपण आता या सरांच्या बायका शोधव्या लागतील....आताच ती योग्य वेळ आहे...
गीतिका : माझ्या माहितीप्रमाणे जर गीतेश सरांची पहिली बायको सोडली तर बाकीच्या चारही बायका आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत.
नेहा : करेक्ट, म्हणजे त्यांचे पत्ते आणि फोन नंबर आपल्याला आपल्या कॉलेज ऑफिस मधूनच मिळेल....
अनुया : वा काय करेक्ट लॉजिक लावलं आहे....पण आपल्याला हे नंबर किंवा पत्ता ऑफिस मधून कसा मिळणार??🤔
सायली : मी सुचवू का?? या बाबतीत प्रज्वल आपल्याला मदत करू शकेल.
नेहा :अरे हो... अनुया!!तू एकदा प्रज्वल ला विचारून बघ ना ...
अनुया : हो, संध्याकाळी प्रज्वल मला फोन📳 करणार आहे... तेव्हा विचारते....
नेहा : ओहो आज फोन वोन📳....
अनुया : नेहा!!🥰 तू पण ना...
प्रज्वलने ठरल्या वेळेला फोन केला....
प्रज्वल : हॅलो अनुया!!
अनुया : हॅलो
प्रज्वलला एकदम काय बोलावे ते सुचत नव्हते. क्षणभर विचार करून त्याने विचारलं... जेवण झाले का??
काय प्रज्वल!!तू पण कसले प्रश्न विचारतोस... मेसेंजर विचारणाऱ्या अनोळखी लंपट लोकांसारखे🙄....असं मनात म्हणून अनुया म्हणाली हो आताच झालं....
प्रज्वल पुन्हा शांतच....
अनुया : प्रज्वल!!तूझे गेस पेपर खूप मदतीला आले...
प्रज्वल : थँक्स... पण खरं सांगू का... गेस म्हणून मी जवळ जवळ सगळंच देत होतो....
अनुया : तरी देखील.... बरेच प्रश्न तू दिलेले अगदीच जश्याच्या तसे आले....
प्रज्वल :अनुया!!आता काय आपण परीक्षेबद्दल बोलायचं??
अनुया : अं, नाही...बरं ऐक ना प्रज्वल!! ते गीतेश सर आहेत ना त्यांच्या आधीच्या सर्व बायकांचे adress किंवा फोन नंबर पाहीजे होते.... मिळू शकतील का??
प्रज्वल : काय 😳?? गीतेश सरांच्या आधीच्या सर्व बायकांचे ऍड्रेस?? कशासाठी हवेत??🤔....
अनुया : काही नाही... त्यांना चांगला धडा शिकवायचा होता.... म्हणजे या पुढे ते असं काही करणार नाहीत... आणि आता धडा शिकवायचा म्हणजे आधीची हिस्ट्री माहिती हवी ना...
प्रज्वल : अनुया!! कशाला त्या फालतू माणसाच्या नादाला लागता😡......काय गरज आहे त्याला धडा शिकवायची😡.... माझं तर स्पष्ट मत आहे तू या फंदात पडू नकोस😡 ..... काय यार अनुया!!त्या फालतू माणसाचा विषय काढून तू पार मूड खराब केला आहे...चल ठेवतो फोन...
प्रज्वलने रागातच😡 फोन📳 ठेवला.... अनुयाला एक शब्द देखील बोलण्याचा चान्स दिला नाही ....
फोन 📳ठेवल्या ठेवल्या अनुया रडायला 😭लागली....हा प्रज्वल याने माझं एकदा तर ऐकून घ्यायचं ना... पण मी तरी त्याला काय सांगणार होते🤔.... गीतिका बद्दल त्याला सांगणं योग्य होतं का??🤔... जाऊदे बाबा या प्रज्वलला तर कधीच ऐकून घ्यायचं नसतं मला नुसता रडवत असतो.....
नेहा : अनुया का रडत आहेस?? काय झालं
क्रमश :
भाग 34वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या